गद्य

कंट्री सॉन्ग्ज

अमेरिकेत कंत्राटदार (कॉन्ट्रॅक्टर) नोकरीमध्ये खूप खूप गावे/शहरे फिरायला मिळाले. खूपशा राज्यात बरीच वर्षे काढल्याने, तेथील राहणीमान समजायला मदत झाली. गावाकडचे आयुष्य आणि शहरातले आयुष्य यात बरीच तफावत असते हे लक्षात आले. उदाहरणार्थ - शहर फार इंडिफरेन्ट असते, कोणाचे कोणाच्या आयुष्यात लक्ष नसते. कामास काम, बाकी तुम्ही तुमचे राजे. on your own . याउलट गावात प्रत्येकाला प्रत्येकजण माहीत असतो. आपुलकी असते पण पायात पायही असल्यासारखे वाटते. तुम्हाला काय सूट होते, तुम्ही ठरवायचे. शहरात उंच टोलेजंग इमारती तर गावात टुमदार, प्रशस्त घरे, खूप मोकळे परसदार, आवार.

ललित लेखनाचा प्रकार: 

कोव्हिड आला रे अंगणी - राजेंद्र कार्लेकर

मुंबईचे राजेंद्र कार्लेकर सांगताहेत आपले कोव्हिडचे अनुभव - १७ ऑगस्टला COVID-19करता रिपोर्ट काढला आणि वाटू लागलं की आपला नंबर लागणार. मी आणि बायको एकाच बोटीतील प्रवासी. दोघांनाही ताप होता आणि बायकोला वास येत नव्हता. घरात दोघंच असल्याने होम क्वारंटाईन होण्याची शक्यता होती. जरा बरं वाटलं. पाच महिन्यांनी ब्रेक मिळणार होता. आम्ही दोघेही बँकर असल्याने ऑफिस चालू होतंच गेले ५ महिने.

ललित लेखनाचा प्रकार: 

करोना: काही नोंदी आणि निरीक्षणे (भाग ४)

Rain and a leaf

ललित लेखनाचा प्रकार: 

पंधरा आणि सोळा ऑगस्टच्या (२०२०) काही नोंदी

नेमेचि येतो मग पंधरा ऑगस्ट. अर्थात लहानपणाच्या आठवणीत या दिवसाला त्याचा स्वतःचा उत्सवी असा रंग आहे , झेंडूच्या फुलांचा वास आहे, त्याच्याशी निगडित पेढे , बर्फी, बासुंदी कधी जिलेबीच्या चवीच्या आठवणी आहेत. परंतु जीवन प्रवाही आहे, आणि गेली काही वर्षे १५ ऑगस्ट फार वेगळा उगवतो. एक तर आपल्या नेहमीच्याच, ओळखीच्या वातावरणात हे उत्सव साजरे करणे आणि एक स्थलांतरित म्हणून हे उत्सव साजरे करणे यात खूप फरक आहे. अर्थात तुलना केली तर फरक आहे आणि तुलना केली नाहीच तर प्रत्येक अनुभव हा एकमेवाद्वितीयच आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

एका डॉक्टरची करोना बखर

पुणे येथील एक कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. चाबुकस्वार (वय वर्षे ६२) यांचा करोनाकाळातला अनुभव.

ललित लेखनाचा प्रकार: 

करोना काळातली निरीक्षणं, अनुभव (भाग ३)

करोना काळातली निरीक्षणं, अनुभव सांगताहेत म्रिन

ललित लेखनाचा प्रकार: 

माया नावाची संकल्पना

मध्यंतरी सॅम जेप्पी (https://www.youtube.com/c/sadasiva108/featured) या माझ्या आवडत्या ज्योतिषाचा एक व्हिडीओ यु ट्युबवरती पहात होते. चंद्राचे कुंडलीतील कारकत्व या विषयावरचा तो व्हिडीओ होता. आत्ता सापडत नाहीये. सापडला की देते. हा व्हिडीओ ऐकताना, मला एक विलक्षण माहीती सहज सापडुन गेली. इट वॉज अ युरेका मोमेंट फॉर मी. ज्योतिषात चंद्राला मायेचे कारकत्व दिलेले आहे. म्हणजे हा ग्रह मायेचा कारक आहे. जसे सूर्य आत्म्याचा कारक तसा चंद्र मायेचा कारक. दर वेळेला मी हे वाचत आलेले आहे. त्यावरती क्वचित चिंतन केलेले आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

आंबट गोड

(असच काही आठवलं म्हणून ....)

आज बस जवळ जवळ रिकामीच होती. आणि मला चक्क बसायला जागा मिळाली होती. उभ्याने प्रवास करणारे नव्हतेच. त्यामुळे आजचा प्रवास सुखद असेल असे वाटत तरी होते.
तेव्हढ्यात "आई ग्गं !!! कित्ती आंबट आहे. " असे जरा मोट्ठ्या आवाजातले उद्गार ऐकू आले.

ललित लेखनाचा प्रकार: 

१८९७ माणदेश । औंधातला प्लेग

भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी, अर्थात बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांची थोडीफार ओळख मराठी वाचकांना असेलच. आचार्य अत्र्यांनी ‘साष्टांग नमस्कार’ नाटकाची प्रेरणा ज्यांच्यावरून घेतली ते, किंवा व्ही.शांताराम यांचा ‘दो ऑंखे बारा हाथ’ ज्या खुल्या तुरुंगाच्या संकल्पनेवर बेतला होता ती संकल्पना राबवणारे, औंधात हायस्कूल आणि बोर्डिंग काढून त्यात माडगूळकर बंधू, साने गुरुजी, शंकरराव खरात यांच्यासारख्या गुणी विद्यार्थ्यांना आश्रय देणारे, किर्लोस्कर, ओगले प्रभृती मराठी उद्योजकांना मदत करणारे, वगैरे त्यांच्या ओळखी अनेक आहेत.

ललित लेखनाचा प्रकार: 

आर डी बर्मन - अशीही एक श्रध्दांजली!

आर डी बर्मन आणि लता की आशा? एक वाद-संवाद आणि एक श्रध्दांजली अशीही!
‘‘म्हणजे कसं बघ. हिंदी सिनेमाच्या इतिहासात असे हाताच्या बोटांवर मोजण्याइतके सिनेमे आहेत, ज्यांची गाणी त्या त्या सिनेमाच्या आशयाशी एकरूप आहेत. इतकी, की ते गाणं त्या संगीतकाराच्या दुसऱ्या कुठल्याच सिनेमात असू शकणार नाही. उदाहरणार्थ, आपला तीसरी मंजिल. पण मला सांगायचंय की आरडी-आशा हे असं कॉम्बिनेशन आहे. अद्वैत. आरडीने लताला कितीही चांगली गाणी दिली असोत; ती बाय डिफॉल्ट चांगली ठरतात.’’

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य