बखर....कोरोनाची (भाग ७)
आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम' मध्ये आहोत.
म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.
माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.
पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.
म्हणजे ही कोरोनाची साथ एक दोन महिन्यात जाईलही (आणि कदाचित तीनचार महिन्यांनी परत येईल अजून जोरात)
पण त्याचा प्रसार ज्या झपाट्याने झालाय त्यामुळे व्यापार उद्योग ते अर्थव्यवस्था ते हेल्थकेअर , सर्व सर्व बाबींमधे वेगाने आणि मूलगामी बदल होताना आपल्याला दिसेल.
ही प्रलयघंटा आहे का ? माहीत नाही , बहुधा नाहीच.
पण एक जाणवतंय की इतिहास घडतोय , आपल्यासमोर...
वेगाने, इतक्या की गेल्या महिन्यात काय होते हे आपण आज कदाचित विसरणार आहोत.
म्हणून या आज घडणारा इतिहास , आपल्याला दिसेल तसा इथे नोंदवत जाऊयात का ?
हिस्टरी ऑफ द प्रेझेंट लिहुयात ? इथेच, या धाग्यावर?
बखर वगैरे म्हणजे काय असतं ? हेच ना?
चला, जशी दिसेल तशी, कळेल तशी ,कुठल्याही विषयावर कोरोना साथीमुळे झालेल्या बदलांची नोंद करूयात आणि लिहुयात
बखर कोरोनाची
(आधीच्या धाग्यावर ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.)
---
टेनिसच्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी फ्रेंच ओपन आणि विंबल्डन या वर्षी करोनामुळे रद्द झाल्या. आता यू.एस. ओपन सुरू झाली आहे - प्रेक्षकांशिवाय. मोठ्या पडद्यांवर लांबून पाहणारे प्रेक्षक दाखवले जात आहेत आणि चीअरिंग ध्वनिक्षेपकांवरून प्रक्षेपित केले जाते आहे.
व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल
जागतिक फिल्म फेस्टिव्हल्समध्ये सर्वात प्रतिष्ठेचं मानलं जाणारं कान फेस्टिव्हल ह्या वर्षी करोनामुळे रद्द झालं. व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल मात्र आजपासून सुरू होत आहे. टिल्डा स्विंटनला लाइफटाइम अचीव्हमेंट दिलं जाणार आहे.
Venice prepares to welcome guests to Covid-safe film festival
चाळीस लाख
१६ दिवसांत १० लाख नवे रुग्ण भारतात आढळले (त्यापैकी ६९,००० गेल्या २४ तासांत) अशी नोंद बखरीत २२ ऑगस्टला केली होती. आज ५ सप्टेंबर म्हणजे त्याला पंधरा दिवस झाले आहेत. काल ८७,११५ नवे रुग्ण सापडले आणि पुढच्या १० लाख रुग्णांचा टप्पा भारतानं ओलांडला आहे. एकूण रुग्णसंख्या ४० लाख २७ हजार ७१८ (स्रोत : वर्ल्डोमीटर)
खरोखरीच काळजी करण्यासारखी
खरोखरीच काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे.
पुण्यातले आकडे तर फारच भितीदायक वाटत आहेत. पण यावर रामबाण उपाय काही उपलब्ध होत नाहीये.
भारतातली लोकसंख्या, आणि त्यामुळे न टाळता येणारी गर्दी हे ही एक कारण असू शकेल का?
कारण सामाजिक अंतर ठेवा म्हणतात, पण कस करायचे?
लहान घरे, त्यात रहाणाऱ्यांची संख्या जास्त. त्यामुळे घरातील एकाला संसर्ग झाला, की इतरांना देखिल होण्याची शक्यता खूपच जास्त, अगदी शेजारी आणि आसपासच्या लोकांनासुद्धा.
त्यात अनेक जण सर्व नियम गंभीरतेने पाळत नाहीत. याला ज्येष्ठ नागरिकांचा देखिल अपवाद नाही.
अचानक आलेल्या महाप्रचंड संकटाचा सामना करण्याची अजूनही पुरेशी तयारी नाही. परंतु यासाठी सतत प्रशासनाला दोष देणे योग्य वाटत नाही. साधने, औषधे आणि मनुष्यबळ या सर्वांचाच तुटवडा आहे. आणि दर दिवसागणिक गरज वाढते आहे. पुरवठी कसे पडणार?
स्वयंशिस्त आणि अफवांवर विश्वास न ठेवता, योग्य आणि खात्रीलायक सूत्रांकडून योग्य ती माहिती घेणे (उपचार आणि औषधे या संदर्भात) हा त्यावर एक उपाय आहे. अर्थात पुरेसा नाही. पण तरीही...
Corona ग्रस्त ची संख्या किती आहे
Covid19 चा रिपोर्ट किती लोकांचा positive आलेला आहे हा आकडा महत्वाचा आहे पण इतका महत्वाचा नाही की त्या वरून काही निष्कर्ष काढले जातील.
साथी चा रोग आहे,हवेतून पसरत आहे ,श्वसन मार्गाने बाधित करत आहे तर त्या पासून स्वतःला वाचवणे तसे अवघड आहे.
जगभरातील देशात covid19 , चे बाधित लोक संख्येने खूप आहेत.
फक्त संख्येनी देशांची तुलना करू नका लोकसंख्येच्या प्रमाणात किती टक्के लोक बाधित आहे अशी टक्केवारी काढली तर भारतात जास्त प्रसार झाला आहे जगाच्या मानाने असे म्हणता येणार नाही.
आणि दुसरी गोष्ट गंभीर लक्षण असलेल्या लोकांची टक्के वारी भारतात किती आहे .
हा आकडा सुध्धा महत्वाचा आहे.
वरवर चे आकडे बघून खरी परिस्थिती कशी माहीत पडेल.
#ममवबेफिकीरी1
#ममवबेफिकीरी1
आजी-आजोबा, मुलगा-सून, नातू(9)-नात (4) असे कुटुंब.
सुनेला ताप आला, क्रॉसिन घेतल्यावर उतरायचा, फॅमिली डॉक्टरकडे गेले, त्याने छे छे viral च असे म्हणून सांगितले, या सगळ्यात 3 4 दिवस गेले. अगम्य कारणांनी त्यांनी सुनेला विलग केले नाही, ती घरभर फिरत होती.
पाचव्या दिवशी वास चव गेली तेव्हा खडबडून जाग आली ,तिची टेस्ट केली, पोसिटिव्ह आली, मग विलगिकरण केले.
घरातल्या मोलकरणी बंद केल्या, सासू सगळी कामे करू लागली, कामाची सवय नसल्याने थकवा येत असेल अशी समजून घालून घेण्यात 2 दिवस गेले, नंतर कणकण वाटली तेव्हा परत धावपळ , मात्र यावेळी घरातल्या सगळ्यांच्या टेस्ट केल्या
आजी-आजोबा -नातू पोसिटिव्ह (सून आधीच होती)
आता एका बेडरूम मध्ये सून-नातू, दुसऱ्यात आजी आजोबा असे क्वारान्टीन झाले आहेत. मुलगा आणि नात सध्यातरी निगेटिव्ह आहेत.
#ममवबेफिकिरी 2
आजी आजोबा मुलगा सून नातू असे कुटुंब
ऐन गणपती च्या दिवसात सुनेला कणकण डोकेदुखी जाणवायला लागली, ते अंगावर काढून फॅमिली डॉक्टर, होमिओपॅथ वगैरे ची औषधे घेत, पाहिले 3 दिवस रेटले. विलगिकरण वगैर प्रकार गावी ही नव्हते. शेवटी नवरा आणि आजोबांना पण ताप सुरू झाला म्हणून टेस्ट केली ती तिघांची पोसिटिव्ह आली.
आजींना गणपतीच्या आधी पासून घसा दुखणे, अंग दुखणे लक्षणे होती त्या कडे दुर्लक्ष केले, त्यांची टेस्ट केली नाही
2 दिवसांनंतर आजींना ताप आला मग त्यांची आणि नातवाची केली. आजी पोसिटिव्ह, नातू निगेटिव्ह
आजी ना रिपोर्ट आल्याच्या दुसऱ्याच दिवशी धाप लागते म्हणून हॉस्पिटल मध्ये भरती करावे लागले
अजून एक दिवसांनी आजोबा पण हॉस्पिटल मध्ये
सध्या आजोबा नॉन ऑक्सिजन बेड वर आजी ऑक्सिजनबेड वर.
नातू परिचितांकडे, आणि मुलगा सून घरी क्वारान्टीन
#ममवबेफिकीरी3
या वरच्याच कुटुंबात आजी हॉस्पिटल मधून घरी फोन करून सांगतायत जेवण छान असते, ब्रेकफास्ट ला अगदी गरम इडली सांबर होते वगैरे
आजोबा सांगतायत छ्या काही चव नसते,डबा पाठव घरून, सुने बाहेरून मागावलेला डबा हॉस्पिटल ला पाठवला (कारण घरी सुद्धा ते तेच खात होते)तर आजोबांचा उलट फोन इकडे बाकीच्यांच्या डब्यात चिकन फिश असते, जरा तोंडाला चव येईल असे पाठव.
सुन फुल्ल इकडे परिस्थिती काये मोड मध्ये
शेवटी ओळखीच्या डॉक्टर ना मध्ये घालून , नाही तुम्ही साधाच आहार घ्या वगैरे सांगितले सासऱ्यांना
#ममवबेफिकीरी 4
खरे तर हे बेफिकीरीचे उदाहरण नाही, पण कॉन्स्टंट लक्ष ठेवायची आणि लौकर निदान करायची गरज यातून दिसते
मुलगा सून एका फ्लॅट मध्ये
सासू खालच्या मजल्यावर दुसऱ्या फ्लॅट मध्ये
सुनेला ताप, फॅमिली डॉक्टर- टेस्ट नाही, पण वेगळा फ्लॅट असल्याने तसे विलगिकरन आपोआप झाले असेल.
रात्री व्हाट्सअप्प वर बोलताना म्हणाली सासू बाईंना आज घसा खवखवत आहे.तिला टेस्ट करू घेच म्हणून आग्रह केला
दुसऱ्या दिवशी सकाळी बोलताना कळले काल रात्री 2 च्या सुमारास त्यांना ऍडमिट करायला लागले, थेट व्हेंटिलेटर्स लावायला लागला, त्यांची टेस्ट केली ती पोसिटिव्ह आलीये.
दरम्यात हिने टेस्ट केली ती निगेटिव्ह आली, पण पुढच्या24 तासात सासूबाई गेल्या.
कदाचित सासूबाईंनी लौकर टेस्ट केली असती तर चित्र वेगळे असते.
#ममवबेफिकीरी5
एक बिल्डिंगीत (जिकडे ऑलरेडी रुग्ण होते) एका माणसाने 4 भटजी आणि 20 25 पाहुणे बोलावून आपल्या सासाऱ्यांचे श्राद्ध घातले. (सासरे करोनानेच गेलेत, जिकडे राहायचे म्हणजे मुलाकडे, तो भाग कंटेन्मेंट झोन आहे, तिकडे लोकांना येता येणार नाही म्हणून जावयाकडे श्राद्ध विधी)
याला काय म्हणावे?
पांडुरंग रायकर या पत्रकाराचा हॉस्पिटल बेड अभावी करोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर 'आवाज उठवणारे' पत्रकार आणि हे फोटोमधले पत्रकार! अशी दृष्य बघून खरोखर कोणतेही सरकार समाजाचे काहीही भले करू शकणार नाही याविषयी खात्री पटते.
https://epaper.loksatta.com/c/54767904
कोरोनादेवीची ममव कहाणी
कोरोनादेवीचा कोप वाढल्यावर सर्व ममव आणि मउमव प्रजा वात्साप देवाला शरण गेली. तिथल्या पुजार्यांचे निरोप वेगाने सर्वदूर पोहोचू लागले. लिंबु, मोसंबी, व्हिटॅमिन सी यांचा एकाचवेळी मारा सुरु झाला. दालचिनी, मिरे, आलं इत्यादी मसाल्याच्या पदार्थांचे काढे घरोघरी उकळु लागले आणि रोजच्या रोज सर्व कुटुंबाच्या नरड्यांत उतरु लागले. काही जण हळदीवरच बसले आणि दिवसभरांत इतकी हळद प्यायले की अनेकांचे डोळे पिवळे झाले. काविळीच्या भीतिने डॉक्टरांकडे धावले आणि कानपिचक्या खाऊन घरी परतले. काढे पिणार्यांपैकी बर्याच जणांना कोंब फुटले आणि मग 'तसल्ली' क्रीमे करणार्या औषधी कंपन्यांचा फायदा वाढला. शेवटी, डॉक्टरांना, आपल्याला रोगाशी लढायचे आहे, घशाशी नाही, असे सांगून त्यांची समजूत काढावी लागली. काही जणांनी सरकार पुरस्कृत भीतिमुळे, स्वतःला घरांत कोंडून घेतले. ऊन मिळत नाही म्हणून डी व्हिटॅमिनचा इतका मारा केला की पुन्हा एकदा डॉक्टरांची बोलणी खावी लागली. घरी आलेले पुडे, भाज्या आणि वर्तमानपत्रेही यातून सुटली नाहीत. साबणाच्या पाण्याने वा व्हिनेगारने भाज्या धुण्याचा कार्यक्रम सुरु झाला. त्या टिकाव्या म्हणून वॉशिंग मशीनमधे वाळवून, फ्रीजमध्ये साठवण्याच्या आयडिया निघाल्या. सर्व पुडे पुसून घेण्याचा उपक्रम सुरु झाला. काहीजण रोजचे वर्तमानपत्र दोन तास उन्हात ठेवून वा इस्त्री करुनच वाचायला लागले. दोरीने बांधलेली पिशवी जवळ -लांब करण्याच्या सुपीक डोक्यातल्या कल्पना आल्या. काही प्रथितयश डॉक्टरांनीच नेती चा पुरस्कार केल्यामुळे घरोघरी नेतीचे प्रयोग सुरु झाले, त्यासाठी बाजारात नेतीपात्रेही मिळायला लागली. कित्येकांना लग्नांत आपण, नेतिचरामि अशीच शपथ घेतली होती की काय, असे वाटू लागले. कोमट पाण्याने विषाणु जात नाहीत असा क्षीण प्रतिवाद केल्यावर, 'असू दे, पण आता नाक अगदी स्वच्छ रहाते', असे समर्थन पुढे आले. निदान त्या निमित्ताने, घरोघरीचे कातगोळ्यांचे कारखाने कमी झाले हे तेवढं चांगलं झालं! वाफार्याने रोग हरा, अशीही मोहीम सुरु झाली. आणि नाकातोंडात जाणारी वाफ म्हणजे उकळत्या पाण्याच्या तापमानाची, असा कित्येकांचा समज झाला. एवढं सगळं करुनही ज्यांना कोरोना झाला आणि ज्यांचे डोळे कायमचे मिटले नाहीत, त्यांचे डोळे उघडले. मास्क हा स्वतःसाठी नसून पोलिसांसाठी आहे, अशी ज्यांची धारणा होती ते रोग पसरवतच गेले. अशी ही कोरोनादेवीची कहाणी!
ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लशीच्या चाचणीत भाग घेणारी एक व्यक्ती अचानक आजारी पडल्यामुळे जगभरात चाचणी स्थगित केली गेली आहे
Oxford University vaccine trial paused after participant falls ill
वाणसामान आणि खाणेपिणे, इ.
साथीमुळे अमेरिकन समाजाच्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा बदलल्या आणि वाणसामान आणण्यात त्यामुळे कसा फरक पडला ह्याविषयीचा एक रोचक लेख -
7 Ways the Pandemic Has Changed How We Shop for Food
मंदीत संधी
मंदीत संधी म्हणून पेप्सीने एक नवं ड्रिंक लाँच केलंय - Driftwell : an enhanced water beverage. स्ट्रेसबस्टर आणि झोप लागण्यासाठी म्हणून त्यात L-theanine हे amino acid आहे.
पन्नास लाख
याच धाग्यात ५ सप्टेंबरला चाळीस लाखांची नोंद होती. तेव्हा त्यासाठी सोळा दिवस लागले होते. आता पन्नास लाख झाले आहेत. म्हणजे १०-११ दिवसांत १० लाख रुग्ण वाढले. (स्रोत : वर्ल्डोमीटर)
कोरोनाचा पाहुणचार
उमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी हे गेली काही वर्षं अरभाट फिल्म्स या संस्थेमार्फत मराठी चित्रपटनिर्मिती करतात. करोनाविषयी माहिती देणारा 'कोरोनाचा पाहुणचार' हा लघुपट त्यांनी नुकताच केला आहे. त्याचा यूट्यूब दुवा.
सुधीर पटवर्धन
हिंदुस्तान टाइम्सने चित्रकार सुधीर पटवर्धन यांना करोना महासाथीदरम्यानच्या मुंबईविषयी चित्र काढण्याची विनंती केली. त्याला मान देऊन त्यांनी काढलेले चित्र -
Sudhir Patwardhan’s exclusive artwork Departure depicts the frailty of Mumbai as home
परिस्थिती काय आहे
जगाने आता दहा लाख मृतांचा आकडा गाठलेला आहे. त्यांपैकी सर्वाधिक म्हणजे दोन लाख मृत्यू अमेरिकेत तर त्या खालोखाल ब्राझील आणि तिसऱ्या नंबरवर भारत (आता ९५,०००, पण काही दिवसांतच लाखाचा आकडा आपण सहज गाठू).
एकूण रुग्णसंख्येत साठ लाखांचा आकडा भारतानं आज गाठला आहे. पन्नास लाखांची नोंद सोळा तारखेची होती, म्हणजे ११-१२ दिवसांत दहा लाख नव्या रुग्णांचा टप्पा गाठलेला आहे. (स्रोत : वर्ल्डोमीटर)
शुक्रवारी सकाळी जिममध्ये गेले
शुक्रवारी सकाळी जिममध्ये गेले. नेहमीचा, गप्पिष्ट ट्रेनर होता.
"काय रे, बातमी बघितलीस का?"
"ट्रंपची? हो... मला फार आनंद झाला."
"तो करोनामुळे मेला नाही म्हणजे मिळवलं. कारण त्यालाच कोव्हिड झालाय म्हणल्यावर आता करोनाचा विषय कसा टाळणार तो! पण निवडणुकीत सडकून पडला पाहिजे तो!"
"नुस्ता पडला नाही पाहिजे, कर न भरण्याबद्दल तुरुंगात गेला पाहिजे. न्यू यॉर्क टाईम्सची बातमी बघितलीस का! मीच ह्या वर्षात त्याच्यापेक्षा जास्त कर भरला आहे..."
हा जिम-ट्रेनर जेवढे तास काम करतो, त्यानुसार त्याला पगार मिळतो. करोनामुळे दोन महिने जिम बंद झाल्यावर दुकानात स्टॉकिस्टचं काम करणार म्हणाला होता. २२-२३ वर्षांचा तरुण आहे; आणि इन्स्टाग्रामवर चॅलेंज वगैरेंच्या फंदांत पडत नाही, आपण-बरं-आपला-व्यायाम-बरा छापाचा आहे. मला नवलच वाटलं होतं सुरुवातीला! पण आम्ही जसजशा जास्त गप्पा मारायला लागलो, तसा हा अजिबात उथळ मुलगा नाही, ह्याला बुद्धी आहे, मनानं चांगला आहे, कष्टाळू आहे, अशा सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या.
अमेरिकी उदारमतवाद्यांमध्ये सुझन ग्लासर ही न्यू यॉर्करची लेखिका प्रसिद्ध पत्रकार आहे. ट्रंपनी गेल्या वर्षात फक्त ७५० डॉलर एवढाच आयकर भरला हे जाहीर झाल्यावर तिनं ट्वीट केलं होतं -
RT if you pay more in taxes than the President of the United States and are not a ‘billionaire’
— Susan Glasser (@sbg1) September 27, 2020
तिथल्या काही प्रतिक्रियाही मजेशीर आहेत -
"RT if you donate 100% of your annual salary each year...."
"You guys are biased" (मला ही विशेष आवडली, बाईचा उल्लेख 'गाईज'मध्ये करण्याबद्दल!)
"Don't judge him because he's been on public assistance. The poor guy just can't seem to stay out of debt; he shouldn't have to live in squalor. It's not his fault he lives in a capitalist society, with a social safety net that catches those who can afford a tax accountant."
दोन महिन्यांनंतर
माझ्या एका मित्राला ऑगस्ट महिन्यात करोना होऊन गेला. घरच्या घरी आयसोलेट होऊन तेव्हा विषय संपला होता. आता त्याला काही इतर कारणासाठी दोन दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवायचं होतं. हॉस्पिटलने स्वॉब टेस्ट केली त्यात अजूनही व्हायरस दिसला (लोड किती ते माहीत नाही) त्यामुळे हॉस्पिटलने ठेवून घ्यायला नकार दिला. (स्थळ : मुंबई)
आमचा नेदरलँड मधील वार्ताहार
आमचा नेदरलँड मधील वार्ताहार डॉ तेज मुंडकुर कळवतो कीhttps://www.dutchnews.nl/news/2020/10/coronavirus-in-the-netherlands-wh…
नवरात्र
शनिवारी घटस्थापना आहे. आज वाण्याकडे गेलो होतो तर एक विशीतला मुलगा विचारत होता की तुमच्याकडे दांडिया मिळेल का? आणि सोसायटीतल्या एकमेव जैन कुटुंबाकडे गेले दोन दिवस वर्दळ आहे. एरवी रात्री दहाला सामसूम होणारं घर आणि आत्ता साडेअकराला त्यांच्या घरून कुणी तरी पाहुणे उतरले. पुण्यातल्या घटत्या रुग्णसंख्येकडे पाहून आनंदी होत असाल, तर पुढचे पंधरा-वीस दिवस रुग्णसंख्येकडे लक्ष असू द्या.
मुहूर्तमाहात्म्य!
वस्तुत:, टर्की या प्राण्यात (खाद्य म्हणून) विशेष असे काही नसते. म्हणजे, कागदाचा बेचव लगदा चावून चावून चघळण्याचे समाधान लाभते.
मात्र, थँक्सगिव्हिंगच्या मुहूर्तावर धार्मिक भावनेने खावा. (म्हणजे, थँक्सगिव्हिंग हा खरे तर धार्मिक सण नव्हे, परंतु तरीही. साधारणत:, आपण साबूदाण्याची खिचडी एकादशीच्या दिवशी ज्या धार्मिक भावनेने खातो, तीच धार्मिक भावना. म्हणजे, इतर दिवशीसुद्धा साबूदाण्याची खिचडी खाता येत नाही किंवा खाल्ली जात नाही, असे नाही; परंतु, तेव्हा त्या खाण्यामागे धार्मिक भावना नसते. तसेच.) थँक्सगिव्हिंगच्या मुहूर्तावर त्या टर्कीच्या अंगात (किंवा, खरे तर मढ्यात) काय संचारते, परमेश्वर जाणे, परंतु, थँक्सगिव्हिंगच्या दिवशी ती टर्की, त्याबरोबरचे ते स्टफिंग नि ग्रेव्ही नि क्रॅनबेरी सॉस, हे काँबिनेशन अप्रतिम लागते.
धार्मिक भावना. किंवा, मनाचे खेळ. तेच ते.
.
गेली काही वर्षं आम्हां दोघांनाही शेजारच्या डेबीकडे थ्यँक्सगिव्हिंगचं आमंत्रण असतं. मी टर्की खात नाही; मला स्टफिंग आवडतं. ते शाकाहारी का कसं, ह्या चिंता मी करत नाही. बरा अर्धा क्वचित थोडी टर्की खातो. तरीही संध्याकाळी ४-५ च्या सुमारास आम्ही दोघं कसेबसे, पाय ओढत २० पावलं चालून घरी येतो, एवढं पोट भरलेलं असतं.
उरलेली टर्कीतली थोडी टर्की डेबी डब्यात भरून देते. बरा अर्धा आणि त्याची मुलगी - तिर्री मांजर ही टर्की पुढे आठवडाभरात संपवतात. नाही संपली तर ती टर्की तिच्या हाडांसकट माझ्या कंपोस्टाच्या डब्यात जाते.
बरा अर्धा दर रविवारी हौसेनं साबुदाण्याची खिचडी करतो. हल्ली तर नवाच प्रकार सुरू केलाय. खूप साबुदाणे भिजत घालतो. आणि दिवसभर ती खात राहतो. त्याच्याच भाषेत - "थ्यँक्सगिव्हिंगची साबुदाण्याची खिचडी असते ती!"
ह्या वर्षी करोनामुळे काय होणार कोण जाणे! तिनं बोलावलं नाही तर बरं होईल; नाही म्हणायची गरज पडणार नाही. तशा बाहेर बागकाम करताना आम्ही भेटत राहतोच.
..
आमच्याकडे टर्की घरात करण्याची पद्धत नाही. बोले तो, सामुग्री नाही, उत्साहही नाही, आणि इतक्या टर्कीचे करायचे काय, हा प्रश्नही असतोच.
मात्र, दरवर्षी, शक्यतो एक व्रत म्हणून, गोल्डन कोरालसारख्या एखाद्या अमेरिकन ऑल-यू-कॅन-ईट बफेत१ जाऊन मनसोक्त हादडून येतो.२ आजवर शक्यतो चुकविलेले नाही, परंतु या वर्षी काय होणार आहे, कल्पना नाही. म्हणजे, एक तर या अश्या बफेंच्या किती शाखा उघड्या राहातील, हे शंकास्पद आहे. आणि, उघड्या राहिल्याच, तरी, या असल्या बफेंमध्ये आणि तेही खास करून थँक्सगिव्हिंगसारख्या विशेष प्रसंगी जी झुंबड उडते, ती लक्षात घेता, तेथे जाणे हे कितपत सुरक्षित आहे, हा दुसरा मुद्दा.३ बघू या काय करायचे ते. बहुधा या वेळेस स्किप मारावे लागेल.
सहसा दर वर्षी ऑफिसमध्ये एखादे थँक्सगिव्हिंग लंच होते. यावर्षी ऑफिस (किमान पुढच्या वर्षापर्यंत) बंद असल्याकारणाने तीही शक्यता नाही.
घरी दरवर्षी बोलावणे येईल असे मित्र नाहीत. त्यामुळे तोही मार्ग बंद आहे. (बंद आहे म्हणण्यापेक्षा, तो मार्ग कधीच उपलब्ध नव्हता.) तसे पूर्वी एकदा एके वर्षी एका (कोकणस्थ ब्राह्मण) सन्मित्राच्या घरी टर्की खायचे आमंत्रण आले होते म्हणा. ती ग्रोसरी स्टोअरांमध्ये जी रेडिमेड थँक्सगिव्हिंग मील्स मिळतात, ज्याच्यात टर्की, स्टफिंग, ग्रेव्ही, क्रॅनबेरी सॉस, सर्व मिळते, नि आयत्या वेळेस फक्त (क्रॅनबेरी सॉस वगळता सर्व) गरम करावे लागते, त्यातला प्रकार होता. प्रकार चांगला होता, परंतु उपरोल्लेखित मित्राने तो प्रकार त्या वर्षी बहुधा प्रायोगिक तत्त्वावर केला असावा, नि पुन्हा त्या (बोले तो, घरी टर्की आणण्याच्या) वाटेला गेला नसावा. (अन्यथा - गणपतीला वगैरे ठीक आहे, परंतु - हा माझा मित्र खास थँक्सगिव्हिंगला म्हणून आमंत्रण कोठले करायला? शेवटी कितीही झाले, तरी आम्ही दोघेही भटेच. कधीमधी ष्टेक खात असलो म्हणून काय झाले?)
तसा एकदा ते ग्रोसरी स्टोअरवाले थँक्सगिव्हिंग मीलदेखील घरी आणून गरम करण्याचा प्रयोग एके वर्षी करून पाहिला. क्वालिटीच्या (आणि, तसे पाहिले, तर किमतीच्यासुद्धा) दृष्टीने ते ऑप्शनसुद्धा खरे तर वाईट नाही. परंतु, त्यामागील अडचण लगेच लक्षात आली. क्वांटिटी!!! बोले तो, टिपिकल मध्यम आकाराच्या अमेरिकन (बोले तो, आपल्या हिशेबाने प्रचंड!!!) कुटुंबाकरिता पुरेसा ऐवज येतो त्यात. इथे आमच्या घरात आम्ही तिघेजण. त्यात बायको शाकाहारी. म्हणजे खाणारे दोघेच जण. आठवडाभर पुरेल इतका माल येतो. आता, उरलेले टर्की+स्टफिंग+ग्रेव्ही+क्रॅनबेरी सॉस हे दुसऱ्या दिवशी खायला वाईट लागत नाही, परंतु पुन्हा तिसऱ्या दिवशी लागोपाठ खायचा कंटाळा येतो, नि चौथ्या दिवशीपर्यंत आयुष्यात पुन्हा टर्की पाहावीशी न वाटण्याइतकी इच्छा मेलेली असते. मग त्या मुळात चाळीसपन्नास डॉलरला विकत घेतलेल्या ऐवजापैकी साधारणपणे पंधरावीस डॉलरचा ऐवज फेकून द्यावा लागतो. त्यात पुन्हा या वर्षीपासून मुलगासुद्धा घरी नाही. म्हणजे खाणारा आता मी एकटाच. (सुट्टीला आलाच घरी, तर एखाद्या दिवसापुरता. नंतर निस्तरायला मला एकट्यालाच लागणार.) चान्सच नाही. त्यामुळे, तोही ऑप्शन बाद.
तुमची तिर्री मांजर आठवड्याभरानंतरसुद्धा ती टर्की कशी काय खाऊ शकते, याचे मला आश्चर्य वाटते. (तुमचा बरा अर्धा, मला खात्री आहे, दुसऱ्या दिवसानंतर तो उरलेला सगळा ऐवज, स्वत: तोंड न लावता, सगळाच्या सगळा तिला डेलेगेट करीत असणार. आणि, आय वोंट ब्लेम हिम फॉर दॅट. पण... मांजरी सहसा खाण्यापिण्याच्या बाबतीत चोखंदळ असतात, असे ऐकले होते. असो.)
तर सांगण्याचा मतलब, या वर्षी बहुधा आमचा धर्म बुडणार, अशी लक्षणे दिसत आहेत.४ बुडूद्यात झाले.५ शेवटी देवास जर काळजी नसेल, तर आम्हांस का असावी? (अल्ला उदास, मशीद उदास, फकीर उदास...६)
==========
तळटीपा:
१ पूर्वी रायन्ससुद्धा असायचे, नि ते तुलनेने अधिक बरे असायचे. परंतु, मध्यंतरी, त्याच्या जॉर्जियातल्या बहुतांश (आणि आमच्या घरापासून आवर्जून गाडी चालवून जाण्याइतपत अंतरातल्या सगळ्या) शाखा बंद पडल्या. चलता है, अमेरिका है|
२ मला नि पोराला तर टर्की नि इतर मांसे हादडता येतातच, शिवाय शाकाहारी बायकोलाही तुलनेने बऱ्यापैकी चॉइसेस मिळतात.
३ 'नॉर्मल' रेष्टॉरण्टे सर्वच नाही, तरी उघडलीयेत आता बऱ्यापैकी. जातोसुद्धा तिथे (मास्क लावून) क्वचित. परंतु ती गोष्ट वेगळी. तिथे एक तर एकाआड टेबले अडवून सोशल डिस्टन्सिंगचा किमान प्रयत्न तरी असतो. नि मुख्य म्हणजे, अमेरिकन बफेंसारखी गर्दी नसते.
४ देश तर जवळपास बुडाल्यातच जमा आहे म्हणा, तेथे धर्माची काय कथा!
५ धर्म. देश नव्हे. ऑल्दो, देश कसा काय वाचतो, हा प्रश्नच आहे. असो. मत देणे, नि पाहात राहणे!
६ ही एक पुरातन (बहुधा आमच्या आजोबांच्या पिढीतली; निदान, आमच्या आजोबांच्या तोंडून ऐकलेली) मराठी म्हण आहे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखविण्याचा येथे उद्देश नाही.
...
मला बरेचदा अमेरिकी रेडी-मील विकत घेताना तीच अडचण वाटते; शाकाहारी पर्याय खूप कमी असतात. आणि असतात त्यात प्रचंड जास्त जेवण आणि बटाटे असतात. खाणार कोण!
आमच्याकडे येते ती उरलेली टर्की म्हणजे एका जेवणापुरता ऐवज असतो. डेबीचे दोन तरुण मुलगे आहेत, २२-२५ वयाचे. एकाची गर्लफ्रेंड आहे, ती पाकिस्तानी असल्यामुळे तिच्या घरी थ्यँक्सगिव्हिंग नसतं, तीही येते. डेबीची आई आणि तिचा नवरा... म्हणत म्हणत चिकार माणसं होतात.
देश तर जवळपास बुडाल्यातच जमा आहे म्हणा, तेथे धर्माची काय कथा!
न्यू झीलंडच्या उपपंतप्रधानानी अमेरिकी शिक्षणाची केलेली टिंगल परवा ट्विटरवर फिरत होती. बघितलीत का?
हात्तिच्या!
एवढेच होय?
नाही, म्हणजे, बाई जे म्हणाल्या, त्यात काही चुकीचे अथवा वावगे आहे, असे म्हणण्याचा इरादा नाही. परंतु, यात नवीन असेही काही नाही. (चपखल आहे, परंतु) शिळाच विनोद आहे; फक्त, हल्लीच्या तापात त्यास ऊत येत असल्यास नवल नाही.
मला वाटले, नॉव्हेल, चमत्कृतिपूर्ण, स्टिंगिंग असे काही सांगता आहात. हा म्हणजे, घासून घासून गुळगुळीत (किंवा, घालून घालून सैल; टेक युअर पिक.) प्रकार आहे. असो.
किशोर मासिक
वाचक लहान मुलेही करोना कवितांना कंटाळली असावीत.
----
किशोर ओनलाईन
मी पूर्वी बोले तो २०१८ पर्यंत
मी पूर्वी बोले तो २०१८ पर्यंत सिटी फ्लो नामक सर्विस प्रोव्हायडरची (वातानुकूलित) बस सेवा नियमित वापरत होतो. त्यावेळी ठाणे ते बीकेसी या २५ किमी अंतरासाठी ते १२५ रु आकारत. करोना टाळेबंदी नंतर त्यांनी जून महिन्यात बससेवा पुन्हा सुरू केली (अशी मेल त्यांनी मला पाठवली). त्यात प्रत्येक ट्रिप नंतर बसचे सॅनिटायझेशन + एक आड एक सीटिंग अशी व्यवस्था होती. त्या कारणाने त्यांनी दर वाढवले होते. पण एकुणात त्यांना प्रतिसाद चांगला मिळाला नसावा. आज त्यांनी २५% भाडेकपात करत असल्याची मेल पाठवली आहे. (मी आता जातच नाही त्यामुळे माझा संबंध नाही; पण आता माझा मेल आयडी त्यांच्याकडे असल्याने मी मेल्यावरही त्यांची ईमेल्स येत राहतील).
हा एक अपकमिंग धंदा होता. बहुधा १२५ रु ही देखील रक्कम नफा कमावण्यासाठी कमीच* असावी. पण सध्या स्टार्ट अप म्हणून मोठा तोटा सोसून ग्राहक मिळवण्याची पद्धत आहे त्यामुळे चालवत असावेत. आता करोनामुळे प्रतिसाद मिळाला नाही तर बंदच पडेल. जे दुर्दैवी* असेल.
*१९९२-९३ मध्ये ऑटोरायडर्स यांनी वांद्रे ते नरीमन पॉईंट अशी लिमोझिन सेवा सुरू केली होती. आणि तेव्हा ते या साठी १२० रु आकारत असत. तेव्हा २०१८-१९ मध्ये त्याहून जास्त अंतराला १२५ रु ही रक्कम निश्चितच "कमी" असावी.
** हा व्यवसाय चालला असता (हा म्हणजे सिटी फ्लो नव्हे तर तत्सम सेवा देणाऱ्या शटल किंवा झिप गो यांचाही) तर कदाचित कार घेऊन ऑफीसला जाण्याची प्रवृत्ती/गरज कमी होऊ शकली असती जे प्रदूषण आणि ट्रॅफिक दृष्ट्या चांगले झाले असते.
तुलना
आणीबाणी आणि लॉकडाऊनच्या काळाची तुलना केली तर आणीबाणी जास्त सुसह्य होती असे वाटते. आणीबाणीत सामान्य माणसाला महाराष्ट्रात तरी त्रास नव्हता. लॉकडाऊन मध्ये मात्र सरकार, मंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि रस्त्यावरचे बंदोबस्ताचे पोलिस यांच्या लहरी आणि मर्जीप्रमाणे सामान्यांना वेगवेगळा त्रास झाला.
रशिया
रशियातून आलेली WTF बातमी - पुरेशा लशींअभावी चाचण्या रखडल्या!
Russia’s Covid-19 vaccine trial paused as clinics run short of shots
The shortage of doses is the latest challenge to Moscow’s ambitious and unorthodox vaccine plan, which has seen the government give regulatory go-ahead for the shot – and launch the mass inoculation of the general public – before full tests for safety and efficacy were complete.
लशीचा फायदा सर्वांना?
ऑक्सफर्ड विद्यापीठाची (आणि पर्यायाने सीरम इन्स्टिट्यूटची) लस सर्व वयोगटांतील लोकांना उपयोगी ठरेल असे दिसते आहे -
Oxford Covid vaccine works in all ages, trials suggest
डेन्मार्क
डेन्मार्कमध्ये मिंक करोनाग्रस्त झाल्यामुळे सर्वच्या सर्व म्हणजे १.७ कोटी मिंकची हत्या करणार. हा म्यूटेट झालेला व्हायरस आहे आणि त्याची लागण माणसांना होऊ शकते. लशीच्या परिणामकारकतेवरही ह्या नव्या म्यूटेशनमुळे फरक पडू शकेल कदाचित -
Denmark to cull up to 17 million mink amid coronavirus fears
भारतात कोरोना संपलेला आहे...
भारतात कोरोना संपलेला आहे...
(क्लिकबेट)
दुर्दैवाने भारतातले लोक तसेच वागत आहेत. उदा. लिफ्टमधले ५ पैकी किमान २ लोक मास्कविना असतात. मॉलमधले कामगारही मास्क वापरत नाहीत. मास्क असतो पण गळ्याशी लटकत असतो. विचारले तर कुत्सित हसतात. नीटपणे मास्क घालणारे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणारे यांची 'भित्रट' अशी संभावना होते. दुसरी, तिसरी,चौथी लाट येतच रहाणार, माणसे मरणार...
आणि जे सावधानी बाळगा असे सांगत रहाणार त्यांच्या वाट्याला कुत्सित संभावना येणार.
भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत... असो!
अमेरिका, एलाय लिली
अमेरिकेने आता एक कोटी रुग्णसंख्येचा आकडा ओलांडला आहे.
फायझरच्या लशीच्या बातमीत एलाय लिलीच्या बातमीकडे लोकांचं दुर्लक्ष झालंय कदाचित, पण या अमेरिकन कंपनीच्या अँटिबॉडी उपचारांना अमेरिकन एफडीएची मंजुरी मिळालेली आहे. लक्षणं दिसल्यापासून दहा दिवसांच्या आत हे दिल्यास त्याचा फायदा होतो असं दिसतंय. वृद्ध किंवा स्थूल लोकांना याचा फायदा होतो असंही दिसलंय. (ट्रम्पलाही अँटिबॉडी उपचार मिळाले होते.)
Eli Lilly’s Antibody Treatment Gets Emergency F.D.A. Approval
उणे ४० सेल्सियसपेक्षाही कमी
उणे ४० सेल्सियसपेक्षाही कमी तापमानावर स्टोअर करावी लागणारी लस सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्याबाबत (डिस्ट्रिब्युशन) मुळात काय विचार केला गेला असावा?
की सर्वानी स्पेशल facilityत येऊनच लस घेणे अपेक्षित?
अमेरिकेत शक्य असेल. भारत किंवा तत्सम देशात अवघड़ आहे वाहतूक/ वितरण.
कमी समजू नका
भारताला कमी समजू नका. ज्या देशांत खोंडांचे सीमेन लि्विड नायट्रोजनच्या टँकर मधून गावोगावी पुरवले जाते (-७० डिग्री) , त्यांना काय अशक्य आहे?
https://www.indiamart.com/rajasthansemencompany/profile.html
युरोपियन मॉडेल की अमेरिकन?
साथीला तोंड देण्यासाठीची युरोपातली उपाययोजना आणि अमेरिकेतली उपाययोजना ह्यांची तुलना करणारा एक लेख. रेस्टॉरंट, पब वगैरे जिथे मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतील असे इनडोअर प्रसंग टाळायचे, पण शाळा चालू ठेवायचा युरोपचा उपाय आणि त्याउलट शाळा बंद ठेवून रेस्टॉरंट, पब वगैरे उघडे ठेवायचा अमेरिकन प्रकार ह्यांतली तुलना रोचक आहे -
Different Virus Responses
प्रतिकारशक्ती दीर्घ काळ
एकदा संसर्ग होऊन गेल्यानंतर प्रतिकारशक्ती दीर्घ काळ टिकते असं संशोधन -
Immunity to the Coronavirus May Last Years, New Data Hint
ही माहिती रोचक वाटते का ?
ही माहिती रोचक वाटते का ?
https://edition.cnn.com/2020/11/30/asia/wuhan-china-covid-intl/index.ht…
लस आणि फेक न्यूज, कॉन्स्पिरसी थिअरीज वगैरे
लशीविरोधात पसरवल्या जाणाऱ्या खोट्या माहितीविरोधात यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटर मिळून एकत्र होऊन लढत आहेत
YouTube, Facebook and Twitter align to fight Covid vaccine conspiracies
फायझरच्या लशीला मंजुरी देणारे ब्रिटन पहिले राष्ट्र ठरले आहे.
Pfizer/BioNTech vaccine approved for use next week in UK
युरप मधील दुसरी लाट
युरप मधील दुसरी लाट व त्याची कारणमिमांसा
https://www.nytimes.com/interactive/2020/12/04/world/europe/europe-covi…
रायपूर डायरी
मुंबई एअरपोर्टवरच कोरोना कोरोनाचा घोष सुरू झाला होता. आत शिरताना temp, आरोग्य सेतू दाखवणे वगैरे करून आत शिरलो, आत सगळेच सेल्फ हेल्प होती (इंडिगो) बोर्डिंग पास, बॅगेज टॅग प्रिंट काढा, तुम्हीच बॅगेला लावा आणि फक्त बॅग ड्रॉप करा. बॅगेज टॅग वेब चेक इन करतानाच जनरेट होतो, हवा असेल तर घरीच प्रिंट काढून बॅग वर चिकटवा.
खरी मजा सेक्युरिटी चेक इनला होती, वर पाळले जाणारे सोशल distancing इकडे नावाला पण नव्हते. सिक्युरिटीवालेपण बेल्ट काढा, शूज काढा करत तब्येतीत चेकिंग करत होते.
मुंबई एअरपोर्टची एकंदर रया गेलीये, शॉपिंग एरिया मध्ये बरीच बंद दुकाने दिसत होती.
इंडिगोमध्ये मिडल सीटवाल्यांना PPE किट देतात, वरच्या अर्ध्या भागासाठी बाथ रोब असावा तसा. आणि सगळ्यांना मास्क आणि फेस शिल्ड.
विमान थांबल्या क्षणी उठून उभी राहायची लोकांची सवय अजून गेली नाही, एअर हॉस्टेस 2 2 लाईन्सना सोडत होती.
मुक्काम पोस्ट रायपूर
शहरातील ट्राफिक प्रचंड कमी झालाय , रिक्षा, ओला खूप खूप कमी झाल्यात. लोकसुद्धा मास्क वगैरे लावून दिसतात, पण एकंदरीत लोकांनी भिती मनावर घेणे सोडलंय.
माझ्याच हॉटेलमध्ये मोठ्ठा लग्न सोहळा होता, त्याचे पूर्ण वऱ्हाड घोळक्याघोळक्यामध्ये वर खाली फिरत होते.
पण रायपूर मधले कोविड नंबर पण खूप कमी झालेत. अगदी स्पेशल कोविड हॉस्पिटलमध्ये गेलेलो तर हॉस्पिटल बंद असावे इतकी कमी गजबज होती. कोरोनामुळे मागे पडलेला त्यांचा 6 7 करोडच्या मशीन्सचा प्लॅन परत बाहेर आलाय. करोनामध्ये हॉस्पिटलने बरा पैसा कमावला असे डिरेक्टर म्हणाला.
डीलरशी बोलताना तो म्हणाला लोक इतके कूल आहेत की बहुतेकांना करोना होऊन गेलाय, माझ्या सर्कलमध्ये जवळपास सगळ्यांना होऊन गेलाय ( याचे सर्कल बरेच मोठे आणि वरच्या लोकांचे आहे, जर प्रिविलेज्ड क्लासला पण होऊन गेलाय तर नक्कीच बाकी लोकांना झाला असणार) त्यामुळे आता मेले कोंबडे आगीला भीत नाही, तसे लोक वागतायत.
परतीच्या प्रवासाला एअरपोर्टवर आत जाण्याअगोदर tempच्या जोडीला बॅगेवर फवारा पण मारून घ्यायला लागत होता सेक्युरिटी चेकवाली बाई स्वयंपाकघरातील चिमट्याने बॅग हलवत होती, हे मनोज्ञ होते.
१-२ प्रवासी फुल्ल ppeमध्ये सुद्धा दिसले.
एकंदरीत लस आली, नाही आली तरी आपलं रहाटगाडगं असेच चालू राहणार.
फायझर, सीरम, भारत बायोटेक
फायझरपाठोपाठ सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांनीही आपापल्या लशींच्या आणीबाणी वापरासाठी भारताच्या Drugs Controller General of Indiaकडे परवानगी मागितली आहे.
भारत बायोटेक
६४ देशांचे प्रतिनिधी लशीविषयी माहिती घेण्यासाठी भारत बायोटेकमध्ये -
India playing key role against Covid-19, says Bharat Biotech as 64 envoys visit facility
सार्वजनिक आरोग्यव्यवस्था आणि लसनिर्मिती
लस उपलब्ध होत असल्यामुळे तिची चर्चा सुरू आहे, पण 'न्यू यॉर्क टाईम्स'मधल्या ह्या लेखात त्यामागे करदात्यांच्या पैशाचा किंवा सरकारांनी केलेल्या आर्थिक मदतीचा वाटा किती आहे हे सांगितलं आहे.
युरोपात लस मंजूर
फायझरची लस युरोपात मंजूर -
Pfizer/BioNTech Covid vaccine approved by European regulator
लस येण्या अगोदर च
लस येण्या अगोदरच गाजावाजा खूप झालंय.
ती यशस्वी होईल असे ठाम पने सांगणार व्यक्ती हा अंध श्रद्धाळू ह्याच वर्गात मोडला जातो.
10 मीटर अंतर पर्यंत बाधित व्यक्ती आला तर च संसर्ग होत आहे तरी जगात करोडो बाधित आहेत.
लाखो लोक मेली आहेत.
फक्त सोपा उपाय होता 10 मीटर पर्यंत कोणत्याच व्यक्ती च्या संपर्कात यायचे नाही.
तरी ही अवस्था.
तेच प्लेग सारखा पिसवा आणि डास पासून हा व्हायरस पसरत असता तर अर्धे जग बाधित झाले असते आणि 25 टक्के तर स्वर्ग वासी झाले असते .
आपण आधुनिक वैद्यक शास्त्र मोठे यश मिळवले आहे ही पण अंध श्रद्धा च आहे.
1 वर्ष तर व्हायरस कोणता आहे आणि त्याची पूर्ण रचना काय आहे हेच ओळखण्यात गेले आणि अर्धवट माहिती वर काढलेली लस काम करेल की नाही हे ठरण्या अगोदर च व्हायरस नी रूप पण बदलेल .
म्हणजे मानवाचा वेग हा व्हायरस च्या वेगा समोर अतिशय मंद आहे.
लढाई जिंकणार कशी.
चीन
१. चीनमध्ये वुहान येथे करोना विषाणूचा पहिला मानवी संसर्ग झाल्याचे कळले त्याला एक वर्ष झाले आहे.
२. बीजिंगमध्ये गेल्या काही दिवसांत रोज काही बाधित लोक आढळत आहेत.
३. दरम्यान महासाथ उत्कृष्ट रीतीने हाताळल्याबद्दल चीनची कम्युनिस्ट पार्टी आपली पाठ थोपटून घेत आहे -
Chinese Communist Party applauds its handling of Covid-19 ahead of WHO investigation into virus' origin
४. कोव्हिडविषयी वुहानमधून वार्तांकन केल्याबद्दल एका पत्रकाराला शासन झाले आहे.
What a journalist's jailing for heroic Covid coverage exposes about China
भारताची लस मंजुरीची पद्धत गोंधळाची?
सीरम (ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेका) आणि भारत बायोटेकच्या लशींना काल डीसीजीआयने परवानगी दिली. त्यापैकी भारत बायोटेकला 'क्लिनिकल ट्रायल मोड'मध्ये मंजुरी मिळाली आहे. हे काही तरी गोंधळाचं आहे असं डॉ. गगनदीप कांग म्हणतायत. त्याविषयी -
'I have no clue. I have never seen anything like it'
लाँग कोव्हिड
वुहानमधल्या बाधित लोकांविषयीचा एक शोधनिबंध नुकताच प्रकाशित झाला आहे, त्यानुसार बरे झाल्यावर सहा महिने लोटले तरीही तब्बल ७६% लोकांमध्ये किमान एखादे लक्षण दिसते आहे -
6 months after illness onset, 76% (1265 of 1655) of the patients reported at least one symptom that persisted, with fatigue or muscle weakness being the most frequently reported symptom (63%, 1038 of 1655). More than 50% of patients presented with residual chest imaging abnormalities.
एक कोटीहून अधिक भारतीयांना
एक कोटीहून अधिक भारतीयांना कोविड होऊन गेला, दीड लाख मरण पावले या बातम्या वाचून दुःखच होतं, पण जेव्हा रोजच्या परिचयातील व्यक्तीचा त्या आकड्यांत समावेश होतो तेव्हा होणाऱ्या दुःखाची प्रतच वेगळी असते. माझ्या काही सहकाऱ्यांना, परिचयातील लोकांना, नातेवाईकांना कोविडची लागण झाली होती, पण सगळे लवकरच बरे झाले. आमच्या संस्थेत Visiting Faculty म्हणून काम करणाऱ्या एका ज्येष्ठ सहकाऱ्यांचा मात्र गेल्या महिन्यात मृत्यू झाला. प्रशासकीय कामांनिमित्त माझे त्यांच्याशी गेली दोन अडीच वर्षे बोलणे, भेट, मेलद्वारे संभाषण होत असे. ७३ वर्षांचे हे प्राध्यापक अतिशय उत्साही होते. अजिबात कटकट न करणारे, आपल्या वयाचा दुरुपयोग माझ्यावर दबाव आणण्यासाठी न करणारे सहकारी म्हणून मला त्यांच्याबरोबर काम करायला बरे वाटत असे. आदल्या संध्याकाळी आमचे whatsapp द्वारे संभाषण झाले, पुढच्या कामाचे नियोजन झाले व दुसऱ्या दिवशी सकाळी इस्पितळात जाताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. हा धक्का आणि दुःख पचवणं फार अवघड गेलं.
इस्राएल-पॅलेस्टाईन
इस्राएल-पॅलेस्टाईनमधल्या राजकीय संघर्षात लशीचंही राजकारण होत असेल तर नवल करण्यासारखं काहीच नाही.
Israel’s Vaccination Drive Is Going Great. But We’re Being Sidelined.
चीन
काही नवे रुग्ण सापडल्यामुळे चीनमध्ये सुमारे दोन कोटी लोक पुन्हा लाॅकडाऊनमध्ये.
अथक पाठपुराव्याअखेर चीनने दिली परवानगी; विषाणूच्या अभ्यासासाठी WHO पथक वुहानमध्ये दाखल.
कोव्हिडविरोधात नाकात मारायचा स्प्रे
फ्रेंच शास्त्रज्ञांनी कोव्हिडविरोधात उपाय म्हणून एक नाकात मारायचा स्प्रे शोधून काढला आहे -
French scientists unveil nasal spray 'Covid solution'
त्याविषयीचा (पीअर रिव्ह्यू न झालेला) पेपर -
An hACE2 peptide mimic blocks SARS-CoV-2 Pulmonary Cell Infection