आणि मी कुडमुड्या ज्योतिषी बनलो..

नव्वद ब्याण्णव असं काही तरी साल असेल. मला पुण्याला भेट द्यायला फार आवडायचं. लक्ष्मी रोड वर नामांकित ज्योतिषांकडे भविष्य पाहणे, तुळशीबागेत नुसतं भटकणं, सारसबाग, पर्वती, संभाजी उद्यान वेळ मिळेल तिकडे भटकणं आणि खादाडी करणं हा सोलो प्रोग्राम असायचा. पिएमटीने कमी पण पायी खूप फिरायचो.
मला नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू पहिल्या पासून खूप आवडायच्या. लहान रेडिओ, घड्याळं, विजेऱ्या अशा वस्तूंच्या शोधात मी कॅम्प मध्ये सायंकाळी भेट द्यायचो. अरोरा टॉवर परिसरात सायंकाळी रस्त्यावर असे विक्रेते स्वस्तात अशा गोष्टी विकायचे. आजकाल कुठेही चायना इलेक्ट्रॉनिक व इलक्ट्रीक वस्तू मिळतात. पण तेव्हा अशा गोष्टी लवकर मिळत नव्हत्या. कस्टमचा माल ( जप्त केलेला) असे काही लोक सांगत. तर अशाच एका सायंकाळी मला तो तिथल्या फुटपाथवर भेटला. तो म्हणजे किरो.
किरोचं वर हाताचा पंजा छापलेले ते पुस्तक होते. पामिस्ट्री व अंकशास्त्र व इतर माहिती असलेलं जाडजूड इंग्रजी मधील पुस्तक शंभर रुपयांत मिळालं.
काहीतरी घबाड सापडल्यासारखं पुस्तक घरी घेऊन आलो. मग काय अभ्यास चालू केला. हाताचे प्रकार, पर्वत, आयुष्य, हृदय, मस्तक,लग्न रेषा, धनरेषा हळूहळू समजून घेतलं. जोडीला जन्मांक, नामांक, कोणत्या महिन्यात जन्म झाला तर त्याची वैशिष्ट्ये, शुभ अंक, रंग,रत्न याची माहिती चांगलीच आत्मसात केली.
मग सहजच शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या हाताचं निरिक्षण करून त्यांना ठोकताळे सांगायला सुरुवात केली. जोडीला दाते पंचांग विकत घेऊन अवकहडा चक्र, नक्षत्र, तिथी याचीही माहिती करून घेतली होतीच.
गंमत, खेळ म्हणून उगाचच मित्रांचे हात पाहून तुझ्या आयुष्यात चांगले घडणार आहे अशा बाता मारायला चालू केले. जन्म तारीख विचारुन साधारणपणे पुस्तकात दिलेल्या आजारांना बळी पडण्याची शक्यता लक्षात घेऊन तुला असा असा त्रास होतो ना? तो हो म्हणे. मग मी हे पदार्थ खाऊ नको ते खा असा सल्ला देई. बहुतेकांना प्रेम, लग्न या गोष्टींविषयी फारच उत्सुकता असायची. मग करंगळीच्या तळाशी असलेल्या आडव्या लग्नरेषा, त्यांची लांबी, हृदयरेषा वगैरे बघून भविष्य सांगायचो. खूप भरभराट होईल, चांगला जोडीदार मिळेल असे पॉझिटिव्ह भविष्य फक्त सांगायचो. कुणाची आयुष्य रेषा तुटलेली असो किंवा धनरेषा कमकुवत असो चांगलंच होणार आहे हे ठोकून द्यायचो. फुकटात भविष्य सांगतो म्हटल्यावर बरेच गावातले लोकं याला भविष्य सांगता येतं अशी कुजबुज करायचे. काही महिला भाऊ पाह्यनारे मला मुलगाच होईल ना ? असे विचारीत.
कुणी आत्मविश्वास कमी असलेली मुले पास होईन का हे विचारायचे.
मला ज्योतिष नीट कळतही नव्हते नि एखादा गुरुही केला नव्हता. हळूहळू मी लोकांना फसवत आहे ही भावना निर्माण झाली. आतून पोकळी जाणवत होतीच. मलाही सारखं या गोष्टींचं वेड लागल्यासारखे झाले होते. सहदेव भाडळी, इंद्रजाल सारखी पुस्तकं वाचून नको तिकडे पाय पडायला लागले होते. नकळत कुणाच्याही हाताचं विश्लेषण करणं, मुहूर्त पाहून कामे करणे, ठराविक नक्षत्रावर काही तोडगे करून पाहणे याचा चाळा जडायला लागला असं वाटल्यावर एके दिवशी ती पुस्तकं आडबाजूला टाकून दिली व परत कोणाला ज्योतिष सांगितले नाही.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ग्रहांचे कार्यकत्व ,स्थानविशेष अभ्यासा. बऱ्यापैकी कुडमुड्या होता येतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद आ'बाबा. मी ज्योतिष विषय कानामागे टाकून दिला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

मलाही असंच - आतून पोकळी वगैरे - वाटतं.

पण आमचं षास्त्र सरकारमान्य आहे; कारण आमच्या ‍षास्त्रात आपल्या भाकीतांमधल्या त्रुटी सांगितल्या नाहीत तर फाऊल मानतात. 'मेरे मन को भाया' प्रकार चालत नाहीत. मी वर्तवलेलं भाकीत आणि बॉसनं मांडलेलं भाकीत ह्यात उन्नीस-बीस फरक आला तरी आम्ही बसून असं का होत असेल ह्याचा विचार करतो. वगैरे. षास्त्र असतंय ते!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्यवाद आदिती. स्टॅट थोडं फार शिकलो होतो. लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी एवढंच आठवत आहे. समेशन चिन्हासारखं काहीतरी समीकरणे होती.. समदं विस्मरणात गेलंय बघा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

प्रमोशनच्या वेळेस लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी activate करतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकंदरीत गाडी लायनीवर आली म्हणायची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

टाळ बोले चिपळीला - नाच माझ्या संग ।
देवाजीच्या दारी आज - रंगला अभंग ॥

सहदेव भाडळी , इंद्रजाल हे काय असतं? तंत्रमंत्र आहे की काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भूतकाल ओळखण्याची एक विद्या होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अह्ह्ह!! गॉट्चा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0