झ झ झ झ झोपडीत

झझझझ झोपडीत चचचच चारपाई

झोपडीत चारपाई माणसाविना, अंबो... रडते वेडी
प्रेमाचा करुया धिंगाणा, निघुन न जावो सुहानी घडी

माका तुझा प्रेम पाहिजे. प्रेम पाहिजे, प्रेम पाहिजे
कुकरू कुकरू हू
तुझ्याच सारखा यार पाहिजे यार पाहिजे हा हा यार पाहिजे
सूर्य न पाही चंद्र न पाही तुझाच बस दीदार पाहिजे

कुकरू कुकरूहू
झोपडीत चारपाई माणसाविना, अंबो... रडते वेडी
प्रेमाचा करुया धिंगाणा, निघुन न जावो सुहानी घडी

रोखू नका, करुद्या की प्रेम तरी दिलवाल्यांना
कुकरू कुकरू हू
टोचू नका भरुद्या की मनात तनाच्या उजाळ्यांना
तू तुझ्या घरवाल्यांना समजाव गं मी माझ्या घरवाल्यांना

कुकरू कुकरूहू
झोपडीत चारपाई माणसाविना, अंबो... रडते वेडी
प्रेमाचा करुया धिंगाणा, निघुन न जावो सुहानी घडी

तुझा मला साथ पाहिजे साथ पाहिजे हो हो साथ पाहिजे
कुकरू कुकरू हू
ओठांची तुझ्या बात पाहिजे बात पाहिजे अरे बात पाहिजे
कपडा नको मज, गेहना नको मज, आपल्याला तुझा बस हात पाहिजे

कुकरू कुकरूहू
झोपडीत चारपाई माणसाविना, अंबो... रडते वेडी
प्रेमाचा करुया धिंगाणा, निघुन न जावो सुहानी घडी

झझझझ झोपडीत चचचच चारपाई...
------

मराठी शब्द माझेच आहेत. मूळ हिंदी शब्द ओळखू येतात का?

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

१९८३ सालच्या मवाली चित्रपटातले गाणे. होय ना राजेशा ? बरे जमलेय हो.
लक्षात रहाय्चे कारण- शेजारच्या कुलकर्ण्यांच्या धाकट्याला तुझा तो सफारी घालून,चकचकीत बूट घालून समुद्रकिनार्‍यावर नाचणारा जितेंद्र आवडायचा. थोडाफार दिसायचाही त्याच्यासारखाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जितेन्द्र - श्रीदेवीच्या 'सुवर्णकाळा'तील अनेक जबरी गाण्याम्पैकी एक.

'हिम्मतवाला' नावाच्या एका दुसर्‍या एका चित्रपटात याच दुकलीचे -
'लडकी नहीं तू लकडी का खम्बा हैं
बकबक मत कर नाक तेरा लम्बा हैं ' असे शब्द असलेले गाणे होते.
आणि खूप हन्डे रचून, अवान्तर नर्तिकान्ना जमवून केलेले
'दुम तर तर तर - दुम तर तर तर, नैनों में सपना - सपनों में सजना, सजना पे दिल आ गया, के सजना पे दिल आगया... ' हे गाणे खूप गाजले होते. विडीओ कॅसेटच्या जमान्यात आमच्या चाळीतल्या एकमेव 'पुढारलेल्या' घरात विडीओ प्लेअर आला तेंव्हा त्यानी बाळ-गोपाळ जमवून दाखवलेला हा चित्रपट होता. त्यातले हे एवढेच लक्षात राहीले. खूप वर्षान्नी आठवणीन्ना उजाळा देऊन खुदुखुदू हसवल्याबद्दल धन्यवाद !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर.

यानंतर 'तय्यब अली प्यार का दुश्मन हाय हाय' या अजरामर गीताचा आपल्या प्रतिभाशाली लेखणीतून उतरलेला अनुवाद मुद्रितात उतरलेला पहावयाची अनिवार इच्छा आहे. कृपया विचार व्हावा, अशी सुचवणवजा विनंती-कम-फर्माइश या निमित्ताने करू इच्छितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'न'वी बाजू यांना बा.डी. अनुमोदन.
पण त्यानंतर मात्र आजच्या जमान्यातल्या 'शीला की जवानी', 'चिकणी चमेली' अशा ताज्या दमाच्या गाण्यांचे मराठी अनुवाद करून गुर्जींनी आपण अगदीच काही हे नाही हे दाखवावे.

"माका तुझा प्रेम पाहिजे", "दिलवाल्यांना" असे शब्दप्रयोग काव्यात करून बाबा घासकडवी यांनी आपण मराठीच्या कोणत्याही बोलीभाषेला कमी लेखत नाही हे वेळीच दाखवून दिले आहे. संपूर्ण मराठी प्रमाण आणि बोली भाषा मंडळ, मौजे बोलघेवडीतर्फे मी त्यांचे आभार मानते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वाह
गुर्जी इज बँक
कुकरुहू हा शब्द मनाला पार स्पर्शून गेला

बायदवे छोडछोडके अपने सलीम की गली अनाकरली डिस्को चली याही गाण्याचा अनुवाद करावा ही विनंती
"सखोल अभ्यास" कराल ही खात्री आहेच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

कुकरुहू हा शब्द मनाला पार स्पर्शून गेला

असहमत!

मराठीत हा शब्द 'कुकूचकू' असा प्रचलित आहे. त्याचा 'कुकरुहू' हा अवतार मराठीवरील हिंदीचे (पक्षी: भय्यांचे) अतिक्रमण आहे. सबब अखिल महाराष्ट्र कुक्कुट (तथा कुक्कुटप्रेमी) महासंघाच्या वतीने तीव्र निषेध!

'नवनिर्माण'वाले याची दखल घेतील काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय हे नबा आता ऊपरोध तुम्हाला कळेना का

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

डिट्टो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

'न'वी बाजू यांचा निषेध. नवनवीन शब्द मराठी भाषेत आणून आमचे आद्य आणि ओरिगिनल गुर्जी मराठी भाषा वाढवत आहेत. तुम्ही त्यांचा विरोध करत आहात. तुमच्यासारख्या पुराणमतवादी आणि रूढीप्रिय मराठी लोकांमुळेच मराठी भाषेची लोकप्रियता वाढवण्यासाठी राजकारणाचा आधार घ्यावा लागतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

राजाके उंचे महलों, में सुख जो मिले गये हों
हैं सारे मिल गये वों, इस झोपडीमें मेरे ॥

भूमीपर लेट जाना, तारोंको यूंही तकना
प्रभुनाम नित्य गाना ,इस झोपडीमें मेरे॥

पहरे और तिजोरी , होती है उनमें चोरी
सहुलियतें हैं पूरी, इस झोपडीमें मेरे॥

जाऊं किसी महल में , "मत जाव" शब्द आए ,
भय मुक्त होके आएं, इस झोपडीमें मेरे॥

महलोंमें वो बिछोने , दियोंके शामदाने
हम इस जमीं को माने, इस झोपडीमें मेरे ॥

आओ तो सुखसे आना, जाओ तो सुख से जाना
डाले कोई जोर ना , इस झोपडीमें मेरे ॥

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

वृत्तात बसवण्यासाठी थोडी आणखी साफसफाई करणे आवश्यक आहे, परंतु ते तितकेही कठीण नसावे.

एकंदरीत चांगली रचना. 'मोरा गोरा अंग लै ले'च्या चालीवर म्हटल्यास बहार यावी.

('ओ रात के मुसाफ़िर'च्या पारंपरिक चालीवर म्हणूनम्हणून कंटाळा आला. पण 'ऐ दिल मुझे बता दे'ची चाल चालू शकेल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पेटंट म्हणजे "रात्रीस खेळ चाले" सुद्धा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

'रात्रीस खेळ चाले' हा जो काही प्रकार आहे, तो वाचलेला-ऐकलेला नाही, त्यामुळे अधिक टिप्पणी करू शकत नाही. क्षमस्व.

(काही हरकत नाही. 'रात्रीस खेळ चाले'चे बोल येथे प्रसिद्ध करावेत, आम्ही ते 'मोरा गोरा अंग'च्या चालीवर म्हणून पाहू. आहे काय नि नाही काय!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

दुर्दैवाने ही चाल आमच्या श्रवणातून सुटल्याचे आढळते. (पण कल्पना एकंदरीत रोचक वाटते.) यथावकाश यूट्यूबवरून शोधून काढूच. तोवर तूर्तास 'मोरा गोरा अंग'च सही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गृहपाठ म्हणून ही चाल आपल्या आवाजात रेकॉर्ड करून प्रतिसादात टाकणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गृहपाठ म्हणून ही चाल आपल्या आवाजात रेकॉर्ड करून प्रतिसादात टाकणे.

भसाडा आहे. आमच्या उत्तमर्धांगास नाइलाजाने ऐकावा लागतो, तेवढे पुरेसे आहे *. इतरांपर्यंत ती तोशीस पोहोचवण्याचे काही समर्थनीय कारण आम्हांस दिसत नाही.

तस्मात्, तो घट आम्ही भिंदू इच्छीत नाही. सबब, क्षमस्व.

* ता.क.: आमच्या उत्तमर्धांगास आमचे घोरणेही (थेट कानांत) ऐकून घ्यावे लागते, हेही या निमित्ताने जाता जाता हळूच सुचवू इच्छितो. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे वा, तुम्ही गाता तेव्हा घट भिंदतो! काय पहाडी आवाज असणार तुमचा. आमच्या कॉलेजटायमात कुमार सानू जोरदार होता हो! विचार करा आमचं आयुष्य किती दुर्दैवी असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आम्ही तर लहानपणापासून हे कायम 'ऐ दिल मुझे बता दे' चालीवरच म्हणत आलो. इथे प्रचलित / सुचविलेल्या इतर चाली म्हणून बघितल्या पण 'ऐ दिल' ची सर आली नाही.

(अवान्तर - यावरून आठवण झाली - 'सदा-सर्वदा योग तुझा घडावा' हे आम्ही 'धडक्-ने लगी दिल के तारों की दुनिया' चालीवर घोळून घोळून म्हणत असू... अगदी 'तुझेsssss कारणी' मधल्या लाम्बवलेल्या 'झे' सकट तन्तोतन्त ['जो तुमssss मुस्कुरा दो' मध्ये लाम्बवलेला म असल्याने] !)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या कॉलेजकालात 'ये रे ये रे पावसा' वेगवेगळ्या चालींमधे म्हणण्याची टूम होती. त्या काळात 'हम्मा' गाणंही फार गाजत होतं. ये रे ये रे पावसा हम्माच्या चालीवर म्हणतात मजेशीर वाटायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>>>>'तुझेsssss कारणी' मधल्या लाम्बवलेल्या 'झे' सकट तन्तोतन्त ['जो तुमssss मुस्कुरा दो' मध्ये लाम्बवलेला म असल्याने] <<<<<

तुम्ही जे गाणं आणि जो श्लोक तुलनेकरता घेताय ते लक्षांत घेतलं तर "जो तुमssss मुस्कुरा दो" च्या चालीवर "तुझे कारणी ." नव्हे तर "रघू नायका..." ही ओळ यायला पायजे ना हो ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

शङ्का अगदी रास्त. 'रघू नायका' यायला हवे. स्पष्टीकरण असे की त्या पोरवयात हिन्दी चित्रपट / गाणी कुठले पाहायला ? 'धडकने लगी'ची चाल आहे हे समजायला चित्रहार बघणे वगैरे नन्तर आले. तोपर्यन्त आम्ही पोरे 'रघूssss नायका', 'उपेssss क्षू नको' अश्या सगळ्याच ओळीन्ना लाम्बण लावून मग एकमेकाङ्कडे बघत फिदी फिदी हसत असू. (लहान वयात कशाकशाचे हसू येते जे 'मोठे' झाल्यावर मावळते हा एक संशोधनाचाच विषय आहे. हे मात्र फारच अवान्तर होईल. त्याबद्दल नवी 'मौज-मजा' सुरू करावी लागेल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवान्तर - यावरून आठवण झाली - 'सदा-सर्वदा योग तुझा घडावा' हे आम्ही 'धडक्-ने लगी दिल के तारों की दुनिया' चालीवर घोळून घोळून म्हणत असू...

'सदा सर्वदा योग तूझा घडावा'करिता 'अकेले अकेले कहाँ जा रहे हो'ची चाल अधिक बहार आणते, असा अनुभव आहे. (अन्यथा, फिट्ट बसणार्‍या चाली अनेक आहेत. पण 'अकेले अकेले'ची सर कश्शाकश्शाला नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर्गातल्या धडाडीच्या कार्यकत्यानी राँबर्ट फ्राँस्टच्या एका कवितेला (शब्द आठवत नाहीत) कुछ कुछ होता है ची चाल लावल्यान इंग्रजीच्या टीचरने ती कविता वीस वेळा अख्खा वर्गाला लिहून आणायला लावल्याची आठवण ताजी झाली

विशेष म्हणजे प्रत्येकाला वही सर्टीफाईड करुन घेतल्या व्हायव्हाला बसण्याची परवानगी दीली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

आम्ही तर लहानपणापासून हे कायम 'ऐ दिल मुझे बता दे' चालीवरच म्हणत आलो.

आम्ही सुद्धा.

'सदा-सर्वदा योग तुझा घडावा' हे आम्ही 'धडक्-ने लगी दिल के तारों की दुनिया' चालीवर घोळून घोळून म्हणत असू...

ही चाल तर इतकी फिट्ट बसली होती की ती चाल ऐकून केवळ मनाचे श्लोकच आठवायचे. मूळ गाणं कुठचं हेच विसरलो होतो. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरील अनुवाद (किंवा प्रेरणा) हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रसिद्ध "या झोपडीत माझ्या" अभंग गीताचा आहे असा उल्लेख असायला हवा होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

म्हणजे, हे सर्वज्ञात नसावे काय?

(शाळेत असताना हीच कविता तर तोंडी परीक्षेत आम्ही 'ओ रात के मुसाफ़िर'च्या चालीवर बाईंच्या तोंडावर फेकून त्यांना वात आणत असू.)

उलटपक्षी, ज्यांस हे ज्ञात नाही, त्यांस हे सांगून काही फायदा आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मज्जाव = मत जाव' हे आवडले. उपपत्ती कोशात नवी भर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण आणखी बालभारती नको.
तुम्ही कोंबडी हिंदीत पळवावी आणि घासकडवी यांनी 'चिकणी चमेली' मराठीत आणावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या

मला आता कळलं हा श्लेष आहेते. कारण मला वाटायचे हे सुखांना उद्देशून वाक्य आहे. पण मुसुंनी हे लोकांना उद्देशून लिहीले आहे. वा वा. या धाग्याचे सार्थका झाले माझ्यापुरता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरं तुम्ही काका लोकं ही भलती गाणी/श्लोक भलत्या चालीत गाऊन दाखवणार आहात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0