गुरु...

गुरु रे गुरु तो कसा रे असावा...?
न चिडता ओरडता,डबलसीट बसावा
पुढुन वहान येता,मागुन बोंब मारावा
असा गुरु कमी,मित्र जास्ती असावा

धरो कान त्यानी जसा मी चुके रे
रडो तो ही जर कान माझा दुखे रे
उभयता असे प्रेम नसतो दुरावा
डोळे झाकुनी तेथे,प्लस वन भरावा

कसे ओळखावे,गुरु श्रेष्ठ आहे
जरा मी घसरता,करी तो ही - ह्हे...! ह्हे...!
असा दुष्टबुद्धी, गुरुही त्यजावा
मनी त्यासी नेहेमी,मायनस वन मोजावा

गुरु आत्म ज्ञानी,असो मित्र कोणी
जसा आमचा तेंडल्या,किंवा कॅप्टन धोणी
बघोनी शिकावा,शिकोनी बघावा
असा गुरू नेहेमी,हातचा एक धरावा

कधी तो ही मारे,किती ऊंच शॉटं
कधी शिष्य घेई,तयाचाच कॉटं
तरी तो गुरु,नाही कणभर चिडावा
खर्‍या गुरूचा,हाच अस्सल पुरावा..!

मिळाला मिळाला गुरु तो मिळाला
परंपरेत सार्‍या,होता जो तळाला
तयाच्याच रूपी,जणू मित्र आहे
मनीचेच माझ्या,खरे चित्र आहे.
०===०===०===०===०===००===०===०===०===०===००===०===०===०===०===००===०===०===०===०===

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

समयोचित विषय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अतृप्त आत्म्या ... असे करु नये...

गुरु शिष्याचा फोटू पण द्यायला हवा

हा बघ Wink


बाकी गुरुवंदना भारीच Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवितेतील शब्दांना 'कंगोरे' फार वाटतात. बाकी आशय ठीक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0