Skip to main content

झोपलेले बर्फ

खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात कोणत्याही संवादाचा पाया असतो समोरच्याचे प्रथम ऐकून घेणे.

काही व्यक्ती समोरच्याची मते आणि विचार दडपण्याचा प्रयत्न करतात.

ते असे लोक असतात ज्यांना स्वत:ची मते आणि गृहीतके बदलण्यात स्वारस्य नसते, जी चुकीची असू शकतात.
असे लोक एका खोट्या गृहीतकाच्या आधारे जगतात की ते नेहमी बरोबरच असतात आणि तेच नेहमी बरोबर असतात.

असा व्यक्ती ज्याला समोरच्याचे ऐकायचेच नसते ते यासाठी की त्याला भीती वाटत असते की समोरच्याचे ऐकले तर त्यातले पूर्ण किंवा काही भाग स्वीकारावा लागेल आणि स्वत:च्या मनातल्या काही चुकीच्या गृहीतकांना धक्का बसेल. त्यामुळे ते ऐकत नाहीत.

पाटा पीचवर टाकलेले आपटबार : खिलाडी ७८६ परीक्षण

जगात मानवांचं वर्गीकरण दोन भागात करायचं म्हटलं तर पहिले असतात साधारण मर्त्य मानव आणि दुसरे अतिमानव. या अतिमानवांना आशीष आर मोहन हे नाव माहीत असतं, ते हिमेश रेशमियाने गायलेली गाणी सहज ऐकू शकतात आणि एण्जॉयही करू शकतात आणि लोहा लोहे को काटता है तसंच अतिमानव अतिमानवांशीच व्यवहार ठेवतात.

अफलातून राजू

मी ५ वर्षापूर्वी कतार ला असताना आमच्या ग्रुप मध्ये राजू मिरचंदानी म्हणून एक टेक्निशियन होता ,वय वर्षे फक्त ६३ ! अतिशय जॉली आणि हसतमुख .अगदी अनोळखी असणाऱ्या व्यक्तीशीही त्याच्या तासनतास गप्पा चालत . इजिप्शियन , फिलिपिनो , थायलंडी , पाकिस्तानी, कतारी, अमेरिकन ,ब्रिटीश कोणीही असो ! ऑफिसर ,म्यानेजर , असो कि झाडूवाला असो ,राजू म्हटलं की सगळ्यांना माहित !

राजीव साने - लोकसत्ता - १८ ऑक्टोबर - 'सम्यक' निसर्ग- एक शुद्ध भंकस

राजीव साने हे नेहमीच रुढाच्या विरुद्ध किंवा वेगळ्या दिशेने जाणारे विचार मांडतात. युगांतर हे त्यांचं पुस्तक असंच अचाट आणि मुद्देसूद होतं. त्यांचे विचार सर्वांना १०० टक्के पूर्णपणे पचनी पडतीलच असं नव्हे, पण त्यांची मांडणी अशी काही लाजवाब असते की काही नाही तर निदान त्या मांडणीच्या आकारासाठी तरी त्यांचं लेखन वाचावं.. लोकसत्तामधे सध्या ते "गल्लत,गफलत,गहजब" हे सदर लिहीतात. त्यातले सर्वच लेख रोचक असतात पण तरीही त्यातला हा एक अत्यंत वेधक लेख.. यावर चर्चा व्हावी अशी इच्छा होती..आज अन्यत्र एक लेख वाचताना या लेखाची आठवण झाली.

दिवाळी टू दिवाळी लिहिण्यामागची कारणं…

Taxonomy upgrade extras

'ऐसी अक्षरे'चा दिवाळी अंक छानच झाला आहे. संपादक मंडळाचे आणि सहभागी लेखकांचे अभिनंदन!

माझ्या लेखावरील प्रतिसादात मन यांनी विचारलेला प्रश्न आणि त्यासंदर्भात त्यांनीच काढलेला एक धागा याच्या अनुषंगाने काही लिहावं असं वाटलं. तसा प्रयत्न करतो आहे.

ट्रॉलीचिकित्सा

Taxonomy upgrade extras

ह्या धाग्याचा जीव तसा लहान आहे. फिलिपा फूट या तत्वज्ञानाच्या प्राध्यापिकेने १९६७ साली 'Trolley problem' या नावाने एक Gedankenexperiment (मनातल्या मनात करायचा प्रयोग) शोधून काढला. अलिकडे अनेक कारणांनी तो पुन्हा प्रसिद्धीत आलेला आहे, आणि नीतीशास्त्रामध्ये त्याबद्दल सततचा काथ्याकूट चालू असतो. ज्यांच्यासाठी तो नवा आहे, त्यांची प्रतिक्रिया काय होते हे समजून घेण्यासाठी हा खटाटोप. (अशा वाचकांनी गूगलगिरी करण्याचा मोह टाळून पुढे वाचावं ही विनंती.)

खेळघर - रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ

(समीक्षेत याची जिम्मा होईल का, याबद्दल किंतू आहे. जर होत नसेल, तर सरळ 'सध्या काय वाचताय?'मधे घालून टाकावे.)

आज ’खेळघर’ (रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ) वाचलं. आधीच कबूल करते, माझी प्रतिक्रिया थोडी गोंधळलेली आहे.

समीक्षेचा विषय निवडा

रावा - शुभांगी गोखले

(समीक्षेत याची जिम्मा होईल का, याबद्दल किंतू आहे. जर होत नसेल, तर सरळ 'सध्या काय वाचताय?'मधे घालून टाकावे.)

आज फारा दिसांनी प्रसन्न दिवस सुरू झाला. खिडकीपासची भरार वार्‍याची जागा, कोवळं ऊन आणि ताजातवाना पोपटी मूड. हातात मस्त कोरंकरकरीत पुस्तक.

शुभांगी गोखलेचं ’रावा’ नावाचं पुस्तक. फार काही जगावेगळं, जगात बदल घडवून आणायला निघालेलं, मैलाचा दगडबिगड ठरेलसं नव्हे. आहे आपलं साधंसंच. पण फार फार जवळचं, आत्मीय वाटलं.

समीक्षेचा विषय निवडा

अलीकडे काय पाहिलंत? -७

अलीकडे काय पाहिलंत? याच्या पाचव्या भागात १०० हून अधिक प्रतिसाद झाल्याने हा नवीन भाग सुरु करत आहे.

याआधीचे भाग:१ | २ | ३ | ४ | ५ | ६