Skip to main content

पंचमी

थेंब थेंब दहिवर
अंग अंग गहिवर
ओते चान्दण्याचा घडा
शुभ्र लाह्या भुईवर

लाह्या दुधाचा वाडगा
नाग चपळ बुजतो
केवड्याच्या पाना आड
हुंकार गतीचे भरतो

रत्ने थेंबांची वेचत
श्रावण उत्सवी नाग
पंचामृते ओसंडली
स्वप्नांना मन्दशी जाग

*****

जालावरचे दिवाळी अंक २०१३

गेल्या वर्षीपासून आपण 'ऐसी अक्षरे'वर विविध जालीय दिवाळी अंकाचा आढावा/मागोवा घेत आहोत. याही वर्षी आता जालावर दिवाळी अंक प्रकाशित होऊ लागतील. काही प्रकाशित झाले देखील आहेत. हा धागा अश्याच जालावरील दिवाळी अंकांबाबत चर्चा करण्यासाठी आहे. तुम्ही वाचलेल्या, माहित असलेल्या आणि जालावर उपलब्ध असलेल्या दिवाळी अंकांबद्दल इथे मनमोकळी चर्चा करू शकता, समीक्षा करू शकता, परिचय करून देऊ शकता आणि आपली मते मांडू शकता.

धाग्याचा प्रकार निवडा:

"ऐसी" दिवाळी अंक... शंका आणि तक्रार

Taxonomy upgrade extras

खालील दिवाळी मंडळींचे दिवाळी अंकातील धागे आवडले.
उत्पल
अवधूत डोंगरे
श्रीरंजन आवटे
अवधूत परळकर
स्नेहदर्शन
शैलेन
सानिया
.
ही मंडळी एरव्ही कुठे असतात?
इतकं भन्नाट फक्त ह्यांना दिवाळीलाच लिहिता येतय असं काही आहे का?
मला वाटणारी शंका. ऐसीवर व्यासंग , जाण प्ल्स उत्स्फुर्तता आणि दर्जा असणार्‍यांची कमी नाही.
ऐसीवरील ही नेहमीचीच यशस्वी मंडळी असवीत. वारंवार आपले नाव समोर कशाला दाखवायचे म्हणून म्हणा किंवा
सामान्य आपल्या ज्ञानाने दिपवून टाकण्यापेक्षा "इतरही असे जाणकार आहेत; मी ही तसाच एक." ही जाणीव करुन देण्यासाठी अंगभूत विनय म्हणून त्यांनी हे इतर आय डी घेउन लिखाण केलं आहे?

रायगडावरील शिवसमाधि कोणी 'शोधली'?

Taxonomy upgrade extras

रायगडावरील शिवसमाधि कोणी 'शोधली’ हा एक वादग्रस्त मुद्दा झालेला आहे. कोणी ह्याचे श्रेय महात्मा फुले ह्यांना देतात तर कोणी लोकमान्य टिळकांना. महात्मा फुले ह्यांच्यावरील विकिपीडिया लेखात पुढील उल्लेख आहे: ’The celebration of "Shiv Jayanti"(Birth day of Chhatrapati Shivaji Maharaj)for the first time in India has been attributed to him. He also discovered the "Samadhi" of Chhatrapati Shivaji Maharaj on Raigad Fort which had disappeared in creepers and climbers.’ लोकमान्य टिळकांच्याकडेहि ह्याचे श्रेय काहीजण देतात. ह्या दोन्ही बाजूंमागे स्वत:च्या विशिष्ट विचारधारा असल्यामुळे मला दिसत असलेली वस्तुस्थिति चर्चेसाठी पुढे आणावी अशा हेतूने हा मजकूर लिहीत आहे. ह्या लेखनासाठी प्रामुख्याने तीन पुस्तकांतील मजकुराचा आधार घेतला आहे. ती अशी - १) `Oriental Experience` by Sir Richard Temple, London, 1883, २)`A Book of Bombay` by James Douglas, Bombay, 1883 आणि ३) लोकमान्य टिळक यांचे चरित्र, भाग १, न.चिं.केळकर, १९२३.

मला असे दिसते की शिवसमाधि ’शोधायची’ काही आवश्यकता नव्हती कारण तिचे अस्तित्व पुष्कळांना ठाऊक होते. १८१८ नंतर भग्नावस्थेत गेलेल्या ह्या किल्ल्यावर स्थानिक धनगर, गुराखी, लाकूडफाटा गोळा करणारे खेडूत अशांचा वावर अव्याहत चालूच होता आणि त्यांना ही जागा माहीत असणार, यद्यपि तिचे महत्त्व ध्यानात येण्याइतके शिक्षणचे संस्कार त्यांच्यापाशी नव्हते. मुंबईकर इंग्रजांना एकूणातच शिवचरित्राबद्दल ‘romantic’ औत्सुक्य होते. (पुष्कळ इंग्रज शिवाजीची तुलना स्कॉटलंडमधील विल्यम वॉलेसशी करत.) हा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी लोक जात असत आणि कोठल्याहि चौकस गवर्नराने हा किल्ला पाहण्याचे ठेवलेले नसावे असे न.चि.केळकर लिहितात. मुंबईचे गवर्नर सर रिचर्ड टेंपल (१८७७-१८८०) हे त्यांच्या कारभाराच्या वर्षातील एका वर्षीच्या नोवेंबरात किल्ल्यावर गेले होते. फेब्रुवारी १८८२ मध्ये लंडनमधील Royal Geographical Society पुढे 'Birthplace and Cradle of Mahratta Power’ असे भाषण त्यांनी केले. ह्या भाषणात त्यांनी शिवकालीन महाराष्ट्राचा आणि शिवचरित्राचा आढावा घेतला आहे. त्यांनी स्वत: काढलेली काही पेन्सिल स्केचेसहि ह्या भाषणासाठी त्यांनी वापरलेली दिसतात. त्या भाषणातील शिवसमाधीचे पुढील लक्षणीय वर्णन पहा:

ह्याच भेटीचे अधिक तपशिलात वर्णन मुंबईचे तेव्हाचे कमिशनर क्रॉफर्ड ह्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये काही वर्षानंतर केले आहे आणि केळकरांनी त्याचा गोषवारा मराठीत दिला आहे. तो असा:

१८८३ साली मुंबईत छापण्यात आलेल्या जेम्स डग्लस ह्यांच्या 'A Book of Bombay' ह्या पुस्तकात पान ४३३ वर समाधीच्या पडझडीचे वर्णन केले आहे आणि कोल्हापूरचे, तसेच सातारचे शिवाजीचे वंशज, पेशवाईचा कारभार ह्या सर्वांना समाधिस्थानाला अशा दुरवस्थेस आणल्याबद्दल दोष दिला आहे. ब्रिटिश सरकार जसे ब्रिटनमध्ये जुन्या टयूडर आणि स्टयुअर्ट राजवटींच्या स्मृति आस्थेने सांभाळते तसेच मुंबईतील सरकार रायगडाची देखभाल का करू शकत नाही असा प्रश्नहि विचारण्यात आला आहे.

१८८० नंतर समाधीच्या दुरवस्थेकडे काही लक्ष वेधले गेल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्येहि ह्याविषयी आपण काही करावे अशी भावना निर्माण होऊ लागली. केळकरांच्या लेखनानुसार वसईच्या गोविंद बाबाजी जोशी ह्यांच्या वाचनात वर उल्लेखिलेले मजकूर आले आणि १८८५ साली स्वत: रायगडाला जाऊन आल्यानंतर ह्या समाधीच्या जीर्णोद्धाराबद्दल आपण काही करावे असे त्यांनी ठरविले आणि ’नेटिव ओपिनियन’सारख्या वृत्तपत्रांमधून लेख लिहिले. १८८७ साली ह्या विषयावर एक पुस्तक त्यांनी छापले. डग्लस ह्यांच्या खोचक लिखाणावरून स्फूर्ति घेऊन त्यांनी जनतेच्या सहभागाने जीर्णोद्धार करण्यासाठी किरकोळ रकमांच्या वर्गण्याहि गोळा करण्यास प्रारंभ केला. पुढे ७-८ वर्षे असाच छोटया प्रमाणात हा प्रश्न जिवंत राहिला.

१८९५च्या एप्रिलपासून ’केसरी’मध्ये समाधीच्या जीर्णोद्धाराबद्दल लेख येऊ लागले. ’शिवाजीचे नाव तुम्ही गाजवा हे पद्य आमच्या कानी पडल्यास बरेच दिवस झाले परंतु त्यातील अर्थाप्रमाणे उपदेश घेऊन काम करतांना कोणीहि आढळत नाही’ अशी टीका केसरीने केली. जीर्णोद्धारासाठी रक्कम पाठविणारांची पोच छापायला केसरीने सुरुवात केली. ३० मे ह्या दिवशी हिराबागेत स्मारकाबाबत एक सभा झाली. तिला अनेक प्रतिष्ठित व्यक्ति, संस्थानिक उपस्थित होते. २५,००० पर्यंत खर्चाचा अंदाज करण्यात आला. ह्या सर्वाचे फलित म्हणजे स्मारकाची रक्कम हळूहळू(च) वाढत गेली. नोवेंबरपर्यंत ती ९००० ला पोहोचली. (ह्याच वेळी सुरू झालेल्या लॉर्ड हॅरिस स्मारक फंडात ४०,००० जमले होते ही बाब लक्षणीय आहे.) सयाजीराव गायकवाडांनी १००० रुपये पाठविले. एका गुजराथी नाटक कंपनीने एका खेळाचे उत्पन्न ७०० रुपये दिले. करवीकर छत्रपतींकडे मदत मागण्यासाठी गेलेल्या डेप्युटेशनला मदतीचे तोंडभर आश्वासन मात्र मिळाले. (मनात आणते तर ते एकटेहि पितृकर्तव्य म्हणून जीर्णोद्धार करू शकले असते!)

अशा ह्या चळवळीतून पुढे १८९७ साली अनेक वळणांतून जात जात आणि एकेक सरकारी आक्षेप दूर करत शिवजयंतीउत्सव सुरू झाला पण तो वेगळा इतिहास आहे.

श्वासात जपत होतो

श्वासात जपत होतो

तुझ्या नेहमीच्या तक्रारी
'मी तुला विसरलो होतो'
कसे सांगू आठवणी
मी श्वासात जपत होतो

एक श्वास बाहेरी
दुसरा परत येई
सान्ग एवढ्या व्यस्ततेत
विसरणे कसे शक्य होई?
लोकांच्यात मिसळूनी
मी तुझ्या जवळ होतो
कसे सांगू आठवणी
मी श्वासात जपत होतो

जागेपणी श्वास चालू
झोपेत ते उसासे
तुझ्या विरहात आठवणीन्चे
हे ठेचाळणे जरासे
उसाशातही श्वासांना
उसंत देत नव्हतो
कसे सांगू आठवणी
मी श्वासात जपत होतो

ब्रोकन ब्रेन्स

आपल्या देशातील बहुतेक कुटुंबात, गल्लीबोळात वा गावात मनाने कमकुवत असलेले, विषण्ण मनस्थितीत वा उदासपणे जगणारे, वेडसर वाटणारे आहेत, हे नाकारून चालणार नाही. प्रत्येक कुटुंबात वेडसर असलेल्या नातेवाइकाबद्दलच्या आख्यायिका व अनुभव सर्क्युलेट होत असतात. परंतु खोदून विचारल्यास बहुतेक वेळा तसे काही नव्हतेच असा पवित्र घेतला जातो. कारण अशी व्यक्ती नात्यातली असणे हे सामाजिकदृष्ट्या कलंक समजले जाते.

धाग्याचा प्रकार निवडा:

विचार रथ सारथ्य आणि संवाद धनुष्य !!

आपल्या मनातल्या विचारांबाबतचा एक नवा विचार मी येथे मांडत आहे. त्या नव्या विचाराचा स्वीकार झाल्यास तसे जरूर कळवा.

बरेचदा आपल्याला दोन प्रश्न भेडसावत असतात.
म्हणजे खाली दिलेल्या या दोन प्रश्नांबाबत आपण "विचार" करतो:
लोक काय विचार करतील?
लोक काय म्हणतील?

मला असे वाटते की लोक काय विचार करतील याचा विचारही आपणच केला तर लोकांना विचार करायला काहीही उरणार नाही आणि आपल्याला काय विचार करायचा आहे तेच मात्र राहून जाईल आणि त्यामुळे आपण मात्र लोकांच्या विचारपद्धतीचे गुलाम होवून जाऊ.

लोकांना त्यांच्या पद्धतीने विचार करू द्या.
आपण आपल्या पद्धतीने विचार करा.

कागद आणि लेखणी

कागद आणि लेखणी

बसलो आहे...
एक कागद घेऊन
आणि लेखणी...
पाहू या...
काय उमट्तय!
हळुवार गंधीत प्रेमकविता... की?
नुसताच आठवणींचा पसारा...
जो आवरता आवरता मीच त्या
पसा-याचा भाग होऊन
हरवून जाईन!

का उमटेल कुठली
व्यथा, वेदना,
आक्रोश...
ऐकू येणारा, समजणारा
पण...
कुठून येतोय हे
नक्की न कळणारा!

का या जाचक, मुखवटाधारी
समाजावर, रूढींवर
आग ओकतील शब्द
त्यांचं नाकर्तेपण...
दुट्प्पीपणा...
पैसा, प्रसिद्धीमागे
पळण्याची अंगी भिनलेली सहजव्रुत्ती...
...यांवर लिहीता लिहीता
शब्दांशब्दांत, अक्षराअक्षरांत
अचानक डोळ्यांत खुपणारा
डोळे मिटायला लावणारा...
आरसा... ... किंवा

पाकिस्तान किनार्‍यालगतच्या समुद्रातून वर आलेले बेट

समुद्र मंथनाची पौराणिक कथा बहुतेक सर्वांना ज्ञात आहेच. या कथेप्रमाणे एकदा देव आणि दानव यांनी समुद्र मंथन करून रत्नाकराच्या पोटात दडलेले अमृत, मंथन करून बाहेर काढण्याचे ठरवले या अमृताबरोबरच या मंथनातून लक्ष्मी, हलाहल या सारख्या अनेक गोष्टीही बाहेर आल्या असे या कथेत सांगितलेले आहे. आपल्या या समुद्र मंथनाच्या कथेप्रमाणेच ग्रीक पुराणांतील एका कथेत पॉसिडॉन या देवाचा मुलगा टारस याची नौका बुडलेली असताना त्याला एक डॉल्फिन मासा वाचवतो आणि टारस या डॉल्फिन माशावर स्वार होऊन समुद्रातून बाहेर येतो असा उल्लेख आहे.

बाबक खुर्रामुद्दिन --पारशी लोकांचे शिवाजी महाराज किंवा राणा प्रताप अंक २

इस ६५० पर्य्म्त आपण मागच्या वेळेस पाहिलं. त्यानंतर दीडेक्शे वर्षे हळूहळू अरबी सत्तेने आपली पकड सर्वत्र घट्ट करत नेली. जिथे तिथे अरबी संस्कृतीचा
प्रसार प्रचार सुरु झाला. आधीच्या गोष्टी जम्तील तितक्या पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरु झाला. दूरदूरच्या गावांत आता सत्तेचे मजबूत जाळे पोचले होते.
आधीची लिपी नष्ट होत आली होती. भाषा बदलत चालली होती. वर्णसंकर वाढत होता. तशातच उमय्याद खिलाफत जाउन अब्बसिद खिलाफत सत्तेवर आली होती.
पण एकूण पगडा अजूनही बराचसा अरबीच होता. पारशी साम्राज्य नष्ट झाल्यावर अनेक पारशी सामंत, पारशी मांडलिक व तुर्क अ‍ॅलिज् ह्यांनी अरबी सत्ता मान्य