कुंडलकरांना महाराष्ट्राचा भूगोल शिकवण्याचा ठराव साहित्य संमेलनात मंजूर.

नाशिक, ५ डिसेंबर.

नाशिकला भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनेक विषय चर्चेला आले. त्यातला एक महत्त्वाचा विषय होता तो सचिन कुंडलकर या मराठी चित्रपट दिग्दर्शकाचं काय करावं. त्यानं आजवर बऱ्याच मराठी मध्यमवर्गीयांच्या भावना दुखावलेल्या आहेत. कुंडलकरांना मराठी साहित्यिक म्हणावं का, कुंडलकरांना धडा कसा शिकवावा असे अनेक विषय या चर्चासत्रात पुढे आले.

मराठी साहित्य संमेलन

संमेलनाध्यक्ष प्रा. जयंत नारळीकर हे सौम्य वृत्तीचे गृहस्थ आणि संशोधक असल्यामुळे, त्यांच्या रीतीला अनुसरून कुंडलकरांना धडा शिकवण्याजागी महाराष्ट्राचा भूगोल शिकवावा असा विचार पुढे मांडण्यात आला. यासाठी मराठीतले अप्रसिद्ध साहित्यिक आणि अललित लेखक नंदा खरे यांचं नाव चर्चेत आलं होतं. पण त्यांनी तयार केलेला मराठी शब्द, कुनस्थान फेसबुकवर व्हायरल न गेल्यामुळे त्यांचं नाव मागे पडलं. त्यानंतर सर्वमाहितीसम्राट अच्युत गोडबोले यांचं नावही चर्चेत आलं. पण कुणा तरुण साहित्यिकानं "विकीपिडीया, विकीपिडीया," अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. कुंडलकर तुलनेनं तरुण असल्यामुळे त्यांना विकीपिडीया माहीत असेल असं गृहीत धरलं गेलं; आणि गोडबोलेंचं नावही मागे पडलं.

तेव्हा शेजारच्या काकूंनी कुंडलकरांना महाराष्ट्राचा भूगोल शिकवण्यासाठी संमेलन आडगावी भरवण्याची सूचना केली. काकू म्हणाल्या, "बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यस्मरणाच्या पूर्वसंध्येला आपण तळागाळातल्या लोकांचा विचार करू. नाशिकसारख्या दुय्यम शहरात साहित्य संमेलन भरवणं पुरेसं नाही. आपण अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. पूर्वनिजामशाहीतलं छोटं गाव निवडणं पोलिटिकली करेक्ट ठरेल. ह्या लोकांनी खूप सहन केलं आहे; ह्या लोकांना स्वातंत्र्यही उशिरा मिळालं. शिवाय त्यांची भाषाही प्रमाण मराठी नाही. आपण त्यांच्या उद्धाराचाही विचार केला पाहिजे. सतत पुण्यात राहणाऱ्या, उच्चवर्णीय आणि बॉलिवूडशी संबंधित पुरुषाच्या अज्ञानाचाच विचार करून निवड केली, हे वाईट दिसेल. किमान आपण सारस्वतांनी या ऑप्टिक्सचा विचार नको का करायला! तर आता कुणी चांगलंसं ठिकाण सुचवा. जेणेकरून आपणही कुंडलकरच्या ट्रोलिंगसाठी हे केलंय असं कुणाला वाटणार नाही."

शेजारच्या काकूंच्या सूचनेनुसार कुंडलकरांना महाराष्ट्राचा भूगोल शिकवण्याचा ठराव साहित्य संमेलनात गुप्तरीत्या मंजूर झाला आहे. पुढचं अखिल भारतीय उद्‌गीरला घेण्याचं ठरलं आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

या बिरुदावली साठी शनिवार वाड्यावर जाहिर सत्कार करण्याचे योजिले आहे.
Smile Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

गेल्या वेळी अमरावती कुठे आहे हे प्रणव सखदेव ला विचारलं होतं कुंडलम्यान ने.
या वेळी ऐसी अक्षरेतर्फे हा मान आपले माजी श्री अरुण जोशी यांना देऊयात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यवतमाळ ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This too shall pass!

मुद्दाम अमरावती लिहिले असेल अशी शंकाही आली नाही हे म्हणजे....
असो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूपच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

३_१४ विक्षिप्त अदिती ह्यांनी ऐसीअक्षरेवर लिहलेल्या 'कुंडलकरांना महाराष्ट्राचा भूगोल शिकवण्याचा ठराव' हे वृत्त योग्य असले तरी त्यात नाशिक शहराला दुय्यम लेखण्यात आल्याने त्यांचा नाशिकच्या जेष्ठ नागरीक संघातर्फे निषेध करण्यात येत आहे. सदरहु लेखक/लेखिकेचे नाव ग्र्बहब आणि उबर इट्सच्या काळ्या यादीत टाकण्यात यावे ह्यासाठी नाशिकचे लोक वेगळे प्रयत्न करणार असल्याचे समजते. ह्याचवेळी हे सचिन कुंडलकर कोण? हा प्रश्न पडल्यानंतर काही नाशिककरांनी त्यांची फेसबुक पदचिन्हे शोधण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला हा माणूस माहिती नव्हता तेच बरे होते अशी त्यांनी प्रतिक्रीया दिली. दरम्यान नावाजलेले मराठी लेखक प्रणव सखदेव ह्यांनी अ‍ॅमेझॉनवर चार नविन पृथ्वीगोल ऑर्डर केले असुन त्यातला एकात झेक आणि स्लोवाकीया हे दोन्ही देश एकत्रित असणार्‍या झेकोस्लोवीयन गोलाचाही समावेश असल्याचे समजते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0