जिया खान आणि एका समुपदेशकाची फेसबुक भिंत

जिया खानची आत्महत्या यासंदर्भात सुलभा सुब्रमण्यम यांच्या फेसबुकवर काही रोचक आणि माहितीपूर्ण मजकूर मि़ळाला. त्यांच्या अनुमतीने हा स्वैर अनुवाद प्रसिद्ध करत आहे. सुलभा मानसोपचार-समुपदेशक म्हणून ठाण्यात काम करतात.

----

जिया खानच्या आत्महत्येच्या बातमीनंतर माध्यमांमधे छापून येणारी भाकितं आणि अंतहीन फेसबुकीय गॉसिपं वाचून मला एवढंच म्हणावंसं वाटतं, जेव्हा एखादी व्यक्ती मदतीसाठी स्वच्छ आणि स्पष्टपणे हाका मारत असते तेव्हा जवळचे नातेवाईक आणि मित्र नजर चुकवतात. त्यांना वाटतं हे सगळं आपोआप कमी होईल. कोणालाही तुमच्याशेजारी बसून, तिचा हात हातात घेण्याएवढा वेळ नसतो आणि त्यात रसही नसतो. हे सगळं नाटक सुरू आहे असं समजतात. दुर्लक्ष करणं हा उत्तम उपाय आहे असं वाटतं.

किंवा आपल्या अशा विचित्र आणि भावनापूर्ण वर्तनासंदर्भात काहीच्याकाही स्पष्टीकरणं देतात. या प्रकारचं नको तेवढं सरलीकरण करताना "असं सगळ्यांच्या बाबतीत होतं", अशा प्रकारे trivialise करतात. किंवा "ओह्ह, मलाही वाईट वाटतंय गं/रे". "हो पण तू असंतसं काही केलं आहेस का?"

तुम्ही मूर्ख असल्याचं भासवतात. अशा वर्तनामुळे आत्तापर्यंत जेवढी मृत्युला कवटाळण्याची इच्छा झाली नसेल तेवढी इच्छा निर्माण होते. प्रत्यक्षात तुमची आत्मघाताची इच्छा नसते... खरोखरच.

हरतर्‍हेने तुम्ही आक्रोश करता, "प्लीज, मला तुमचा थोडासाच वेळ हवाय. मला काय सांगायचंय ते ऐका. मला मदत करा." ते म्हणतात, "पुन्हा कधीतरी."

आणि तुमच्याबद्दल चर्वितचरण करतात, जसं काही तुम्ही विच्छेदनासाठी असलेली एखादी वस्तू आहात. काही(च्याकाही) तार्किक संगती लावतात आणि आपली जबाबदारी पार पाडली असं समजतात. वर पुन्हा आपण त्यांच्याप्रती कृतज्ञ असावं अशी अपेक्षा. safe, secure.. and suddenly strong.

तुम्ही काय करता?

तुमच्या सगळ्यात जवळचे लोकही तुमच्या दृष्टीकोनातून परिस्थिती पहात नाहीत, समजून घेत नाहीत आणि "चिंता करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे" असा दिलासाही देऊ शकत नाहीत. तेव्हा तुम्हाला खोल दरीत स्वतःला झोकून द्यावसं वाटतं ...

पण अशा वेळेस थोडं थांबा. उसंत घ्या. मन आणि शरीराची शक्ती एकवटून स्वतःच्या हिंमतीवर एखादं शिखर सर करा. आता तुम्ही मुक्त आहात.

----

त्यांच्याकडे अनुवादासाठी परवानगी मागितली असता त्यांनी आणखी थोडा मजकूरही पाठवला:

सोप्या भाषेत मानसशास्त्र सांगायचं तर रोजच्या बोलण्यातला नैराश्य हा शब्द दु:खभावना, low feeling असं असतं. आपल्याला प्रत्येकालाच असं अधूनमधून वाटतं. आपण त्याला तोंड देऊ शकतो ... पण कधीपर्यंत?

वैद्यकीयदृष्ट्या नैराश्य यात बरीच अधिक नकारात्मक भावना असते; व्यवस्थित व्याख्या असणारी एक मानसिक घटना. नैराश्य एखाद्या अचानक झालेल्या किंवा वारंवार उद्भवणार्‍या ट्रॉमामुळे होऊ शकतात. अशा घटने/घटनांमुळे ताण येतो आणि रुग्णाला त्याची किंमत चुकवावी लागते. काही मनोकायिक विकार, यात अन्य काही लक्षणं, विकार यांच्या जोडीने नैराश्य येतं, उदा: बायपोलर, स्किझोफ्रेनिया, OCD, इत्यादीसारखे मनोविकार किंवा मधुमेह, हृदरोग, क्षय, AIDS यांच्यासारखे शारीरिक आजार. यांचा दुष्परिणाम म्हणून नैराश्य येतं आणि इतर उपचारांच्या जोडीने नैराश्यावरही उपचार करावे लागतात. मर्यादेपलिकडे अशी भावना उद्भवणं 'थांबवता' येत नाही. आजाराच्या अगदी सुरूवातीलाच व्यावसायिकाकरवी किंवा प्रत्यक्ष रुग्णानेच यावर काम केल्यास (intervention) औषधांची आवश्यकता भासत नाही. अन्यथा औषधं टाळता येत नाहीत. औषधांमुळे विकाराचा सामना करणं शिकण्यासाठी पूर्वतयारी होते.

नैराश्य ही गोष्ट कोणी आपण होऊन निवडत नाही. अगदी निराश व्यक्तिमत्त्वं असणारे लोकही नाहीत. हा विचारांचा एक साचा असतो, जो मोडण्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं. एखाद्या कार्पेटखाली पसारा सारून द्यावा किंवा कचरा टाकून द्यावा तितक्या सहजरित्या हा साचा मोडता येत नाही.

लोकप्रिय चित्रपट आणि साहित्यात मनोविकार आणि रुग्णांचा वापर विनोदनिर्मितीसाठी केला जातो. अतिपरिचयामुळे सामान्य लोकही याकडे गांभीर्याने बघत नाहीत.

मला थोडा राग किंवा अस्वस्थता (anxiety) आली आहे, हतोत्साह वाटतं आहे असं म्हटलं तर लगेच आठवण करून दिली जाते, "हो पण तू तर समुपदेशक आहेस." जसं काही मी समुपदेशक आहे म्हणजे मी mutant आहे! मी अशा वेळेस म्हणते. "हॅलो? मी सगळ्यात आधी एक मनुष्यप्राणी आहे. मी समुपदेशक आहे म्हणून मी सामान्य माणसांपेक्षा माझ्या भावना अधिक चांगल्या पद्धतीने हाताळू शकते, योग्य मार्गावर चटकन येऊ शकते, आणि मानसिक उतारचढावांचा मला इतरांपेक्षा कमी त्रास होतो. कदाचित. पण महत्त्वाचं असं की मला मदतीची आवश्यकता आहे हे मला बरंच आधी समजतं. आणि सर्वात महत्त्वाचं, मी ते करते."

"आयुष्याचा एक भाग म्हणून दु:खाशी तडजोड करण्यातून समाधान मिळालेलं आहे. आपली जी काही असेल ती प्रतिमा न जपण्याचं स्वातंत्र्य आणि स्वतःच्या भावना व्यक्त करण्याचं धैर्य आपल्या मनातच असावं लागतं."

field_vote: 
4.2
Your rating: None Average: 4.2 (5 votes)

प्रतिक्रिया

सुलभाताईनी डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे . पण लक्षात कोण घेतो ? Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पोस्ट मार्मिक आहे. बर्याचदा लोकं मदत करण्याऐवजी अजुन जास्त खायीत लोटुन देतात. आणि परत दुटप्पी/दांभिकपणा आहेच. त्यामुळे नैराश्य आलेल्यांनी इतरांकडे जाण्यापेक्षा स्वतः किँवा व्यवसायीक सल्ला घेणच योग्य वाटतं.
नैराश्याची लक्षणं आणि स्वनियंत्रणच्या पायर्या कुठे मिळतील का? आणि या पोस्ट ची चेपु लिँक पण हवीय शेअर करायला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चांगला आणि ग्राह्य लेख. विचार करण्याजोगा!
इथे अनुवाद केल्याबद्दल आभार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काही दिवसांपूर्वी सुलभाताईंशी समक्ष भेट झाली होती, या विषयाच्या आजूबाजूने बरीच चर्चा झाली होती. (म्हणजे मी मुख्यत: ऐकत होतो) ते आठवलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनुवादाबद्दल आभार. असे जजमेंटल लोक लै डोक्यात जातात, पण साला लक्षात कोण घेतो? Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अनुवादाबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जुई

अजून एक आचरटपणा म्हणजे - भूत लागणे असे समजणे ...... सुशिक्षित लोक या समजात मागे नाहीत Sad
काहीतरी घिसाडघाईचे निष्कर्ष काढून आपली कातडी बचावायची. बस एवढच. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विचार वाचनीय आणि मार्मिक आहेत. अनुवाद दिल्याबद्दल धन्यु!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

मानसिक-आरोग्य शिक्षण ही गोष्ट गांभीर्याने घ्यायला हवी !!! शाळांतून नीतिमूल्यशिक्षण की कायतरी सुरु झालं होतं मागे..त्यात संवेदनशीलता वगैरे प्रकार शिकवतात असं ऐकून होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

मूळ स्टेटस अपडेट

एका समुपदेशकाची चिडचिड अशा अर्थाचं एक मुक्तछंदातलं काव्य सुलभा यांनी पाठवलं आहे. ते इथे
We also bleed.
And actually it’s bloody Red blood.
They say you have no licence to feel;
Anger, sadness, loneliness, longing,
Confusion, hurt, fear… nothing!
You’re into ‘Mental Health’, aren’t you?!
So you can’t cry frustrated tears or mutter angrily.
That’s for all of us; the ‘others’:
The free souls who can crib, lash out,
Throw tantrums, feel indignant or morose—
With shame, or fear, or remorse.
And demand to be understood, pampered and forgiven.

But YOU,
the Mental Health Professional…
You have no business feeling blue,
Or have a ‘cuddle’ need.
No trouble allowed in your relationship; you must cope --Always.
And no, you have no right to ‘empathy’.

Guess what!
We actually ARE Human- feeling flesh & blood,
Who may be able to keep it on ‘hold’,
While we attend to ‘those in need’.
But when that’s done—we can bleed too.

The only difference is that we Know--- well, mostly;
We know when it’s coming and what’s to be done,
Who to go to for help, and how much to bear;
How not to let it demolish you to tatters,
And how to rebuild yourself, while still caring for others.

So give yourself a chance, my friends….
We owe it to ourselves.
We’re Human too.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा लेख वाचल्यावर मनात आलेले काही विचार.

उपचारांकरता, मुळात आपल्याला मदतीची गरज आहे, हे नैराश्यग्रस्त व्यक्तीला पटणे ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे.
सहसा मदतीची अपेक्षा जवळच्या व्यक्तींकडून केली जाणे हे स्वाभाविक समजले जाते, पण नैराश्यग्रस्त व्य्क्तीच्या बाबतीत असे घडतेच असे नाही.
१. जवळच्या व्यक्तीकडे या प्रकारचे नैराश्य समजून घेण्याची/मदत करण्याची कुवत असतेच असे नाही.
२. जवळच्या व्यक्तींपासून हे नैराश्य लपवले जाते किंवा मदत मागितली जात नाही कारण मदत मागण्यात लाज/कमीपणा/अपराधी वाटत असते. अशावेळी तुलनेने दूरच्या किंवा नवीन ओळखीच्या व्यक्तीकडे मन मोकळे करणे सोपे वाटते. अर्थातच यात जवळची व्यक्ती दुखावली जाते आणि नात्यात तेढ निर्माण होते. मदतीचा एक रस्ता कदाचित कायमचा बंद होतो.

अनेकदा नैराश्यग्रस्त माणसाची इतरांनी आपले म्हणणे केवळ ऐकून घ्यावे (ते म्हणणे त्यांच्या समस्येबद्दलच असेल असे नाही, माझ्या एका सहकार्‍याला बायपोलर डिसऑर्डर होती, सहवासाने कुठला आपला ऐकून घेण्याचा दिवस आहे हे मला समजायला लागले होते.) व 'तू ही माणूसच आहे, चुका माणसांकडूनच होतात' हे ऐकवावे अशी अपेक्षा दिसते. आपल्याला थोडे अधिक महत्व द्यावे असेही त्यांना वाटत असते. त्याकरता ते आपले नैराश्य झाकून आपण खूप मनमिळाऊ, खिलाडू, हास्यविनोदात रमणारे सोशल वृत्तीचे आहोत असे भासवत असतात. त्यामुळे इतरांची दिशाभूल होते व त्यांना समजून घेण्यामधे अडचण निर्माण होते.

सुदैवाने मला कधी इतके निराश कधी वाटले नाही. पण प्रसंगी जेव्हा उदास किंवा लो वाटते, तेव्हा माझे छंद उपयुक्त वाटतात. नियमित व्यायामानेही खूप फायदा होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बायपोलर मध्ये "मॅनिया" फेझ मध्ये अतिशय उत्साही व फोकस्ड वाटते. पण अति मॅनिया असेल तर खूप चीडचीड होते. हाच लंबक जेव्हा नैराश्याकडे झुकतो तेव्हा उदास व होपलेस वाटते. तदनुसार या माणसांची अभिव्यक्ती बदलते. पण "वेल्-मॅनेज्ड" बायपोलर मध्ये हे सर्व मूड स्विंग्स औषधांनी व्यवस्थित आटोक्यात ठेवलेले असतात.

सानिया यांचे म्हणणे अगदी बरोबर अहे. या व्यक्तींबरोबर बरेचदा रहाणे खूप कसरतीचे असते..... विशेषतः जेव्हा औषध लागू पडलेले नसते तेव्हा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्टीवन फ्राय ने कालच २०१२ मध्ये आत्म्हत्या करण्याचा प्रयत्न केला होता अशी जाहीर कबूली दीली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय. एके दिवशी हा मित्र खूप आनंदी, उत्साही आणि आत्मविश्वासापूर्ण वाटे, तर दुसर्‍याच दिवशी अबोल, आत्ममग्न आणि इतरांपासून तुटलेला वाटे. सुरुवातीला हे समजून घेणे कठीण गेले, पण नंतर त्याच्या मूडचा अंदाज यायला लागला. त्याच्या व्यक्तिगत आयुष्यातही बरेच गोंधळ होते. त्याचे हे दुसरे लग्न. जोडीदाराचे तिसरे. शिवाय जोडीदाराचे स्वतःचे मानसिक असंतुलन होतेच भरीला.

पण "वेल्-मॅनेज्ड" बायपोलर मध्ये हे सर्व मूड स्विंग्स औषधांनी व्यवस्थित आटोक्यात ठेवलेले असतात.

सायकॉटीक ड्र्ग्सचा वापर या आणि इतर अनेक कारणांकरता होताना पाहिलेला आहे. हायपरअ‍ॅक्टीवीटीवर ताबा ठेवायला, वर्तणूकीवर ताबा ठेवायला(बिहेवियर मॅनेजमेंट), कामातली एकाग्रता वाढवण्याकरता आणि मसल रिलॅक्सेशनकरताही ही औषधे वापरताना पाहीली आहेत. या औषधांचे दुष्परिणामही आहेतच. पण अनेकदा औषधांचा वापर अनिवार्य असतो.

रुची, चित्रफितीच्या दुव्याकरता धन्यवाद. सवडीने पाहीन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनुवाद करुन पुढ्यात दिल्याबद्दल धन्यवाद.
मानसशास्त्र फार क्लिष्ट आहे, मनोरंजक ही आहे. अज्ञाताचा वेध घेण्याची माणसाची प्रवृत्ती मेंदूची एक अनाकलनीय सफर घडवून आणते. अच्युत गोडबोलेंचे मनात वाचतो आहे. हे पुस्तक मानसाशास्त्राची मनोरंजक सफर आहे. सुबोध जावडेकरांचे मेंदूच्या मनात वाचल्यावर श्रद्धा अंधश्रद्धां बाबत एक नवीन पैलू उमगतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अनुवाद करुन पुढ्यात दिल्याबद्दल धन्यवाद.
असेच.
अच्युत गोडबोलेंचे मनात वाचतो आहे
मीही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

मार्मिक पोस्ट.
या आय. पी. एच. मधल्या सुलभा सुब्रमण्यम का?

अदितीने दिलेल्या लिंका माझ्याकडे चालत नाहियेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पोस्ट विजीबिलीटी फक्त फ्रेँडसाठी आहे बहुतेक त्यामुळे चालत नाहीय.
ही लिँक चालेल बहुदा
https://m.facebook.com/story.php?story_fbid=589328257768155&id=229722830...
आणि हे सुलभाताईंच प्रोफाइल
https://m.facebook.com/sulabhas

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिसली.
थँक्स!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पोस्ट अत्यंत आवडली. अनुवाद केल्याबद्द्ल धन्यवाद!
प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कधी ना कधी नैराश्याचा सामना केलेला असतोच. येत्या काळात तर डिप्रेशन हा एक मोठ्या प्रमाणात होणारा आजार असणार आहे म्हणे. अमेरिकेसारख्या तथाकथित संपन्न देशातही याचे प्रमाण बरेच आहे असे ऐकून आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तथाकथित काय?
आहेच संपन्न .. जिकडे तिकडे आपल बुद्धी भेद करत डाऊट पेरत हिंडायच.

> अमेरिकेसारख्या देशातही याचे प्रमाण बरेच आहे असे ऐकून आहे.

असायला भारतात पण खूप आहे हो, पण रोजच्या जेवणाचे वांदे असल्यावर या गोष्टींकडे चोचले म्हणूनच बघितले जाणार. ऊगाच नाही मग लोक तथाकथित (येथे हा शब्द बरोबर बसतो बघा) बुवा बाईंच्या नादी लागत, ऊगाचच नाही लोकांच्या अंगात येत... काहीतरी आऊट्लेट पाहिजे असतो.

अमेरिकेने बाकीचे प्रश्न सोडवले म्हणून त्यांना याकडे लक्ष द्य्यायला वेळ तरी मिळ्तोय, काहीतरी खरखुर संशोधन करून आकडेवारी तरी जाहीर करतात म्हणून तुम्हाला वरच विधान करायला संधी तरी मिळते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरं आहे तुमचं. चूक झाली. अमेरिकेला जायला न मिळालेले असे बरेच डिप्रेस्ड लोक दिसतील तुम्हाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्टीवन फ्रायच्या बायपोलर बद्दल वर उल्लेख आलेलाच आहे पण त्याने या विषयावर बनवलेली,सिक्रेट लाईफ ऑफ द मॅनिक डिप्रेसिव्ह ही डॉक्युमेंटरी देखील फार चांगली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तीन मिनीटाची क्लिप ऐकून पुढे अजून ऐकायची उत्सुकता स्वस्थ बसू देत नाहीये. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद. डॉक्युमेन्ट्री रोचक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पूर्ण माहितीपट पाहिला. बरीच नवीन माहिती समजली.

आजूबाजूच्या लोकांना असे त्रास होत असतात आणि आपल्यापर्यंत येईपर्यंत आपल्याला त्याची पुसटशी कल्पनाही नसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खूप चांगला मजकूर. आवडला आणि अर्थातच पटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

डिप्रेशन हे प्रचंड त्रासदायक प्रकरण आहे. जर त्रास होत असेल तर सायकायट्रीस्ट / थेरेपीस्ट किंवा तुमच्या रेग्युलर डॉक्टरकडे जाउन मेडीकेशन घेतलं तर फरक पडतो.
If not overwhelmed by the depressive state could cause the suicide attempt or suicide..

मन मोकळं करणं अत्यावश्यक गोष्ट आहे. ब्लॉग लिहणे, मिपा , ऐसी वगैरे साईट्स वर लिहिणे, प्रतिसाद देणे वगैरे प्रकारांनी मनातल्या गोष्टींना वाट करुन देता येते. नाही तर जवळचा मित्र्/मैत्रीण असेल तर त्यांच्याशी बोला. तुम्हाला त्रासदायक असणार्‍या लोकांपासुन शक्य तितकं लांब रहा. जरा आजुबाजुला पाहीलं, न्युज पाहील्या तर लक्षात येतं की "जवळच्या" लोकांचा सेडीस्टपणा आत्महत्या, डीप्रेसीव्ह स्टेट्सला कारणीभुत ठरतो तेव्हा अशा लोकांपासुन दुर व्हा.

एक दुर्दैवी घटना इथे नमुद करावीशी वाटते : यशवंत कुलकर्णी याने आत्महत्या केली. त्याच्याशी बर्‍यापैकी बोलणं झाल्यावर कदाचित त्याला डीप्रेशन असावं असं वाटुन डॉक्टरकडे जाणे किंवा एखादे रीलेशन जोपासणे असे सल्ले दिले. बहुतेक आपल्याला डीप्रेशन आहे हेच मान्य न केल्याने ट्रीटमेंटचा प्रश्नच नाही अन त्यामुळेच त्याने आत्महत्या केली असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत आहे.

Spouse is your best friend to open up. पण जोडीदारच नसेल/जवळ नसेल/दुरावा असेल किंवा जोडीदारच कारण असेल तर अवघड होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अति डिप्रेस्ड माणसं अशा पद्धतीने स्वतःला संपवतात तेंव्हा त्यांच्या आप्तेष्टांचा त्रास एक प्रकारे कमीच होत असतो. तेंव्हा कधी कधी अशा आत्महत्या ही एक इष्टापत्तीच वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0