Submitted by नील on बुधवार, 18/11/2020 - 01:40
आज फायनली लॉक डाऊननंतर पहिल्यांदा टॅक्सीवर चाललोय.
८ मार्च ते १ नोव्हेंबर: ८ महिने.
विश्वाच्या पुलाखालून बरंच पाणी वाहीलं ह्या काळात.
बरचसे लोकं तर नाका तोंडात पाणी जाऊन गुदमरले, कित्येक डूबलेसुद्धा.
निर्लज्ज होऊन खरं सांगायचं तर मला पर्सनली फारशी झळ नाहीच पोचली करोनाची.
Submitted by देवदत्त on गुरुवार, 12/11/2020 - 11:11
"काय राव, वीस करन्सी होतात नेहमी. तीस कसले मागताय? मी काय प्लूटोवरून आलोय काय?"
पायलटच्या हातावर वीस करन्सी ठेवत रामराव उतरले आणि सहकुटुंब सहपरिवार एससी स्टॅन्डकडे चालू लागले.
"नेपच्यून सहाशे, नेपच्यून सहाशे!" अशी हाळी एकजण देत होता.
"बाबा, तिकीट घेऊया ना?" वत्सला म्हणाली.
रामराव काही बोलायच्या आतच मनोहर म्हणाला, "एहेहे! तिकिटं अधिकृत तिकिटखिडकीतूनच घ्यायची हेही माहीत नाही तुला! आणि म्हणे व्ह.फा.ला बसतेय."
"तू गप रे चोंबड्या!" वत्सला फुरंगटून म्हणाली.
"नका रे भांडू सारखे. मामा काय म्हणेल अशा भांडकुदळ भाचरांना बघून?" यमुनाकाकूंनी भांडण थांबवले.
Submitted by भटक्या कुत्रा on बुधवार, 04/11/2020 - 20:47
वणवा जंगलात विलीन होतो की जंगल वणव्यात?
फार फार वर्षांपूर्वी एक वणवा सुरू झाला आणि हळूहळू पूर्ण जंगल व्यापु लागला.
मजल दर मजल करत एका सदाहरित जंगलपाशी आला.
सदाहरितांनी आधीच दूर दूर च्या जंगलातील पशुपक्षीं ना आसरा दिलेलं ज्यांचं घर त्याच वणव्यात जळून गेलेलं.
गवत वेली किंचालल्या "वाचवा-आग-आग" त्यावर उंच उंच सावली न देणारी अशोकाची झाडे म्हणाली 'चूप बसा, तुम्हाला दिसत नाही पण मला दिसतंय, वणव्यात आहे तेज, अंधकार मिटवायला आलाय.
Submitted by देवदत्त on बुधवार, 04/11/2020 - 17:33
"नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा" ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. धनसुख आणि माया शर्मा या दांपत्याला मात्र ही म्हण गैरलागू होती. त्यांच्या मालकीच्या शेकडो कुरणांमध्ये हजारो एकरांमध्ये गवताची अब्जावधी पाती डोलत असत. हिरवंगार गवत विकत घेण्यासाठी मोठमोठ्या डेअरी फार्म्सची अहमहमिका असे. शर्मा दांपत्याला कसली ददात नव्हतीच. त्यांनी हौसेने बांधलेल्या टुमदार टोलेजंग बंगल्याबाहेरील संगमरवरी पाटी त्यांची फ्राॅईडियन स्लिप दिमाखात मिरवत असे - "शर्मा सधन"!
Submitted by नील on सोमवार, 12/10/2020 - 00:15
आज शनिवारी रात्रीच टॅक्सी घेतली.
हे आमचे दिनेशभाई!

ह्यांनी टॅक्सी दिली नसती तर मी अजूनही टॅक्सीच शोधत बसलो असतो सो त्यांचे अनेकानेक आभार.
Submitted by म्रिन on गुरुवार, 08/10/2020 - 22:13
जवळपास साडेसहा महिने झालेत आपलं आयुष्य बदलून गेल्याला. सगळ्यात मोठा फटका आर्थिक बसलेला आहे अनेकांना.
मागे एका मैत्रिणीचा उल्लेख केला होता, पर्यटन व्यवसायात असलेल्या तिच्या नवऱ्याला मेपासून पगार मिळालेला नाही. कधी मिळेल माहीत नाही, अजून काम नीट सुरू झालेलं नाही.
Submitted by shripad.tembey on मंगळवार, 29/09/2020 - 10:45
कोरोना आणि माध्यमे...
कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगात असंख्य जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु या विषाणूपेक्षाही कितीतरी वेगाने अफवांचा विषाणू जगभर पसरतो आहे. कोरोना विषाणूच्या मास्कच्या आड तोंड झाकून वांशिक भेदभावाचा विषाणू आजकाल गल्लीबोळातून फैलावतो आहे.त्यामुळे ज्याप्रमाणे साथीच्या रोगाकरिता आपण इंग्रजी भाषेमध्ये ‘इपिडीमिक’ असा शब्द वापरतो तसा सध्याच्या अफवांची साथ बघता त्याला ‘इन्फोडेमिक’ असा शब्द प्रचलित होत चालला आहे.
Submitted by नील on गुरुवार, 24/09/2020 - 12:56
आज सकाळी बँड्रावरून नेहेमीप्रमाणे मलबार-हिलला जायला टॅक्सी पकडली.
वांद्र्याचे कॉलनीतले काही टॅक्सीवालेही आता ओळखीचे झालेयत.
आज असेच तोंडओळखीचे आफ्रोझभाई भेटले.
आता मलबार-हिलची दिनेशभाईंची टॅक्सी बऱ्यापैकी सेट आहे तशी पण मुंबईकर सदैव "ऑन" असतो.
म्हणूनच आफ्रोझभाईंनासुद्धा सगळी स्टोरी सांगितली... म्हणजे बँड्रातही शनिवारी टॅक्सी मिळण्याची शक्यता चाचपून पहावी हा हेतू.
तर ते माझ्या एकंदरीत प्रोजेक्टवर बेहद्द इंप्रेस झाले.
बहोत मेहनती हो, आपकी इन्शाल्ला बहोत तरक्की हो वगैरे तोंडभरून आशीर्वाद दिले.
Submitted by म्रिन on मंगळवार, 22/09/2020 - 13:07
फेसबुकवर मी एका ग्रुपची सदस्य आहे. private group आहे, (सदस्य करून घ्यावे अशी विनंती करू नये) दीडशेहून अधिक सदस्य आहेत. वेगवेगळ्या व्यवसायातले आहेत, विविध देशांत राहणारे आहेत. मुख्यतः टवाळक्या, गॉसिप हा उद्देश असला तरी बऱ्याच वेळा अनेक विषयांवर खूप सखोल चर्चा होते. यातले काही सदस्य एकमेकांना प्रत्यक्ष भेटलेले आहेत, परंतु हा फक्त ओळखीच्या व्यक्तींचा ग्रुप नाही. कारण प्रत्यक्ष कधीही न भेटलेल्या अनेक व्यक्ती या ग्रुपच्या माध्यमातून खूप जवळच्या झालेल्या आहेत. यातील आम्हा १०-१५ जणांचा कायप्पावर ग्रुप आहे. तिथे आम्ही रोज संपर्कात असतो.
Submitted by नील on रविवार, 06/09/2020 - 14:04
टॅक्सी दिवस ९: २३ फेब्रुवारी २०२०
आजही साऊथ मुंबईतच भाडी मारली सकाळी...
गिरगावात फडके मंदिराजवळ एकाला सोडलं...
कांदेवाडी, सी. पी. टॅंक, फडके-वाडी... आख्खं गिरगावच लहानपणापासून खास आवडीचं:
पाने