Skip to main content

‘डर’ –एक भयकथा ! (लेख)

असं म्हणतात की झुरळ हा प्राणी फारच प्राचीन आहे. प्रागैतिहासिक का कुठल्याश्या काळापासून तो पृथ्वीवर वास्तव्य करून आहे. मानव तर तसा 'आनी-जानी'च आहे म्हणा. पण झुरळं मात्र माणसांच्या आधीपासून होती आणि माणसांच्या नंतरही राहणार आहेत असं आम्ही कुठेतरी वाचलंय. पण य:कश्चित झुरळाला इतकी सिनिअ‍ॅरिटी देऊन त्याचं 'प्रतिमासंवर्धन' करणं काही आम्हाला पटत नाही. मग या झुरळांपेक्षाही जुनं काय असावं जे आजही आपल्या आजूबाजूला सर्व चराचर व्यापून आहे ? थोडं डोकं खाजवल्यावर लक्षात आलं की- आहे ! अशी एक गोष्ट आहे जी या पृथ्वीवर फडतूस झुरळांपेक्षाही जुनी आहे ती म्हणजे भय, भीती किंवा डर !

ललित लेखनाचा प्रकार

समाजवाद म्हंजे नेमकं काय ?

समाजवादाची बोलचालीतली (सोप्प्या शब्दातली) व्याख्या व सैद्धांतिक व्याख्या अशा दोन वेगळ्या व्याख्या करता येतील. सोप्या शब्दात समाजवाद म्हंजे सरकारचा औद्योगिक बाजारपेठेतील मोठ्या प्रमाणावर शिरकाव. बाजारपेठेत अनेक क्षेत्रे असतात. ढोबळ मानाने कृषि, औद्योगिक व सेवा ही तीन क्षेत्रे. परंतु औद्योगिक व सेवा क्षेत्रात अनेक सब-सेक्टर्स येतात. सरकारचा त्या क्षेत्रांत जेवढा जास्त सहभाग तेवढा समाजवादाचा प्रादुर्भाव जास्त. उदा. भारतीय प्रजातंत्रात संविधानानुसार केंद्रसूची, समवर्ती सूची, व राज्यसूची अशा तीन सूचींद्वारे सरकारला बाजारपेठेत प्रवेशाची सत्ता देण्यात आलेली आहे.

Making of photo and status : ६. च्यामारी !!!

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.

http://www.aisiakshare.com/node/6241

विलोभनीय अशी सय

परवा बऱ्याच दिवसातून घराजवळ असलेल्या वाचनालयात जायला मिळाले. पुस्तके चाळत असता, प्रसिद् चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांचे आत्मचरित्र हाती लागले. सई परांजपे हे तसे समांतर चित्रपट चळवळीतील महत्वाचे नाव. खरे तर अभिनेता नसीरुद्दीन शाहचे आत्मचरित्र देखील नुकतेच आले होते(English-Then One Day) आणि आणि त्यांनी त्याचे केलेले मराठी भाषांतर(आणि मग एक दिवस) देखील आले होते. मागील महिन्यातच मी चित्रपट रसास्वाद शिबिराला उपस्थित राहिलो होतो, तेथे त्याचा उल्लेख झालाच होता. त्यामुळे ते नाव तसे डोक्यातच होते. त्यामुळे मी ते पुस्तक लगेच घेतले आणि वाचले. त्याचे शीर्षक सय-माझा कलाप्रवास.

ललित लेखनाचा प्रकार

मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ९१

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० पेक्षा अधिक झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---

आदूबाळ साहेब, National Financial Regulation Authority काय आहे?

निर्बंध...

जायचे आहे सगळ्या बंधनातून निसटून कुठे तरी एकांतात
स्वच्छ सुंदर हवेत मन मोकळे करायला.
हलक्या वाऱ्याच्या झुळूकीवर बेधुंद होऊन उडायला.
पण हिम्मत होत नाही, बंधने सुटत नाहीत....
आणि नुसता राहतो तो एकांत कुठल्या तरी आठवणींचा.
मन सुध्दा किती हळवे असते ना.
जे समोर आहे ते सोडून भलतेच विचार करत राहते आणि मग सगळे सुख असताना चिंता संपत नाहीत.
राहतो तो आठवणींचा बाजार आणि न साकारलेली असंख्य स्वप्ने.
पण कुठेतरी हे थांबायला हवे. मनाला सुद्धा आता समजायलाच हवे.
पळून पळून थकलेल्या मनाला आता शांत व्हायलाच हवे.
काही तरी करावेच लागेल, मनाला वेसन घालावीच लागेल.

तुटलेला कान, ऍबसिन्थ, थिओ, कॅनव्हास, वान गॉग चे चित्राख्यान अर्थात - तवूय व्हिन्सेंट !

तुटलेला कान, ऍबसिन्थ, थिओ, कॅनव्हास, वान गॉग चे चित्राख्यान अर्थात - तवूय व्हिन्सेंट !

स्पर्धा का इतर?

संख्याजगताच्या अद्भुत कथा...4

ऑयलर संख्या (e): ठेवीची रकम वाढतच का जात नाही?

या पूर्वीचेः लेख 1, लेख 2, लेख 3

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

शिंजुकू इंसिडेंट-Shinjuku Incident

आचरटबाबांनी खफवर सिरीया/म्यानमार इ इ देशांतून दुसऱ्या देशात जाणारे निर्वासितांचा विषय काढला आणि दिवाळी अंकातील संकीर्ण सदरात मिलींद यांचं घानातल्या करीमची सातवी चूक हे ही वाचण्यात आलं होतं. म्हणून यावर आधारीत समीक्षा. निर्वासितांच्या आयुष्यावरचे अनेक चित्रपट अनेक देशांमध्ये आले. त्यातलाच एक चित्रपट हाँगकाँग मधला 'शिंजुकू इंसिडेंट'.

समीक्षेचा विषय निवडा

उलगडा

तीन दिवसांच प्रशिक्षण, डहाणूला, त्याच्यासाठी ठरलेलं नसताना एक दिवस आधी निघणं. त्या दिवशीचे क्लास ऍडजस्ट करायचे राहिलेले म्हणून सासूबाईचे फोन वर फोन...डोक्यात अडजस्टमेंटचा मचळा, हेडफोन मध्ये वाजायलेलं Enrique Iglesias चं tonight I'm fucking you भनकायलेलं...
तसंही प्रवास म्हटलं की मन गाडीपेक्षा कैकपटिंनी जोरात सैरभैर होत बुद्धी अन् चित्ताची पार विकेट घेऊन टाकतं.
वैजापूर. डोक्यात तसाच मचळा. ईतके दिवस कधीमधी मनात चमकून जाणारी, सहसा स्वप्नात अन् अनेकवेळा दिवास्वप्नात मुक्काम ठोकणारी ती एकदम नजरेसमोर आली, हेडफोन मधलं नुकतच वाजायला सुरु झालेलं अंकितचं मत जा रे मत जा...