पाककृती हवी आहे: लसणाचं लोणचं
कोकण किनारपट्टीवर वेगवेगळ्या जातींत लसणाचं लोणचं करण्याच्या पारंपरिक प्रथा आहेत. उदाहरणार्थ गोव्यात ख्रिश्चनांकडे पोर्तुगीज प्रभावाखाली व्हिनेगर वगैरे घालून लसणाचं लोणचं करतात. सारस्वत, केरळी वगैरे पद्धतींनीही लसणाचं लोणचं करतात. कुणाला अशा पाककृती माहीत असल्या तर त्या द्याव्यात. धन्यवाद.
- Read more about पाककृती हवी आहे: लसणाचं लोणचं
- 24 comments
- Log in or register to post comments
- 15780 views
होते कुरूप वेडे.... अस्मिता देशपांडे (साभार, पालकनीती, मार्च २०१२ चा अन्क)
प्रत्येकाच्या जवळ क्षमता-अक्षमतांचं एक आपापलं गाठोडं असतं. परिस्थितीनुसार ह्यातल्या काही अक्षमता संपतात, तशा काही क्षमता आपल्याला सोडूनही जातात. कुठल्याही आयुष्यात असं काही ना काही घडतच असतं. पण या सगळ्याहून महत्त्वाचं आहे ते आपलं आपल्या ह्या गाठोड्याकडे पाहणं, त्यातल्या कमतरतांचा अर्थ वेगळ्यानं समजावून घेणं.
------------------------------------------------------------------------------------------------------
- Read more about होते कुरूप वेडे.... अस्मिता देशपांडे (साभार, पालकनीती, मार्च २०१२ चा अन्क)
- 17 comments
- Log in or register to post comments
- 13812 views
काही नोंदी अशातशाच... - ९
दहा दिवस झाले वास्तवात या गोष्टीला. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू व्हायचा होता. पण त्याची हवा तयार होत गेली होती. या आंदोलनाचा, खरं तर आंदोलनामागील मागणीमागील विचाराचा, विरोधक हीच माझी त्या वर्तुळात प्रतिमा होती आणि आहेही. स्वाभाविकच ते सारे एका बाजूला आणि मी एका बाजूला अशी चर्चा सुरू होती. चर्चा नव्हे, किंचित वादच. समोर एक वकील होते, त्यांचे दोघे-तिघे समर्थक, एक प्राध्यापक.
- Read more about काही नोंदी अशातशाच... - ९
- 11 comments
- Log in or register to post comments
- 8644 views
पुन्हा जंतर मंतर: भाग २
- Read more about पुन्हा जंतर मंतर: भाग २
- 23 comments
- Log in or register to post comments
- 17895 views
वेगळी
जगणं सगळ्यांसारखं
मन वेगळं.
मग मनाचं दुखणं खुपणंही.
त्यावरची औषधं अनेक.
मनाला न पटणारी
म्हणूनच निरुपयोगी.
मनाच्या तऱ्हा आणि कळा
त्यांचा तेच अर्थ लावणारे
असं वाग असं वागू नको
म्हणून त्यांच्या नियमात घुसवणारे.
सगळे एका रेषेत चाललेत
त्यांचा प्रवास होईलही उत्तम.
पण आकाशात विखुरलेत
काही ढग अस्ताव्यस्त
मनाला चोखाळायचीय त्यांची वाट.
जरी आहे ती खडतर दाट.
नाहीतर मग नुसतंच पसरायचं
रोडावलेल्या समुद्रासारखे.
दुरवरल्या दिपस्तंभांकडे नजर लावून.
काहीही करायचंय.
कसंही करायचंय.
कुणी काही सांगावं का?
तुमचं वेगळं आमचं वेगळं
हे त्यांना पटावं न का?
तुमच्या नियमात आम्ही नाही बसत.
- Read more about वेगळी
- 3 comments
- Log in or register to post comments
- 4153 views
नागार्जुन यांच्या तीन कविता
१. मी मिलिट्रीचा म्हातारा घोडा
मी मिलिट्रीचा म्हातारा घोडा
ते माझा लिलाव करतील
मला घेऊन जाईल
एखादा चतुर टांगेवाला
डोळ्यांवर रंगीत झापडे चढवील
आणि म्हणत राहील
पुढे चल बेटा
सरळ चल...
सरळ.....
२. हे जे एन यू
नवयुवक नवयुवतींच्या
मनमोकळ्या खेळांचे प्रांगण
हे जे एन यू
मी खरं ते सांगून टाकू का ?
ही अतिशय चांगली जागा आहे
फारच चांगली
अजून काय म्हणू
मी विचार करतोय की मीही प्रवेश घेऊनच टाकतो
'तिबेटीयन' निवडायला कुणी कशाला आक्षेप घेईल
डॉ़क्टर बिमला प्रसाद
डॉक्टर नामवर
डोक्टर मुजीब
मला रेकमेंड करतीलच
- Read more about नागार्जुन यांच्या तीन कविता
- 6 comments
- Log in or register to post comments
- 5767 views
भर दे झोली ..!!!!
भर दे झोली ..!!!!
परवाच बारावीची परीक्षा संपली आणि माझे दोन पुतणे माझ्यासोबत नाशिकहून मुंबईला आले . कधी एकदा पेपर टाकतो आणि मुंबई गाठतो ती त्यांची अवस्था दहावीची आणि आत्ता कालची सुद्धा. मागच्या वेळी पुरे आठ दिवस राहिले दोघे , यावेळी मात्र C E T चे जोखड असल्याने तीन दिवसात परत .
- Read more about भर दे झोली ..!!!!
- 4 comments
- Log in or register to post comments
- 6526 views
धुकं......... (१)
धुकं
आता फक्त एवढंच कर
उचलून घे पापण्या अलगद
येऊ दे हलकी तिरीप प्रकाशाची
तेवढ्याच त्या दोन झरोक्यातून .
आणि त्या चिमटीभर उबेने
विरघळेल बघ
दाटलेलं धुकं
तुझ्या माझ्यातलं .
ज्या धुक्यालाच
अजाणतेपणी
समजत होतीस
अंतर तुझ्या माझ्यातलं .
मग कर ना बस एवढंच आता
उचलून घे पापण्या
एवढ्याशाच का होईना .
आणि टाक विरघळवून
सारचं सारं ...तुझ्या माझ्यातलं ..!!!
- Read more about धुकं......... (१)
- 11 comments
- Log in or register to post comments
- 6165 views
'देऊळ' चित्रपटाचं सामाजिक अंगानं केलेलं विश्लेषण (स्रोत: म.टा.)
आजच्या 'महाराष्ट्र टाईम्स' मध्ये 'देऊळ' या गाजलेल्या आणि पारितोषिकप्राप्त सिनेमाविषयी एक रोचक लेख आलेला आहे. टाटा समाजविज्ञान संस्था,मुंबई ('टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस') इथे काम करणाऱ्या माधुरी एम्. दीक्षित यांनी 'ऱ्हासाच्या चिंतेचं देऊळ' या लेखात 'देऊळ'मध्ये त्यांना जाणवलेल्या छुप्या जातीयतेविषयी काही चिकित्सा केली आहे. 'ऐसी अक्षरे'करांचा या चिकित्सेविषयीचा अभिप्राय जाणून घ्यायला आवडेल.
लेखाचा दुवा: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12482985.cms
- Read more about 'देऊळ' चित्रपटाचं सामाजिक अंगानं केलेलं विश्लेषण (स्रोत: म.टा.)
- 13 comments
- Log in or register to post comments
- 8945 views
गुलाबी सिर- द पिंक हेडेड डक
'गुलाबी सिर- दी पिंक हेडेड डक' या संतोष शिंत्रेच्या पहिल्या कथासंग्रहाच्या 'ब्लर्ब' मध्ये म्हटलेलं आहे, 'नव्या शतकाच्या पहिल्या अकरा वर्षांमध्ये लिहिलेल्या या कथा. माणसाचं व्यक्तिगत आणि सामूहिक आयुष्य कधी उजळून, कधी झाकोळून तर कधी भोवंडून, चक्रावून टाकणारी ही वर्षं. माध्यमं, तंत्रज्ञान, संधी, आव्हानं, मूल्यं, माणुसकी, परस्परसंबंध, शोषण, सामाजिक वास्तव... सगळंच ढवळून काढणारी वर्षं. सोबतीला निसर्गाच्या सतत होणार्या र्हासाची गिरमिटयुक्त जाणीव. पण कुठेतरी, आशेची एक न संपणारी लकेरही.
- Read more about गुलाबी सिर- द पिंक हेडेड डक
- 21 comments
- Log in or register to post comments
- 28278 views