इतर

मलंग

सध्या थियेटर मध्ये मलंग नावाचा सिनेमा आलाय, पाहिलेल्या ट्रेलर वरून सिनेमा त्या नावाशी किती मेळ खातोय हे मात्र थियेटर मध्येच जाऊन पाहण्याची रिस्क घ्यावी लागेल. अर्थात दिशा पटनी वगैरे लोक Instagram वरच चांगले दिसतात त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी थियेटर हि जागा काहीशी अयोग्य राहील असं मला वाटतं. मुळात थियेटर हे सिनेमामुळे आणि सिनेमे हे ऍक्टिंगमुळे बनतात, दिशा आणि ऍक्टिंग ह्यांचा संबंध आपण तसा न जोडलेलाच बरा! असो . पण एक गोष्ट मात्र मनाला फारच आवडून गेली आणि ती म्हणजे ह्या सिनेमाचं टायटल सॉंग. अप्रतिम लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं असं गाणं म्हणता येईल.

ललित लेखनाचा प्रकार: 

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ५ (१९ जानेवारी २०२०)

आज दोनच भाडी मारली.

एका माझ्या मेमे मावशीसारख्या दिसणाऱ्या प्रेमळ बाईला रे रोडला सोडली.

तिने मला भायखळ्याच्या "S" ब्रिजचा रस्ता दाखवला.

भारी डौलदार आहेत हे पूलबुवा.

S

मावशीबाई एक्सपर्ट कूक होत्या.

पारसी / गुजराथी / मुघलाई / चायनीज फूड,

नल्ली निहारी / बिर्याणी / केक्स सगळं काही बनवायच्या.

लवकरच अमेरिकेला कूकिंगचे क्लास घ्यायला चालल्या होत्या.

ललित लेखनाचा प्रकार: 

सिंधुआज्जी आणि पार्टी गेम्स

एकदा सिंधुआज्जींना त्यांच्या मैत्रिणीने तिच्या नातवाच्या वाढदिवसाच्या पार्टीला बोलावले. प्लसवन म्हणून स्लॉथ्याला आणायचे नाही हे मैत्रिणीने निक्षून सांगितले असल्याने सिंधुआज्जी एकट्याच पार्टीला गेल्या. केक कापणे वगैरे सोपस्कार यथासांग पार पडले. त्यानंतर एक इसम पुढे आला आणि त्याने पार्टी गेम्स सुरू करण्याची घोषणा केली.

ललित लेखनाचा प्रकार: 

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ४ (२९ डिसेंबर २०१९)

सकाळी दिनेशभाईंनी लवकरच बोलावलं होतं.

शार्प ९ ला पोचलो.

ह्या वेळीस सुशीलभाईची टॅक्सी होती.

सिमला हाऊसला.

हा मलबार हिलच्या अल्ट्रा पॉश लोकवस्तीतला एक थोडा गरीब घेट्टो.

सुशीलभाई गोरा घारा गुटगुटीत बाळासारखा प्रेमळ माणूस.

त्यानी आपल्या टॅक्सीच्या खोडी आणि टिपा निगुतीनं समजावून सांगितल्या.

सकाळी साधारण अशी भाडी मारली.

मलबार हिल ते ग्रॅण्टरोड स्टेशन:

इकडे कंबाला हिलच्या फ्लायओव्हरखाली सिग्नलवर थोडा कन्फ्युज होऊन गाडी पुढे लावली.

गवालिया टॅंकवरून येऊन पेडर रोडला राईट मारणारी लोकं माझ्यामुळे थोडी ब्लॉक झाली.

ललित लेखनाचा प्रकार: 

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ३ (२२ डिसेंबर २०१९)

Boot

आज टॅक्सी घेतली आणि जवळच हँगिंग गार्डनला थांबलो.

लहान बाबू असताना गेलेलो म्हातारीच्या बूटाजवळ ते कैक वर्षांनी आज गेलो.

एका साध्याश्या म्हातारबाबांना फोटो काढायला सांगितला त्यामुळे त्यांची फिगर... आपलं सॉरी फिंगर किंचित दिसतेय.

काइंडली ऍडजस्ट!

मग हँगिंग गार्डन वरून आमच्या संजूदादा सारख्या एका टकलू माणसाला क्रॉफर्ड मार्केटला सोडला.

ललित लेखनाचा प्रकार: 

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २ (१५ डिसेंबर २०१९)

आज दिनेशभाईंनी त्यांची स्वतःचीच टॅक्सी दिली.
ह्या वॅगन-आर बाई कचकावून साडे-पाच लाख किलोमीटर चाललेल्या.
इकडे आपण च्यायला गाडी एक लाख किलोमीटर चालली की रेस्टलेस व्हायला लागतो.
पर्स्पेक्टीव्ह पर्स्पेक्टीव्ह म्हणतात ते हेच असावं बहुधा!

तर आधी दिनेशभाईंनाच ग्रॅण्ट रोड स्टेशनला सोडलं.
लगेचच एका कपलचं भाडं मिळालं.
गाडी जुनी तिला पॉवर स्टिअरींग नव्हतं.
स्टेशनवर टर्न मारता मारता हात भरून आले.
माझ्या मस्का व्हेन्टोची फार याद आली.
कपलला भारतीय विद्याभवनला जायचं होतं.
ही लोकेशन्स पहिल्या दिवसासारखीच.

ललित लेखनाचा प्रकार: 

अंडी आणि सफरचंदं

कोरोनाचा हाहा:कार मार्च-एप्रिलच्या काळात सुरू झाला आणि जगभरातल्या सगळ्या सेवाभावी संस्था झडझडून कामाला लागल्या. दहा हात कमी पडतील अशा झपाट्याने लोकं काम करत होते/आहेत. परदेशाबरोबर भारतालाही या कोरोनाचा फटका बसायला सुरुवात झाली होती. रोज सगळीकडे देशोधडीला लागलेल्या मजुरांच्या बातम्या, उद्या खायला काय अशी चिंता पडलेल्या साध्यासुध्या लोकांच्या बातम्या वाचून काळजी वाढायला लागली होती. परदेशात असताना स्वत:च्या देशाबद्दल असे काही वाचले की, मोठी अस्वस्थता येते, आणि अशावेळी उचलून पैसे देणे हा मदत करण्याचा एक ठोस उपाय असतो.

ललित लेखनाचा प्रकार: 

अप्रिय आठवणींपासून सुटका

मे २००७ च्या सुरवातीला जीवनविद्या मिशने मांडलेल्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायला मला सुचवले गेले होते. मला माझ्यातल्या नकारात्मक भावनांवर ताबा मिळवण्यासाठी हे सुचवले गेले आहे हे मला त्यावेळी माहीत नव्हते. २००७ च्या सुरवातीपासून अंदाजे दीड वर्षे मी अभ्यास करीत होतो.

ललित लेखनाचा प्रकार: 

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १ (८ डिसेंबर २०१९)

टॅक्सी मिळत नसल्याने माझा मोजो जरा ढिला पडत चालला होता.

वीकेंड्स फ्री ठेवले होते टॅक्सी चालवायची म्हणून...

पण टॅक्सी मिळत नसल्याने वैतागून साल्साचा क्लास लावून टाकला.

केतकीचा पुण्यात बचाता क्लास आणि माझा मुंबईत साल्सा असं थोडे शनिवार-रविवार चालू होतं.

तशाच एका शनिवारी रात्री केतकीचा मेसेज आला:

गुड न्यूज टुमारो इज युअर मीटिंग.

१० :३० मॉर्निंग हॅंगिंग गार्डन सिमला हाऊस.

दिनेश भाई ...

ही होल्ड्स ३ टॅक्सीज !

मी थरथरलोच.

फायनली...

ललित लेखनाचा प्रकार: 

घन तमी शुक्र बघ राज्य करी

https://www.aathavanitli-gani.com/Images/Photo/Lyrics/Bha_Ra_Tambe.jpg
.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - इतर