मानवी जनुकांवर स्वामित्वहक्क नाही - अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
अॅन्जेलिना जोलीच्या डबल मॅस्टेक्टमीबद्दल अनेक ठिकाणी लिहून आलं. 'ऐसी अक्षरे'वरही त्यावर एक लेख आला होता. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा एक ताजा निर्णय त्या संदर्भात महत्त्वाचा आहे. कालच्या ह्या निकालामुळे अनेक वर्षं भिजत पडलेला मानवी जनुकांच्या स्वामित्वहक्काचा मुद्दा काही अंशी निकालात निघाला आहे. गेली तीस वर्षं अमेरिकन पेटंट ऑफिस जनुकांवर स्वामित्वहक्क देत होतं. नैसर्गिकरीत्या आढळणारी मानवी जनुकं प्रयोगशाळेत वेगळी काढली गेली तरी त्यावर कुणाला स्वामित्वहक्क मिळणार नाही असं ढोबळ अर्थानं ह्या निकालाचं स्वरूप आहे.
- Read more about मानवी जनुकांवर स्वामित्वहक्क नाही - अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
- 8 comments
- Log in or register to post comments
- 6489 views
माझ्यासारख्या मवाल्याचा सज्जन मित्र
माझ्यासारख्या मवाल्याचा सज्जन मित्र
काही लोक पहिल्या भेटीत आपल्याला कशी वाटतील व भासतील, हे त्या लोकांच्या राहणीमानाप्रमाणेच आपल्या स्वतःच्या नजरेवर अवलंबून असते. काही लोक बाह्यरूपी दिसताना मवाली दिसत असतात, वा बघणारा स्वतःला सोडून इतरांना मवाली गणत असतो. पण कोणाचे नशीब कशी चाल खेळेल सांगता येत नाही, आणि अश्या लोकांबरोबरच आपल्याला अनेक वर्षे काढावी लागतात. कधी नाईलाजाने तर कधी मित्रत्वाने.
- Read more about माझ्यासारख्या मवाल्याचा सज्जन मित्र
- 7 comments
- Log in or register to post comments
- 6663 views
(जंगलातला) आजोबा !!
सुजय ढाके हा एक मराठी चित्रपटसृष्टीतला प्रयोगशील दिर्दर्शक ! सुरवातीचा चा पिच्चर 'शाळा' काढून त्याने सगळ्यांना 'इचीभना' म्हणायला लावला. त्याचा नवीन येणारा चित्रपट म्हणजे 'आजोबा'!
आजोबा नावाच्या एका बिबट्याची गोष्ट त्याने सुंदर चित्रबद्धीत केली आहे.
- Read more about (जंगलातला) आजोबा !!
- 18 comments
- Log in or register to post comments
- 16945 views
शॉप फ्लोअर व्यवस्थापन..
फार पुर्वि (म्हणजे ७० चे दशक} कारखाना व्यवस्थापना मधे फंडे होते ..
अर्थात आजच्या बदलत्या कालखंडात ते किति लागु आहेत हे सांगणे कठिण,,
त्या पैकी एक
शॉप फ्लोअर व्यवस्थापन..
शॉप फ्लोअर वर रोज नविन काम नविन डॉईंग्ज..असे प्रकार चालुच असतात..
त्या साठी ३ डी हा फंडा असायचा..
हे ३ डी म्हणजे...
१.Discuss यात संबंधित कामगार व सुपर वाईजर समवेत जॉब, ड्रॉईंग, ऑपेरशन क्रम..आदिच्या चर्चा करायचो..जर कुणाला ड्रॉईंग मधे अडचण वा इतर काहि समजले नसेल तर तर समजावुन सांगणे असे प्रकार असायचे.
- Read more about शॉप फ्लोअर व्यवस्थापन..
- 5 comments
- Log in or register to post comments
- 3278 views
बौद्धिक संपदा
Taxonomy upgrade extras
"लढवय्या शेतकरी" धाग्यावर एक मुद्दा चर्चेत आहे.
जेनेटिकली मॉडिफाइड बियाण्यातून जे पीक येते त्यातील धान्यबिया पुनरुत्पादन करू शकणार नाहीत असा जनुकीय बदल केलेला असतो. त्यामुळे दरवेळी शेतकर्याला कंपनीकडून (संशोधकाकडून) बियाणे घ्यावे लागते.
ही अनएथिकल / अनैतिक पद्धत आहे असे काहींचे मत आहे.
त्याच्या नैतिक अनैतिकतेविषयी चर्चा करायची आहे.
माझा दृष्टीकोण पुढील प्रमाणे...
एखाद्या संशोधनासाठी आलेला खर्च आणि त्या इनोव्हेशनचे रिवॉर्ड म्हणून संशोधकाला पेटंट दिले जाते. त्यामुळे त्या वस्तूचे उत्पादन करण्याचा एकाधिकार संशोधकाला मिळतो.
- Read more about बौद्धिक संपदा
- 61 comments
- Log in or register to post comments
- 48006 views
एका "हॅकर"चा ब्लॉग आणि धक्कादायक सांख्यिकी 'निकाल'
सारांशः ICSE चे बारावीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच धाकट्या मित्रांवर शाईन मारण्यासाठी एका गीकने सर्व्हरवर "डल्ला मारला". त्यातून त्याला दिसलं की या गुणतालिकांमधे गडबड आहे.
प्रश्नः १. सर्व्हर हॅक केला आणि दोन लाख मुलांचे बारावीचे मार्कतर काढले ना! कोणाचे पैसे तर ढापले नाहीत ना! मग का एवढी चिंता?
२. मुळात याला कसं समजलं की या गुणतालिकांमधे काही गडबड आहे?
तपशीलवार उत्तरं:
- Read more about एका "हॅकर"चा ब्लॉग आणि धक्कादायक सांख्यिकी 'निकाल'
- 54 comments
- Log in or register to post comments
- 37562 views
"तीर्थरूप"
"उलटी अंबारी हाती येईल
आकाबाई आठवताना
कुबेर सुद्धा अपुरा पडेल
यांचे हट्ट पुरवताना
सायकल बीकल चालवायला
इथे काय लॉटरी लागली ?
एक चड्डी गांडीला एक दांडीला
तर यांची कोरी प्यांट फाटली.
सिनेमाला जाऊ म्हणतात
माज आला भडव्याना
शनिमहात्म्य वाचा म्हणतो
साडेसातीला जपताना
गाणगापुरची यात्रा आली
खाऊ तिथली तिखट शेव
अमिताभचा पिक्चर लागला
लगेच निघाले नवरदेव !
गावस्करच्या मॅचसाठी
तिकडे यांचा जीव जाईल
टीव्ही कसला बघतोस साल्या
परीक्षा तुझा बाप देईल ?"
आजारपणं अभ्यास बिभ्यास
कर्तव्यं पार सगळी पाडली
करवादून बोलले तरी
फी कधी नाही चुकली
पोराचे हट्ट पुरवताना
- Read more about "तीर्थरूप"
- 16 comments
- Log in or register to post comments
- 13808 views
सौदी अरेबियातला नास्तिक
सौदी अरेबियासारख्या धर्मकर्कश देशात नास्तिक असण्याची परिणती कैद, छळ किंवा मृत्युदंडसुद्धा होऊ शकते. आणि तरीही ह्या देशात नास्तिक आहेत. अशा एका विशीतल्या नास्तिकाचा परिचय yourmiddleeast.com ह्या संकेतस्थळानं प्रकाशित केला आहे. परदेशातून पुस्तकं स्मगल करणं, इतर नास्तिकांबरोबर गुपचूप गाठीभेटी ठरवणं, शुक्रवारच्या नमाजाला न गेल्याचं लपवून ठेवणं अशा पद्धतीचं आयुष्य जगणं नास्तिकांना भाग पडतं. त्याचं तपशीलवार आणि सुन्न करणारं वर्णन ह्या मुलाखतीत आहे.
मुलाखतीचा दुवा
- Read more about सौदी अरेबियातला नास्तिक
- 68 comments
- Log in or register to post comments
- 28983 views
बहुगुणरमणीय
पावसाळ्याबद्दल सारेच लिहितात, सार्या वयाचे, सार्या पेशाचे! साहित्यिकांचा फार आवडता आहे तो; कारण तो वेगळा आहे – बहुगुणरमणीय!
पण सूक्ष्मपणानं त्याच्याकडे कोणी बघतच नाही.
जगातल्या सगळ्या द्वंद्वांप्रमाणे ‘शीतोष्ण’ हेही एक प्रसिद्ध द्वंद्व आहे. भूगोलाच्या काटेकोर नियमांमुळे सहा-सहा महिने पृथ्वीला हे द्वंद्व सहन करावं लागतं. या द्वंद्वाला धूप न घालता त्यांच्या पार जाऊन आपलं अस्तित्त्व दाखवणारा म्हणून पावसाळा वेगळा!!
- Read more about बहुगुणरमणीय
- 20 comments
- Log in or register to post comments
- 10924 views
खास लकबी
संवाद साधण्याच्या काहि लोकांच्या खास लकबी असतात..
एम आय डी सी ला अस्ताना आमचा एक मित्र होता एखादी चर्चा असली व त्याने त्या विषयावर तोंड उघडले कि आधि
"मला एक समजत" अशी सुरवात केल्याशिवाय तो पुढे बोलायला सुरवात करत नसे..
तर एक यु पी वाला होता तो "वो क्या है न जी" अशी सुरवात करित असे.
काहि लोकाना " मी काय बोलतो ते लक्षात येते ना" म्हणायची सवय असते..्
तर काहि लोक्स २ पेग पोटात गेले कि फाड्फाड कोकाटे ईंग्लिश बोलु लागतात....
शेवटी व्यक्ति तितक्या प्रक्रुति
- Read more about खास लकबी
- 13 comments
- Log in or register to post comments
- 7348 views