'ऐसीला विचारा ' : घरगुती व जनरल प्रश्न - भाग १
Taxonomy upgrade extras
काही बाबतीत सल्ला हवा आहे. अगदि घरगुती वापरातील इएलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते अगदि नाव लावण्यापर्यंत.
इथे विचारण्यास संकोच वाटतो आहे. पण मदत मिळण्याची , निदान योग्य बाजूकडे अंगुलीनिर्देश होण्याची बरीच शक्यता वाटल्याने इथे धागा टाकतो आहे.
१. विवाहोत्तर मुलीने नाव आहे तसेच ठेवले, तर सरकारदरबारी कुठे अडचण येण्याची शक्यता आहे का? किंवा बँक, पासपोर्ट, व्हिसा ह्या ठिकाणी काही
त्रास होउ शकतो का?
एक काल्पनिक नावांनी उदाहरण घेउ. समजा, "अवनी महेश गणोरे " हिचं "नरेश सोपान आवळे" ह्याच्याशी लग्न झालं; तर आधीचं आहे तसच नाव तिला सुरु ठेवण्यास काय काय अडचणी आहेत?
- Read more about 'ऐसीला विचारा ' : घरगुती व जनरल प्रश्न - भाग १
- 115 comments
- Log in or register to post comments
- 63082 views
कुरळे केस सोनेरी...
कुरळे केस सोनेरी
बाहुली माझी सोनपरी
लुकलुक लुकलुक डोळ्यांची
इवल्या इवल्या नाकाची
गुब्रे गाल फुलापरी
बाहुली माझी सोनपरी
हिला न येतो राग कधी
नेहमी असते आनंदी
कधी न कुठला हट्ट धरी
बाहुली माझी सोनपरी
खूप मला ही आवडते
जवळ सदा माझ्या असते
मैत्रिण माझी खरीखुरी
बाहुली माझी सोनपरी
- ग्लोरी
- Read more about कुरळे केस सोनेरी...
- 4 comments
- Log in or register to post comments
- 3543 views
अद्भुत आविष्कार
अद्भुत आविष्कार
निसर्ग हा खरेच अद्भुत किमयागार आहे. अश्या अनेक गोष्टींची निर्मिती त्याने अशी चुटकीसरशी केली की त्यांचे अस्तित्व आणि त्यांचे निर्माण यांचे रहस्य उलगडा करण्यात हजारो वर्षे कमी पडतील. त्या कश्या निर्माण झाल्या? कोणी केल्या? आणि का आहेत याचा काही केल्या थांगपत्ता लागत नाही. मग अश्या अनाकलनीय गोष्टींचे गूढ उकलत नसले की कालानुरूप त्या रहस्यावर धार्मिक रूढी वा अंधश्रद्धेचे टॉपिंग चढते.
- Read more about अद्भुत आविष्कार
- 3 comments
- Log in or register to post comments
- 5887 views
शुभ्र आज्यांचे पिंजारलेले समूह
पृथ्वीगोलापासून किंचित दूर
निळ्या स्ट्रैटोस्फिअर मध्ये
असतात वस्ती करून
शुभ्र आज्यांचे पिंजारलेले समूह
संथपणे …. फिरणाऱ्या पृथ्वीला
आंजारत गोंजारत, प्रसंगी लाचलुचपत देत
असतात तग धरून
शुभ्र आज्यांचे पिंजारलेले समूह
हिंदकळतात वारयानं
हेलावून जातात नव्या वर्षाच्या रोषणाईनं
घाबरतात धूमकेतूंना
शुभ्र आज्यांचे पिंजारलेले समूह
पहिल्या रडण्याचा किनरा आवाज
सूक्ष्मपणे ऐकतात
पहिल्या अडखळणाऱ्या पावलांकडे
असतात लक्ष ठेवून
शुभ्र आज्यांचे पिंजारलेले समूह
धूर सोडणाऱ्या आगगाड्या
कौतुकानं न्याहाळतात
होतात हवालदिल
जंगलातल्या वणव्यानं
- Read more about शुभ्र आज्यांचे पिंजारलेले समूह
- Log in or register to post comments
- 2103 views
नेति नेति चा एक्सरसाइज
रेल्वे स्टेशन वर रात्री
रेल्वेला यायला अजून अर्धा तास असताना
कुठल्याशा कॅफेत केव्हाच पिउन संपलेल्या कॉफीच्या कागदी कपासमोर
थकलेल्या मनाच्या पुराण्या सवयी जाग्या होतात
त्यातलीच एक
नेति नेति च्या एक्सरसाइज ची
समोरचा कागदी कप…तू आहेस ?
नेति नेति
काचेच्या शो रूम मधले काळे चष्मे…तू आहेस ?
नेति नेति
खालची जमीन , जाहिराती मधली अर्धनग्न स्त्री ?
नेति नेति
मधूनच थंड हवेची झुळूक सोडणारं
भकास ट्यूब लाईट असणारं वरचं फाल्स सीलिंग ?
नेति नेति
इस्त्री केलेले लोखंडी रूळ ?
मागून धावणाऱ्या लोखंडी गाड्या ? त्यांची गति ?
नेति नेति
हवा ? कॉफीतले पाणी ? दूध ?
नेति नेति
- Read more about नेति नेति चा एक्सरसाइज
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2560 views
सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया
सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया
आमच्या वर्तमानपत्राकडे आलेल्या असंख्य प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया खाली देत आहोत.
गोपाळ सुंदर, अमरावती: सचिन म्हणजे क्रिकेटचा देव आहे. देव कधी रिटायर होतो का? लागू म्हणतात देवाला रिटायर करा.
पंकज मोरे, कारसुळ बु.: सचिनची निवृत्तीची बातमी ऐकून डोळ्यात पाणी आले. वडील म्हटले शेतावर जा अन कांद्याला पाणी दे. मी गेलो नाही, घरीच माळ्यावर रडत बसलो.
- Read more about सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया
- 12 comments
- Log in or register to post comments
- 7987 views
भारत-पाक १९६५ युद्ध....त्रोटक आणि विस्कळित माहिती
१९६५ चे भारत पाक युद्ध सुरु कसे झाले?
पार्श्वभूमी:-
१९६०चे दशक एक वेगळेच समीकरण जागतिक राजकिय पटलावर मांडत होते. शीतयुद्धाला रंग चढत होता. NATO च्या छत्राखाली अमेरीकन समर्थक देश व कम्युनिस्टांच्या लेबलखाली तत्कालीन USSR म्हणजे रशियाचे समर्थक अशी कधी छुपी तर कधी उघड स्पर्धा सुरु होती. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळताच अमेरिकेने स्वतः मैत्रीचा हात पुढे करत भारतात अमेरिकन तळ मागावायचा प्रयत्न केला. भारताने तो फेटाळुन लावल्यावर राजकिय दृष्टीने अमेरिकेच्या मनात भारताविषयी अढी निर्माण झाली ती पुढे कित्येक दशके वाढतच गेली. इतरही कारणे त्यास होतीच.
- Read more about भारत-पाक १९६५ युद्ध....त्रोटक आणि विस्कळित माहिती
- 33 comments
- Log in or register to post comments
- 26378 views
एअर इंडिया मध्ये सध्या काय चालले आहे?
1960च्या दशकात किंबहुना 1970 च्या दशकात सुद्धा, प्रवाशांना देण्यात येणार्या सुखसोयींचा विचार केला असता, भारताची राष्ट्रीय विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाची गणना, जगातील त्या वेळच्या सर्वोत्कृष्ट विमान कंपन्यांत होत असे. पुढच्या बाजूस पंखे असलेल्या सुपर कॉन्स्टेलेशन विमानांचा ताफा या कंपनीकडे प्रथम असे व नंतर या विमानांची जागा बोइंग कंपनीच्या 707 या जेट विमानांनी घेतली होती. 1975 मध्ये एअर इंडियाच्या विमानाने मुंबई ते रोम असा केलेल्या माझ्या पहिल्या आंतर्राष्ट्रीय प्रवासाच्या सुखद स्मृती अजूनही माझ्या स्मरणात आहेत.
- Read more about एअर इंडिया मध्ये सध्या काय चालले आहे?
- 14 comments
- Log in or register to post comments
- 7837 views
मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )
मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )
पुनर्प्रसारणाबद्दल :
सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.
प्रस्तावना :
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )
- Log in or register to post comments
- 6583 views
मित्र
ही कविता वीaर-रस पूर्ण अशी शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेउन केलेली आहे. शिवाजी महाराजांच्या एका काल्पनिक लढाईचे चित्रण आहे जे की खुद्द महाराज आपल्याला सांगत आहेत अशी कल्पना यात केलेली आहे.
इतिहासात वेळोवेळी उल्लेख केल्या गेलेल्या त्यांच्या विश्वासू माणसांना माझ्या कडून एक भावपूर्ण आदरांजली!
तुम्हा सर्व रसिक वाचकांच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत!
वाजले रणवाद्य हे
सुरू झाली रणधुमाळी
निसटला चिलखताचा माझ्या
बंद कसा ऐनवेळी!
सूऽ सूऽ करीत बाण एक
जिरेटोप घेउन उडाला
माझ्या भात्यात बाणांचा
अवघा साठा संपला
दोन-चार घावानंतर
तलवारही झाली बोथट
पाच-सहांशी करता हातघाई
- Read more about मित्र
- 8 comments
- Log in or register to post comments
- 4485 views