Skip to main content

Making of photo and status : ९. जाऊँ क्या खंडाला!?

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.

http://www.aisiakshare.com/node/6241

दरस बिना..

समुद्राचा तळ गाठता येत नाही, आणि अश्रूचा स्रोतसुद्धा सापडत नाही.. दोघांना अस्तित्व खारेच आहे, एक अथांग तर दुसऱ्याचे अलौकिक.

दुपार सरत असतांनाचा वेळ, चार ते पाचचा, या वेळेत सारे भरून आलेले असते. ना खोल ना गंभीर, सगळे सुटेसुटे होणारे गुंते. वासांनी निर्माण झालेले जग मोकळे होत एक केवळ श्वास होणारे.

ललित लेखनाचा प्रकार

पोळीचा चिवडा

पोळीचा चिवडा

साहित्य-
५ पोळ्यांचा चुरा, २ चमचे तेल, एक छोटा चमचा मोहरी, एक छोटा चमचा जिरे, हळद, कढीपत्ता, मूठभर शेंगदाणे, बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेला टमाटा, बारीक कापलेल्या २-३ हिरव्या मिरच्या, चवीपुरते मीठ, सजावटीसाठी कोथिंबीर.

कृती-
सर्वात प्रथम कढईत २ चमचे तेल घ्यावे. तेल तापल्यावर त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, शेंगदाणे, मिरच्या, कांदा, टमाटा घालून फोडणी द्यावी. नंतर त्यात पोळ्यांचा चुरा आणि मीठ घालून चांगले परतून घ्यावे. कढईवर झाकण ठेऊन २ मिनिटे शिजू द्यावे. पोळ्यांच्या चिवड्यात सजावटी साठी कोथिंबीर घालावी.

कळी म्हणते कळीला...

कळी म्हणते कळीला

कळी म्हणते कळीला 
उद्या मी होईल फुल गळेल मग
पाकळया सार्या नेईल 
कोणीतरी मजला चुरगळून ...
  
किती छान वाटतं जेव्हा कोहळं
हे बालपण पानाच्या गर्द 
हिरवाळाईत डुलतं पण कळीच जेव्हा फुलं होतं
तेव्हा इतराच्या नजरेत भरतं....

स्त्री आणि कळी 
यांचा मिलाप किती जुळतो 
दोघीच्याही वाट्याला खुटून नेण्याच दुख: मात्र
माणसाकडूनच मिळतं....

नाट्यत्रयी वाडा चिरेबंदी, भाग#१

मी नाटकवेडा माणूस आहे. म्हणजे नाटकं पाहायला आवडतात, नाटकं करायला नाही! ह्या ब्लॉग वर मी बऱ्याच नाटकांबद्दल लिहिले आहे. त्यातही मला जुन्या काळातील, म्हणजे १९७० ते १९९० मध्ये रंगमंचावर आलेल्या नाटकांचे पुन्हा आजच्या काळात केलेले प्रयोग पाहायला आवडतात. मराठी नाटकांच्या बाबतीत हा तसा पहिला तर सुवर्णकाळ होता. काही वर्षांपूर्वी दूरचित्रवाणी वाह्निन्यांच्या गर्दीत एक दोन मराठी वाहिन्या होत्या त्या अशी जुनी नाटकं दाखवत असत. वाडा चिरेबंदी हे नाटक जुने आणि बरेच प्रसिद्ध आहे. प्रसिद् नाटककार महेश एलकुंचवार यांनी ते लिहिले आहे. त्यांचे एक नाटक वासांसि जीर्णानि खूप पूर्वी मी पहिले होते, त्यात डॉ.

समीक्षेचा विषय निवडा

उदासगाणी

चार महिने या खोलीत मी राहतो आहे, तितक्या रात्री मी इथे जागवल्या आहेत. आज उद्याची शेवटची रात्र असणार आहे. काहीही धड हाती न लागता इथून मी निघणार आहे, तरी पण, हा ‘पण’ जमा केलेल्या इथल्या आठवणींना माझ्या मनात उभा करतो आहे. मला माझं गवसण्याच्या अडनिड्या प्रयत्नात ही खोली आता एक भाग झाली आहे. कित्येक गाणी इथे मी ऐकली असतील, ठराविक गाण्यांच्या रिंगणात रात्री गेल्या खऱ्या, त्यातून मला उदास गाण्यांचेच वेड लागले आणि मग त्या जोडीला पैसे कमवायला काही कामे मिळवता येतात का, त्यासाठी कित्येक गोष्टींना नेटवर जोखून पाहिले असेल. सप्टेंबरच्या परीक्षेचा पास निकाल इथेच पाहिला.

ललित लेखनाचा प्रकार

हे सव्यसाची,

खुणावतील तुला जटिल गणिते-
आदिस्फोटाच्या प्रसववेणांची

हाकारतील तुला कोडी-
विस्कळखाईत क्षणोकणी होणार्‍या
विश्वाच्या अटळ अंताची

या अपार भूतभविष्यादरम्यान
लीलया झुलणारा तुझ्या प्रज्ञेचा झोका
कुठे खिळवलाय, हे सव्यसाची?

तो इथेय बघ,
निळ्या पाखरपंखावर
अथक थिरकणार्‍या
क्षणभंगूर वर्तमानात

ऑयलर संख्या e ची अद्भुत कहाणी! (पूर्वार्ध)

गणित जगतात π, e, i, 0 आणि 1 याबद्दल जितकी चर्चा होत असेल तितकी इतर कुठल्याही अंकाच्या वा संख्येच्याबद्दल होत नसावी. π इतकी नसली तरी ऑयलर संख्या eचा सुद्धा गणिताच्या इतिहासात फार मोठा वाटा आहे. π च्या इतिहासाइतका e चा इतिहास मनोरंजक नसेलही. परंतु गणित जगतात त्यालाही मानाचे स्थान आहे. तुलनेने e ही संकल्पना अलिकडची असल्यामुळे इतिहासाची पानं कदाचित भरलेली नसतील.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

ती त्सुनामी

सागराच्या गहनगर्भातून अवचित उमटते
तटतटा मृद्स्तंभ तिथले तोडुनी भिर्काविते
वितळणारा तप्त लाव्हा प्राशुनी मग झिंगते
गूढ अंध:कार अवघा ढवळुनी फेसाळते
थर्थरे भवताल जेव्हा ती अनावर उसळते
गाज दर्याची चराचर भेदुनी रोरावते

प्रलयतांडव ती त्सुनामी
आतले सगळे किनारी उधळुनी आक्रंदते
...साचले सांडून जाते
...घडविले उखडून जाते
...वेचले विखरून जाते
...मांडले मोडून जाते

ती त्सुनामी विप्लवी
...पण केवढे शिकवून जाते.

कल्याणकारी राज्य म्हंजे नेमके काय - स्वरूप, व परिणाम

कल्याणकारी राज्य म्हंजे सर्व नागरिकांच्या जीवनातील मुलभूत व प्राथमिक समस्या सोडवण्यामधे सरकारची मदत. ह्यामधे संधीची समानता, सामाजिक सुरक्षा, प्राथमिक वैद्यकीय सेवा, गुलामगिरीच्या अथवा वेठबिगारीच्या सापळ्यात सापडण्यापासून संरक्षण इत्यादी बाबी येतात. यातली अप्रकट तत्वे खालीलप्रमाणे - (१) व्यक्तीला जीवन जगण्याची संधी नाकारली जाऊ नये व स्वत:चे जीवन सुकर करण्याची संधी मिळावी, (२) दुसरे व अत्यंत महत्वाचे - वरील (१) साध्य करण्यात जो मदत करतो त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबून जाऊन व्यक्तीच्या आत्मसन्मानाला खोल धक्का पोहोचू नये.