Skip to main content

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९

1 minute

५ जानेवारी २०१९:

क्रॉफर्ड मार्केटच्या SB२ ला गेलो पण त्यांनी तात्काळ परत पिटाळलं.

परत खेरवाडी पोलीस स्टेशनला आलो तर कळलं की ऑनलाईन अर्जच भरायचाय.

साईट टेरिबल आहे.

१२ जानेवारी २०१९:

बेसिकली बॅजसाठीच्या पोलीस क्लीअरन्सची प्रोसेस बरीचशी पासपोर्टच्या पोलीस क्लीअरन्ससारखीच आहे.
ऑनलाईन अर्ज करून स्कूल लिव्हिंग, आधार कार्ड आणि फोटो साईटवर 'वर्भर' (अपलोडला हा शब्द कसा वाटतो?) करायचाय.
शिवाय खेरवाडी पोलीस स्टेशनला जाऊन एक अर्ज द्यायचा.
हे ते ऍप्लिकेशन आईच्या सुवाच्य अक्षरात लिहिलेलं :)

application

आता मी मुंबईतली कनिष्ठ मध्यमवर्गीय मुलं जशा आणि जेवढ्या मारामाऱ्या करतात तेवढ्या तरुणपणी केलेल्या.
पण सिरीयस असं काही नाही... एकंदरीत वृत्ती पापभीरू म्हणता यावी.
सो आपला रेकॉर्ड क्लिअर.
तेव्हा क्लिअरन्स मिळायला काही अडचण पडू नये.

आजचा खर्च १२३ रुपये ६० पैसे

Police online

(क्रमशः)

आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध

Node read time
1 minute

ललित लेखनाचा प्रकार

'न'वी बाजू Mon, 30/03/2020 - 07:05

कृपया आपले चेकपुस्तक पाठवून देण्याची व्यवस्था करू शकाल काय? विशेष काही नाही, थोडी आपली स्वाक्षरी गिरविण्याची प्रॅक्टिस करेन म्हणतो.

तसेच, आपल्या पत्त्यातील 'वसाहत' आणि 'जवळ' यांच्या मधील तो शब्द कोणता आहे?

आपली आणखीही वैयक्तिक माहिती जालावर अशा प्रकारे जाहीररीत्या मांडावी, अशी विनंती करतो.

कळावे, लोभ असावा, ही विनंती.