फोनवरच संभाषण
"काय करतीयेस" पलीकडून त्याने विचारलं.
"हं!" तिने निश्वास टाकला. "म्हटलं सकाळपासून कसा फोन आला नाही. बिझी होतास का?"
"बिझी नव्हतो. असाच कुणाचातरी विचार करत होतो."
ती गप्प बसली. "कुणाचा" असं विचारलं तर तो काय बोलणार हे तिला पक्कं माहित होतं.
"कुणाचा असं नाही विचारणार?" त्याने तिकडून विचारलंच.
"नाही. मी तसलं काही विचारणार नाही. आणि तुही असलं फालतू काही विचारायचं बंद कर." तिने रागाने फोन आपटला.
- Read more about फोनवरच संभाषण
- 23 comments
- Log in or register to post comments
- 17679 views
द अंडरटेकर!
बास! शिर्षक वाचल्यावरच अनेकांचा थरकाप उडेल. अनेकांना आश्चर्य वाटेल. अनेकांना उत्साह वाटेल. आणि अनेकांना विचित्रही वाटेल. मात्र 'कोण हा अंडरटेकर?' असा प्रश्न कुणालाच पडणार नाही. रेसलींग या नावानं प्रसिद्ध असलेली कुस्ती तुम्हाला आवडत असेल अथवा नसेल, आणि डब्ल्य़ुडब्ल्य़ुएफ (किंवा आता डब्ल्य़ुडब्ल्य़ुई) अनेक वर्षांपासुन पाहिले असेल अथवा नसेल; परंतु 'अंडरटेकर' हे नाव आणि हे व्यक्तीमत्त्व याबद्दल काहिच कल्पना नाही; असा माणुस सापडणे विरळाच! आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्रालाच आपल्या नावानं ओळखलं जाण्याचं सौभाग्य एखाद्याच सचिन तेंडुलकरला मिळतं आणि एखाद्याच अंडरटेकरला!
- Read more about द अंडरटेकर!
- 13 comments
- Log in or register to post comments
- 16906 views
कॉकटेल लाउंज : गाथा टकीलाची (भाग 2)
मागच्या भागात (भाग १) टकीलाचा इतिहास (पल्के, अगावेचे फळ, भौगोलिक स्थान वगैरे) बघितला. आता ह्या भागात बघूयात टकीलाचे वेगवेगळे प्रकार. मागच्या भागात बघितल्याप्रमाणे टकीला ही ब्लु अगावेपासून बनवतात. ह्या ब्लु अगावेच्या वापरल्या गेलेल्या प्रमाणामुळे टकीलाचे ढोबळमानाने २ मुख्य प्रकार पडतात.
१. टकीला : ह्या प्रकारात ब्लु अगावेचे प्रमाण १००% असते.
२. मिक्सटो : ह्या प्रकारात ब्लु अगावेचे प्रमाण कमीत कमी ५१% इतके असते. बाकी उसाचा रस किंवा वेगळ्या ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज रुपातील साखर असते.
टकीला NOM
- Read more about कॉकटेल लाउंज : गाथा टकीलाची (भाग 2)
- 6 comments
- Log in or register to post comments
- 10004 views
'थांबा!'.. तुम्ही ही पुस्तकं वाचू शकत नाही!!
हिंदू या दैनिकात काही दिवसांपूर्वी हसन सुरूर यांचा You can't read this book हा लेख प्रकाशित झाला होता. गेल्या आठवड्यात 'प्रहार'मध्ये 'थांबा!'.. तुम्ही ही पुस्तकं वाचू शकत नाही!! हे त्याचं मराठी रूपांतर प्रसिद्ध झालं आहे. मूळ लेखाचं शीर्षक हे निक कोहेन यांच्या 'You Can't Read This Book: Censorship in an Age of Freedom' या पुस्तकावरून घेतलेलं आहे. त्या पुस्तकात ब्रिटनमधल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कोण आणि कशी गळचेपी करत आहे याचा लेखाजोखा आहे.
- Read more about 'थांबा!'.. तुम्ही ही पुस्तकं वाचू शकत नाही!!
- 16 comments
- Log in or register to post comments
- 20542 views
"पाय"ची प्रायोगिक किंमत : वेगळाच पैलू
Taxonomy upgrade extras
नुकत्याच एका चर्चाविषयात "पाय"ची किंमत प्रत्यक्ष मोजमापांनी काढून अंदाजांची सरासरी करण्याबाबत चर्चा झाली. (दुवा)
येथे चर्चाविषयाचा मुद्दा वेगळाच आहे. या चर्चेपुरते असे मान्य केलेले आहे, की काळजीपूर्वक विचार करून अशा प्रकारचा प्रयोग करता येईल, जेणेकरून अंदाजांची सरासरी ठीक-ठाक येईल, आणि वर्तुळाचा परिघ/व्यास ही किंमत मिळेल.
- Read more about "पाय"ची प्रायोगिक किंमत : वेगळाच पैलू
- 7 comments
- Log in or register to post comments
- 5851 views
" स्वप्नामधली जमाडीजंमत "
कावळा करतो कुहू कुहू
कोकिळा करते काव काव
फोडते मांजर डरकाळी
वाघोबा करतो म्याव म्याव
पळे सर सर सर हत्ती
निवांत चाले हळू खार ती
कोल्होबा चिडीचूप बसतो
ससोबा गुरगुरगुर करतो
आरोळी उंदीरमामाची ती
वनराजाला वाटे भीती
माकड चाले जमिनीवर
कासवाची उडी झाडावर
आई छान सांगते गंमत
बंडू ऐके पेंगत पेंगत
रंगुनी जाई बघत बघत
स्वप्नामधली जमाडीजंमत
- Read more about " स्वप्नामधली जमाडीजंमत "
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3352 views
मुंगळा : अर्थसंपृक्त रूपकवस्त्रांचं दुसरं अनावरण
मागच्या लेखात आपण मुंगळा या दृक्श्राव्याच्या शक्तिस्थानांचा आढावा घेतला. त्यात वापरलेलं माध्यम, चित्रपटातील स्थान, एकाच वेळी स्वतंत्र कलाकृती असणं आणि चित्रपटात योग्य ठिकाणी चपखल बसणं इत्यादी मुद्दे मांडले. एखाद्या नामी इमारतीकडे बाहेरून पाहून तिचं देखणं रूप, भक्कम बांधणी, आणि चिरान् चिरा योग्य जागी असल्याचा विचार करावा तसं. या लेखात आपण त्या इमारतीत शिरून तिच्या अंतरंगांचं अवलोकन करू.
- Read more about मुंगळा : अर्थसंपृक्त रूपकवस्त्रांचं दुसरं अनावरण
- 8 comments
- Log in or register to post comments
- 6886 views
.
.
- Read more about .
- 24 comments
- Log in or register to post comments
- 15757 views
सांब भोळा
रानात सांब भोळा
उघडा असे दुपारी
'देवा कसाही तू रे...!?'
मी एक त्या विचारी
म्हणतो मलाही सांब
'मी खेळ तव मनाचा,
असतो निसर्ग सारा..
कधी देव का कुणाचा..?'
'पडणार साऊली जी
माझेच अल्प रूपं..,
का बांधता तुम्ही हे..
नसते खुळे हिशेबं..?'
'व्यापुनि चराचरी या
मी विश्वरूपं सारे...,
माझेच भोग मजसी..
छळतीलं का कधी रे..?'
'तुमच्या खुळ्या स्वभावी
मज देव-जन्म आहे..,
कुणी 'देवं' का म्हणा ना..?
अंती निसर्ग आहे...!'
'त्याचीच शुद्ध किमया
भासे तुम्हा उन्हाळा,
निर्जीव मूळचा मी
तुमचाच सांब भोळा...!'
- Read more about सांब भोळा
- 13 comments
- Log in or register to post comments
- 6081 views
न कळलेले
सकाळी साडेदहाच्या सुमारास कार्यालयातील माझ्या जागेपाशी आवाज ऐकू आला. हा आवाज खारींचा आहे हे आता अनुभवाने मला माहीत झाले होते. आज सकाळीच यांचा गप्पा मारायचा, इतकेच नाही तर दंगा करायचा मनसुबा दिसतोय.. हे माझ्या लक्षात आल. बाहेर व्हरांडयात एक चक्कर टाकून त्यांच काय चाललय ते पाहाव असा विचार माझ्या मनात आला अन तितक्यात टेबलावरचा फोन खणखणला. मग कामात मी गुंतले ती गुंतलेच. मी काही फार महत्त्वाच आणि सृजनात्मक काम करते अशातला भाग नाही. पण सवयीने निरर्थक कामातही माणूस अडकत जातो. पोटासाठी अनेकदा आपण अशा कामाचे गुलाम बनतो! का असे होते ते कळत नाही, पण घडते खरे तसे!
- Read more about न कळलेले
- 21 comments
- Log in or register to post comments
- 15237 views