कॉलनीतल्या शाळेत शिकवले न जाणारे काही विषय

कॉलनीतल्या सगळ्या सुस्थित काका-काकूंनी आपल्या मुलांना आणि नातवंडांना शाळेत काय शिकवलं जातं, आणि काळानुसार काय शिकवलं पाहिजे याची यादी केली. ती पुढीलप्रमाणे -

१. निबंधलेखन - कमीतकमी शब्दांत स्वतःबद्दल अधिकाधिक माहिती पुरवणे. आपल्या मनःस्थितीबद्दल लोकांना अधिकाधिक उत्सुकता वाटायला लावणे. आपण काल काय जेवलो होतो, यातूनही आपली आर्थिक आणि मानसिक परिस्थिती लोकांना समजली पाहिजे. एक चित्र, हजार शब्द जुनं झालं. आता एक शब्द लाख शब्द, हे मुलांना समजलं पाहिजे.

२. मानसशास्त्र - कुत्र्यांमधले सगळे ट्रेंड्स व्हायरल जातात. एक कुत्रा भुंकायला लागला की कॉलनीतले सगळे कुत्रे भुंकायला लागतात. एक कुत्रा एखाद्या सायकल, स्कूटर आणि कारच्या मागे लागायला लागला, की सगळेच त्याच सायकल, स्कूटर किंवा कारच्या मागे जातात. आणि रेबीजबद्दल काय बोलणार महाराज! तर अशा तऱ्हेने माणसांमधले जास्तीतजास्त ट्रेंड्स व्हायरल जाण्यासाठी विद्यार्थ्यांची पूर्वप्राथमिक शाळेपासून तयारी करवून घेणे; जेणेकरून त्यांच्या हातात स्व‌तःचा फोन वा आयपॅड* येईस्तोवर त्यांना व्हायरल जाण्याची सवय होईल.
* साध्या किंडल पेपरव्हाईटलाही आयपॅड म्हणायची मराठी पद्धत आहे.

३. बीजगणित - २३० - २२० * ०.५ = ?
यात सरळसरळ दोन गट पडतात. एक गट जो शाळेत ह्या गोष्टी शिकतो, हा गट अत्यल्पसंख्य आहे. त्यांना माफ करा. दुसरा गट जो ह्या प्रश्नांची उत्तरं अत्यंत प्रेमादरानं फेसबुक आणि ट्विटवर लिहितो. ह्या होमवर्क करणाऱ्या मोठ्या गटाला बंड करायला शिकवणं, हा बीजगणिताचा भाग होऊ शकत नाही.

फेसबुक आणि ट्विटरवर कुणालाही वाईट म्हणू नये असं म्हणणारा एक गट आहे; या गटासाठी सदर प्रश्नाचं उत्तर १ ते २५० या मोठ्या रेंजमध्ये कुठेही बसू शकतं. त्यांना बीजगणित शिकवून काही फायदा नाही. ते सगळ्यांना लाईक हाणणारच.

फेसबुक आणि ट्विटरवर फक्त विरोधकांना ट्रोल करायला जाणाराही एक गट आहे. आपल्या विरोधी मताच्या लोकांनी १ ते २५० या रेंजमध्ये कुठलंही उत्तर दिलं तरी त्यांना धर्म, कपडे, खाण्यापिण्याच्या सवयी आणि इतर कशावरूनही ट्रोल करू शकतात. आपल्या आवडत्या लोकांना भलते लोक ट्रोल करतात, म्हणून हे लोक विरोधकांना ट्रोल करू शकतात.

तर बीजगणित शिकवण्याची काही गरज नाही. तो अत्यल्पसंख्य गट बीजगणित शिकून, ए.आय.वाटे इतरांची सोय करून टाकेल.

४. शरीरशास्त्र - याचे वर्ग घ्यायची काही गरज नाही. घ्यायचेच असतील शाळेत पुरेसे संडास असले की झालं. तिथे सायकल शिकल्यासारखी मुलं शिकतील. आपल्यापेक्षा मोठ्या मुलांकडून. मुद्दाम वेळ घालवायची गरज नाही.

जोवर विवक्षित संस्थळांचा ताबा फेसबुककडे येत नाही तोवर मोठ्या मुलांनाही नवनवीन माहिती सहज मिळत राहील.

५. राजकारण - मोदी, मोदी, मोदी!
मोदी मोदी मोदी

६. भाषा - गूगल ट्रान्सलेट आणि गूगल ट्रान्सलिटरेट आल्यामुळे गूगल वापरायला गूगलायचं कसं हे शिकवणं अतिशय महत्त्वाचं आहे.

७. विज्ञान - वेदपठण.

८. नागरिकशास्त्र - change.orgवर याचिका दाखल करणे. आणि आपल्या लाडक्या लोकांच्या पोस्टींवर लाईकचा पाऊस पाडणे.

९. सांख्यिकी - भारतात १०पैकी ११ लोकांना सांख्यिकी येतेच. खिशात किंवा पर्शीत हात घातला की आकडे तयार. शेजारच्या काकू-काकांना काही अनुभव असेल तर तीच सांख्यिकी.

१०. शारीरिक शिक्षण - फोनवर टंकनाचा वेग कीबोर्डवर टंकण्यापेक्षा जास्त होणं महत्त्वाचं आहे.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

ते बहुतेक कॉलनीतल्या लोकांची विचारप्रवृत्ती बदलून टाकणार. काही लोक त्याला प्रचार म्हणतात बिचारे. कॉलनीत एखादा टाइमस्क्वेअर असायला हवा सभा घेण्यासाठी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तरार्धाचे रोकडे उदाहरण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0