गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे.
आयुष्यात दोन गोष्टी एकदा शिकल्या की त्या आपण कधीच विसरत नाही. त्या म्हणजे सायकल चालवणे आणि पोहणे. तरुण वयात या दोन्हीची क्रेझ असते. पहिली गोष्ट आवडीतून गरजेत कधी रूपांतरित होते हे कळतच नाही पण दुसरी गोष्ट गरज बनावी अशी काही परिस्थिती अजूनतरी पुण्यात नाही.
आता जेव्हा पूर्वी पानशेत धरण फुटले होते तेव्हा लोकांनी घरातील वाहून गेलेलं सामान (गरज म्हणून) पोहत पोहत जाऊन पकडून आणले होते प्लस वाहून गेलेल्या लोकांना शोधण्याच्या मदतकार्यात हि ते (गरज म्हणून) होते हा भाग वेगळा.
- Read more about गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे.
- 8 comments
- Log in or register to post comments
- 6135 views
कोणती प्रतिमा सजीव वाटते?
खाली दिलेली दोन पोर्ट्रेटस प्रसिद्ध सरोदवाद्क विश्वजित रॉयचौधरी (पंडित मल्लिकार्जुन मन्सुर यांचे शिष्य) यांच्या मी पुण्यात काढलेल्या एका पोर्ट्रटच्या दोन वेगवेगळ्या आवृत्त्या आहेत.
कॅमेरात असलेल्या evaluative metering या प्रकारात प्रतिमा फ्लॅट होते आणि त्यामुळे निर्जीव वाटते. प्रतिमेच्या वेगवेगळ्या भागात प्रकाशाच्या तीव्रतेची सरासरी काढून मग सरासरी तीव्रता ठरते आणि कॅमेरा एक्सपोजर सुचवतो. Centre weighted meteringला काही मर्यादा पडतात. विशेषत: प्रतिमेचा मुख्य विषय स्थिर नसेल तर Centre weighted metering वापरणे जरा किचकट ठरते.
- Read more about कोणती प्रतिमा सजीव वाटते?
- 25 comments
- Log in or register to post comments
- 9936 views
आम्ही अमेरिकावासी
आता एनआरआय लोकान्च्या मानसिकतेची चर्चा सुरुच झालीय तर आमचीही त्यात थोडी भर!
- Read more about आम्ही अमेरिकावासी
- 35 comments
- Log in or register to post comments
- 24428 views
भवचक्र, मारीया, मनोव्यापार आणि आर्थिक व्यवहार
- Read more about भवचक्र, मारीया, मनोव्यापार आणि आर्थिक व्यवहार
- Log in or register to post comments
- 3431 views
छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २२: यंत्र
या वेळचा विषय आहे "यंत्र". मानवनिर्मित यंत्रांची चित्रे येथे दिसावी, अशी विषय देतानाची अपेक्षा आहे.
यंत्रे म्हटली म्हणजे उपयुक्तता हा प्राथमिक हेतू असतो. परंतु यंत्र बनवणार्याची सौंदर्यदृष्टी म्हणा, किंवा यंत्राच्या अभियांत्रिकीसाठी काही विवक्षित संमिती (सिमेट्री) लागत असल्यामुळे म्हणा, कित्येक यंत्रे सुंदरही असतात. कधीकधी बघणार्याच्या परिप्रेक्ष्यामुळे, कॅमेर्याच्या चौकटीतल्या निवडीमुळे, किंवा यंत्राच्या परिसराशी होणार्या संदर्भामुळे एक कथानक निर्माण होऊ शकते.
अशी यंत्रांची चित्रे आपण येथे बघूया!
-----
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २२: यंत्र
- 56 comments
- Log in or register to post comments
- 75232 views
अनावृत काफिऱ
तुझे शुभ्र, संयत शुकवस्त्र
पाघळतं, विरघळतं
विभ्रमाचा प्रारब्ध तेवढा गतिमान करत ठेवतं
सत्य अन्शा अन्शाने प्रकट होत जातं
आणि माझ्यातला मी मात्र
अनायासेच तू कभिन्न करून ठेचलायस
खिन्न प्रणयाचा सारीपाट
घडी करुन परत आत सारलाय
तुझ्या अमर्त्य अमृताशी एक मर्त्य क्लेश
कायमचा बांधला गेलाय
नुकत्याच कोरड्या केलेल्या मज्जारज्जूंनी
माझ्या किरमिजी बेटावरची
तुझ्या आत्मलिंपणाची नक्षी
पांथस्त सूर्योदयाची
सुबक विप्रलब्ध आविष्कार
अलिखीत उन्मीलीत समाधीकडे नेतो
आणि तू आपल्या करूणेचे उन्माद
शिताफीनं शेवटपर्यंत झेलत राहातेस
ह्रदयंगम अकृत्रिम स्नेहाचा सांजशकून मात्र
- Read more about अनावृत काफिऱ
- Log in or register to post comments
- 3014 views
प्रोडक्ट
'मी' नावाच्या 'प्रोडक्ट'ला,
धारदार एकाकीपणाचं वेष्टण आहे,
त्यातला जिन्नस 'एक्सपायर' होत नाही,
जोवर तुम्ही ते 'रैपर' 'स्क्रेच' करत नाही,
'लकी ड्रॊ' सुद्दा आहे त्यात एक,
ज्याच्या 'विनर'ला काहीच गवसणार नाही,
माहीत आहे?
तरीही कापू म्हणतो हा 'टेट्रापेक' एकदाचा,
पाहीन तरी,
किती 'प्रिझर्वेटीव्हज' आहेत
किती 'न्यूट्रियंट्स' आहेत
अथवा उगाच,
नुसताच आपला बुडबुडा भरलेला असायचा
एरर इन क्वालिटी कंट्रोल
ऎबनोर्मल डिसट्रीब्यूशन
मार्केट मधे मात्र पोकळ डब्यांनाच चलती आहे,
नुसता चकचकीत, गुलाबी असला तरी चालेल,
चालेलच हे प्रोडक्ट
सिलीकोन भरलेली,
टंच,
आधीची,
- Read more about प्रोडक्ट
- Log in or register to post comments
- 2182 views
मास्लोचा पिरेमिड
मास्लोचा पिरेमिड माणसाच्या गरजांची उतरन्ड दाखवतो. जशा एकावर एक रचालेल्या विटा. प्रत्येक विटेची गरज खालची वीट. आधी जिवंत राहण्यासाठीच्या गरजा. मग प्रेम-बिम, सामाजिक गरज. त्यावर बनतात मान्यता, प्रतिष्ठा, प्रसिद्धी. आणि शेवटी म्हणे आत्मभान येत. त्यामुळे म्हणे बहुतेक जण खालच्या विटा बनून राहतात. कारण त्यांना वरची पायरी गाठताच येत नाही कधी. आणि जसजसे माणसाला काही मिळत जाते तस तसे म्हणे त्याला आणखी हवे. अस अगदी शेवट होई पर्येन्त तो पायर्या चढायचा प्रयत्न करत राहतो. पण शेवटी अत्युच्च बिंदू सुद्धा एक त्रिकोण आहे, आतल्या आत. त्यात रुतत जाणे, आकसत जाणे हा आपल्या जीवनाचा ध्येयवाद असतो म्हणे.
- Read more about मास्लोचा पिरेमिड
- 8 comments
- Log in or register to post comments
- 8171 views
झाकली मूठ..
मूठ. लॅपटॉपच्या टेबलावर दणक्यात आपटलेली मूठ. जगात सार्या चळवळी अशा मुठितुन प्रगटल्यात हा आपला आजचा भलताच कडक विचार. आणि आजकाल आपण भारीच क्रांतिकारक वगैरे झालो आहोत. देशाबाहेर पडेपर्येन्त आपण कधीही समाज बदलण्याचा प्रयत्न, सामाजिक अन्यायाला वाचा वगैरे फोडण्याचा प्रयत्न, आंदोलनात भाग घेऊन, हिरीरीने वगैरे कधीच केला नाही. आपले जीवन हेच काय ते सुधारता येते असे म्हणून गप्प बसलो. शेतकर्याचे प्रश्न 'आज ८.३४ ची लोकल हुकणार बहुतेक' या धाकधुकीत नेहमी हरवत. शनिवारी रात्री ओवरटाइम करताना दीन दुबळ्यान्च्या सामाजिक उद्धाराचा गजर रात्री-बेरात्रिही कधी झाला नाही. स्वार्थीच जीणे जगलो.
- Read more about झाकली मूठ..
- 42 comments
- Log in or register to post comments
- 26454 views
काव्यकोतवाल समीक्ष शहांच्या अनंत माफ्या मागून
स्वयंपाकघर-माजघराच्या सीमारेषेवर ये
तिथल्या गुप्त एरियामध्ये अक्रोड-बदामाची अपरंपार बीजे आहेत
ती पळव
फेड
पाकशास्त्राची घरंदाज अंगवस्त्रे बिनधास्त
येथल्या एखाद्या निष्प्राण शेगडीखाली बसून
व्यूहरचना कर
स्वाहाकाराच्या जमेल तेवढ्या प्रकरणांची
घोळव
प्रत्येक नव्या चवीबरोबर
निरनिराळे क:पदार्थ
ओढून काढ
बोकडाच्या बरगड्यांमधील सैद्धान्तिक सुरे
वाहू दे रस
फुटलेल्या नळीतून
वाहू दे अमर्याद
मांड पाट घाल घाट
बुभुक्षित हो भुकेच्या नगरीतून हवे असल्यास
सोयीस्कर तांबडा-पांढरा रस्सा मागत
फन्ना उडवत
ये
स्वयंपाकघर-माजघराच्या सीमारेषेवर
तिथे मी तुझी वाट पाहतो आहे
- Read more about काव्यकोतवाल समीक्ष शहांच्या अनंत माफ्या मागून
- 8 comments
- Log in or register to post comments
- 3212 views
