Skip to main content

मी कोण आहे?

तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला? तुम्ही स्वतःहून सांगितल्याशिवाय कसे बुवा कळणार तुम्ही कोण ते, नाही का? अगदी बरोबर आहे. आणि तसे हा प्रश्न अध्यात्मिक किंवा तात्विक दृष्ट्या विचारलेला नाही, तर सरळ सरळ व्यावहारिक आहे. जरा विचार करा. आजकालच्या जगात आपण आपल्या बद्दलच्या विविध गोष्टींची महिती आपण चकटफू सगळीकडे नकळत देत असतो. तुम्ही म्हणल ते कसे? आपण मोबाईल वापरतो, संगणक वापरतो, विविध प्रकारे हि दोन्ही यंत्रे वापरून आपण आपल्या अनेक जीवनावश्यक तसेच इतर गोष्टी आपण करत असतो. त्याद्वारे स्वतःबद्दलच्या माहितीचे अनेक पैलूचे ठसे आपण सोडत असतो. पटते ना?

ललित लेखनाचा प्रकार

माजी पईली बायकु - भाग तिसरा -३

तिच्या चाचा कोप थंडगार जालेला आन माज्या कोपावर माशा गुं गूं कराय लाग्ल्या. ही इतका येळ कुटे गेली काय पत्ता लागना. मी हुटलो आन अंग्नात आलो. शवचालयचं दार उगडच व्हतं. आत यिऊन बाद्रुम पायली त ते बी उगडं. सर्वे घरबर फीरून पायलं पन चंदीचा पत्ताच नाय. घरात मी येकलाच. बा आन आय गावाकड. थोर्ला भाव लातुरात, धाकला परबनीत. बईन आन बावजी हुस्मानाबाद मंदी. चंदीला फॉन करु म्हून मोबील घियाला बेद्रुम मंदी ग्येलो. टेबलावं मोबिल दिसला न्हाई. रोज रातच्याला मोबिल टेबलावं त ठिवत हुतो. लई भारी मोबिल हाय सामसुनचा, म्हंजी हाट जीबी राम, येकशे हट्टावीस जीबी मीम्री आन साडीसा ईंच सक्रीन. साडीसा ईंच.......

रामायण व महाभारत - भाग ४

Taxonomy upgrade extras

रामायण व महाभारत या दोन गोष्टींतून तत्कालीन समाजाचे काय प्रकारचे चित्र दिसते?

माजी पईली बायकु - भाग २

सकालच्याला जाग आली तवा उन कासराभर वर आलेलं. मी पांघरून बाजुला फेकला आन हुटलो. आज घरात कुनीच नव्हतं. चंदी चा बनवत आसल म्हून मी कीचान मदी ग्येलो त कुटं काय. त्वालेतला बसली आसल आसा इचार क्येला आन मंग मी ग्यास पेटीवला आन चाचं आदन ठिवलं. बायकुला सर्पराइज दावू मंजी येकाद मुका घेती का देती त्ये पघु असा इचार केला आन गरम पान्यात साकर आन चाची पौडर टाकली. अवं सर्प-राइज म्हंजी साप हुबा रातो आसं नव्हं, उगा गेर समजुत करून घिऊ नगा. चा उकल्ला तवा त्यामदी दुद वतलं आन मग दोन कपात गाललं. टेबलावं ठीउन चंदीची वाट पाऊ लाग्लो. माजा चा पिऊन जाला तरी बी चंदी येयना.

ललित लेखनाचा प्रकार

माजी पईली बायकु-१

कदी कागुद कमी पडला त कदी पेनातली श्याई वालून ग्येली माज्या जिंदगानीची इष्टोरी लिवताना. या इष्टोरी मदलं "माजी पईली बायकु" नाव असल्यालं पर्करन हाये ते लिवतो. मनापर्मान बायकु भेटाय लई बाग्य लागतं राजे हो. गावाकड येक जोतीस व्हता त्याला माजा जनम कागुद दावला न इचारलं की बाबा रे मला बायकु कशी भेटल? त्यो म्हनला तू लई नसीब काडनार हायेस. येक सोडून दोन मिळत्याल पन येकीची बी ग्यारंती नाय. मी त्येला बोल्लो तुज्या थोतरीत देवू का येक? त्यो म्हनला माज्या थोतरीत मारसील पन नसीबाच्या थोतरीत? कसं जगायचं आसा प्रस्न हुबा राईल तवा कोनला माराया जासील?

ललित लेखनाचा प्रकार

रामायण व महाभारत - भाग ३

Taxonomy upgrade extras

रामायण व महाभारतातील काही पात्रे - काही प्रमुख, काही कमी महत्त्वाची, काही दुर्दैवी, काही सुदैवी.

चीनच्या अर्थव्यवस्थेत काय गडबड आहे?

Taxonomy upgrade extras

ह्या लेखात चीनसमोर असणाऱ्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीसंबंधातली आकडेवारी आणि त्यामागची कारणमीमांसा मांडण्याचा प्रयत्न आहे.

नाही म्हणजे नाही.

"मी निघते गं मावशी, रेश्मा आली की तिला तो कॅटलॉग आठवणीने दे.. मग ती तो तिच्या मैत्रिणींना दाखवेल."
सोफ्यावरून उठत वसुधा म्हणाली.
"अगं थांब की जरा, इतकी उन्हाची कुठे जातेस? थोडा चहा घेऊन जा, छान आले घालून करते .. माझी चहाची वेळ झालीच आहे." मावशी स्वयंपाकघराकडे जाताना म्हणाल्या.

ललित लेखनाचा प्रकार

चांदणचुरा

आमच्या घराचा मालक शेतकरी होता. आम्ही भाडेकरू. पोनाप्पा असे मालकाचे नाव होते. त्याची बायको स्मिथा. तिला आम्ही मितवा म्हणायचो कारण आम्हाला स्मिथाव्वा असा उच्चार करायला जड जायचं. मितवाला एक मुलगी होती छाया नावाची आणि मुलाचे नाव रोहन. त्याकाळचे त्यांचे घर म्हणजे फार्म हाऊस. प्रचंड मोठे शेत होते. गुरेढोरे, बकऱ्या, दोन कुत्री, एक मांजर असा त्याचा मोठा परिवार होता. दोन गायी होत्या त्यांची नावे लक्ष्मी आणि इंद्राक्षी. " भाग्यद लक्ष्मी बारम्मा, भाग्यद इंदी बारम्मा ", असं म्हणत मितवा त्यांना चारा भरवायची.

ललित लेखनाचा प्रकार