Skip to main content

अशा लेखांतून काय साध्य करायचे आहे?

Taxonomy upgrade extras

मी ऐसी अक्षरेचा गेल्या वर्षीपासून सदस्य आहे. वाचनाची आवड आहे म्हणून सदस्य झालो. वेळ मिळेल तसा वाचत असतो. अलीकडे सतीश वाघमारे यांचे पुरोगामी महाराष्ट्र आणि जयंती हे दोन लेख वाचनात आले. लेखकाची शैली उत्तम आहे. लेख ललित या श्रेणीत आहेत. याचाच अर्थ ते काल्पनिक असावेत. पण लेखा खालील प्रतिक्रियांतून लेख सत्य घटनेवर आधारित आहेत, असा आभास निर्माण होतो. दोन्ही लेखांचा रोख पाहता, हे लेख निर्भेळ आहेत, असे म्हणवत नाही.

'बंबसूत्र भाष्य': प्रस्थापित भाषा व ज्ञान बंबात घालणारा ग्रंथ

'जिज्ञासा' म्हणजे जिनगानीचा सा. प. पू. गुरुवर्य ऊसमहाराज काकवे यांनी गाळीव कृतीतून लिहिलेल्या बंबसूत्र भाष्य (बंबसूत्र - भावोन्माद - दुर्बोधचंद्रिका - लवणरस -पाश्चात्यमधुशालासहित) या ग्रंथाचे प्रकाशन आज रोजी दि. १९/६/२०१३ ला सायंकाळी ११ वाजता लातूर येथील संध्यानंद कॉलेज मागील मदिरालयात संपन्न होत आहे. या निमित्ताने या दुर्मिळातल्या दुर्मिळ वाचकवर्ग असलेल्या ग्रंथाच्या रूपातून अजाण वाचकांची, झोपलेल्या श्रोत्यांची, रिकामटेकड्या अभ्यासकांची, उटपटांग साधकांची, 'बंबरूपसाधनाने दादाजी कोंडके यांजप्रमाणे बेंबाट्याचा साक्षात्कार व्हावा', ही जिज्ञासा नक्कीच तृप्त होणार आहे.

पुरुषांसाठी धोकादायक केस लॉ

प्रौढ स्त्री-पुरुषांमध्ये शारीरिक संबंध आल्यास ते पती-पत्नीच - मद्रास हायकोर्टाचा निर्णय
http://www.loksatta.com/desh-videsh-news/couple-of-right-legal-age-indu…

भारताचा आशियाई दोरीवरचा खेळ (२/३: भारतीय उपखंड व परिसर)

भाग: १ | २ | ३

पश्चिम आशियातील घडामोडींकडे पाहिल्यावर भारतीय उपखंड आणि परिसराकडे वळूया.

ब. भारतीय उपखंड व परिसर

धाग्याचा प्रकार निवडा:

मोहब्बतें - गुरू नॉट कूल

ज्याचे खरे नाव 'गुरू नॉट कूल' असायला हवे, अशा गुरूकूल नावाच्या कडक स्कूल बद्दल हा चित्रपट आहे. कडक म्हणजे अभ्यास किती कडक करावा लागतो ते माहीत नाही. आख्ख्या चित्रपटभर एकही वर्ग दाखवलेला नाही, कोणी अभ्यास करतानाही दाखवलेले नाही. पण येथील संचालक अधूनमधून सगळ्यांना हॉल मधे राउंड अप करून रागीट चेहर्‍याने ‘परंपरा और अनुशासन’ शिकवतो. भाषा अशी की तुलनेत उत्तर प्रदेश भाजप चे अध्यक्ष हाय फाय इंग्रजी बोलत असतील असे वाटावे. कडकपणा एवढाच.

‘फायनल ड्राफ्ट’

खास “एका लग्नाची दुसरी गोष्ट” फेम मुक्ता बर्वेच नाटक पाहायला गेले.....वाटलं होत, आता एक अप्रतिम नाट्याविष्कार पाहायला मिळणार.
सुरवातीला कलाकारांची ओळख म्हणून दोन शब्द बोलायला मुक्ता बर्वे आणि गिरीश (आडनाव आठवत नाही.) यांना बाहेर बोलावले तेव्हा त्यांच्या बोलण्यावरून वाटलं कि धमाकेदार परफॉर्मन्स होणार...पण नाटक सुरु झाल तस जाणवलं कि सगळ संवादांवरच निभावून नेत आहेत.

ही साठफळांची कहाणी सूफळ कायम्चूर्ण!

जगप्रसिद्ध आहारात अज्ञ चिक्की केंटकीमध्ये तिच्या बगिच्यात मशागत केलेल्या लॉनच्या भोवताली शोभिवंत फुलझाडांची रोपे लावण्यात गढून गेली होती. आज ती "मज आणुनी द्या तो लॉनमोअर केंटुकीनाथाऽऽऽ" असे लडिवाळ स्वर, स्व. सुधीर फडके अगदी गहिवरून जातील इतक्या लाडिकपणे आळवत होती. तिच्या सख्ख्या शेजारी एक पांढऱ्या तोंडाचा टप्पू अमेरिकन बुढा चार्ली रहायचा. त्याच्या बगिच्यात तात्काळ फलोत्पादक झाडांची नेहेमीच रेलचेल असे. चिक्की बगिच्यात गात, बागडताना दिसताच तो आपले बागकाम सोडून भान हरपून पहात बसला. एकदा गायला लागली की चिक्कीची ब्रम्हानंदी टाळी लागे.

पांडुरंग सांगवीकर सम लैंगिक आहे का?

Taxonomy upgrade extras

कलाकृति मधलि एखादि व्यक्तिरेखा आपली चौकट मोडुन वाचक अथवा प्रेक्षक यांच्या मनोव्यापाराचा हिस्सा बनते तेंव्हा ती कलाकृती यशस्वी होते असे म्हणायला हरकत नाही. शेरलॉक होम्स च बेकर स्ट्रीट वरील घर बघायला अनेक पर्यटक जायचे. मध्यंतरी हॅरी पॉटर या अती लोकप्रिय मालिकेमधले Dumbeldore हे पात्र कसे 'गे' आहे हे अहमहीकेने सांगणार्‍या लेखांचा वरवा पाडण्यात आला होता. उल्लेखनीय बाब अशी की दस्तुर्खुद लेखिका जे.के. रोलिंग बाई नि पण या थियरी ला दुजोरा देऊन एकच खळबळ उडवून दिली. या कपोकल्पित पात्राना मानवी गुणधर्म चिकटवने हा वाचकांचा / प्रेक्षकांचा अट्टहास असतो.

चिनी साम्राज्य

२०५० सालातला भारत. नक्षलवादी फक्त दुर्गम भागात असायचे ते आता सर्व भारतभर पसरले होते.बहुतेक भाग त्यांनी काबीज केला होता. बरेच राजकीय नेते मारले गेले होते. उरलेले दिल्ली आणि त्याच्या जवळपासच्या भागात मिलिटरीच्या संरक्षणाखाली रहात होते. बाकीच्या देशांत त्यांचा संपर्क जवळजवळ तुटलाच होता. तरीही बाहेरच्या जगात अजून 'नक्षलीस्तान' ला मान्यता मिळाली नव्हती. शहरातल्या जनतेला अंगमेहनतीची कामे करावी लागत होती. नक्षलींनी जी शहरे काबीज केली, तेथील वस्तीत जाऊन सर्वप्रथम तिथल्या खाजगी गाड्या जाळून टाकल्या. एसयूव्ही सारखी खाजगी वाहने स्वतःच्या वापरासाठी बळजबरीने घेतली.