ऐसीअक्षरेवर श्रेणी देण्याची सुविधा सर्वांनाच असली पाहिजे का?

प्रतिक्रिया

अहो संस्थळ व्यवस्थापकांना जरा वेळ तर द्या, आधी सदस्यांच्या ओळखी तर नीट होउ द्यात. कशाला उगाच आज लग्न तर उद्या मूल अशी गत करताय.

------------------------
घणघणतो घंटानाद

१२० च्या स्पीडने पुलावरुन गाड्या निघाल्या..अजुन किति वेळ हवा?

त्या पुलाची किमान मर्यादा ५०० ची आहे ना पण.

------------------------
घणघणतो घंटानाद

>

तुम्हाला वाटतंय नेमकं ह्याच क्रमाने हे घडतंय? मला तर हे वाचून http://www.aisiakshare.com/node/40 इथे हा क्रम उलटा आहे की काय असं वाटलं होतं.

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

चिल्लर, हा धागा जरा नीट वाचाल का? त्यात हे वाक्य आहे "८. अधिकाधिक सदस्यांना त्यांचे पुण्य पाहून सहसंपादक बनवण्यात येईल."

अजून आम्हीच हे नीट शिकतो आहोत म्हणून थोडक्या लोकांना सहसंपादक बनवले आहे. हे सर्व नीट चालतं आहे, उपयुक्त आहे याची खात्री पटली की "अधिकाधिक सदस्यांना त्यांचे पुण्य पाहून सहसंपादक बनवण्यात येईल". फक्त दोन दिवस झाले नाहीत संस्थळाचं अधिकृत उद्घाटन करून; शिकायला वेळ लागतो. तेव्हा थांबा; धीर धरा.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

संपादक कुणालाही बनवा! त्याविशयी मी काही बोललोच नाही. वाटल्यास काही लोकांना पुढ पुढ करायची आवड असते त्यन्ना प्राधान्य द्या. पण प्रतिसादावर मत नोंदवण्याचा अधिकार सर्वाना सारखा असावा,.

तुम्ही तो धागा वाचा हो एकदा. सहसंपादक वेगळे आणि कचरा उचलणारे वेगळे. सहसंपादक म्हणजे तेच ज्यांना श्रेणी देता येते.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा हा, नेमके.
लईच उतावीळ बघा....अन येवढी कस्ली कम्पुची भिती बाळगता?
तुम्च एकदा बौद्धिकच घेतल पाहिजे चान्गल! Blum 3

माझ्या मते श्रेणी देण्याचा अधिकार सर्व सदस्यांना असावा. अन्यथा आमच्या लेखनाला श्रेणी देणारे हे कोण टिकोजीराव? असा समज सदस्यांमधे निर्माण होऊ शकतो. मी होय ला मत दिले आहे.

तुम्ही चिल्लर, ते टिकोजीराव. सिंपल. Smile

आणि तुम्ही कमीशनवर का?

कौलातले पर्याय अपुरे वाटले. त्यात

३. सर्वांनाच नको. त्यापेक्षा संस्थळावर नियमितपणे सकारात्मक व संस्थळाच्या अंतिम ध्येयाशी सुसंगत योगदान देणाऱ्यांना सुविधा हवी.

हा पर्याय हवा होता. मला वाटतं तो असता तर त्यालाच बहुमत मिळालं असतं.

म्हणजे ज्यांना हा अधिकार नाही ते सगळे उपद्रवी आहेत का?

मी सुद्धा 'सर्वांनाच नको' ह्या मताचा आहे. श्रेणी, कर्म, पुण्य ह्या सगळ्या सध्यातरी गोंधळात टाकणार्‍या गोष्टी वाटताहेत. काही प्रश्न आहेत.

१. जर एखाद्याला वरचे वर निगेटिव श्रेणी मिळत गेली तर त्या सदस्याचे खाते निलंबीत किंवा रद्द केले जाते/जाईल का?
२. जर एखाद्याने लेख न लिहिता फक्त प्रतिसाद दिलेत, आणि त्याला कोणीच श्रेणी दिली नाही तर त्याचं कर्म कसं वाढतं, किंवा कधी कमी होतं.
३. जर एखाद्याने एकोळी धागे काढत राहीले तर त्याचा कर्म, आणि पुण्यावर कसा परिणाम होतो? एकोळी धागे काढण्याबाबत काही धोरण आहे का?
४. कर्म आणि सध्याचे कर्ममूल्य यामधे फरक काय?
५. कर्म वाढलं की तुमची प्रतिसाद देतानाची डिफॉल्ट श्रेणी वाढते (म्हणे), त्याचा फायदा काय?
६. एखाद्याने खोडसाळपणे कुणाला निगेटिव श्रेणी दिली तर ती कशी मॉनीटर केली जाईल, आणि अफेक्टेड सद्स्याचे कर्म/पुण्य कसे पुर्ववत होईल?

एकंदरीत श्रेणी, कर्म, पुण्य ह्या तिन्ही गोष्टीं कश्या ऑपरेट होतात ह्याचा खुलासा झालेला नाही. मान्य की संस्थळ नवीन आहे, पण ह्या गोष्टींचा खुलासा लवकर झाला तर बरे.

-अनामिक

४. कर्म आणि सध्याचे कर्ममूल्य यामधे फरक काय?

कर्ममूल्य हे तुमच्या प्रतिसादांचे 'सरासरी गुणांकन' आणि 'कर्म' ('मौजमजा' सोडून काढलेले धागे) यावर ठरत असावे असा अंदाज आहे. नेमके काय सूत्र वापरून कर्ममूल्य ठरते याची कल्पना नाही.

माझं वाचन आणि अभ्यास पूर्ण झाला की हे नीट लिहून काढतेच.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खरंच लिहून काढ, म्हणजे माझ्या सारख्या नवसदस्याला सहज कलेल. वेळ लागला तरी चालेल, पण हे कसं चालतं ते कळायला हवं.

-अनामिक

मधल्या काळात असलेल्या बर्‍याच तांत्रिक त्रुटी आता दूर झाल्यामुळे मला आता मला वाचनासाठी थोडा वेळ मिळेल. सगळेच नव-वापरकर्ते असल्यामुळे श्रेणींचं गुणदान कसं होतं तेही नीट लिहून काढते. म्हणजे सर्वांनाच त्याचा फायदा होईल.

इथे सगळेच नवसदस्य रे, तू काय आणि मी काय! Smile

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गुरुवार, 27/10/2011 - 15:02 | होय

अदितीतै, मला श्रेणी देण्याचा अधिकार आहे म्हणजे मी तुमच्या कंपुत आहे आणि तुम्हाला माझा अंदाजही बरोबर वाटतो. तुम्ही मला 'माहितीपूर्ण' ही श्रेणी न दिल्याबद्दल मी निषेध नोंदवत आहे.

कर्म संपलं हो माझं, आता तुम्ही मला श्रेणी द्या. म्हणजे मग मी तुम्हाला श्रेणी देईन.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>>> कर्म संपलं हो माझं, आता तुम्ही मला श्रेणी द्या. म्हणजे मग मी तुम्हाला श्रेणी देईन. जाम हसलो यावर, खदखदून हसलो! Smile पण ही सुविधा भारी आहे, थोडेफार पुढेमागे कमीजास्त होईल, पण तृटी काढल्या तर चान्गली चालेल.
(हसण्याचे कारण असे की एक कवि कविता ऐकवताना दुसर्‍या कविला म्हणतो की तु मला वाहव्वा कर मी तुला वाहव्वा करतो, तसे काहीसे वाटले Wink )

बहुमत वाले, सध्यातरी ६४% मते 'हो' ला आहेत. ऐकणार का सदस्यांचे?

धाग्यांना श्रेणी द्यायची सोय असती तर या धाग्याला निरर्थक अशे श्रेणी दिली असती. :चकल्सः

श्रेणी सुविधेबद्दल आधीच इतकं लिहलेलं असताना उगाच धागा काढल्यावर अजून काय करणार?

आणी हो, असे निरर्थक धागे नियमीत काढणार्‍यांना मात्र नक्कीच श्रेणी द्यायची सोय देऊ नये. Wink

सर्वांना प्रतिसादाची श्रेणी देण्यापेक्षा अशा निरर्थक धाग्यांना श्रेणी देऊन त्यांची बोळवण करायला हवी.

मलातरी हा धागा निरर्थक वाटत नाही. हं त्यातल्या 'कंपू' शब्दावर आ़क्षेप आहे. श्रेणी सुविधेबद्दल आधी लिहलेलं पुरेसं नाही असं वाटतयं. म्हणजे कसं की श्रेणी द्यायला सहसंपादक व्हावं लागतं. सहसंपादक व्हायला पुण्य कमवायचं; कसं तर लेख आणि प्रतिसाद देऊन! किती लेख आणि किती प्रतिसाद दिले म्हणजे कर्म/कर्ममुल्य संख्या बदलते? मी आतापर्यंत जे ४-६ प्रतिसाद तिलेत त्यावरुन तरी अजून माझ्या खात्यात बदल झालेला नाही. श्रेणी, कर्म, कर्ममुल्य, पुण्य ह्यावर पुरेसा खुलासा नसल्याने गोंधळात टाकणारं वाटतं.

श्रेणी देण्याची सुविधा असु देत किंवा नसू देत, मला व्यक्तीशः काही फरक पडत नाही. पण म्हणून ज्यांना ती सुविधा आहे त्यांनी त्याचा गैरवापर केला तर त्याचं मॉनीटरींग कसं होणार? (समुहाचा शहाणपणा टिकावा म्हणून संपादकांना सतत कार्यरत रहावे लागणार.)

अजून एक - श्रेणी किती गोंधळात टाकणार्‍या आहेत. एखाद्याला रोचक वाटलेला प्रतिसाद दुसर्‍याला खोडसाळ वाटणार नाही कशावरून? आणि लिहिणार्‍याचा तो लिहण्याचा उद्देश मार्मीक असेल तर? +१ आणि -१ सहज समजणार्‍या गोष्टी आहेत, पण त्या बरोबर खोडसाळ की भडकाऊ ही पुस्ती कशाला?

-अनामिक

अनामिक,

श्रेणींवर आणखी एक चर्चा सुरू आहे. तिथे आधीच असे प्रश्न लोकांनी मांडले आहेत. श्रेणीसुविधेविषयी प्रश्न किंवा अडचणी आहेत हे खरे पण हा कौल सर्वसाधारण नाही कारण योग्य हेतूने सुरू केलेल्या कौलात किमान

सर्वांना सुविधा द्यावी
काहीजणांना द्यावी
कोणालाच देऊ नये

असे निरुपद्रवी पर्याय असते. चिल्लर यांचे प्रतिसादही खोडसाळ वाटल्याने हा धागा मला निरर्थक वाटतो.

...चिल्लर यांचे प्रतिसादही खोडसाळ वाटल्याने हा धागा मला निरर्थक वाटतो.

आता सहमत आहे असे म्हणतो.

-अनामिक

सर्वांना सुविधा द्यावी
'होय' हा पर्याय त्यासाठीच आहे.

काहीजणांना द्यावी

दुसरा पर्याय काय वेगळा आहे? 'काहीजणांना'साठीच कंपू शब्द वापरला आहे.

कोणालाच देऊ नये
हा पर्याय निरर्थक आहे. कोणालाच द्यायची नसेल तर हवीच कशाला श्रेणींची भानगड?

श्रेणी देणारे संकेतस्थळचालकांचे बगलबच्चे आहेत. अन्यथा वरच्या प्रतिसादाला निरर्थक आणि खोडसाळ अशा दोन श्रेण्या मिळायला हव्या होत्या. असे असुनही माझ्या प्रतिसादांना निगेटीव्ह श्रेण्या दिल्या आहेत कारण मी अडचणीत आणणारे प्रश्न विचारत आहे.

>>श्रेणी किती गोंधळात टाकणार्‍या आहेत. एखाद्याला रोचक वाटलेला प्रतिसाद दुसर्‍याला खोडसाळ वाटणार नाही कशावरून? आणि लिहिणार्‍याचा तो लिहण्याचा उद्देश मार्मीक असेल तर? +१ आणि -१ सहज समजणार्‍या गोष्टी आहेत, पण त्या बरोबर खोडसाळ की भडकाऊ ही पुस्ती कशाला?

या विषयात तज्ज्ञ असण्याचा दावा नाही, तरीही माझ्या अल्पमतीनुसार याचं उत्तर देतो:
श्रेणी अनेक असल्या तरीही त्यांचं मूल्य +१/-१ आहे. यानं काय होतं, तर एखाद्या प्रतिसादाला एकंदर जितक्या श्रेणी मिळाल्या त्यांतल्या किती +१ होत्या आणि किती -१ होत्या यावरून प्रतिसादाची गोळाबेरीज श्रेणी ठरते. एखाद्याला प्रतिसाद खोडसाळ वाटला आणि दुसर्‍याला भडकाऊ वाटला तरीही दोन्हींचं मूल्य -१ असल्यामुळे गोळाबेरीज श्रेणी ऋण राहते. असंच सातत्यानं निरनिराळ्या पण धन श्रेणी मिळालेल्या प्रतिसादांचं होतं. याउलट एखाद्याला रोचक वाटलेला प्रतिसाद दुसर्‍याला खोडसाळ वाटला तर गोळाबेरीज श्रेणी ० येते. थोडक्यात, प्रतिसादाचं मूल्य धन किंवा ऋण दिशेनं जाण्यासाठी अनेकांकडून आणि सातत्यानं त्या दिशेची कोणतीतरी श्रेणी मिळाबी लागते. ज्याला जे मूल्य वाटेल ते त्यानं द्यावं. मतभिन्नता ही एक चांगली गोष्ट असते असं मानून वेगवेगळ्या श्रेणीदात्यांना आपापल्या वेगवेगळ्या मतांनुसार श्रेणी द्यायची सोय उपलब्ध विविध श्रेणींतून मिळते. अशा सर्व श्रेणीदात्यांची गोळाबेरीज श्रेणी वाचकांना दिसते.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे स्पष्ट आहे.

धाग्यातील आणि प्रतिसादातील भाषा पाहिली तर धाग्याचा उद्देश स्पष्ट आहे. धाग्यात श्रेणी विषयी अधिक माहिती करून घेण्याचा उद्देश नाही, हे सुद्धा स्पष्ट आहे. हे सगळं माहित असूनही मुद्दाम पहिला प्रतिसाद सौम्य दिला. (हाफिसात आहे ना! Wink )

माझी काही निरिक्षणं मांडतो..

जर एखाद्याने लेख न लिहिता फक्त प्रतिसाद दिलेत, आणि त्याला कोणीच श्रेणी दिली नाही तर त्याचं कर्म कसं वाढतं, किंवा कधी कमी होतं.

कर्म आणि प्रतिसादाचं डिफॉल्ट कर्म दोन वेगळे आहेत. कर्म बहुतेक, ग्लोबल असावं. प्रतिसादाचं कर्म प्रतिसादांना मिळालेल्या श्रेणीने बदलतं. वेळेनुसारही बदलतं. (समजा दोन चार दिवस माझ्या एकाही प्रतिसादाला चांगली श्रेणी मिळाली नाही तर ते कमी होतं)

जर एखाद्याने एकोळी धागे काढत राहीले तर त्याचा कर्म, आणि पुण्यावर कसा परिणाम होतो? एकोळी धागे काढण्याबाबत काही धोरण आहे का?

हे मॉड्युल्स इतके कस्टमाईज अजूनतरी केलेले नसावेत. धोरणं कर्माच्या मॉड्युलमध्ये इन्क्लूड केलेली नसावीत.

कर्म आणि सध्याचे कर्ममूल्य यामधे फरक काय?

२ चे उत्तर पहावे.

कर्म वाढलं की तुमची प्रतिसाद देतानाची डिफॉल्ट श्रेणी वाढते (म्हणे), त्याचा फायदा काय?

कर्म नाही, सद्ध्याचे कर्ममूल्य वाढल्यास वाढते. सद्ध्याचे कर्ममूल्यच डिफॉल्ट प्रतिसादाची श्रेणी. म्हणजे जर माझ्या प्रतिसादाला सातत्याने २ श्रेणी मिळत असेल तर माझं डिफॉल्ट दोन होतं. उलट सात्यताने ० श्रेणी मिळत असेल तर माझं डिफॉल्ट ० होतं. अशाने कोणी श्रेणी नं देताही तुमच्या धाग्याच्या व्हू श्रेणीप्रमाणे तुम्ही प्रतिसाद पाहू शकाल.

एखाद्याने खोडसाळपणे कुणाला निगेटिव श्रेणी दिली तर ती कशी मॉनीटर केली जाईल, आणि अफेक्टेड सद्स्याचे कर्म/पुण्य कसे पुर्ववत होईल?

प्रतिसादाला येणार्‍या एकूण श्रेणीप्रमाणे हे ठरेल. (देणार्‍याचं नाही, मिळणार्‍याचं) चिंजंनी म्हणल्याप्रमाणे.

एखाद्याला रोचक वाटलेला प्रतिसाद दुसर्‍याला खोडसाळ वाटणार नाही कशावरून?

सो बी इट. श्रेणींमधील फरक (मॉड्युलच्या उद्देशाने काय आहे हे मलाही माहित नाही)

थँक्स नाईल. बर्‍याच गोष्टी समजल्यात.

-अनामिक

चिल्लर यांनी एका प्रतिसादात म्हटले आहे की "मिपाशी भांडून वेगळे व्हायचे तर वेगळी चूल तरी नीट मांडा की." ...... ही असली अर्धवट ज्ञानावर बेतलेली मुक्ताफळे उधळणार्‍या लोकांच्या हाती श्रेणी जायची व्यवस्था येऊ नये. यांचा ट्रॅक पहाता, बरीचशी वक्तव्ये ही "खोडसाळ" च आहेत हे दिसते.

सर्वांना ही सुविधा नसावी तसेच काही जणांना तर नसावीच नसावी असे मत मांडते. पैकी ज्यांचे कर्ममूल्य निगेटीव्ह आहे (निगेटीव्ह वावर) त्यांना अजीबात ही व्यवस्था मिळू नये.

माझी मुक्ताफळे चुकीची आहेत का? ऐसीअक्षरे चालकांची मिपाशी भांडण नव्हते का झाले? कृपया जालिय अभ्यास वाढवा.

कंपू वगैरे शब्द वाचून तुम्ही सर्व श्रेणी देण्याची सुविधा असणार्‍या सदस्यांकडे संशयाने पाहत आहात असे दिसते.श्रेणी देण्याची सुविधा सुरूवातीला प्रत्येकाला असायला हवी असे माझे मत आहे. याचा अर्थ प्रत्येकाला नेहमीच श्रेणी देता यावी असा मात्र नाही. आधी असलेल्या सुविधेचा प्रत्येकजण कसा वापर करतो यावर किती गुणांकन देता यावे हे ठरवले जावे. या संकेतस्थळावर हा नवा प्रयत्न आहे आणि मूख्य म्हणजे याविषयीचे धोरण पारदर्शक आहे. प्रतिसाद उणे गुण मिळूनही कायम असतो. उडवला जात नाही. कोणाला ऊणे गूण पटले नाही तर काही किंमत मोजून (स्वतःचे पुण्य कमी करून) न्याय मिळावा (गूण धन व्हावे) म्हणून काही कृती करता येते.

सदस्यांमध्ये काही हायरार्की आहे हे सगळ्यांना दिसते म्हणून मला श्रेणी प्रकार व्यक्तिशः आवडत नसला तरी सामंजस्याने वापरल्यास 'श्रेणीव्यवस्था' कदाचित उपयुक्त ठरू शकेल, असे वाटते.

.श्रेणी देण्याची सुविधा सुरूवातीला प्रत्येकाला असायला हवी असे माझे मत आहे.

ह्यावर काहीही मत न नोंदवता माझ्यावर वैयक्तिक टिका करण्यात कंपूला रस दिसतो.

ह्यावर काहीही मत न नोंदवता माझ्यावर वैयक्तिक टिका करण्यात कंपूला रस दिसतो.

तुमच्यावर वैयक्तिक टिका केलेली मला दिसली नाही. तुमच्या मतांवर/लेखनावर टिका करणारे लोक कंपू करून वावरत नाहीत हे मला व्यवस्थित माहीत आहे. कृपया थोडासा धीर धरा, प्रवर्तकांना वेळ द्या, आधीच सर्वांना कंपु वगैरे दृष्टीकोनातून पाहू नका.

कोणता प्रतिसाद किती महत्वाचा वा रिलेवंट आहे हे तुम्ही कसे ठरविणार? भारतीय शास्त्रीय संगीतातलं मला कळत नाही. मी मारे भल्ता मोठ्ठा मॉडरेटर झालो साईटचा, काय उपयोग त्याचा?
मला तर या श्रेणींची गरज काय तेच समजत नाहीये.
पण असो. या नव्या घराचे ते नियम अस्तील तर तसे. काय फरक पडतो त्याने?..

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

रतीय शास्त्रीय संगीतातलं मला कळत नाही. मी मारे भल्ता मोठ्ठा मॉडरेटर झालो साईटचा, काय उपयोग त्याचा?

असे असल्यास तुम्ही त्यावरच्या प्रतिसादाला श्रेण्या देऊ नका. श्रेणी देण्याचा अधिकार मिळाला म्हणजे प्रत्येकाने प्रत्येक प्रतिसादाला श्रेणी दिली पाहिजे असे नाही.

या नव्या घराचे ते नियम अस्तील तर तसे. काय फरक पडतो त्याने?..

हा नियम कसा झाला?

पुर्वग्रहाने जड झालेल्या पापण्या थोड्या उघडून पाहिले तर कदाचित उपयोग होईल.

रतीय शास्त्रीय संगीतातलं

हे रतीय शास्त्रीय संगीत काय आहे बरे? रतीय क्रिडांबाबत अनेकांनी काही शास्त्रीय लिहून ठेवले असावे पण हे रतीय संगीतही असते हे माहीत नव्हते. Wink

अभ्यास वाढवा, अभ्यास!

रतीय शास्त्रावर पुस्तकं, सिनेमे निबंध सगळं सगळं आहे! (लिंका दिल्या जाणार नाहीत. Wink )

कोणता प्रतिसाद किती महत्वाचा वा रिलेवंट आहे हे तुम्ही कसे ठरविणार? भारतीय शास्त्रीय संगीतातलं मला कळत नाही. मी मारे भल्ता मोठ्ठा मॉडरेटर झालो साईटचा, काय उपयोग त्याचा?

एखाद्या प्रतिसादामधून माहिती मिळते का नाही हे तर नक्कीच समजू शकतं. उदा: या धाग्यावरचा हा प्रतिसाद माहितीपूर्ण आहे एवढं संगीताची खूप माहिती नसली तरी समजतंच.

मला तर या श्रेणींची गरज काय तेच समजत नाहीये.

अनेक वाचकांना खूप वेळ नसतो; अवांतर, अवास्तव, खोडसाळ प्रतिसाद वाचण्याची इच्छा नसते. ज्या सहसंपादकांना तेव्हा वेळ आहे, त्यांनी अशा निरूपयोगी, भडकाऊ प्रतिसादांना तशा श्रेणी दिल्या की वाचकांची सोय होते. याशिवाय असे अनेक प्रतिसादही येतात ज्यांचं काही मूल्य नसतं, ना माहिती, ना विचार, ना विनोद, फक्त 'पोलिटीकली करेक्ट' आहेत म्हणून रहातात. अशा सर्व प्रतिसादकांना हाक देण्याचंही काम श्रेणींमुळे होऊ शकतं.
याउलट चांगल्या श्रेणींमुळे उत्तमोत्तम लिखाण आणि लेखकांना प्रोत्साहन देता येतं. अनेकदा आपण धाग्यावर प्रतिसाद देण्याआधीच कोणीतरी उत्तम प्रतिसाद दिलेले असतात. "+१" असा प्रतिसाद देण्यापेक्षा श्रेणी देऊन ते काम सोपं होतं.

पण असो. या नव्या घराचे ते नियम अस्तील तर तसे. काय फरक पडतो त्याने?..

या समजूतदारपणाबद्दल आभारी आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझा प्रतिसाद दखलपात्र ठरविल्याबद्दल धन्यवाद!
या श्रेणी पद्धतीमुळे किचकटपणाच वाढेल असे वाटते.
मझ्या समजूतीप्रमाणे जो प्रतिसाद उणे श्रेणी घेऊन येईल तो काढून टाकला जाणार नाहीये. तो फक्त फिकट होईल व टिचकी मारून उघडावा लागेल. म्हणजेच सर्वर वरील लोड वाढणार अन वाचकास त्रासदायक होणार. दुसरा भाग म्हणजे कमी धागे अन कमी वाचक आहेत तोवर ठीक, नंतर प्रत्येक प्रतिसादा श्रेणी देत बसणे म्हणजे मॉडरेटर्स साठी किती किचकट काम होईल?
या व्यतिरिक्त, कित्येक सदस्य 'टाईमपास' या निखळ हेतूने वाचन करण्यास येतात. त्यांना 'अश्या' प्रतिसादांचे वाचन करण्यात व त्याबद्दल बोलण्यात जास्त रस असतो. (विदा नाही, पण निरिक्षण आहे. उदा. पिवळ्या पुस्तकांना संग्रहालयात धाडण्याचा धागा. टाईमपास आहे की नाही?)
आपण प्रतिसादाची दखल घेतलीत म्हणून हे सुचवावेसे वाटले की कोणत्या प्रतिसादास किती महत्व द्यायचे हे वाचकास ठरवू देत. उगा काही गोष्टी लपवून ठेवण्यात काय अर्थ? ज्यांना पहायचंय ते टिचकी मारून पाहणारच?
आकसाने श्रेणी देणे, किंव्या त्याचा व्यत्यास- म्हणजे टिनपॉट प्रतिसादास उत्तम श्रेणी, कंपुबाजी करणे व चांगले प्रतिसादही दाबून टाकणे इ. बाबी याच श्रेणी पद्धतीचे 'साईड इफेक्ट्स' म्हणून येतील. त्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. शेवटी अगदी न्यायालयतही न्यायदान घटना व कायद्यानुसार असले तरी त्या खुर्चीत बसलेल्या व्यक्तीची व्यक्तिगत मते/पूर्वग्रह त्यात प्रतिबिंबित होतातच.
ज्या घरी आलो तिथले नियम पाळलेच गेलेच पाहिजेत, त्याबद्दल दुमत नाहीच. पण नियमाबद्दल चर्चा घडून येते आहे म्हणून बोललो. राग नसावा.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

दुसरा भाग म्हणजे कमी धागे अन कमी वाचक आहेत तोवर ठीक, नंतर प्रत्येक प्रतिसादा श्रेणी देत बसणे म्हणजे मॉडरेटर्स साठी किती किचकट काम होईल?

सहसंपादक या नावाने तुम्ही गोंधळलात बहुतेक. हे नेमून दिलेले काम नसून सदस्यांना दिलेली एक सुविधा आहे. प्रत्येक प्रतिसाद वाचून श्रेणी त्यांनी द्यावी असे अपेक्षित नाही.

कोणत्या प्रतिसादास किती महत्व द्यायचे हे वाचकास ठरवू देत

श्रेणी सुविधा यापेक्षा वेगळी नाही. इथे वाचक ठरवतोच पण ते व्यक्तही करतो.

ज्या घरी आलो तिथले नियम पाळलेच गेलेच पाहिजेत

परत एकदा सांगतो. हा 'नियम' नाही. ही एक सुविधा आहे. सुविधेचा वापर करायचा का नाही हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.

नियमाबद्दल चर्चा घडून येते आहे म्हणून बोललो. राग नसावा.

अजिबात नाही. उलट असे विचार तुम्ही जसे योग्य पद्धतीने मांडत आहात तसे केल्यास सगळ्यांचाच फायदा होतो. जरूर लिहा.

मझ्या समजूतीप्रमाणे जो प्रतिसाद उणे श्रेणी घेऊन येईल तो काढून टाकला जाणार नाहीये. तो फक्त फिकट होईल व टिचकी मारून उघडावा लागेल.

होय बरोबर आहे. सतत चुकांकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा किंवा शिक्षा करून सुधारण्यापेक्षा बोलून सुधारता येत असेल तर बोलून बघायचं हे बरं नाही का? हे संकेतस्थळ सुरू करण्याचं मुख्य उद्दीष्टांपैकी एक म्हणजे चांगले वाचक आणि लेखक घडवणे. त्या दृष्टीकोनातून अधिकाधिक लोकांची मतं व्यक्त व्हावीत म्हणून अधिकाधिक लोकांना श्रेणी देता यावी याचा विचार सुरू आहे.
त्यातून ज्यांना सर्व प्रतिसाद वाचायचे आहेत ते स्वतःचा थ्रेशोल्ड -१ असा सेट करून सगळे प्रतिसाद वाचू शकतात.
प्रतिसादांची उघडझाप करून, माझ्या मते, सर्व्हरपेक्षा आपापल्या कंप्यूटरवर जास्त ताण येईल; पण तो अतिरिक्त ताण एवढा कमी असेल की त्याने फार फरक पडू नये.

काही प्रतिसाद मुडपलेले दिसतात; ते अजिबात लपवलेले नाहीत. आपल्याला किती वाचायचं आहे हे सदस्य-वाचक ठरवू शकतो. 'ऐसीअक्षरे'वर सदस्य होण्याचा हा फायदा की आपल्याला स्वतःपुरता हा थ्रेशोल्ड ठरवता येतो. आज कमी वेळ आहे, हे चार धागे आणि चर्चा वाचायच्या आहेत, थ्रेशोल्ड वर ठेवला. काल चिक्कार वेळ होता, थ्रेशोल्ड -१ ठेवून सगळे प्रतिसाद वाचले असं स्वतःलाही करता येईल.

आणि ज्या सगळ्यांना टाईमपास करायचा आहे त्यांनी तो जरूर करावा. मौजमजेचे धागे काढावेत, पिवळ्या पुस्तकांच्या धाग्यावर मी सुद्धा बरेच प्रतिसाद दिले आहेत. मला वेळ होता, मजा करायची होती, चांगली कंपनी होती, केला दंगा. फक्त असा दंगा "ग्रिव्हन्स डे" किंवा स्वल्पविराम अशा धाग्यांवर होऊ नये अशी अपेक्षा आहे. दंगा करतानाही थोडं भान ठेवावं अशी अपेक्षा आहे. या अपेक्षा अवाजवी आहेत का? फक्त सर्वांनाच याचं भान आहे असं वाटत/दिसत नाही, त्यासाठी श्रेणी.
सर्व सदस्य अगदी व्यवस्थित भान राखणारे असतील तरीही प्रत्येकाच्या व्यवसाय, आवड, वाचन, कुवतीनुसार प्रतिसादांचं उपयुक्तता-मूल्य ठरतं. जेव्हा वेळ कमी असतो, किंवा एखाद्याला थोडंच वाचायचं असतं तेव्हा हा गाळ-साळ आधीच कोणीतरी काढलेला मिळतो.

याउलट या सहसंपादकांनी सर्व धागे वाचावेत, सर्व प्रतिसादांवर श्रेणी द्यावी अशी अपेक्षा आहे का? अजिबात नाही. मी स्वतः चांगल्या प्रतिसादांना चांगली श्रेणी देते. अगदीच काही खोडसाळ, भडकाऊ दिसल्याशिवाय वाईट श्रेणी देत नाही. काही गोष्टी दुर्लक्षाने मारून टाकण्यासारख्या असतातच. याउलट दुसरा एखादा फक्त वाईट प्रतिसादांनाच वाईट श्रेणी देत राहील. आणखी कोणी सर्व प्रतिसादांना श्रेणी देईल. सगळ्यांना सगळं वाचणं शक्य नाही, वेळ कमी असतो या गोष्टी या सहसंपादकांच्याही बाबतीत खर्‍या आहेतच.

आकसाने श्रेणी देणे, किंव्या त्याचा व्यत्यास- म्हणजे टिनपॉट प्रतिसादास उत्तम श्रेणी, कंपुबाजी करणे व चांगले प्रतिसादही दाबून टाकणे इ. बाबी याच श्रेणी पद्धतीचे 'साईड इफेक्ट्स' म्हणून येतील.

असं होऊ शकतं यात वाद नाही. काही व्यवस्थित प्रतिसादांना वाईट श्रेणी का मिळाली हे मलाही समजलं नाही. पण अशा ठिकाणी समूहाचं शहाणपण अधिकच कामी येतं.

सहसंपादक निवडण्याची पद्धत अशी असावी की ज्यातून चांगलं लिखाण करणार्‍यांना श्रेणी देता यावी. चांगलं लिखाण याचा अर्थ समज उत्तम आहे; मतभेद झाले तरी मुद्दाम आकसाने वाईट श्रेणी देणार नाहीत. किंवा विरोधी मत आहे म्हणून वाईट श्रेणी देणार नाहीत. मुद्दा कसा मांडला आहे याला जास्त महत्त्व असावं; माहिती आहे का, विचार आहे का, प्रतिसाद विनोदी आहे का यांवर चांगल्या श्रेणी द्याव्यात अशी अपेक्षा आहे. उदा: तुमचेच हे इथले प्रतिसाद आहेत, यांत माझ्या मतांच्या काही प्रमाणात विरोधात मतं आहेत. पण मला तुमचा प्रतिसाद रोचक वाटतो; कारण तुम्ही विचार करून, व्यवस्थित लिहीता आहात. मी तुमच्या या वरच्या दोन प्रतिसादांना श्रेणी दिली तर नि:संशय चांगल्या प्रतीची देईन. साधारण अशीच अपेक्षा सहसंपादकांकडून आहे.

सध्या निवडक लोकांनाच श्रेणी देता येते आहे कारण सहसंपादक निवडण्याची प्रक्रिया ऑटोमेट करण्यासाठी लोकांचा अभ्यास करावा लागतो आहे. भले माझ्या मतांच्या विरोधी असतील पण विचार करू शकणारे लोकं किती दिवसांतून लॉगिन करतात, किती प्रतिसाद, लेख लिहीतात याचा विचार करून ही निवड ऑटोमेट करायची आहे. सहसंपादक असणं, इतरांच्या प्रतिसादावर श्रेणी देणं हे जबाबदारीचं काम आहे. ती जबाबदारी ज्या लोकांना समजते अशा ठराविक लोकांच्या लिखाण, लॉगिनची वारंवारिता याचा मी अभ्यास करते आहे; जेणेकरून नवनवीन सूज्ञ लोकांनाही सहसंपादन करता येईल.

सध्या तरी ही पद्धत अशीच रहावी असं माझं मत आहे कारण त्याशिवाय या पद्धतीची उपयुक्तता समजणार नाही. अधिकाधिक लोकांना लिखाणावर एका शब्दात प्रतिक्रिया देण्याचीही सोय असावी. फक्त "+१" एवढाच प्रतिसाद देण्यापेक्षा त्या प्रतिसादातले विचार मार्मिक वाटले का रोचक, प्रतिसाद विनोदी वाटला का माहितीपूर्ण असं सांगणं जास्त 'माहितीपूर्ण' आणि प्रोत्साहनपर आहे, नाही का?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फाऊंडर मेम्बर्सपैकी एक असल्याने अदिती यानी 'ऐसीअक्षरे' हे संस्थळ निकोप पद्धतीने (जरी वैयक्तिक सदस्य म्हणून त्याना मौजमजा विरंगुळ्यासाठी काही विशिष्ठ डीग्रीपर्यंत धाग्यावरील+प्रतिसादांतून प्रकटणारा वेलकमिंग हलकफुलका दंगा अपेक्षित असला तरी..) चालविण्यासाठी केलेल्या अभ्यासाची प्रचिती या दीर्घ प्रतिसादात उमटली आहे. यावरून त्यांना आणि त्यांच्या सहकारी संपादक सदस्यांना संस्थळाच्या यशस्वीततेसाठी इच्छित असलेले दालन सदैव गजबजलेले राहण्यासाठी नवनवीन कल्पनांचे वावडे नाही हे देखील स्पष्ट होत आहे. मला स्वतःला या "श्रेणी" पद्धतीमध्ये काही "ऑब्जेक्शनेबल ऑर कॉन्फ्लिक्टिंग इलेमेन्ट्स" आहेत असे वाटत नाही, कारण यातून काही चांगले निष्पण्ण होणार असेल तर प्रतिसादातील 'दंग्या'ला एका सीमारेषेनंतर चाप बसेल असेच वाटते.

जालीय भाषेतील वर्तणुकीवर "ईझीनेस" चा फार मोठा परिणाम होत असतो आणि त्यातून एखादेवेळी एखादी अभ्यासू व्यक्ती प्रतिसादातून प्रकट होणार्‍या अपमानस्पद भाषेला प्रत्युत्तर देण्याऐवजी शांतपणे प्रांगणातून निघून जाणे पसंत करते असा इथला {इथला म्हणजे सर्वमान्य जालीय संस्थळ घडामोडी} अनुभव मॉडरेटींग टीमला येत असणारच. त्यामुळे देहाच्या आरोग्य नियमनासाठी आहार-निद्रा-चयापचन क्रिया जशा महत्वाच्या मानल्या जातात तद्वतच संस्थळाची 'प्रकृती' सुदृढ राहाण्यासाठीही भाषा-नियमन होणे क्रमप्राप्त असल्याने 'श्रेणी' ची सुई योग्य तो प्रभाव दाखवेल असा विश्वास वाटतो...मात्र मूळ प्रतिसादातील कौलाचा मुद्दा ~ श्रेणी देणे हक्क सर्वानाच की संपादक मंडळ स्थापित करीत असलेल्या समितीसदस्यांनाच याबाबतचा अंतिम निर्णय जो होईल तो होवो, पण तो सार्थ असेल की नाही हे येणारा काळच ठरवेल. त्यासंदर्भाची लवचिकता दाखविण्याचे सौजन्य मंडळाकडे असणारच याबाबत विश्वास दाखविला पाहिजे.

अशोक पाटील

जालीय भाषेतील वर्तणुकीवर "ईझीनेस" चा फार मोठा परिणाम होत असतो

महोदय,
आपले बरेच लिखाण इतर संस्थळांवर वाचले. आपण विचारपूर्वक व उत्तम लिहीता असा अनुभव आहे. इथे तुमचे वाक्य अर्धवट उर्धृत करीत आहे, कृपया माफी असावी:
ईझीनेस च्या बद्दल. (कॉन्टेक्स्ट बदलून, व मला इतर स्थळांचा नामनिर्देश करण्याचे अलिखित शिष्टाचार नीट ठाऊक नाहीत, तो दोष पत्करूनः)
मनोगत ही देखणी साईट. टेक्निकली छान. पण प्रत्येकच प्रतिसाद टिचकी मारून वाचावा लागतो. खरं सांगतो, हा इझीनेस नाही, मी ३-५ धागे वाचून सोडून दिली साईट. तुमचा अनुभव कसा ते ठाऊक नाही. मिपा वर सद्स्यत्व देणारी यंत्रणा फेल झालिये, तरीही तिथे सहभागी न होता तसेच वाचतो.

त्या श्रेणी मुळे टिचकी चा किचकटपणा सुरू होईल अन लोक वाचन बंद करतील असे वाटते.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

धन्यवाद आडकित्ता जी.

मीदेखील मराठी जालीय विश्वसागरात फार काळ जलतरण केलेली व्यक्ती नाही. पण कबूल करायला हरकत नाही की, मुलाने ज्यावेळी मला अशा 'मराठी' संस्थळाचेदेखील सदस्यत्व घेण्याची सूचना केली ती मला आवडली होतीच पण त्या अगोदर मी दीडेक महिना सर्वच संस्थळावर वाचनघिरट्या घालत होतो. तुम्ही उल्लेख केलेले 'मनोगत' मी पाहिलेले आहे पण तिथल्या तांत्रिक सुविधा (की असुविधा ?) मला काहीशा किचकट वाटल्या सबब तिकडे जाणे थांबलेच. "ईझीनेस" चे साईड इफेक्ट मला जाणवले [वाचनमात्र काळातच] की कित्येक सदस्य मूळ लेख वा त्यावरील प्रतिक्रिया पूर्णपणे न वाचताच "छान, मस्तच, आवडले, अजून येऊ द्या" तत्सम 'येते गं, टिकली लावून जाते गं' थाटाची दळण घालणारे प्रतिसाद देऊन संबंधित धागाधारकाला "व्वा, व्वा, आपल्या धाग्याचा टीआरपी वाढला बरं का !" चे खोटे समाधान देत बसतात. यातून संस्थळ वृद्धीसाठी नेमके काय साध्य होते हे समजणे जिकिरीचे होते. पण जालीय लेखनस्वातंत्र्याचा कुठेही संकोच होत नसल्याने "आहे हाती हरभर्‍याची टोपली, देत राहू दाणे देता येतील तितके पाखरा" अशा ईझीनेसचे कॉन्ग्रेसी गवत फोफोट्याने वाढत चालले आहे. [

आता 'ऐसीअक्षरे' ने पटलावर आणलेली "श्रेणी" पद्धती. यावर चर्चाचर्वितण चालू आहेच. याचेही काही 'प्रोज अ‍ॅन्ड कॉन्स" असतील ज्यांचा साकल्याने या संस्थळाच्या मॉडरेटर्सनी विचार केला असणारच [ही मंडळी जालीयविश्वातील 'नवे मनू' च आहेत.] त्यामुळे त्यानाही काही वेळ देणे सर्वांसाठी लाभदायक सिद्ध होईल असा आशावाद बाळगणे गैर मानले जाणार नाही.

अशोक पाटील

त्या श्रेणी मुळे टिचकी चा किचकटपणा सुरू होईल अन लोक वाचन बंद करतील असे वाटते.

आडकित्ता, एक मुख्य फरक असा आहे की वाचनमात्र सदस्यांनीही एकदा स्वतःचा 'थ्रेशोल्ड' सेट केला की त्यांना पुन्हा पुन्हा तसं करावं लागत नाही. तुम्हाला सर्व प्रतिसाद वाचायचे आहेत, तुम्ही तुमचा थ्रेशोल्ड -१ ठेवा, सगळे प्रतिसाद दिसतील, उघडझाप करावी लागणार नाही. पण म्हणून इतर सर्वांनी हेच आणि असंच करावं अशी सक्ती आपण का करावी? ज्यांना कमी प्रतिसाद वाचायचे आहेत त्यांना त्याचं स्वातंत्र्य आहे, ज्यांना प्रत्येक अक्षर वाचायचं आहे त्यांना त्याचं स्वातंत्र्य आहे. एकदा थ्रेशोल्ड सेट करावा लागतो हे काही फार त्रासदायक नाही, नाही का?

मी नवा आहे, मला कर्म कुठून मिळेल? माझ्या धाग्यांना श्रेणी कशी मिळेल? अन जे होईल त्यातून माझा हिरमोड होऊन संस्थळाच्या कामकाजात सहभागी होण्याची उर्मी कमी होऊन अंततः संस्थळ पुनः एकदा त्याच 'नेहेमीचे यशस्वी' कलाकारांनी सादर केलेला तोच नाट्यप्रयोग थोडं बदलून असा होणार नाही काय?

कर्म मिळण्यासाठी प्रतिसाद आणि धागे लिहावे लागतील. हे कर्म श्रेणी देण्यासाठी खर्च करता येतं. आपल्या प्रतिसादांच्या बाय-डीफॉल्ट श्रेणीशी याचा संबंध नाही. आपल्या प्रतिसादांना चांगल्या श्रेणी मिळाल्या की आपल्या प्रतिसादांचं गुणांकन आपोआप वर जातं.
सध्या धाग्यांना श्रेणी देण्याची सोय नाही, पण ते करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. चांगलं जे काही ते बाजूला काढून ठेवावं आणि जुन्या-नव्या सर्व सदस्यांना वाचण्यासाठी हवं तेव्हा चटकन उपलब्ध असावं असा विचार चार महिन्यांपूर्वीच सुरू झाला आहे. फक्त त्या प्रयोगांत अजून यश आलेलं नाही.
'नेहेमीचे यशस्वी कलाकार'च श्रेणी देतील असं नव्हे. आत्ता नाही एक आठवडा झाला, संस्थळाची माहिती इतर काही संस्थळांवर टाकून, आणि त्यातही आता साधारण ७५ श्रेणीदाते आहेत. हा आकडा आत्ता मर्यादित आहे कारण १. या लोकांना श्रेणी कशी द्यावी याबद्दल कल्पना आलेली आहे, समजेल याबद्दल खात्री आहे. २. या लोकांच्या लिखाण, वावराचा अभ्यास करून ऑटोमेशनकडे जावं असा विचार आहे.
या पद्धतीत कोण किती वेळा लॉगिन करतं याकडे लक्ष नसून, कोणी किती उत्तम लिखाण करतं हे महत्त्वाचं आहे. लॉगिन करण्याचा फायदा हा आहे की तुमच्या मतांची नोंद होते, आणि तुमच्या चांगल्या वाईट प्रतिसादांचा रेकॉर्ड रहातो; त्याबदल्यात तुम्हीही चांगल्या-वाईटाबद्दल दोन क्लिकमधे मतप्रदर्शन करू शकता. चांगले मुद्दे मांडणं, नवनवीन माहिती देणं, उत्तम विनोद करता येणं हे सुज्ञ, बुद्धीमान असल्याचं लक्षण आहे आणि अशा अधिकाधिक बुद्धीमान लोकांनी संस्थळ चालवण्यास, मोठं करण्यास हातभार लावावा अशी आमची इच्छा आहे.

माझ्या प्रतिसादाला आपण लिहिलेला प्रतिसाद व प्रतिसादास प्रतिसाद या मर्यादित धागाविभागाचे व त्यातील प्रतिसादांच्या 'स्कोर' चे अवलोकन करावे. ज्या माझ्या मूळ प्रतिसादावरून हा 'सब लुप' बनला, त्या प्रतिसादाचे स्कोर मूल्य व प्रत्येक सद्स्याचे प्रतिसदाचा दर्जा व स्कोर मूल्य : हिशेब कसा काय झाला? या सर्व उप प्रतिसादांच्या मूल्यांची बेरीज मिळून मुख्य प्रतिसादाचे मुल्य ठरावे.. व हेच धाग्याच्या मूल्या बाबत व्हावे. (माझ्या मते नैसर्गिक न्याय)

हा नैसर्गिक न्याय कसा हे समजलं नाही.

पण मला जे समजलं आहे त्यावरून, उदा: राजेश घासकडवी यांनी माझ्या एखाद्या "प्लीज या कवितेचा अर्थ समजून सांगा" अशा सुमार विनंतीवजा प्रतिसादाला दिलेल्या चांगल्या प्रतिप्रतिसादामुळे मला काही "कूल पॉईंट्स" मिळावेत का? माझ्या मते अजिबात नाही. चांगली श्रेणी चांगल्या प्रतिसादांनाच मिळावी. मी एखादा सुमार, निरर्थक किंवा अवांतर प्रतिसाद दिला तर मला त्याची शिक्षा मिळावी आणि मी चांगला प्रतिसाद दिला तर मला त्याबद्दल चांगली श्रेणी मिळावी. उलटपक्षी, माझ्या चांगल्या प्रतिसादाला उत्तर म्हणून इतर कोणी अवांतर, खोडसाळ लेखन केलं तर मला त्याचा फटका बसू नये. हे मला दिसत राहिलं तर मी अधिकाधिक चांगलं लिखाण करण्यास सुरूवात करेन आणि उगाच "+१" प्रकाराचे ट्यार्पीवर्धक पण सुमार प्रतिसाद लेखन थांबवेन. संस्थळाचा उद्देशच हा आहे की चांगले लेखक आणि वाचक संस्थळामुळे तयार व्हावेत. जे आधीच चांगले लेखक आणि/किंवा वाचक आहेत त्यांना व्यासपीठ असावं, जिथे त्यांचा आपसांत संवादही असू शकतो.
'३_१४ विक्षिप्त अदिती' या सदस्याने आत्तापर्यंत ठीकठाक लिखाण केलं आहे म्हणून अदितीने तिथेच थांबू नये, पुढे जात रहावं हा उद्देश आहे.

नवीन आलेले सदस्य तुम्ही दिलेलं आहे त्याच ट्रॅकवरून जातात असंही नाही. आंजावरच असे काही लोकं आहेत की जे आले, थोडंबहुत वाचन केलं आणि अनेक ठिकाणी चांगले प्रतिसाद दिले; अशा लोकांचं स्वतंत्र लिखाण खूप कमी आहेत. उदा: नितिन थत्ते. 'ऐसीअक्षरे'वरील काही सभासदांना एकूणच असे फोरम्स म्हणजे काय हेच माहित नाही; पण ते उत्तम लेखक आणि वाचकही आहेत. नवीन लोकांनी लिखाण करावंच, आणि त्यात कर्म-श्रेणीव्यवस्था अजिबात आड येत नाही. उलट श्रेणीव्यवस्थेचं एकदा ऑटोमेशन केलं की मला (अदितीला) कोण माणूस हुशार वाटतो यापेक्षा कोण सदस्य हुशार, माहितगार इ.इ. आहे ते लगेच लक्षात येऊन त्यांनाही या व्यवस्थेत सामील होता येईल.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>>त्या श्रेणी मुळे टिचकी चा किचकटपणा सुरू होईल अन लोक वाचन बंद करतील असे वाटते. अनुमोदन Smile

तुमचं विश्लेषण मान्य.
मुद्दे योग्य आहेत. पण एक शंका:
प्रतिसादांची श्रेणी ही 'कर्मा'शी बांधील आहे.
कर्म हे तुमच्या लिखाणावर अवलंबून आहे.
या सुरुवातीच्या काळात आपण ९९% आमंत्रित सदस्यांबद्दल व त्यांच्या वागणूकीबद्दल विचार करीत आहात असे जाणवले. मराठी संस्थळांवरील वावराचे माझे स्वतःचे जालीय वय सुमारे ४ महिने आहे. दरम्यान मी भरपूर वाचन केले. या वाचन्/निरिक्षणातून जाणवते, की : जुन्या / लोकप्रिय स्थळांवर आलेला नवा सदस्य बहुधा पुढील अवस्थांतून जातो, (हे आपल्यालाही मान्य असावे.)
१. सद्स्यत्व न घेता वाचन (लर्किंग)
२. सद्स्यत्व घेऊन मग थोडे प्रतिसादात्मक लिखाण, बहुधा 'सहमत' इ.
३. चुकत माकत एकादा धागा. बहुधा शंकानिरसन प्रकारचा: माझ्या लॅपटॉपचा १/४ स्क्रीन ब्लँक झालाय, मदत करा. किंवा. चिंचवड मधे के.जी. कोणती चांगली इ. प्रकारचा.
३ अ : थोडा बरा धागा : इतर ठिकाणी दिलेल्या प्रतिसादांवरून निघालेला.
४. खरे अभ्यासू लेखन. हे दरम्यानच्या काळात ब्लॉग वगैरे चालवून व इतर वैयक्तिक अभ्यासातून येते
५. इतर अभ्यासूंशी परिचय, व संस्थळाच्या पॉलिसिजची अध्यहृत समज. (म्हणजे विंडोज मधे जसे MS प्रॉडक्ट्स साठी हिडन प्रोग्रामींग हूक्स असतात तसे) व त्यातून बिन्धास्त धागे उघडणे.

आता माझा प्रश्नः
मी नवा आहे, मला कर्म कुठून मिळेल? माझ्या धाग्यांना श्रेणी कशी मिळेल? अन जे होईल त्यातून माझा हिरमोड होऊन संस्थळाच्या कामकाजात सहभागी होण्याची उर्मी कमी होऊन अंततः संस्थळ पुनः एकदा त्याच 'नेहेमीचे यशस्वी' कलाकारांनी सादर केलेला तोच नाट्यप्रयोग थोडं बदलून असा होणार नाही काय?

माझ्या प्रतिसादाला आपण लिहिलेला प्रतिसाद व प्रतिसादास प्रतिसाद या मर्यादित धागाविभागाचे व त्यातील प्रतिसादांच्या 'स्कोर' चे अवलोकन करावे. ज्या माझ्या मूळ प्रतिसादावरून हा 'सब लुप' बनला, त्या प्रतिसादाचे स्कोर मूल्य व प्रत्येक सद्स्याचे प्रतिसदाचा दर्जा व स्कोर मूल्य : हिशेब कसा काय झाला? या सर्व उप प्रतिसादांच्या मूल्यांची बेरीज मिळून मुख्य प्रतिसादाचे मुल्य ठरावे.. व हेच धाग्याच्या मूल्या बाबत व्हावे. (माझ्या मते नैसर्गिक न्याय) अन्यथा नवे सदस्य या प्रक्रियेत अन पर्यायाने संस्थळाच्या कामकाजात आत्मियतेने सहभागी होणार नाहीत. संस्थळ हे पुनः एकाच चाकोरीत बद्ध होऊन फक्त 'अनदर क्लोन' असे होऊन बसेल..

हा प्रतिसाद थोडा विस्कळित झाला आहे. समजून घ्याल अशी आशा. पुन्हा एकदा: स्कोर ची गरजकाय? Sad

ता.क. : लॉगिन च्या वारंवारिते बद्दल. उदा. मी २४ तास ऑनलाईन असतो. अन कॉम्प्युटर व बहुधा ब्राऊझर ही सुरूच असतो. माझी लॉगीन जवळजवळ परपेच्युअल असते. याचा हिशेब कसा काय होणार? सहाजिकच माझी येण्याची नोंद वारंवारिता अतिशय कमी भरेल?

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

या नव्या घराचे ते नियम अस्तील तर तसे. काय फरक पडतो त्याने?

हेच, आणि एवढेच. त्यापुढं चर्चा म्हणून सहभागासाठीही काही लिहण्यानं "सर्वर वरील लोड वाढणार अन वाचकास त्रासदायक होणार." Smile
असा किंवा तसा त्रास झालाच तर वाचक येणार नाहीत. न आले तर संस्थळ टिकणार नाही. व्यवस्था स्वीकारून वाचक आले तर संस्थळ चालू राहील. वाचकांचा सहभाग वाढला तर संस्थळ मजबूत होईल. सिंपल.

वाचक येणार नाहीत. न आले तर संस्थळ टिकणार नाही. व्यवस्था स्वीकारून वाचक आले तर संस्थळ चालू राहील. वाचकांचा सहभाग वाढला तर संस्थळ मजबूत होईल. सिंपल

.

म्हणजेच "आहे हे असं आहे! पटलं तर राहा नाहीतर चपला घालून चालू पडा" फारतर काय होइल नाय येणार कुणी आणि पडेल बंद तिच्यायला!
बरोबर का मोडक?

अगदी नेमके. त्याचे कारण स्वच्छ आहे. जुन्या भाषेतच सांगायचे तर, लोकांनी संस्थळ उभं करायचं. इतरांनी वाट्टेल तसं वागून संस्थळचालकालाच डोकेदुखी करायची, याला काहीही अर्थ नाही. इथं एक चौकट आहे, त्याच्या आत मारायच्या त्या उड्या मारा. ही चौकट आपल्या आकाराला पुरेशी वाटत नसेल तर वैयक्तिक स्तरावर चालकांशी संपर्क साधून ती व्यापक करण्याचा प्रयत्न करा. त्यांना ते पटलं तर ते व्याप्ती वाढवतील. नाही पटलं तर आहे तशी चौकट राहील. त्यात नाचणं जमत नसेल तर मोकळं व्हावं. पण काय आहे, इथं किंवा तिथंही अभिव्यक्ती आणि लोकशाही ही आदरणीय आधारभूत तत्वे आहेत, त्यामुळं हे असं होत असतंच. समजून घ्या. Smile
ही माझी मतं आहेत. ती फाट्यावर मारता येतातच. संस्थळचालकांची मते यासंदर्भात वेगळी असू शकतात. Smile
अवांतर: आनंदयात्रींचा हा प्रतिसाद कुणी खोडसाळ ठरवला?

मला अजुनही श्रेणी देता येत नैये!!! लवकरात लवकर काय ते कळवावे हीच नम्र विनंती.

तुम्हाला देताही येणार नाहीत. तुमच्या आणि गुगळेंच्या प्रतिसादांना जाणुन बुजुन खालची श्रेणी दिली जात आहे हे तुमच्या लक्षात आले नाही का?

मला देता येते आहे. नीट कळ्ळं नाहीये अजून, पण चांगली सोय आहे.

मला फक्त प्रतिसादांनाच श्रेणी देता येतेय,सहित्याला नाही.
हा प्रकार बरोबर नाही.
साहित्यालाही श्रेणी देता आली पाहिजे.

माझ्याकडे कर्म-मूल्य २ आहे. प्ण श्रेणी कशी द्यायची हे समजत नाही. असतीतर आडकित्तांच्या प्रतिसादाला सगळ्यात वरची श्रेणी दिली असती.

मला श्रेणी देता येईल का
असल्यास कशी

.

कंपू या शब्दाचा अर्थ 'गट' असा घेऊन दुसर्‍या पर्यायाला मत दिले आहे.

माझ्या मते हा अधिकार सगळ्यांकडे नसावा, मात्र हा अधिकार मिळण्यासाठीचा 'क्रायटेरिया' जाहिर असावा. (म्हणजे ठराविक कर्म झाल्यावर हा अधिकार मिळेल वगैरे)
म्हणजे अधिक गुणांकन मिळवून हा अधिकार घेणं हे मोटीवेशन ठरेल

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एक तर मला ते कर्म वगैरे भानगड अजिबात समजली नाही...बाकी जे वाटेल ते लिहित जायचे बाकी चिंता अजिबात करायचं कारण नाही असं आमचं आत्तापर्यंतचं धोरण चालु राहील.

बरं मग?

------------------------
घणघणतो घंटानाद

आपला विस्तृत प्रतिसाद वाचला.
माझ्या तरी शंका दूर झाल्या आहेत. तुमचा उत्तरे देण्याचा धीर (पेशन्स) वाखाणण्याजोगा आहे. (तो वाखाणण्यात येत आहे हे जाहीर करतो :दिवे:) मी तुमच्या जागी असतो, तर इथपर्यंत संतापून नक्कीच काही खडूस बोलून गेलो असतो.

तुमचा पेशन्स थोडा अजून ताणत २ गोष्टी सुचवू इच्छितो, त्या अशा:

  • १. या "कर्मविपाक" सिद्धांतावर आपण व इतरही मॉडरेटर्स नी सखोल उहापोह केलेला आहे असे दिसतेच आहे. फक्त, झीरो बजेट करून इतर जन्मींचे (पक्षी इतर मसं वरील अवतारांचे) बरेवाईट पूर्वसंचित इकडे बाय डीफॉल्ट ट्रान्स्फर न करता, नवी साईट नवे राज असे करावे असे वाटते.
  • २.
    कर्म मिळण्यासाठी प्रतिसाद आणि धागे लिहावे लागतील. हे कर्म श्रेणी देण्यासाठी खर्च करता येतं. आपल्या प्रतिसादांच्या बाय-डीफॉल्ट श्रेणीशी याचा संबंध नाही. आपल्या प्रतिसादांना चांगल्या श्रेणी मिळाल्या की आपल्या प्रतिसादांचं गुणांकन आपोआप वर जातं.
  • कर्म श्रेणी देण्यासाठी खर्च करण्याची कल्पना नीटशी समजली नाही, पण हा एक उत्तम कंन्ट्रोल ठरेल असे वाटते. म्हणजे कंपूशाही करून कुणी थिल्लर प्रतिसादांस चांगली श्रेणी दिली, तर त्याची श्रेणी देण्याची क्षमता आपोआप घटून ती त्याला इतरत्र वापरता येणार नाही, असे काहीसे करता येईल काय?

- शुभेच्छुक,
आडकित्ता गोड(चारू)बोले(वाक्)

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

>>कर्म श्रेणी देण्यासाठी खर्च करण्याची कल्पना नीटशी समजली नाही

प्रतिसाद आणि धागे लिहून कर्म मिळतं. ही झाली जमेची बाजू. पुरेसं कर्म मिळालं की तुम्हाला प्रतिसादांना श्रेणी देता येतात. श्रेणी देताना हे कर्म खर्च होतं. ते पुरेसं खाली आलं की तुमची श्रेणीक्षमता नाहीशी होते. मग प्रतिसाद/धागे लिहून पुन्हा कर्म मिळवावं लागतं. अशी ही संकल्पना आहे.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

श्रेण्या देत बसून तुम्हाला काय येसेस्सीबोर्डाचे पेपरतपासनीस व्हायचे आहे का?
सगळ्यान्ना प्रतवारीचा हक्क हवा
काही गरज नाही प्रतवार्या करत बसायची
चीयसाब तरक र्यावातप्र हीना जरग हीका
पळा पळा, डोन्गराला आग लागली....

श्रेण्या देत बसून तुम्हाला काय येसेस्सीबोर्डाचे पेपरतपासनीस व्हायचे आहे का?

साध्या भाज्यादेखिल निवडून निवडून घेतो, इथल्या प्रतिसादान्ना निवडायल नको?

काही गरज नाही प्रतवार्या करत बसायची

पळा पळा, डोन्गराला आग लागली...

काल पर्यन्त माझे कर्ममुल्य की काय ते २ वगैरे दिसत होते, कुणीतरी माझ्या दोन प्रतिसादान्ना "निरर्थक" असा शेरा मारल्याने बहुतेक ते कर्ममूल्य घटून शून्यावर गेले. मायनस अर्थात वजा आकड्यात जायची सुविधा असेल तर माझे कर्ममूल्य मायनस मधेच कायम असण्याची शक्यता जास्त आहे. तर असो. आयडीया चान्गली आहे.

अहो, जो शेरा मारतो तेव्हा त्याचेही कर्ममूल्य घटते तेव्हा तुमच्या चांगल्या प्रतिसादांना उगाच निरर्थक असा शेरा मारून कोण स्वतःचे कर्ममूल्य फुकट वाया घालवेल. सबब तुमच्या निरर्थक आणि टुकार प्रतिसादांनाच निरर्थक असा शेरा कुणीतरी मारलेला असणार.

स्वगतः माझ्या ह्या माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल मला माहितीपूर्ण अशी श्रेणी कुणी देईल काय?

------------------------
घणघणतो घंटानाद

पालथ्या घड्यावर म्हणीप्रमाणे तुमच्या प्रतिसादाला निरर्थकच श्रेणी दिली पाहिजे. Wink (माझं शिंचं कर्म संपलंय नाहीतर दिली असती. Wink )

कर्मण्ये वा धिकारस्ते मा फलेषु कदाचन.....

------------------------
घणघणतो घंटानाद

तो मुद्दा आहे, पण प्रत्यक्ष कुबेरास वा त्याचे अनुयायांस कर्ममूल्य घटण्याची कस्ली आलिये भिती? नै का? Biggrin पण असो.
मला मायनस आकड्यान्ची भिती नाही. मात्र "श्रेणी" प्रकारात कम्पुशाहीचा धोका कुणी कुणी व्यक्त केला होता, त्यात बरेच तथ्य असू शकते हे ध्यानात घ्यावे.
माझ्या मते, प्रतिसाद कुणी दिलाय हे दिसतच नाही, केवळ विषय्/श्रेणी/दिनांक-वेळ दिसते, तर विषया ऐवजी, आयडी दिसली, तर तुम्ही काहीका श्रेणी द्या, लोक ज्यान्चे वाचायचे तेच वाचायला जातिल. अन तिथेच नेमकी ग्यानबाची मेख मारुन ठेवलीये की ते टिचकी मारल्याशिवाय कोणी लिहीलय हे कळत नाही. ही आयडीया मात्र आवडली नाही.

एका पोस्टला एक कर्म वाढताना दिसतंय.
पण एक श्रेणी दिल्याने साधारण किती कर्म घटतं?? म्हणजे एक पोस्ट लिहून मिळवलेलं कर्म एका श्रेणी देण्याने जात नाही ना?

एका पोस्टला(प्रतिसाद) नाही वाढत, एक नविन धागा सुरु केला तर वाढत, तपासुन बघायला हवय.
शिवाय आता तर बाय डिफॉल्ट माझ्या पोस्ट्स्ना झिरो स्कोअर दिस्तोय, म्हण्जे माझ्या पोस्ट मला देखिल झाकलेल्या दिसुन टिचकी मारल्याशिवाय दिसत नाहीत, भन्नाटे एकुणातच कल्पना.... अनुल्लेख करायची येवढी सुन्दर तान्त्रिक सुविधा मी आजवर कुठल्याच साईट वर पाहिली नाहीये Wink
पण तुमचे प्रश्न बरोबर आहेत, कळीचे आहेत, हे कर्म अन त्याच्या मुल्याचे जमाखर्चाचे गणित कुठेतरी उलगडून दाखविलेले असायला हवे.

अम्.. मला पोस्ट म्हणजे धागा असं म्हणायचं होतं.

प्रतिसादांनीही वाढतं का कर्म.. मग मी नीट वाचलं नसेल. परत वाचतो माहिती..

नेमकं कशाने किती वाढतं हे हळूहळू कळेलसं वाटतं..

या सर्व यंत्रणेमागे अनुल्लेखाचा किंवा हेतुपुरस्सर प्रतिसाद झाकण्याचा भाग नसावा असे वाटते, कारण झाकणार्‍याचे कर्मही त्या प्रयत्नात कमी होतंयच की..

धागा
प्रतिसाद

यांमुळे नेमकं किती कर्म वाढतं अशी शंका विचारली होती.. उदा धाग्याने १ वाढतं. प्रतिसादाने ०.२५.. श्रेणी दिली की ०.२५ कमी.. कोणत्याही प्रकारची श्रेणी दिली तरी तितकीच घट की वेगवेगळी..

आपल्याला निगेटिव्ह श्रेणी मिळाली की अमुक इतके पॉईंट गेले..

या सर्व शंका तातडीने निरसन व्हाव्यात इतक्या महत्वाच्या नाहीत पण सर्वांना समजावं म्हणून इथे सार्वजनिकरित्या विचारल्या. हे नेमकं वाढ आणि घटीचं गणित कळलं की श्रेणी देताना उपयोगी पडेल. उगीच श्रेणी देण्याची पद्धत पडणार नाही.

>>>या सर्व यंत्रणेमागे अनुल्लेखाचा किंवा हेतुपुरस्सर प्रतिसाद झाकण्याचा भाग नसावा असे वाटते, कारण झाकणार्‍याचे कर्मही त्या प्रयत्नात कमी होतंयच की.. नसेलही तसा हेतुपुरस्सर प्रकार, पण आता मी माझ्या पोस्ट दिसण्याकरता खालील पर्यायातुन -१ पर्याय निवडल्यावर बर्‍याच नवनविन पोस्ट्स बघायला मिळाल्या ज्या आधी दिसत नव्हत्या. काही जणान्ना ही सोय बरी वाटेल, पण माझ्यासारख्या चिकित्सकाला, कुणीतरी दुसर्‍याने मायनस वन श्रेणी दिलेल्या त्या टाकाऊ म्हणून वाचायला नकोतच असे वाटणार नाही, किम्बहुना, असे दुसर्‍याच्या मताने चालणे जमणार नाही. कोणत्या टाकाऊ, कोणत्या नाही ते माझे मीच ठरवणार ना? अन बहुसन्ख्य सभासद, बाय डिफॉल्ट असलेली अधिक१ (+१) ची सुविधा बदलण्याचे (माहित नसल्याने वा मुद्दामहून) कष्टही घेणार नाहीत व विशिष्ट आयडीच्या पोस्ट ना मायनस ठरविल्यावर त्या आपोआप झाकलेल्या रहातील हे निश्चित, अन म्हणूनच मी म्हणले की अनुल्लेखाचा हा अभिनव प्रकार आहे.

असो, साईट नविन आहे, ट्रायल अ‍ॅण्ड एरर काही काल होतच रहाणार. कसलेही पूर्वमत बनविण्यापेक्षा वाट पहाणे हे उत्तम!

मला वाटतं की एकदा मी / आपण ती -१ ची लेव्हल सिलेक्ट करुन बदल साठवा किंवा तत्सम "सेव्ह" केलं की त्यापुढे आपल्याला नेहमीच सगळ्या प्रतिक्रिया दिसतील (कोणतीच प्रतिक्रिया मिटलेली नसेल) चुभूदेघे.. पण मला वाटतं असं करता येत असेल तर फेअर इनफ.. करुन पाहतो.

>>>>मला वाटतं की एकदा मी / आपण ती -१ ची लेव्हल सिलेक्ट करुन बदल साठवा किंवा तत्सम "सेव्ह" केलं की त्यापुढे आपल्याला नेहमीच सगळ्या प्रतिक्रिया दिसतील (कोणतीच प्रतिक्रिया मिटलेली नसेल) चुभूदेघे.. पण मला वाटतं असं करता येत असेल तर फेअर इनफ द्याट इज नॉट फेअर इनफ! हे मी माझ्यापुरत अस बघितल तर असेल फेअर इनफ, पण आधीच्या पोस्ट मधिल ठळक केलेल्या मजकुरातील, बाय डिफॉल्ट +१ आणि नविन नेटशी सराव नसलेले सभासद यान्ची सान्गड घालता -१ गुणान्कन असलेल्या पोस्टी असतील हे देखिल त्यान्च्या गावी ध्यानात येणार नाही. जर ही बाय डिफॉल्ट सुविधा -१ ला सुरु ठेऊन, युजरला त्यात हवा असेल तर बदल करुन घेईल, असे धोरण ठेवले तर आक्षेपाला जागा उरणार नाही. मात्र, बाय डिफॉल्ट +१ ठेऊन, नविन युजर्स ना, -१ बद्दल अन्धारातच ठेवायचे असेल तर अवघड आहे. कारण, -१ गुणान्कन, काही निवडक लोकच करु शकतात्/सगळ्यान्ना सुविधा मिळाली गुणान्कनाची तरी कम्पुशाहीची भिती -१ करता रहातेच!
असो.

जरा विचार करुन तरी प्रतिसाद लिहा! शेळीच्या लेंड्यासारखे पन्नास निरर्थक प्रतिसाद द्यायचे आणी मग अवांतर, निरर्थक श्रेण्या मिळाल्या की रडत बसायचं!

ओ निळेकाका, कृपया प्रतिसादावर आ़क्षेप असावे, प्रतिसादकावर नको. वैयक्तिक टिपणी कशाला करताय.

------------------------
घणघणतो घंटानाद

श्रेणी संबंधित कीती प्रतिसाद त्यांनी दिलेत ते पहा जरा. त्याला किती उत्तरं दिली गेली आहेत ते पहा. सारखं तेच उगाळायचं आणि मुद्दामुन 'अनुल्लेखाचं धोरण' आहे अन ढमकं अन तमकं आहे करण्याला काय अर्थ आहे का?

बाकी माझा प्रतिसाद प्रतिसादकाच्या अनुशंगानेच आहे. ज्याला चुक वाटेल त्याने तशी श्रेणी द्यावी. सुविधा त्याच करता आहे.

>>>श्रेणी संबंधित कीती प्रतिसाद त्यांनी दिलेत ते पहा जरा. त्याला किती उत्तरं दिली गेली आहेत ते पहा. सारखं तेच उगाळाय>>> म्हणजे? किती सन्ख्येने प्रतिसाद द्यावेत यावर देखिल काही मुल्यान्कन आहे की काय? मला कसे माहित नाही? इथे कसे कुठे दिसत नाही? की त्या सन्ख्यात्मक मुल्यान्कनाला तुम्हाला नेमले आहे? काही कळत नाही बोवा!
बाकी, माझे प्रतिसाद व येथिल वावर जर या संस्थळाच्या चालकान्ना आक्षेपार्ह वाटला तर त्यान्नी मला इथे जरुर जाहिररित्या सान्गावे/हवे तर अन्तर्गत निरोपाद्वारे सान्गावे, मी तत्काळ हे संस्थळ सोडून जाण्यास तयार आहे. तुम्हांस हवे तर तशी विनन्ती (म्हणजे मला जायला सान्गण्याबद्दल) तुम्हीही चालकांकडे करु शकता! नै का? पण उगाच नको तिथे शेळीच्या लेन्ड्या नि फिन्ड्या सारखे किळसवाण्या उपमा देत जाऊ नका बोवा.

श्रेणी संबंधित कीती प्रतिसाद त्यांनी दिलेत ते पहा जरा. त्याला किती उत्तरं दिली गेली आहेत ते पहा.

तुमच्या मुद्द्यांशी सहमत आहेच. माझा आ़क्षेप फक्त वैयक्तीक टिपणीविषयीच होता. विनाकारण वातावरण गढूळ करणे नकोसे वाटते इतकेच. Smile
बाकी आमचे कर्ममूल्य आम्हास राखून ठेवायचे असल्याने श्रेणी अद्याप देत नाही.

------------------------
घणघणतो घंटानाद

वातावरण गढूळ करणे याला म्हणतात: लिंबूटिंबूची वाक्यं खाली देत आहे.

१. नविन युजर्स ना, -१ बद्दल अन्धारातच ठेवायचे असेल तर अवघड आहे.
२. भन्नाटे एकुणातच कल्पना.... अनुल्लेख करायची येवढी सुन्दर तान्त्रिक सुविधा मी आजवर कुठल्याच साईट वर पाहिली नाहीये
३. मात्र "श्रेणी" प्रकारात कम्पुशाहीचा धोका कुणी कुणी व्यक्त केला होता, त्यात बरेच तथ्य असू शकते हे ध्यानात घ्यावे.
४, मला काय हे श्रेणी वगैरे द्यायचा "अधिकार" नको बोवा!
५. लपुन लपुन श्रेणी देणे म्हणजे मला कुणाच्या पाठीमागे लपुन बसुन त्याला खडा मारल्यागत वाट्टय,

हे असे प्रतिसाद वारंवार देण्याचा उद्देश काय आहे हे वेगळे सांगायला नको. राहिला मुद्दा मंद वगैरे म्हणण्याचा तर, आय कान्ट हेल्प इट. जे वाटलं ते म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, इथं तर नाहीच नाही.

सहमत आहे हो.
त्यांना कर्ममूल्याची संकल्पनाच अजून नीट समजली नाही तर त्याला ते तरी काय करणार.
image

------------------------
घणघणतो घंटानाद

>>>> राहिला मुद्दा मंद वगैरे म्हणण्याचा तर, आय कान्ट हेल्प इट. जे वाटलं ते म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, महाशय, माझी वेगवेगळ्या पोस्ट्मधिल निवडक वाक्यान्ची (मागिलपुढील पोस्ट्सचा सन्दर्भ टाळून) जन्त्री टाकण्याचे येवढे कष्ट घेण्या ऐवजी, आपलेच वरील वाक्य व त्यातिल ठळक केलेला मुद्दा.... केवळ स्वतः करता लावुन वापरण्याशिवाय, मज पामराकरता देखिल लावला असतात तर आभाळ कोसळल नस्तच, शिवाय जन्त्री करायचे कष्टही वाचले अस्ते! कसे ते सान्गतो.
तुम्ही दिलेल्या वाक्यान्ची जन्त्री मी नाकारत तर नाहीच, पण केवळ आयकाण्टहेल्पइट असे म्हणून झटकुनही टाकत नाही. ती ती वाक्ये, संस्थळाच्या धोरणाबद्दल सध्या दिसणार्‍या/जाणवणार्‍या बाह्य रुपामुळे कशाप्रकारची मते बनू शकतील याची निदर्शक म्हणूनच, अन मलाही काही एक वाटले म्हणूनच लिहीली आहेत. संस्थळचालक त्यातुन योग्य तोच बोध घेतील न की वैयक्तिक टीकाटिपण्णी करतील याची खात्री आहे.

मुलांनो आणि मुलींनो, वादावादी थांबवा. लवकरच याचं डॉक्यूमेंटेशन लिहून प्रसिद्ध करते आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इतकाच माझा मन्दपणा जाणवत असेल अन माझे प्रतिसाद शेळीच्या लेन्ड्यासारखे वाटत अस्तील तर सढळ हस्ते मायनस वा कसल्या त्या "श्रेणी" द्या ना! कुणी अडवलय? की कर्ममूल्य सम्पल तुम्च??? लिहून बोलुन कुणाला कस्ली मर्दुमकि दाखवताय? असो. चालुद्यात तुमचं

जर ही बाय डिफॉल्ट सुविधा -१ ला सुरु ठेऊन, युजरला त्यात हवा असेल तर बदल करुन घेईल, असे धोरण ठेवले तर आक्षेपाला जागा उरणार नाही.

हे ठीक वाटतंय..

तरीही वापर करु लागल्यावर लवकरच वापरकर्त्याला हे सेटिंग कळेलच असंही वाटतं. तोपर्यंत निरर्थक प्रतिसादांपासून त्याचा "बचाव" (?) होईल.. Smile म्हणून बाय डिफॉल्ट +१ ठेवला असावा.

तरीही डिफॉल्ट -१ ठेवण्याविषयी प्रवर्तकांनी विचार करायला हरकत नाही.

>>> तरीही डिफॉल्ट -१ ठेवण्याविषयी प्रवर्तकांनी विचार करायला हरकत नाही. अनुमोदन Smile
(मूलभूत प्रश्न आहे, स्पःष्ट शब्दात काहीएक आक्षेप घेणे/तृटी दाखविणे म्हणजे गुन्हा अस्तो का?)

शेळीच्या लेंड्या निरर्थक असतात हा जावाईशोध लावल्या बद्दल
अखिल भारतीय बोकूड महासंघा तर्फे जाहीर निषेध!

हे बघा शेळीच्या लेंड्यांचे उपयोग अन त्यावर किती लोकांची उपजीविका चालते ते Blum 3

आपला,
बोकूड (लिव्हर फ्राय) प्रेमी, आडकित्ता

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

पाने