२०१४ चा आशावादी आढावा !!
येत्या वर्षात -
रस्त्यावरच्या खड्ड्यांत
भ्रष्टाचार पाय घसरून पडावा
सच्चाईच्या डांबराने
त्याला तेथेच कायमचा गाडावा
भारताचा उज्ज्वल इतिहास
पुन्हा पुन्हा घडावा
भारताचा दुश्मन
धाय मोकलून रडावा
मनाच्या अंगणात आशादायी स्वप्नांचा
सुमंगल सडा पडावा
नववर्षाच्या शुभेच्छा !!
प्रतिक्रिया
सुंदर!!!
सुंदर!!!
का कोण जणे पण -
>> भारताचा दुश्मन धाय मोकलून रडावा>> फार आवडले. खूप!!!
शीर्षकातच आशावाद म्हटल्यावर
शीर्षकातच आशावाद म्हटल्यावर आमचं बोलणंच खुंटलं.
असो.
नववर्षाच्या तुम्हाला आणि समस्त ऐसीकरांना शुभेच्छा!
"आढावा" वर्ष संपताना घेतात
"आढावा" वर्ष संपताना घेतात ना?
आशावाद छान आहे
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
आढावा शब्दातच आशावादाची
आढावा शब्दातच आशावादाची उत्कटता सामावली आहे हो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
कोणीतरी नवीन वर्षाच्या
कोणीतरी नवीन वर्षाच्या संकल्पांवर धागा काढा. सगळ्यांचे संकल्प ऐकायचे आहेत.
शेळ्यांवर बसून उंट काय
शेळ्यांवर बसून उंट काय हाकताय? काढा ना धागा. पट्टारुंदी जाळा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
???
ते पोज़िशनिंग जरासे चुकले काय हो मालक?
धन्यवाद ! आपणा सर्वांना ....
नववर्षाच्या शुभेच्छा !!!
माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-निमिश्किल
https://nimishexpress.blogspot.com/
धन्यवाद! आणि आपल्याला...
...वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
.
.
शंका
|
|
|
भ्रष्टाचार का होईना, पण रस्त्यावरच्या खड्ड्यात पुन्हापुन्हा पडण्याकरिता रस्त्यावरचे खड्डे कायम नकोत काय? किंवा, त्यांना डांबराने बुजवायचे म्हटले, तर नवनवीन खड्डे पुन्हापुन्हा पाडायला नकोत काय?
एकदा गाडला की झालं की वो.
एकदा गाडला की झालं की वो. बादमे ना रहेगा बास ना बजेगी बासुरी
तेच म्हणतोय तर...
...हे महाशय "पुन्हा पुन्हा"ची गोष्ट करून राहिलेत!
म्हणजे पुन्हा पुन्हा च्या
म्हणजे पुन्हा पुन्हा च्या वरच्या ओळी पूर्ण इतिहासात तुम्ही सामील केल्या आहेत तर
वोक्के.
त्या न्यायाने,
भारताचा दुश्मन
धाय मोकलून रडावा
.
.
.
.
मनाच्या अंगणात आशादायी स्वप्नांचा
सुमंगल सडा पडावा
शत्रूच्या अश्रूंचा सडा पडावा अशी इच्छा ते करताहेत असे म्हणले तर बरोबर होईल
कवितेतील ही नवी बाजू आपल्या लक्षात आलेली नाही हे नम्रपणे नमूद करु इच्छिते