Skip to main content

गुलैल ने उजेडात आणलेला - अडाणी ग्रुप चा व मोदी सरकारचा "तथाकथित" भ्रष्टाचार

Taxonomy upgrade extras

गुलैल ने उजेडात आणलेला संभाव्य भ्रष्टाचार - http://gulail.com/adani-modi-nexus-to-result-in-loss-of-rs-23625-crore-…

हा दुवा मला ऐसी अक्षरे वरूनच मिळाला व मी असे गृहित धरतो की तुम्ही ही बातमी प्रथम वाचलेली असेलच.

माझा दावा असा आहे की - हा भ्रष्टाचार आहे की नाही याबद्दल शंका आहे व असल्यास कितपत आहे याबद्दल सुद्धा शंका आहे.

प्रश्न -

आपल्या शरीरातील छुपी घड्याळे

मागच्या महिन्यात माझ्या जुन्या शाळासोबत्यांबरोबर एक संध्याकाळ गप्पा गोष्टींमध्ये घालवण्याचा योग आला. आता हे सर्व शाळा सोबती वयाची सत्तरी ओलांडलेले असल्याने, या स्वरूपाच्या गप्पागोष्टींमध्ये आताशा होते तसेच त्या दिवशी झाले व गप्पांचा रोख आमच्या तब्येती व वयोमानानुसार येणार्‍या व्याधी यांकडे वळला. त्या वेळेस माझ्या सहजपणे हे लक्षात आले की तेथे जमलेल्या आम्हा 8/10 मित्रांपैकी बहुतेक जण आता चष्मा वापरत होते. काही जणांच्या डोळ्यांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली होती. निदान चौघांना तरी मधुमेह होता व त्यासाठी नियमित औषधपाणी करावे लागत होते.

धाग्याचा प्रकार निवडा:

गृहस्थ व्हा!

सुजीत आणि नेहा आठ-दहा वर्षे लंडनमधे राहिले. तिथे असतानाच एक वर्षापूर्वी त्यांना मुलगा झाला. सुजीत आयटी इंजिनियर तर नेहा कॉमर्स ग्रॅज्युएट. सुजीत लंडनमधे भरपूर पगाराची नोकरी करतानाही नेहाने काही बँकांमधे छोट्या-मोठ्या कंत्राटी नोकर्‍या केल्या. नंतर सुजीतने इंग्लंडचे नागरिकत्व घेतले आणि तो एकुलता एक मुलगा असल्याने म्हातारे आई-वडील भारतात एकटेच असतात व आईची तब्येत खूप खराब झाली म्हणून नेहाच्या संमतीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. आठ-दहा वर्षांमधे सुजीतने पुण्यात दोन फ्लॅट व एक प्लॉट घेऊन ठेवला होताच. भारतात परतल्यावर सुजीतचे आई-वडील त्यांच्याबरोबर राहू लागले.

सचिनला शेवटचं अनुभवताना....

आणि देवा....पहिल्यांदा देवाच्या डोळ्यात पाणी बघितले...माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हत...आणि मला खात्री आहे, हा क्षण अनुभवणा-या कुणाच्याही ते थांबल असेल...कदाचित गालावर ते अश्रू दिसले नसतील....पण प्रत्येक मन पाझरलं असेल!

किती सविस्तर बोलला सचिन...किती व्यवस्थीत...किती मोठ्या मंचावर...किती सा-या लोकांबद्द्ल. तो बोलला त्यापेक्षा जास्त ऐकू आलं...समजल. त्याला मनभरून बोलू द्याव अस वाटत होतं...तसा तो बोलतही होता पण, त्यालाही कळत होतं आपल्याही समजत होतं...24 वर्षाच्या प्रवासावर 24 मिनीटात नसतं बोलता येत!

तरी...काळजाला हाथ घालणार त्याच वाक्य मला अधोरेखित करावस वाटतयं.

गणितज्ञांच्या अद्भुत कथा - वाळूवरील रेघोट्या

गणितातील मूर्त वा अमूर्त संकल्पना, संज्ञा, चिन्हं, इत्यादींच्या बाबतीत विचार करताना या गोष्टी गणितज्ञांना कशा काय सुचल्या असतील, गणितातील चिन्हांना, संज्ञांना जगन्मान्यता कशी मिळाली, यांचा पहिल्यांदा वापर कुणी केला, त्यापूर्वी काय होते, असे अनेक प्रश्न विचारावेसे वाटतात. समीकरणांची मांडणी प्रथम कुणी केली, शून्याची कल्पना कशी सुचली, त्याचा प्रत्यक्षात वापर कसा झाला, कल्पित संख्या म्हणजे काय, ऋण संख्यांना संख्यांरेषेवर स्थान कसे मिळाले, इत्यादी प्रश्नांचा भडिमारही या संबंधात करता येईल.

लोकसंवाद :- काही चितपरिचित डायलॉग्ज

Taxonomy upgrade extras

लोकगीत, लोककला, लोकसंगीत कसं असतं अगदि लोकांत मिसळून गेलेलं; त्यांच्यात वारंवार आढळणारं; तसेच हे "लोकसंवाद"
हल्लीचे काही लोकसंवाद. खरं तर लोकरोग. लोकांच्या टाळक्याला झालेले आजार.
(ह्यातले एक दोन मी जालवरील प्रतिसादातून उचलले आहेत)
.
.

१.मुलगी काळी असली तरी कमावती आहे!!
२.तू आयटीत आहेस? मग तिसरं होम लोन कधी घेतोयस?
३.तू आयटीत आहेस? मग भारतात काय करतोयस?
४.भेंचोत महागाई इतकी वाढलिये आजकाल; ग्लेनफिडिच पितानाही हाच विचार सतावतो.
५.मी मुलगा इंजिनिअर असला तरच होकार देणार.
६.तो मुस्लिम/ब्राम्हण्/दलित असला तरी चांगलाय! किंवा
६.१ मी मुस्लिम असलो तरी मी देशभक्त आहे हो.
किम्वा

संगीतकला चित्रकलेपेक्षा प्रभावी आहे का?

Taxonomy upgrade extras

पार्श्वभूमी - या धाग्यावर 'इतर कलांचं लोकशाहीकरण झालं त्याप्रमाणे चित्रकलेचं झालं नाही' असा एक मुद्दा मांडला गेला होता. हे लोकशाहीकरण न होण्याची कारणं देताना शुभा गोखलेंनी सदोष शिक्षणपद्धतीचा मुद्दा मांडला होता. त्या अनुषंगाने चर्चा करताना सर्वसामान्य मराठी रसिकाची मनोभूमिका हाही मुद्दा पुढे आला. विशेषतः संगीत ऐकण्यासाठी हौशीने जाणारा मध्यमवर्ग त्याहून अगदी कमी खर्च करूनही चित्रं पाहण्यासाठी जात नाही. आणि या पारंपारिक मनोभूमिकेतून चित्रकलेच्या लोकशाहीकरणाला अडथळा आल्याचा मुद्दाही मांडला गेला.

बंडू

बंडूसाठी काही
अवघड मुळी नाही

बंडू काढतो चित्र
रंग त्याचे मित्र

बंडू करतो कथ्थक
थक्क होतात नर्तक

बंडू गातो गाणी
उन्हाचे होते पाणी

बंडू भलता भारी
फारच चमत्कारी

- ग्लोरी

अद्भुत आविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय

अद्भुत आविष्कार

अद्भुत आविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय

"कपारीतील दगडाची चालणारी गाय" अश्या नावावरून काहीच संदर्भ लागत नाही ना? मलाही नाही. अगदी याची देही याची डोळा पाहून आलो असलो तरीही नाही. मग असे नाव का? कारण 'सूरदास' म्हणाला म्हणून.
"दगडाचा पुतळा दरवर्षी काही गव्हाचे दाणे इतके अंतर पुढे सरकतो" - खरे वाटत नाही ना? मलाही नाही. पण खोटे ठरवायला कारण पण नाही माझ्याकडे.
आता हा सूरदास कोण? कसला गायीचा पुतळा ? काय गव्हाचे दाणे ?

तुम्ही नियमितपणे काय वाचता?

Taxonomy upgrade extras

'ऐसी'च्या संस्कृतीप्रमाणे ऐसीकर आपल्या म्हणण्याच्या पुष्टीदाखल यथार्थ दुवे देत असतात ही गोष्ट खरी. पण ते वाचताना प्रश्न पडतो की, ही मंडळी इतकी माहिती चाळून पचवत असतील आणि हवी तेव्हा चपखलपणे काढून देऊ शकत असतील, तर हे लोक नियमितपणे वाचतात तरी काय नि किती? ते कुतूहल शमवण्याकरता हा धागा.

उत्पलच्या धाग्यात त्यानं म्हटल्याप्रमाणे जालावरचं महाभारत एकेकदा पहायला, आपल्या वाचनाचं कुरण निवडायला नि त्यावर काहीएक म्हणणं तयार व्हायला वेळ जातो, तोवर हे दुवे महापुरात हरवूनही गेलेले असतात. तसे ते जाऊन नयेत, एका ठिकाणी सापडावेत, म्हणूनही.