मानस मनीचे
आज ह्या महाजालात लिहिण्याची सुरुवात .
एका माहितीचा शोध घेता घेता सापडलेली ही अलिबाबाची गुहा .
- Read more about मानस मनीचे
- 7 comments
- Log in or register to post comments
- 3763 views
आठवणीतले प्रवास दुचाकीवरचे - भाग ३
हीरो होंडावरचा गोव्याचा प्रवास झाल्यावर नंतर पोटापाण्याच्या उद्योगांमध्येच एवढा गढून गेलो की दुचाकीवर कुठे लांब जाण्याचा प्रश्नच आला नाही. तेव्हा झालेले प्रवास म्हणजे तळेगांव, मुंबई वा दिल्ली. यातील तळेगांवला दुचाकीने जात असे, पण ते म्हणजे जलतरण तलावापर्यंत जाऊन पायाचा अंगठा(च) बुडवून येण्यासारखे होते.
नाही म्हणायला एकदा लोणावळा-खोपोली-कर्जत-नेरळ-कल्याण असा प्रवास केला होता. खोपोली-कर्जत-कल्याण हा रस्ता तेव्हा खूपच छान होता. छान म्हणजे काय, तर एकेरीच होता, पण रहदारी तुरळक असे. आणि पावसाळा नुकताच होऊन गेलेला असल्याने सगळ्या ओढ्या-वहाळांना मुबलक पाणी होते.
- Read more about आठवणीतले प्रवास दुचाकीवरचे - भाग ३
- 19 comments
- Log in or register to post comments
- 9493 views
** खात्री **
सर,
तुम्ही फारच विकलांग झाला आहात!
अलिकडे बर्याचदा तुम्ही
या देवळाच्या पायरीवर
नाही तर त्या चौकातल्या बाकावर
कुणाला तरी शोधत असता.
जेव्हा जेव्हा मी तुम्हाला
बघतो तेव्हा अजिबात थांबावसं
वाटतं नाही की
चवकशी कराविशी वाटत नाही.
कारणे अनेक आहेत,
पण तो प्रसंग अजुनही चांगला
लक्षात आहे.
"अरे! तुझी स्वप्नं भंग पावली!"
असं तुम्ही बसमध्ये एकदा
भेट झाली तेव्हा हिणवले होते...
कदाचित
माझ्या स्वप्नांमध्ये
तुम्हाला काही वाटा नव्हता
म्हणुन असेल.
- Read more about ** खात्री **
- 12 comments
- Log in or register to post comments
- 10226 views
सरकारमान्य महिष्यौच्चवंशरेतन केंद्राचे उद्घाटन
मौजे चढेवाडी, जातिवंत प्रतिनिधीकडून: देशातल्या पहिल्या आणि एकमेव सरकारमान्य महिष्यौच्चवंशरेतन केंद्राचे काल मौजे चढेवाडी येथे भव्य उद्घाटन झाले. आपल्या म्हशींच्या पोटी जातिवंत अवलादी पैदा व्हाव्यात म्हणून व्याकुळ झालेल्या पंचक्रोशीतल्या शेतकर्यांना यामुळे फार मोठा आधार मिळाला आहे असे मानले जाते. हे केंद्र उभारले जाईल असे माननीय खासदार श्री. गोरक्षनाथ गोर्हे यांनी गेल्या निवडणुकीत दिलेले आश्वासन अशारितीने पूर्ण करून आपल्या समाजसेवेच्या व्रताचे उदाहरणच लोकांसमोर ठेवले आहे असे चढेवाडीचे सरपंच माननीय श्री. सखाराम दामोदर चढे यांनी आवर्जून सांगितले.
- Read more about सरकारमान्य महिष्यौच्चवंशरेतन केंद्राचे उद्घाटन
- 10 comments
- Log in or register to post comments
- 10847 views
त्रिपेडी (मानसशास्त्र/ज्योतिष/गूढशास्त्र)
Taxonomy upgrade extras
यापूर्वी मी धागे अर्थात काढलेले आहेत. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, धागा काढल्यावर विविध अक्षरक्षः अनेकानेक प्रकारच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्या प्रतिक्रियांना उत्तर देणे मला अतिशय जिकीरीचे/ दमछाक करणारे वाटते. इतके की एनर्जी सॅप होते. मानसिक थकवा जाणवतो.
वास्तवातही, जेव्हा ४ डोक्यांबरोबर सामान्य/अगदी अतिसामान्य चर्चा करतानाही, स्वतःचे सत्य (माय ट्रुथ) मांडता येत नाही. बोलू की नको बोलू या संभ्रमातच वेळ जातो अन त्या कचरण्यात मत अजिबात मांडता येत नाही.
- Read more about त्रिपेडी (मानसशास्त्र/ज्योतिष/गूढशास्त्र)
- 14 comments
- Log in or register to post comments
- 18872 views
दोन क्षणचित्रे-
रुळांच्या काठाला
काळ्या बाभळी रापल्या
जटा पिंजारल्या
निष्पर्ण त्रोटक
खोड-खपल्या टणक
जीव धरून मूळ
तगमग पिउन मातीची
खुणगाठी बांधते जीवेच्छा.
रुळांच्या काठी
वृक्ष डेरेदार
पारंब्या घोळल्या मातीपर्यंत
तरुण काया
पालवी कोवळी
भार काहीसा डोईवर
उभी
धीट शांत विरक्त.
*******************
- Read more about दोन क्षणचित्रे-
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2278 views
शापीत स्वप्ने
लग्न करून आलेल्या तिच्या स्वप्नाळू डोळ्यातली.....आता थिजून गेलेली स्वप्ने ! त्यातल्या काही स्वप्नांना किनारा मिळाला असेल, काहींना शब्द...पण अशी कित्येक स्वप्ने विरून गेली असतील ज्याचं अस्तित्व तेव्हाही जाणवलं नसेल आणि आताही. अशा काही स्वप्नांसाठी दोन शब्द ..एक प्रयत्न..!
------------------------------------------------------------------------------------------------------
स्वप्नांच्या तुटण्याचा
आवाज होत नाही
डोळ्यात आसवांचे
सुकले थवे हे काही
मेंदीच्या पावलांनो
उंब-यास त्या विचारा
सुटली तिथे जी स्वप्ने
सांभाळतो बिचारा
फाये क्षणाक्षणांचे
वा-यासवे उडाले
रित्याच गंधकोषी
- Read more about शापीत स्वप्ने
- Log in or register to post comments
- 3532 views
स्कूलबस नियमावली
राज्य शासनाने नुकत्याच जारी केलेल्या स्कूलबस नियमावलीबद्दलच्या जीआरने खळबळ उडवून दिली आहे. हा जीआर शालेय शिक्षण खात्याने काढला आहे. पण त्या खात्याच्या मंत्र्याला त्याबद्दल माहीतीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जीआर मधल्या तरतुदी जाचक असल्याचे सांगत मुख्याध्यापकांच्या संघाने आणि शाळाचालकांनी शाळा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=U35Ri
- Read more about स्कूलबस नियमावली
- 34 comments
- Log in or register to post comments
- 14994 views
सोन्याचे झाड
मुलांच्या परीकथांत बर्याचदा सोन्याच्या झाडांचे वर्णन असते. या अशा झाडांच्या सोनेरी फांद्यांवर म्हणे झगमग करणारे हिरे, मोती आणि इतर रत्ने लटकलेली असतात वगैरे वगैरे. अर्थातच डोके ठिकाणावर असलेला कोणताही सुज्ञ माणूस परिकथेत असलेल्या या सोन्याच्या झाडावर विश्वास ठेवणार नाही. तरीसुद्धा, वाचकांचा विश्वास बसो किंवा न बसो, पण ऑस्ट्रेलियामधील शास्त्रज्ञांनी अगदी खर्याखुर्या अशा सोन्याच्या झाडाचा शोध लावला आहे ही गोष्ट मात्र सत्य आहे.
- Read more about सोन्याचे झाड
- 2 comments
- Log in or register to post comments
- 4086 views
लोक समारंभानं लग्न का करतात?
Taxonomy upgrade extras
मी ज्याला लोक जनरली 'माणूसघाणी' म्हणतात, त्या प्रकारात मोडते. पण एवढ्यात काही लग्नसमारंभांना उपस्थिती अनिवार्य ठरली. केवळ बोअर होण्यापलीकडे काही प्रश्नही पुन्हा नव्यानं पडले. त्याबद्दल लोकांची मतं आणि अनुभव ऐकायला आवडतील, म्हणून हा चर्चाप्रस्ताव.
- Read more about लोक समारंभानं लग्न का करतात?
- 132 comments
- Log in or register to post comments
- 53687 views