Skip to main content

एकारा

विसरायला काय होते तुला.. जीवनाचा ओघ.
वाळू निसटावी आणि फैलावी तशी सैल पडलेली तुझी धावपळ.

रूजलेली मुळें किती खोल आहे, या जीवनाची, तुला कुठे ठावूक आहे..

ऊन पडावे तसे तुला आठवणींचा पान्हा फुटतो आणि रात्र उजाडावी तशी जरा जीर्ण आकारशून्य निराशा वेढून घेते.

लाल रंगावर निळाई तरळते तसं तुझं शरीर. बालकवींचा औदुंबर जसा.
स्नायूंच्या चेतनाचे दरवाजे आतून बंद केलेले, की आतच ढकललेले.

बागेतल्या मकरंदावर दरोडा घालणारे भुंगे तुझ्या आयुष्यात आलेत,
बाग बनवून गेले आयुष्याला तुझ्या..

दुसरा नाही, म्हणून तू राहतो, निजतो, गुंडाळून घेतो एकारातच..
वाह!

मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (12)

आपल्या विश्वाच्या शेवटाची सुरुवात कशी असेल?

मानवी अस्तित्वाच्या अंताबद्दल भाकीत करताना आपल्या विश्वाचा मृत्यूसुद्धा त्यास कारणीभूत ठरू शकेल असे म्हणावे लागते. हे विश्व कशाप्रकारे कोसळून जाईल याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुळात यांची चाचणी कशी घ्यावी, त्यांची शहानिशा कशी करावी याबद्दलच अनेक शंकाकुशंका आहेत. उत्सुकता शमवण्यापोटीच हा मुद्दा उपस्थित केला जातो असेही वाटण्याची शक्यता आहे. हे विश्व पूर्णपणे गोठून जाईल (deep freeze), की कृष्णविवरात नाहीसे होईल की अस्टेरॉइड्सच्या माऱ्यामुळे तुकडे तुकडे होऊन ब्रह्मांडात सामावून जाईल की….आणखी काही तरी ?

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

All we imagine: स्वचा शोध

'लोक काय म्हणतील', 'हे असं वागायचं असतं म्हणून मी असं केलं', ह्या प्रेरणेतून दाखवलेल्या चांगुलपणामुळे आपण खरंच चांगली व्यक्ती ठरतो का? All We Imagine As Lightमध्ये घेतलेला स्वचा शोध.

समीक्षेचा विषय निवडा

लेखनपरिषद

एकदा लेखन संघ सर्वसमावेशक लेखन परिषद आयोजित करण्याचं ठरवतं. लेखन संघाचे खूप वर्षांपासून सगळ्या प्रकारचे लेखन एकाच छताखाली येतील असे वातावरण तयार होण्यासाठी प्रयत्न चालू होते. पण ठराविक लेखनासाठी संघाला ओळखले जायचे. कधीकाळी संघ स्थापनेपासूनच शिक्का बसला होता. अभिजनांचं लेखन म्हणजे संघ. सुखवस्तू वर्गातील लोकांचं लेखन म्हणजे संघ हा शिक्का पुसायचाच असा नवीन संघ वरिष्ठांनी चंग बांधला होता.

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पवई तर्फे खुली काव्यवाचन स्पर्धा(स्वरचित किंवा इतरांची)

रोटरी क्लब ऑफ बाँबे पवईच्या पवई फेस्ट २५ या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवात मराठी, हिंदी आणि इंग्रजी काव्यस्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. कविता सादरीकरण ऑन लाईन असेल. प्रत्येक भाषेच्या स्वतंत्र गटात स्वरचित आणि दुसऱ्या कोणाच्या कवितेच्या सादरीकरणासाठी वेगळे, तसेच १८ वर्षांखालील आणि १८ वर्षांवर असे वेगवेगळे वयोगट असतील. आपल्या कविता वाचनाचा विडियो यूट्यूब वर अपलोड करून त्याची लिंक रजिस्ट्रेशन सह ५ जानेवारी पर्यंत आमच्या कडे पाठवण्यात यावी.

बदलत जाणारे जनमानस

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल लागल्यापासून एकूणच वैचारिक वातावरण खूप बदललेलं आहे. कोणालाही अपेक्षा नव्हती असा निकाल लागलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडी सपशेल आपटलेली आहे तर महायुतीला अपेक्षा पेक्षा जास्त सीट्स मिळाल्यामुळे ते सुद्धा आश्चर्यचकित झालेले आहेत. आता मुद्दा असा आहे की एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीत जेव्हा भाजपला हार सहन करावी लागली होती तेव्हा महाराष्ट्रात कोणीही ईव्हीएम चे रडगाणं गायलं नाही. मात्र नंतरच्या चार महिन्यात भाजपालाच पुन्हा भरभरून मतदान झाल्यावर ईव्हीएमचे रडगाणं सुरू झालं विरोधकांकडून. याच्यावर चर्चा होतील वाद होतील.

तुला दिसणारा पक्षी

फार पूर्वीची गोष्ट आहे,
अवतीभवती जंगल तर होते.
विचारांनी वेढलेले, उंचच उंच..
कल्पनेने व्यापलेले, आकाशाला गवसणी घालणारे.
प्रेमाची एक गुहा होती तिथे.
कुणालाही सहजी दिसू न शकणारी, रम्य अश्या शृंगारवेलींनी लिप्त..
तराजूत दोन्ही पारड्यात समान ठेवता येईल, इतकी बुद्धी आणि शक्ती अशी डौलदार वृक्ष आजूबाजूला वाढलेली होती.
एक निराकार उन्हाचा कवडसा उजळत त्या गुहेच्या तोंडाशी आलेला होता, त्यात किल्मिषांचे रजःकण उजळून निघत होते.
थांग न सापडणारी स्वप्नांची दरी होती.
यथार्थचा झरा खळखळ वाहत होता.
त्या जोडीला डगमग डगमग करणारी मनाची एकाग्रता विहरत होती.

त्या तिथे पलिकडे..

कधी अनायसे घडते, घडत जाते, ते तसं घडू नये, असेही वाटत नाही आणि ते तसंच का घडते आहे, असंही वाटत राहते..

परवा तह झाला तसं बोलणं बंद पडलं आहे. मनात चरा पडला आहे की नाही हेही अजून नीटसं कळलं नाही, पण बोलणं तर बंद आहे.

तशी वेळ आता त्याची बाहेर पडण्याची, आणि मी त्याला हलके मिठीत घेऊन निरोप देण्याची, पण निरोप आता असा अडखळून गेला आहे.

जागतिक तापमानवाढ सर्वेक्षणाचे निकाल

जागतिक तापमानवाढ हा सगळ्यांवरच परिणाम करणारा व सगळेच कमी-अधिक प्रमाणात जबाबदार असणारा असा सर्वसमावेशक आणि म्हणूनच जटिल विषय आहे. सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला, वाढती अर्थव्यवस्था असणारा, भारत हा जगातला तिसरा सगळ्यांत जास्त कार्बन उत्सर्जित करणारा देश आहे. जागतिक तापमानवाढीच्या तीव्र परिणामांना तोंड देणारा एक मोठा देश म्हणून भारताची या विषयात खूप मोठी भूमिका आहे.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स