Skip to main content

आजकाल हे असे आहे...

आजकाल असे आहे...

खेळाडू "अभिनय" करत आहेत *(मँच फिक्सिंग)
खेळाडू अभिनय करत आहेत *(बॉलीवूड मध्ये प्रवेश करून, जाहिरातीत)

आजकाल हे असे आहे...

अभिनेते राजकारणात शिरत आहेत
अभिनेते "राजकारण" करत आहेत

आजकाल हे असे आहे...

राजकारणी जनतेच्या सेवेचा "अभिनय" करत आहेत
राजकारणी सत्तेच्या रणांगणावरचे "खेळाडू" बनत आहेत

आजकाल हे असे आहे...

बातम्या मनोरंजनाचा वारसा चालवत आहेत
मनोरंजन रक्तरंजीत अपराधी झाले आहे * (गुन्हेगारी सिरियल्स)

आजकाल हे असे आहे...

माणुसकी सैतानाच्या तावडीत सापडली आहे!
माणुसकी माणसांच्या शोधात भटकते आहे!

आजकाल हे असे आहे...

ज्योतिष, पत्रिका आणि संख्याशास्त्र

पुण्याला प्रथमच भेट देणार्‍या कोणाही परदेशी पर्यटकाला असा प्रश्न विचारला की काय हो? प्रथमदर्शी पुण्यातील कोणती गोष्ट तुमच्या डोळ्यात भरली? तर माझी खात्री आहे की बहुसंख्य पर्यटक पुण्याच्या रस्त्यावर धावणार्‍या काळ्या आणि पिवळ्या रंगांच्या रिक्षांचे नाव घेतील. मात्र हाच पर्यटक जरा जास्त शंकेखोर आणि चिकित्सक असला तर या रिक्षांपैकी बहुसंख्य रिक्षांच्या तळाला बांधलेली आणि रस्त्याला टेकेल की काय असे वाटावे, एवढ्या लांबीची एक सुती दोरी व त्यात ओवलेले एक लिंबू आणि चार/पाच हिरव्या मिरच्या यांकडे आपले लक्ष गेले असे सांगितल्याशिवाय राहणार नाही.

धाग्याचा प्रकार निवडा:

हाडळीचा मुका

हाडळीचा मुका

मानसं मस जमलि व्हति. म्हनजि तसं कारनच घडलं व्हतं. शुंगार टेलर वाल्या का़का टेलरचं पोरगं घर सोडुन गेल्तं. काका टेलर अन त्याच्या बायकुचं रोजचं कडाक्याचं भांडान असायचं म्हनुन कोनच त्येंच्या घरच्या भानगडित पडायचं नाय. पण काल रातच्याल काकीचा लैच येगळा आवाज आला अन तिनं हांबरडा फोडला का, तवाच पब्लिक जमा झालं.

बाबूराव

नेटवरचं माझं लिखाण हे प्रामुख्याने स्वान्तसुखाय या कॅटेगरीत मोडतं. पुस्तक छापण्याची किंवा प्रसिद्ध होण्याची कुठलीही अपेक्षा नसल्याने प्रयोग करावेसे वाटतात. मुद्रीत माद्यमातून नेटसारख्या माध्यमात येताना बरेच फरक आहेत. काही सुविधाही आहेत. त्यांच्या नैतिक अनैतिकतेच्या चर्चेत न पडता काही गोष्टी क्लिअर कराव्याशा वाटतात. लिखाण करताना थोडंसं वेगळ्या शैलीचं लिखाण एका वेगळ्या अवतारात करावं असं वाटलं. याच कारणासाठी काही काळ बाबूराव या नावाने लिखाण केलं. सुरुवातीला अशुद्ध भाषेत लिहीणा-या बाबूरावाने काही लघुरहस्यकथा लिहीताना सुशि, वाळिंबे, ब्लॅकस्टार यांची टिंगल केली.

विकीपंडीत किंवा गूगलपंडीत ?

सध्याच्या इंटरनेटप्रणित युगात, इंटरनेट हे माहितीचे मायाजाल न राहता माहितीचा अफाट स्रोत झाले आहे. त्याचा वापर करून कोणीही कुठल्याही विषयाची माहिती मिळवून, त्या माहितीचा यथायोग्य वापर करून, त्या माहितीचा मानवजातीसाठी योग्य उपयोग करू शकतो. जसे विज्ञान हे शाप किंवा वरदान होऊ शकते त्याचप्रमाणे इंटरनेटवरच्या अफाट माहितीचा हा सागर त्याचा वापर कसा करू त्याप्रमाणे उपयोगी किंवा दुरुपयोगी ठरू शकतो. ते प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अबलंबून आहे. कोणाला अर्धा भरलेला ग्लास 'अर्धा रिकामा' असा दिसू शकतो किंवा 'अर्धा भरलेला' दिसू शकतो.

धाग्याचा प्रकार निवडा:

एका महाचित्रपटाची गोष्ट

काल टीव्हीवर फुकट मिळाल्यामुळे एक चित्रपट बघिटलो. त्याचं नांव सांगण्यापेक्षा गोष्टच सांगावी.

समीक्षेचा विषय निवडा

गव्हाणी घुबडाच्या घरात.. समारोप..!! ..They are back..!!

"अब इसे मारना है की छोडना है, आपकी मर्जी. लेकिन ये खिडकी कभी नही खोलिये.. और उसका नाम मुह से बिलकुल मत बोलिये. हमारे यहां होता तो स्साला मार ही डालते थे तुरंत.."

खिडकी खाडकन बंद करत एसी टेक्निशियन म्हणाला.

नवीन फ्लॅट भाड्याने घेतला. मालकांनी बराच कचरा मागे सोडला होता. शिंकत खोकत मी ते घर राहण्यायोग्य बनवण्याचा प्रयत्न करत होतो.

एका बेडरुमच्या खिडकीत जुन्या विंडो एसीचं धूड चढवायचं होतं. ते काम करता करता असं दिसलं की सात अंडी खिडकीखालचा सज्जा की काय म्हणतात त्या वळचणीत पडलेल्या कचर्‍यात आणि डबरात पडलेली, की घातलेली म्हणा, दिसत होती.

घरटं वगैरे बांधण्याचे कष्ट घेतले नव्हते.

बॉम्बे डक - आगरकर निवृत्त!

Taxonomy upgrade extras

२००३ मधली ब्रिस्बेन कसोटी. भारताचा स्कोर ऑस्ट्रेलियाच्या स्कोरच्या पुढे नेऊन व स्वतः शतक मारून दादा नुकताच आउट झालेला. आगरकर खेळायला आला. मग एक दोन बॉल्स नंतर एक रन काढला आणि जणू शतक मारल्यासारखे बॅट उंचावून सर्वांना दाखवली. स्वतःच्याच अपयशाबद्दल इतक्या सहजतेने सेन्स ऑफ ह्यूमर दाखवणारा खेळाडू क्वचितच कोणी असेल. येथे बॅट दाखवण्याचे कारण म्हणजे त्यापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अजित आगरकर त्यांच्या विरूद्ध सलग ७ वेळा शून्यावर आउट झाला होता. त्यातील चार वेळा 'गोल्डन डक' म्हणजे पहिल्याच बॉलवर! तेथेच त्याला 'बॉम्बे डक' नाव पडले.

पिअर्सची कमाल

पिअर्स साबण काय काय करतो ? एका आंघोळीत बाईला देखणं करुन नवर्याला तिच्यावर जबराट प्यार करायला लावतो. आँफीस मधुन कितीही दमून आलेला असो. पिअर्सने आंघोळ केलीय ना तिने ? आवळलीच पायजे तिला ! संतुर साबण काय करतो ? कौनसे काँलेजमे पढती हो ? उत्तर यायच्या आत आरोळी ! मम्मीsss... मेरी त्वचा से मेरी उम्र का पताही नहीं चलता ? सैफ लगेच च्यूतिया बनतो ! आरतिच्याबायलिला काय उमर ? ह्या असल्या फाल्तु वचनेबल जाहिरातीँनी आमच्या काही बायका होत्यात वेड्या. आणि माजतात गोंधळ. गोष्ट तशी साधी. सत्तरी ओलांडलेला आणि गाव तालुक्याबाहेरही कधी न गेलेला एक अडाणी स्वाभिमानी सासरा नामे बळीराम. एका कानाने जरा बहिरा.