मुक्तीद्वार
भगव्या देहाचे मुक्तीद्वार
पाठीवर घेऊन
तो चढत जातो
पहाडी वाट
जाणिव नेणिवेच्या
अनुभुतीची बीजं
विखरुन देत वाटेवर
जात पंथ
धर्म वर्ण
रंग लिंगांतुन
मुक्त होण्यासाठी
स्वताला निर्विकाराने
भारण्यासाठी
पहाडाच्या टोकावर
तो वाट पहातो
मुक्तीद्वार उघडण्याची
बघ मी समाजमितीच्या
सगळ्या संकल्पना
सोडुन आलोय
आदिम होऊन आलोय
तरी ते उघडत नाही
मग देतो ढकलुन
निमिषार्धात
पहाडाच्या टोकावरुन
गडगडत
धडधडत
ते पायथ्याशी येतं
तितक्यात कुठुनसं
भयशुन्य फुलपाखराचं
अस्तित्व लहरत येतं
आणि त्यामागे
कुतुहलाचे पाय घेऊन
एक लुतभरलं कुत्रं
स्वताचं आत्मभान
द्विधा करणारी
खाज विसरुन
- Read more about मुक्तीद्वार
- 9 comments
- Log in or register to post comments
- 10007 views
खासगी आयुष्यात सरकारी हस्तक्षेप?
Taxonomy upgrade extras
महाराष्ट्र टाईम्समधली ही बातमी वाचनात आली.
बातमीनुसार, ‘ गे सेक्स ’ ( पुरुषांमधील समलिंगी संबंध) वैध ठरविण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला केंद्रीय गृह मंत्रालयाने आज लेखी विरोध करण्यात आला. (हे मटाचं मराठी आहे. त्याबद्दल हवं तर वेगळी चर्चा करू.)
समलिंगी संबंध अनधिकृत असतात असं सरकारचं म्हणणं आहे. त्याशिवाय जगातल्या इतर देशांच्या तुलनेत भारतातील नैतिक आणि सामाजिक मूल्ये वेगवेगळी आहेत, असंही गृहमंत्रालयाचं म्हणणं आहे. यासंदर्भात मला काही प्रश्न आहेत.
- Read more about खासगी आयुष्यात सरकारी हस्तक्षेप?
- 53 comments
- Log in or register to post comments
- 57197 views
महाविजेता कोण?
व्यवसायातील प्रगतीसाठी नाविन्य व सर्जकता यांची गरज...
- Read more about महाविजेता कोण?
- 3 comments
- Log in or register to post comments
- 7312 views
एन आर आय मराठी लोक
Taxonomy upgrade extras
माझ्या मैत्रिनिने मला या साइतचा पत्ता दिला म्हणून मी इथे आले. सुरवातीला मराठि लिहिण्याच्या प्रयत्न केला पण जमले नाहि. हळुहळु शिकेन असे वाटते.
मी गेली काही वर्शे अमेरिकेत रहाते. या साइतवर ज्या प्रकारची चर्चा वाचन वगेरे गोष्टिन्वर केली जाते ते पाहुन आनन्द झाला. इथल्या चर्चेमुळे नवी पुस्तके कळली.
- Read more about एन आर आय मराठी लोक
- 43 comments
- Log in or register to post comments
- 40682 views
आर्ट ऑफ लिव्हिंग!!
(मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात लिहलेल्या या लेखाने नागपूरच्या 'आर्ट ऑफ लिव्हींग' च्या भक्तजनांना थोडे दुःख झाले होते. शिवाय ईतर बाबा-महाराजांचे भक्तही माझ्यावर थोडे रागावलेच होते. तोच लेख आता परत चर्चेस टाकतो आहे.)
....
- Read more about आर्ट ऑफ लिव्हिंग!!
- 14 comments
- Log in or register to post comments
- 14074 views
दुरवरल्या गावाकडची आठवण
उदास संध्याकाळी असल्या; त्या उजाड डोंगररांगा पाहून
दुरवरल्या गावाकडची आठवण मनात येते राहून राहून
शेणगोठा कचरा काढून झाडून साफ केले घर ते
आईची ती घांदल गडबड मजला येथूनी दिसते
कपीला चांदी गाय गरीब चारा खात असते
मायेचा स्पर्श होताच दुधामध्ये प्रेम उतरते
त्याच वेळचे ते निरसे दुध मी टाकतसे पिवून
दुरवरल्या गावाकडची आठवण मनात येते राहून राहून
धाब्याचे घर पाटाईचे; त्यात झोका बांधलेला
लहान भाऊ त्या झोळीत असे झोपलेला
आठवतो तो परवचा झोका देता देता म्हटलेला
आठवतो तो अभ्यास अजूनही घोकंपट्टी केलेला
- Read more about दुरवरल्या गावाकडची आठवण
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2695 views
नेमेचि येतो. . %@#!
सकाळी दचकून जाग आली तर मी कुठे आहे ते पहिल्यांदा लक्षात येईना.
मी गादीवरुन उठून चौरंगासमोर कधी येऊन बसले, माझ्यासमोर कॉन्स्टिट्यूशनचा ठोकळा का आहे, काहीच कळेना. मी अजूनही बेडरुममध्ये झोपलेय, त्या झोपेतल्या स्वप्नात मी चौरंगासमोर अभ्यास करते आहे, आणि मग त्या स्वप्नातल्या मला कॉन्स्टिट्युशन वाचता वाचता झोप लागलिये असं वाटायला लागलं. मग स्वप्नातल्या झोपेत तरी नीट झोपूयात म्हणून पुन्हा बेडरुममध्ये जाऊन झोपले.
सकाळी जाग आली तीच आठ्या भरलेल्या कपाळाने आणि दिवसातला पहिला विचार,"बोर बोर झालंय!"
- Read more about नेमेचि येतो. . %@#!
- 36 comments
- Log in or register to post comments
- 27742 views
फ्यूनरल ब्लूज - डब्ल्यू. एच. ऑडेन
२१ फेब्रुवारी हा डब्ल्यू. एच. ऑडेन या कवीचा जन्मदिवस. त्या निमित्तानं त्याच्या 'फ्यूनरल ब्लूज' या कवितेचं मी केलेलं भाषांतर इथे देत आहे. मूळ कविता इथे वाचता येईल.
- Read more about फ्यूनरल ब्लूज - डब्ल्यू. एच. ऑडेन
- 20 comments
- Log in or register to post comments
- 15858 views
हे कविते ,
हे कविते ,
तुझ्यासाठी वेडे होण्यातही
किती शहाणपणा आहे ,
हे ह्या शहाण्या टीकाकारांना सांगणे-
हा शुद्ध वेडेपणाच नाही काय !
- Read more about हे कविते ,
- 5 comments
- Log in or register to post comments
- 4471 views
"गावाकडची अमेरिका"
डॉ. संजीव चौबळ यांचं "गावाकडची अमेरिका" हे पुस्तक माझ्या हाती लागलं आणि दोनशे-सव्वादोनशे पानी असलेलं हे पुस्तक पटकन् वाचून झालंसुद्धा. अमेरिकेतल्या मराठी जीवनाची चित्रणे करणार्या कथा/कादंबर्या/प्रवासवर्णने (आता यात दैनिक सकाळ मधल्या मुक्तपीठ सदरातलं लिखाणही आलंच!) , "फॉर हिअर ऑर टू गो?" सारखी इमिग्रंट-स्टडी ची पुस्तकं आता मराठीमधे रुळली आहेत. या सर्व पुस्तकांचा कमी अधिक फरकाने दृष्टिक्षेप हा, अमेरिकेत येऊन राहिलेल्या मराठी लोकांवर आहे. त्यांमधली अमेरिकेची वर्णने येतात ती इमिग्रंटस् च्या संदर्भातली असतात.
- Read more about "गावाकडची अमेरिका"
- 32 comments
- Log in or register to post comments
- 29527 views