मिस्टर काय करतात.. ?
स्क्रीन काळा आणि मोठ्ठा गोळा या पुस्तकातून... ऑनलाईन नसल्याने फार कोणी वाचलं नसावं.
........................
आमच्या एक शिक्षिका माझ्या आईची मैत्रीण म्हणजे फ्यामिली फ्रेंडही होत्या. (काय नशीब..! काय नशीब..!! तेव्हापासूनच हे असंच..)
त्यांच्याकडे गेलं की नेहमी त्या एका बरणीतून मारी बिस्कीट काढून द्यायच्या. दहा एक वर्षं मी तिथे जात राहिलो. पण तीच फळी, तोच डबा आणि तेच मारी...
त्यांच्याकडे टायगर म्हणून एक मोठा कुत्रा होता. तो नेहमी उदास दिसायचा. मारी एक्स्प्लेन्स दॅट..
- Read more about मिस्टर काय करतात.. ?
- 108 comments
- Log in or register to post comments
- 44385 views
अण्णा हजारे यांनी आपले मौन सोडायला हवे
Taxonomy upgrade extras
ज्या कारणांसाठी टीम अण्णांनी देशव्यापी आंदोलन केले आहे, तेच आरोप आता टीम अण्णांवर होत आहेत. ज्यांनी मोठ्या विश्वासाने या टीमवर विश्वास दाखवला होता, त्या लोकांसाठी हा सगळा प्रकार दुर्दैवी म्हटला पाहिजे. टीम अण्णांवर चोहोबाजूंनी होत असलेला आरोप आणि टीका याला अण्णा हजारे यांनी आपले मौन व्रत सोडून उत्तर द्यायला हवे, अन्यथा आधीच संशयाच्या गर्देत सापडलेले अण्णांचे मौनसुद्धा बदनाम झाल्याशिवाय राहणार नाही. मौनाला मोठी सात्त्वीक परंपरा आहे. ही परंपरा अण्णांकडून जोपासली गेली पाहिजे.
- Read more about अण्णा हजारे यांनी आपले मौन सोडायला हवे
- 6 comments
- Log in or register to post comments
- 4002 views
गॅन्गबॅन्गपुरम्
सॉफ्ट आणि सिल्की सॅण्डलवूड क्रीमचं ऍनिमेशन
तुझ्यावरती फुगा फुटल्यासारखं येऊन आदळतं,
आणि तुझ्या अपरलिपची पोझिशन साधून
बांबूमुळे फाटलेल्या फ्लेक्सबोर्डचं
झाकण उचलून एक जण
बाहेर काढतो अलगद धडोत्तरी मुंडकं.
तिथून मी पॅन करतो तर
टीव्हीवर आणि थ्रीजीवर स्ट्रीम होत होत
तू काजळ घातलेल्या, लिपस्टिक लावलेल्या
केसांच्या खोप्यावर काही दागिने आणि
वेण्या चढवून, एण्ट्री विसरुन
विंगेत बरबट चॉकलेट खाणार्या
एका मुद्रेत मावेनाशी होतेस.
आम्ही रस्त्यांतून अवाक्.
आमचे ड्रायव्हर अवाक्.
आमच्या घरात, क्लबात
आम्ही सारेच दात दाबून
स्तब्ध.
तू फ्रेंच किस ने आम्हाला
ल्यूब्रिकंट हवा
- Read more about गॅन्गबॅन्गपुरम्
- 34 comments
- Log in or register to post comments
- 14432 views
मोंगलाई बिरयाणी
साहित्य :
बासमती तांदूळ १ किलो
मटण किंवा चिकन १/२ किलो
दही ४०० ग्रॅम
अननस १ (गोल चकत्या करुन)
सुके आलू बुखार (७-८)
४-५ कांदे (उभे चिरुन)
बटाटे (उभे कापुन)
लवंग - १६
दालचिनी ८ तुकडे
तमालपत्र ८
वेलची १०
काळीमिरी १६
जिर १ चमचा
मिरची पावडर १ चमचा
आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट २ ते ३ मोठे चमचे
हिंग
हळद
मिठ
३-४ चमचे तेल
तुप
गव्हाचे पिठ (मळून)
- Read more about मोंगलाई बिरयाणी
- 10 comments
- Log in or register to post comments
- 10494 views
हवेतल्या गोष्टी - ४ - उरले ते मोती
संदर्भासाठी आधिच्या भागांचे इतर संस्थळावरचे दुवे दिले आहेत.
हवेतल्या गोष्टी - १
हवेतल्या गोष्टी - २ : ती
हवेतल्या गोष्टी - ३ - पिंज-याचे दार उघडावे...
पावसाळ्यातील अशीच एक फ्लाईट, अगदी पहाटे पहाटे निघालो होतो. वास्तविक पहाटेची फ्लाईट म्हणजे माझी अगदी आवडती. आजूबाजूची रात्रीबेरात्री उठून विमानतळावर आलेली मंडळी, पुन्हा झोपेच्या आधीन होत असताना, मी टक्क जागा असतो.
- Read more about हवेतल्या गोष्टी - ४ - उरले ते मोती
- 5 comments
- Log in or register to post comments
- 3812 views
जो जास्त बडबड करतो
Taxonomy upgrade extras
"जो जास्त बडबड करतो, तो सगळ्यांच्या लक्षात राहतो. जो गडबड करतो, तो लक्ष वेधून घेतो. जो तडफड करतो, त्याच्याविषयी सहानुभूती वाढत जाते. जो कडकड करतो, त्याला काही तरी मिळून जाते. गप्प राहणार्याचे मोती खपत नाहीत, पण बडबड करणार्याची वाळूही खपते म्हणतात" या साहित्यिक तत्वज्ञानावर मी भरपेट खूश आहे. मी यात स्वतः ला पडताळलं. तुमचं काय मत आहे?
- Read more about जो जास्त बडबड करतो
- 12 comments
- Log in or register to post comments
- 4980 views
मुलीची आई
मुलगी जन्मली
सगळे म्हणाले
लक्ष्मी आली घरी
खूप बरं वाटलं, कारण आईच ना मी ||१||
अंगणातल्या चिमण्या
घरीदारी नाचतात
तरी घरट्याकडे वळतात, सांजेच्या वेळात ||२||
झगे परकरपोलके झाले
साड्याचोळ्या ल्याल्या
पहातापहाता जरा मोठ्याच दिसू लागल्या ||३||
शिकल्या सवरल्या
स्वावलंबी झाल्या
आणि मन पोखरू लागल्या, उदासी सावल्या ||४||
आईचं काळीज
धडधडू लागलं
पण कर्तव्याची जाण मन खाऊ लागलं ||५||
मुलीची जात
नाही रहाणार घरात
जाईल परक्यात, पण नांदेल सुखात ||६||
तेव्हा वाटलं -
"आत्या व्हावं, मावशी व्हावं
भावाबहीणींची व्हावं ताई,पण कठीण होणं मुलीची आई" ||७||
- Read more about मुलीची आई
- 3 comments
- Log in or register to post comments
- 4007 views
अक्साई चीन
पहिल्यांदा "अक्साई चीन" हा शब्द वाचला-ऐकला होता तेव्हा एक परिचित "हा चीनने भारताचा ढापलेला प्रदेश आहे" अशी माहिती मला तावातावाने देत होते. अर्थातच या भागाबद्दल बाकी कोणतीही माहिती न देता सदर परिचितांच्या चर्चेची गाडी नेहरूंवर घसरली आणि जणू काही नेहरू नसते तर अक्साई चीन आपल्याकडून सुटला नसता अश्या आविर्भावात ते तावातावाने बोलत होते. त्यांच्या भावना प्रामाणिक होत्या मात्र त्या इतक्या खोलापर्यंत पोचल्या होत्या की त्यांच्या लेखी सत्य काय हे जाणण्यापेक्षा तत्कालीन राजकारण्यांवर राग व्यक्त करण्याचे साधन इतकेच महत्त्व 'अक्साई चीन' चे राहिले होते.
- Read more about अक्साई चीन
- 8 comments
- Log in or register to post comments
- 7923 views
दोन उदास चेहरे
प्रेमासारख्या प्रकरणांच्या आठवणींचा दरवाजा सगळ्या शक्यतांचे द्वार बंद झाल्यावर आपोआप खुलतात.एका वयाच्या पावसाबरोबरच जुन्या प्रियेसीला याद करण्याचा मौसम सुरू व्हायला लागतो. मी खिडकीजवळ बसलो आहे. आणि बाहेर पाण्याबरोबरच आठवणींचा पाऊस कोसळू लागलाय. मन असं काही चिंब भिजून जातंय की, त्याचा कुणालाही पत्ता लागणं शक्य नाही. पण आता कुणी टपकलंच तर मात्र लपवणं कठीण होऊन जाईल.सालं भयंकर आहे सारं.
- Read more about दोन उदास चेहरे
- 9 comments
- Log in or register to post comments
- 7063 views
पिवळ्या पुस्तकांना संग्रालयात पाठवा
आमची प्रेरणा-पिवळ्या दिव्याला संग्रालयात पाठवा
हे विडंबन कृपया हलकेच घ्या. मूळ लेखाविषयी आम्हाला आदर आहेच.
- Read more about पिवळ्या पुस्तकांना संग्रालयात पाठवा
- 54 comments
- Log in or register to post comments
- 25301 views