Skip to main content

कुंपण

चांदणठिणग्यांचे नभझुंबर
पहाटफुटणीत विझता विझता
शब्द गवसले- त्यांची पडझड
बघत राहिलो दिवस उगवता

शब्दाशब्दामधुनी वाटले-
येईल काही अमोघ उसळत
पण निष्प्रभ अर्थाचा खुर्दा
आला हाती.. बसलो मोजत

साखरझोपेच्या काठावर
शब्द भासले होते ओतीव
धग दिवसाची सोसून कळले
ते ही निपजले पोकळ, निर्जीव

लख्ख समजले पुन्हा यापुढे
भ्रमनिरास ना होऊ देणे
ओलांडून शब्दांचे कुंपण
अर्थनिरर्थापल्याड जाणे

जुन्या खाटिकखान्यात शेक्सपीयर, हाईनर म्युलर, हॅम्लेट आणि कंपनी (मुक्तशब्द मासिकात पूर्वप्रकाशित !)

हॅम्लेट हे एक निमित्त! हॅम्लेटच्या निमित्ताने मला पुण्यातल्या,भारतातल्या आणि गेली काही वर्षे माझ्या नाट्यानुभवविश्वात असलेल्या युरोपियन, पोलिश नाटकाकडे पाहता येईल;त्यातल्या काही गोष्टी सांगता येतील आणि नाटकाच्या आजूबाजूने काही बोलता येईल असं वाटल्याने हा लेखप्रपंच!

ललित लेखनाचा प्रकार

सिंधुआज्जी आणि नीरव कोलाहल

सिंधुआज्जींनी तरस बल्बाकडे अंमळ रागानेच पाहिले. तो कितीही लाडका असला तरी काय, पाहुण्यांसाठी आणलेला खिमा फस्त करणं ही त्याची चूकच होती. त्यात भर म्हणजे, सेरेंगेतीमध्ये झेब्र्याच्या कवट्या कच्च्याच चघळणाऱ्या तरसांचा पाईक असलेल्या तरस बल्बाने खिमा मात्र सिंधुआज्जींनी साग्रसंगीत बनवल्यावर खाल्ला होता. सबब, सिंधुआज्जींचे श्रमदेखील व्यर्थ गेले होते.

तरस बल्बाला समज द्यावी म्हणून घसा खाकरणार एवढ्यात सिंधुआज्जींना आठवलं - आज त्यांचं मौनव्रत होतं!

एवढ्याशा अडचणीला शरण जातील एवढ्या लेच्यापेच्या नाहीत सिंधुआज्जी! त्यांनी ब्रिटिश साईन लँग्वेजमध्ये तरस बल्बाची खरडपट्टी सुरू केली.

ललित लेखनाचा प्रकार

सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ नावाचा अंडरडॉग

त्या दिवशी अवचित एक थोडी विंडो मिळाली रविवारी रात्री.

"आत्मपॅम्फ्लेट" बघायचा का "सजनी..." असं चाललं होतं.

बघायचेत तर दोन्ही.

पण जगण्याची तारांबळ, इ एम आय, अप्रेझल रेटींग, कुटुंबातल्या कुरबुरी, चाळिशीपारच्या तब्येतीच्या तक्रारी अशा मोठ मोठ्या भूतांशी लढताना "वेळ" ही फर्स्ट वर्ल्ड कमोडिटी होऊन जाते आणि काही सारख्याच वजनाच्या नितांत रेकमेन्डेड गोष्टींसाठी सोफी'ज चॉईस वापरावाच लागतो.

तर सजनी जिंकला कारण दिग्दर्शक मिखिलची प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी त्याची आई मुसळे काकू ह्या आमच्या शेजारी.

(भारी गोड कुटुंब!!!)

समीक्षेचा विषय निवडा

जाणीव भान भाग - 5

मेंदूतील क्रिया – प्रक्रियांचे निरीक्षण

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

प्रभाकरन्.

माझी डायरी
दि. २२/५/२००६

प्रभाकरन्:

व्हॉट अ जीपीएम्! डिपार्टमेंट कायम ओव्हरहेडेड. २० वर्षांचा अनुभव आहे म्हणतात. वय ५०.त्याचे सर्व जुने सहकारी इतर कंपन्यांमध्ये जवळ जवळ सीईओ झालेले आहेत पण हा अजूनही इथे त्याच पदावर आहे. लाईक अ बँक क्लर्क. एकाच ठिकाणी बसून राहणारा, आव्हाने नकोत. ओह, बट ही स्पीक्स फ्ल्युएंट इंग्लिश. टिपिकल दक्षिण भारत. दर सोमवारी टाय घालतो. त्याच्या हाताखाली किती लोकं काम करत असतील? मी, विजया, संजाना, नागेश आणि विनय. सिर्फ पांच.

मराठा आरक्षण आणि वास्तव

स्वातंत्र्यापूर्वी, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि १९९० नंतर खूप महत्वाची स्थित्यंतरे महाराष्ट्रात झाली. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय उलथापालथ झाली या तीनही कालखंडात. त्याचे परिणाम समाजातील सगळ्याच जातीपातीच्या लोकांना भोगावे लागले. सध्या आपण महाराष्ट्रातील मराठा समाजाचा विचार करु. मराठा समाज कधीकाळी शेकडो, हजारो एकर जमीनींचा मालक होता. सरंजामशाही, संस्थानिकं, वतनदारी, जहागिरदारी इतकं सगळं या समाजाला लाभलेलं होतं.

बस्स तुझं असणं..........

तु कोण, काय, तुझं गावं कोणतं, तुझं येणं कुठलं हे काहीच माझ्यासाठी महत्त्वाचं नव्हतं... नाहियेय...तुझं माझ्या आयुष्यात असणचं माझ्यासाठी बहारदार होतं वसंतातल्या लालट गुलमोहरासारखं......मला टवटवीत करणार.....तसं म्हटलं तर आपली ओळख दोन वर्षांपूर्वीची आणि म्हटलं तर जन्माजन्माची म्हणूनच तर हा अनुरागी बंध जुळला ना !  जो आजच्या क्षणापर्यंत कायम आहे....मनाच्या कप्प्यात.

ललित लेखनाचा प्रकार