भाषा
भारतात किती टक्के लोकांना हिंदी येते?
Taxonomy upgrade extras
भारतात किती टक्के लोकांना हिंदी येते? मला किती टक्के लोकांची प्रथमभाषा हिंदी आहे हे नको आहे (हे साधारण ४० टक्क्यांच्या आसपास असल्याचे वाचले आहे - सर्वसाधारणपणे ज्याला हिंदी पट्टा म्हटले जाते तो). असा भाग सोडूनही हिंदी येणारेही बरेच जण असावेत असे वाटते, उदा. महाराष्ट्रातले बहुतांश लोक, गुजरात, प. बंगालमधील काही लोक, दाक्षिणात्य राज्यांतीलही काही लोक वगैरे. हे सगळे पकडून हिंदी येणारे किती जण असतील? अनेकदा हिंदीविरोधी मतांमध्ये 'हिंदी फक्त ४०% लोकांना येते, बाकी ६०% लोकांना हिंदी येत नाही' छाप विधाने असतात, पण हिंदी येणारे बरेच जास्त असतील असे वाटते.
- Read more about भारतात किती टक्के लोकांना हिंदी येते?
- 35 comments
- Log in or register to post comments
- 10902 views
सरसकटीकरण
Taxonomy upgrade extras
या धाग्यावर ऋषिकेषचा हा प्रतिसाद आहे. ज्यांना ह्या धाग्याच्या विषयाचे स्वरुप पाहता आवश्यक वाटते त्यांनी जरुर तो धागा वाचावा नि मग हा वाचावा.
आता खालिल उतारा (पून्हा?) वाचा -
माझी बायको जपानमध्ये होती तेव्हा तिने केलेले निरिक्षण मांडतो आहे. ते प्रातिनिधिक आहे किंवा कसे याची कल्पना नाही, परंतु धक्कादायक जरूर आहे:
- Read more about सरसकटीकरण
- 80 comments
- Log in or register to post comments
- 28125 views
भाषा मरणं कितपत गंभीर असतं?
Taxonomy upgrade extras
एक भाषा मरते, तेव्हा ती आपल्यासोबत बरंच काही घेऊन मरत असते. भाषा म्हणजे काही फक्त एक साधन (tool) नव्हे. ते हळूहळू व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचं एक अंगच होत जातं. भाषेसोबत तिचं सांस्कृतिक (साहित्य, समाज, खाद्यपरंपरा, धर्म आणि दैवतं, इतिहास) संचितही तिच्यात सामावलेलं असतं. एक वस्तू अस्तंगत झाली, म्हणून तिच्यासाठी असलेली संज्ञा हळूहळू नाहीशी होत जाते (उदा. घंगाळ) हे जितकं खरं आहे, तितकंच संज्ञाच लोप पावल्यामुळे संकल्पनेला अभिव्यक्ती मिळायचं बंद होतं आणि ती यथावकाश मरून जाते (उदाहरण आठवत नाहीय. आठवलं की टंकीन. तोवर जाणकारांना आमंत्रण) हेही खरं आहे.
- Read more about भाषा मरणं कितपत गंभीर असतं?
- 11 comments
- Log in or register to post comments
- 2294 views
मराठी साहित्य आणि चांगले लेखन कशाला म्हणाव?
Taxonomy upgrade extras
मराठी मध्ये लिहताना मला कायम एक प्रश्न पडतो बर्याच वेळेस जुन्या प्रस्थापित लेखकांनी जे लेखनाचे मापदंड तयार केलेले असतात त्यांना अनुसरून लिहील तर लोकांना ते लिखाण आवडत. नेमाडें, ढसाळ , भाऊ पाध्ये इत्यादी लेखकांनी त्या कोशातून बाहेर यायला मदत केली. अस असाल तरीदेखील काही प्रमाणात समीक्षेची मापदंड वेगळी असतात.नक्की कोणत्या आधारावर लेखन चांगल आहे किंवा नाही हे ठरवलं जात?चांगल्या लेखनाचे निकष काय? अतिशय बाळबोध पद्धतीने लिहिलेलं चांगले अनुभव हेच चांगल लेखन आहे का? मराठी मध्ये सुर्रेअल लेखन कुणी केल आहे का?(हारूकी मुराकामी सारख)मराठी साहित्य आहे त्या ठिकाणी बसकण मारून आखडून गेल आहे का?
- Read more about मराठी साहित्य आणि चांगले लेखन कशाला म्हणाव?
- 32 comments
- Log in or register to post comments
- 6714 views
रॅण्डम आणि आर्बिट्ररी ह्या संकल्पना
Taxonomy upgrade extras
विज्ञानविषयक लेखनात तसेच संख्याशास्त्रीय चाचण्यांसंदर्भात रॅण्डम ही संज्ञा वापरलेली आढळते. ह्या संज्ञेचा अर्थ काय आहे आणि तो विविध संदर्भांनुसार बदलतो का अशी शंका मनात आहे. ह्या संज्ञेचा मराठी पर्याय म्हणून यादृच्छिक, वाटेल तसे, कोणतेही, अनियत, आकस्मिक, स्वैर, इतस्ततः, संधानविरहित, क्रमरहित असे पर्याय महाराष्ट्र शासनाच्या भाषासंचालनालयाने प्रकाशित केलेल्या पारिभाषिक शब्दसंग्रहांत दिलेले आहेत.
http://marathibhasha.com/kosh-words/search?term=random&field_pratishabd…
http://marathibhasha.com/kosh-words/search?term=random&field_pratishabd…
- Read more about रॅण्डम आणि आर्बिट्ररी ह्या संकल्पना
- 15 comments
- Log in or register to post comments
- 3832 views
शब्दार्थ आणि शब्द पर्याय
Taxonomy upgrade extras
अनेकदा इंग्रजी शब्दांचे अर्थ चटकन सापडत नाहीत. काहीवेळा अर्थ म्हणजे वाक्यच दिलेले असते. जसे की clone या शब्दाचे भाषांतर 'एकाच वंशाच्या आणि ज्या जन्मदात्या पेशीपासून संभोगरहित पुनरूत्पत्तीने निर्माण होऊन तिच्याशी वांशिक एकरूपता दाखवतात अशा पेशी' असे होते. त्याऐवजी चपखल अर्थ हवा असतो. खांडबहाले वरही सगळे शब्द असतातच असे नाही. काहीवेळा आपल्याला हव्या असलेल्या अर्थाचा शब्द सापडत नाही अशा शब्दविषयक मदतीसाठी व चर्चांसाठी हे पान बनवत आहे. या निमित्ताने एक शब्दसाठाही एकाच पानावर तयार होईल ही अपेक्षा आहेच!
मराठी मध्ये खालील शब्दांसाठी चपखल शब्द हवे आहेत
sensors
programmable
anthropomorphism
- Read more about शब्दार्थ आणि शब्द पर्याय
- 13 comments
- Log in or register to post comments
- 5413 views
.
अर्थ एक, अर्थछटा अनेक: शब्दसमूह नोंदींसाठी धागा
Taxonomy upgrade extras
जवळ-जवळचे अर्थ असणारे अनेक शब्द आपण वापरत असतो. अर्थछटांमधला नेमका फरक नक्की करायला जावं, तर मात्र लोकांना विचारण्याखेरीज दुसरी मदत हाताशी नसते. माझ्या माहितीप्रमाणे असे जवळजवळचे अर्थ असणारे शब्द एकत्र देणारा आणि त्यांच्या अर्थछटांमधला फरक नोंदणारा कोश मराठीत नाही. (कुणाला ठाऊक असल्यास जरूर सांगा. मी आभारी असेन.) तो कोश निघायचा तेव्हा निघो, तोवर मला अशा अर्थछटांमधला फरक नक्की करण्याचं काम करणं आवडेल, कुणी करत असेल तर वाचायलाही आवडेल. तेवढ्याकरता हा धागा आहे.
इथे लिहिताना पाळायची पथ्यं:
१. शक्यतोवर शब्दाची जात (आणि जातीबरहुकूम लिंग, सामान्यरूप, अनेकवचन, अनियमित रूपं इत्यादी) नोंदावी.
- Read more about अर्थ एक, अर्थछटा अनेक: शब्दसमूह नोंदींसाठी धागा
- 51 comments
- Log in or register to post comments
- 17934 views
मराठी प्रमाणलेखनाचे नियम (ऊर्फ गैरसोय आणि गळचेपी)
Taxonomy upgrade extras
मला प्रमाणलेखन पाळण्यात काहीही म्हणण्याजोग्या अडचणी येत नसल्या, तरी माझ्या मते मराठी प्रमाणलेखनाचे नियम अत्यंत गैरसोयीचे, अपुरे आणि संदिग्ध आहेत. त्यांच्यात विसंगती आहेत.
खरा संतापजनक भाग हा की, हे नियम पाळता येण्याकरता तुम्हांला फक्त मराठी भाषा नि हे नियम अवगत असणं पुरेसं नाही; तर संस्कृतही ठाऊक असणं क्रमप्राप्त आहे. शिवाय इतर भाषांतले शब्द लिहायचे झाल्यास त्या त्या भाषेतल्या उच्चारांची माहिती असणं आवश्यक आहे, असंही हे नियम सांगतात. हा कुठला न्याय आहे कुणास ठाऊक.
- Read more about मराठी प्रमाणलेखनाचे नियम (ऊर्फ गैरसोय आणि गळचेपी)
- 66 comments
- Log in or register to post comments
- 23548 views
कर्तरी व कर्मणी क्रियापदे, प्रथमा व तृतिया विभक्ती
Taxonomy upgrade extras
खालिल सहा वाक्ये पहा -
१. गुंजन खाना लायी है ।
२. गुंजन ने खाना लाया है ।
३. गुंजन खाना खायी है ।
४. गुंजन ने खाना खाया है ।
व
५. गुंजनने जेवण आणले आहे.
६. गुंजनने जेवण खाल्ले (केले) आहे.
पहिल्या चार हिंदी वाक्यांपैकी १ व ४ बरोबर आहेत. २ व ३ अर्थहिन आहेत. असे हिंदी लोकांच्या बर्यापैकी लोकांचे म्हणणे आढळले. पुढे जाऊन, इथे गुंजन एक मुलगी आहे म्हणून, 'गुंजन ने खाना लाया है।' म्हणणे म्हणजे तिला टॉमबॉइश म्हटल्यासारखे आहे असेही बर्याच लोकांचे म्हणणे होते.
मराठीत दोन्ही क्रियापदे (आणणे, खाणे) कर्मणी आहेत असे वाटते, हिंदीत मात्र असे आहे असे दिसत नाही. का ते मला आजपावेतो कळले नाही.
- Read more about कर्तरी व कर्मणी क्रियापदे, प्रथमा व तृतिया विभक्ती
- 16 comments
- Log in or register to post comments
- 7651 views