गोव्याच्या कोंकणी भाषेच्या भाषिकांना मदतीची विनंती
नमस्कार,
मी अनेक वर्षांनी इथे पोस्ट टाकण्याचा प्रयत्न करते आहे. शब्दनिवडीच्या ज्या चुका होतील, त्या कृपया गोड मानून घ्याव्यात ही विनंती!
मला सध्या गोव्याची कोंकणी भाषा बोलणाऱ्या व्यक्तींची थोडी मदत हवी आहे. जर तुम्ही ह्या भाषेचे भाषिक असाल, तर कृपया माझ्याशी संपर्क साधा अथवा इथे प्रतिक्रिया द्या.
थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे:
काय मदत हवी आहे?
डेटा ॲनोटेशन करायचे आहे: म्हणजे ह्या भाषेत लिहिलेला मजकूर वाचून त्या मजकूराची शैक्षणिक गुणवत्ता काय ह्याचे रेटिंग द्यायचे आहे.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about गोव्याच्या कोंकणी भाषेच्या भाषिकांना मदतीची विनंती
- 3 comments
- Log in or register to post comments
- 1587 views
18+
कमान ओलांडून अठरावी
अधीर आलो अनंग-देशी
इथल्या अणु-रेणूवर अविरत
प्रथम-रसाची(#) झाक जराशी
पर्वत इथले अवघड, दुस्तर
घळीत त्यांच्या नजर न ठरते
चेटूक त्यांचे नजरबंदीचे
स्वप्नातही ना पाठ सोडते
गुहा निसरड्या, फसव्या इथल्या
दुर्लभ अतिशय त्यांचे दर्शन
गारूड गूढाचे पण त्यांच्या
पंचप्राणा छळते निशिदिन
अनंगदेशी एक उमजले
नाद खुळा पर्वत कुहरांचा
हात आपुला जगन्नाथ - जो
मुठीत दे अनुभव तुष्टीचा :)
=================
(#): नवरसांतील प्रथम रस = शृंगाररस
- Read more about 18+
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1502 views
मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (11)
माणूस प्राणी नामशेष होणार का?
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (11)
- 4 comments
- Log in or register to post comments
- 1108 views
लग्नासाठी शास्त्रीय वाद्य-संगीत
थोड्या दिवसात भावाचे लग्न आहे. कार्यालयात लावण्यासाठी शास्त्रीय संगीताची (वाद्य-संगीत) playlist बनवत आहे.
- उस्ताद बिस्मिल्लाह खान यांची सनई (शास्त्र असतं ते!)
- पं हरिप्रसाद चौरासियांचा पहाडी
- पं राम नारायण यांचा मिश्र देस
- शाहिद परवेझ खान यांचा बागेश्री
पारंपरिक मध्यमवर्गीय ब्राह्मणी पद्धतीचं अगदी साधं लग्न आहे. तर तसे संगीत शोधत आहे. काही suggestions असल्यास सुचवावे. कार्यकारी मंडळ आभारी असेल!
स्पर्धा का इतर?
- Read more about लग्नासाठी शास्त्रीय वाद्य-संगीत
- 4 comments
- Log in or register to post comments
- 1996 views
गोंदलेला हात मऊ टापटिपीचा..
या महिन्यात हातात पडलेल्या 'मार्ग' या नियतकालिकानं सगळ्या गोंदण-आठवणी जाग्या केल्या. अंकाचं शीर्षक, 'इंडियन टॅटूज, ओन्ली स्किन डीप?' असं आहे. स्कंदपुराण, पद्मपुराण ते अगदी अर्थशास्त्रातही जिथे गोंदणाच्या नोंदी आहेत त्यांचा उल्लेख या अंकात आहे. स्वतःच्या शरीराला 'अंकित' करून घेण्यामागच्या कोणकोणत्या प्रेरणा असू शकतात त्या शोधून काढण्याचा प्रयत्न या अंकात दिसतो.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about गोंदलेला हात मऊ टापटिपीचा..
- 3 comments
- Log in or register to post comments
- 1741 views
सासर्याचा सैपाक: पित्झा
गेल्या शनिवारी सकाळी सौ. माहेरी गेली. आता घरात मुलगा, सून आणि मी. सौ. नसताना अस्मादिकांना खाण्याचे नवीन प्रयोग करायला स्वैपाकघर मोकळे होते. माझी सून म्हणाली बाबा आपण रविवारी ब्रेकफास्ट साठी डोमिनो मधून पित्झा मागवू. मी उत्तर दिले, बाजारातून महागडा पित्झा मागविण्यापेक्षा स्वैपाक घरात ओवन आहे घरीच पित्झा बनवू. ओवनचा काही उपयोग तरी होईल. या शिवाय विदेशी कंपनीचा पित्झा मागवून आपल्या देशाचे नुकसान कशाला करायचे. आमच्या लेकाने माझ्या मताशी सहमति दाखविली. बाजारात जाऊन चार पित्झा बेस (त्यावर दोन फुकट मिळाले), अमूलचे ग्रेटेड चीज आणि पनीर, शिमला मिरची, बिन्स आणि बेबी कॉर्न आणले.
- Read more about सासर्याचा सैपाक: पित्झा
- 27 comments
- Log in or register to post comments
- 5166 views
विश्वाच्या आर्ताचे भान मराठी
मराठी भाषा - प्रेम गीत
...
खुलणाऱ्या हास्याचे रंग मराठी
शब्दांच्या किमयेचे अंग मराठी
आंब्याच्या झाडाचा चीक मराठी
मिरचीच्या ठेच्यावर मीठ मराठी
आईच्या पदराची ऊब मराठी
बापाच्या मायेचे रूप मराठी
शाळेच्या घंटेचा नाद मराठी
मित्रांशी होणारे वाद मराठी
प्रेमाच्या चिट्ठीचा रंग मराठी
स्वप्नाळू डोळ्यांचा ढंग मराठी
रुणझुणत्या चालीचा डौल मराठी
लवलवत्या डोळ्यांचा कौल मराठी
जगण्याची चौतर्फा जाण मराठी
झटणाऱ्या हातांची खाण मराठी
दमलेल्या श्रमिकाचा घाम मराठी
उरलेल्या सगळ्यांचा राम मराठी
- Read more about विश्वाच्या आर्ताचे भान मराठी
- Log in or register to post comments
- 352 views
देणाऱ्याचे हात घ्यावे
लोकलच्या फूटबोर्डाच्या सांडव्यावरून
फलाटावर धो धो कोसळणाऱ्या
बेफाम गर्दीचा बेहाल थेंब बनायची
सवय करतानाच्या काळातली गोष्ट
...एक दिवस दोन उघडीवाघडी भिकाऱ्याची लेकरं
गर्दीबरोबर फलाटावर सांडताक्षणी
चट्दिशी उठून
वाहत्या गर्दीच्या
काठावर गेली
एक नेहमीसारखा खाली बसला
अन् दुसरा ऐटीत उभा राहून
स्वतःच्या भिकेतले नाणे
बसलेल्याच्या ओंजळीत टाकून
निर्व्याज हसू लागला
मग आनंदाच्या फेर वाटपासाठी
भूमिकांची अदलाबदल
वारंवार..
- Read more about देणाऱ्याचे हात घ्यावे
- 4 comments
- Log in or register to post comments
- 759 views
प्रायश्चित्त
तो एक धंदेवाईक खुनी होता. माफक फी आकारून खून करण्यात तो माहीर होता. खून करायचे तंत्र त्याने अभ्यास करून विकसित केले होते. बळीच्या सामाजिक प्रतिष्ठे प्रमाणे तो फी आकारत असे. राजकारणातील प्रसिद्ध व्यक्ति असेल तर जास्त धोका कारण पोलीस मग गुन्हेगाराला पकडण्याचे काम कसोशीने करतात. मग फी पण तशीच. बिल्डर घेतलेले कर्ज परत करायला काच कूच करू लागला की मग फायनान्सरने तरी काय करावे. कर्ज माफ करायला लागले तर धंदा कसा होणार. छातीवर दगड ठेऊन त्याला बोलावणे पाठवावे लागते.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about प्रायश्चित्त
- 2 comments
- Log in or register to post comments
- 692 views
आणि... हॉस्टलर मुलांकरिता सुपरफास्ट गाडी स्टाॅपेज नसलेल्या स्टेशनावर थांबली...
रेलवेच्या आठवणी
असाच कामानिमित्त बहिणीकडे भोपाळला गेलो होतो...
भोपाल- बिलासपुर अमरकंटक एक्सप्रेसनी परत येत होतो... (वाटेत लागणारया जबलपुरला थांबलेली माझी आई तिथूनच आमच्या सोबत पुढे येणार होती.)
गाडीत पाय ठेवायला जागा नव्हती...
दोन दिवसानंतर दिवाळी होती.
म्हणून गाडीत सगळी हॉस्टलर मुला-मुलींची ही गर्दी होती... भोपाळला शिकायला आलेली ही मंडळी सणावारासाठी आपापल्या घरी परत जात होती...
- Read more about आणि... हॉस्टलर मुलांकरिता सुपरफास्ट गाडी स्टाॅपेज नसलेल्या स्टेशनावर थांबली...
- 2 comments
- Log in or register to post comments
- 873 views