सांजवेळ

दिगूअण्णा खिडकीच्या बाहेर बघत बसले होते. खाली जी मुले खेळत त्यांना बघणे, दिवसभर रहदारी बघणे. हा त्यांचा नेहमीचा क्रम होता .दिवस तर कसाबसा ढकलला जात असे पण संध्याकाळ मात्र उदासवाणी असे. ह्या सांजवेळी दिगूअण्णा नेहमीच अस्वस्थ असत.

आतल्या खोलीत मालतीबाई जपमाळ ओढत बसे. ह्या जोडप्याची देखभाल करण्यासाठी कोणीही नव्हते. घरात पैसा होता पण मायेच कुणी नव्हत. दिगूअण्णाना मालतीबाई नि मालतीबाईना दिगूअण्णा इतकेच त्यांचे विश्व.

शेजारच्या सखारामबापूंचे भरलेल कुटुंब त्यांना नेहमीच मोहवत असे. सखारामबापूंची नातवंड दुपारी दिगूअण्णाच्या घरी येत तेव्हा दिगूअण्णा नी मालतीबाईना फार आनंद होत असे.

सखारामबापूंचा मुलगा बबन हा खरच गुणी मुलगा होता.दिगूअण्णाचा माधव आणि हा बबन एकाच वयाचे दोघेही एकत्रच शिकले पण शैक्षणीक प्रगतीत माधव हा नेहमीच वरचढ होता. दिगूअण्णाची साम्पतिक स्तिथी हि सखारामबापूंपेक्षा चांगली होती. निरनिराळ्या क्लास्सेस यांचा मारा करून माधव हा अभ्यासात चांगलाच पुढे आला होता. बबनची मात्र एवढी प्रगती नव्हती सखाराम बापूंच्या तुटपुंज्या मिळकती मुळे त्यांना बबनच्या शैक्षणीक प्रगतीकडे नीट लक्षच देता आले नव्हते.आणि बबनही शिक्षणात सामान्यच होता.

काळ आपल्या वेगाने पुढे निघून गेला माधव हा एक संगणक अभियंता झाला व अमेरिकाला जाऊन सेटल झाला तर बबन हा एका कंपनीत कारकून म्हणून कामाला लागला त्याने एका घरगुती मुलीशी लग्न केले व त्यांचा संसार सुरु झाला माधवनेही एका अमेरिकन मुलीशी लग्न केले व तो तिथेच स्थायिक झाला.

आज दिगूअण्णा जेव्हा दोन्ही संसाराकडे बघत होते तेव्हा त्यांना जाणवले कि ज्यावेळी माधवची शैक्षणीक प्रगती होत होती त्यावेळी ते आनंदात होते. परंतु आज मात्र तशी परिस्तिथी नव्हती

सखारामच्या कुटुंबाकडे पुरेसा पैसा नव्हता. तथाकतीत प्रतिष्ठेची साधने नव्हती. पण त्या घरात प्रेम होते, जिव्हाळा होता, कौटुंबिक सौख्य होते. बबन हा आपल्या आई वडिलांकडे लक्ष देई. घरात पैसे दिले म्हणजे आपले कर्तव्य झाले असे मानणाऱ्यापैकी बबन नव्हता. त्याला बढतीची जागा मिळत होती पण त्या साठी दुस ऱ्या राज्यात जावे लागेल अशी अट होती.

पण बबनने बढती नाकारली व आई वडिलांची सेवा करण्यासाठी तो येथेच राहिला. सखारामबापूंनी त्याला समजावले “बेटा, तू जा आमची काळजी करू नको. आम्ही काय पिकले पान. आज आहोत, उद्या गळून पडणार”. पण बबन म्हणाला, “बाबा, तुम्ही मला काटकसर करून शिक्षण दिलेत. तुमची सेवा करणे हे माझे कर्तव्य आहे. आज उतारवयात तुम्हाला नि आईला माझी गरज आहे. मी जास्त पैशांसाठी नि करीअरसाठी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही.तो कृतघ्नपणा होईल. करीअर पैसा ह्या गोष्टी निश्चितच मोठ्या आहेत. पण माझ्या आई वडिलांपुढे त्या मला तुच्छ आहेत. थुंकतो मी त्या जादा मिळणाऱ्या पैशांवर. जर मला आई वडिलांचा त्यासाठी त्याग करावा लागणार असेल.” मला माहित आहे बाबा मी लहान असताना जेव्हा आजारी पडे. तेव्हा तुम्ही नि आई रात्ररात्र माझ्या उशाशी बसून काढल्यात. आज तुम्ही वृद्ध झालात तुम्हाला आज माझी खरी गरज आहे, तर मी तुम्हाला सोडून कसा जाऊ. बाबा, मला जर कुणी गरीब म्हटले तर मला काही वाटणार नाही. पण पैशांसाठी आई वडिलांना सोडणारा कृतघ्न म्हटले तर मला माझीच लाज वाटेल, बाबा”.शेवटी त्याच्या हट्टापुढे सखारामबापू झुकले.

इकडे माधव अमेरिकेत सेटल झाला होता. आपल्याला नातू झालाय हे दिगूअण्णाना फेसबुकच्या माध्यमातून कळले. अनेक वर्षांनी त्यांना आपल्या मुलाला भेटायचा योग आला. ते सपत्निक अमेरिकाला गेले. आपली अमेरिकन सून नि नातवंडे त्यांनी डोळे भरून पाहिली.नातवाना हे आजी आजोबा बिलकुल आपले वाटले नाही. त्यांची छोटी नात तर आजीचे कुंकू, गळ्यातले मंगळसूत्र, साडी हा अवतार बघून एकाद्या परग्रहावरील माणसाला पाहावे तशी त्यांना पाहू लागली. एकदा मालतीबाईनी आपल्या सुनेला संकष्टीचा उपवास धरायला सांगितला. तेव्हा सुनबाई फक्त हसली. नंतर माधव आईला म्हणाला,”तिला पुन्हा असे काही सांगू नकोस.तिला ह्या गोष्टीन मध्ये अजिबात रस नाही”. मालतीबाई नाराज झाल्या. नातवान्शीही त्यांचे कधी जुळलेच नाही आजी बाबा आपल्या नातवाना अनोळखीच राहिले. माधव आपल्याला एकदाही इथे कायमचे राहायला या असे बोलला नाही हे दिगू अण्णांना चांगलेच खटकले.

शेवटी महिनाभर तेथे राहून दिगूअण्णा नि मालतीबाई परतले. तोच त्यांना आमंत्रण मिळाले सखारामबापूंच्या एकसष्ठीचे. दिगूअण्णा मागील महिन्यातच एकसष्ठ वर्षाचे झाले होते पण कोणालाच त्याची आठवण नव्हती. सखारामबापूंची एकसष्टी जोरात झाली. शंभर एक पान उठले. बबन सपत्निक आईवडिलांच्या पाया पडला.आपण आज जे यशस्वी आहोत त्यामागे आईवडिलांचा आशीर्वादच आहे हे त्याने ठासून सांगितले.

काटकसरीत थोड्या पैशात संसार करणारा बबन आज स्वताला यशस्वी म्हणत होता याचे दिगूअण्णाना कौतुक वाटले. दिगूअण्णानी सखारामबापूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व म्हणाले “सखाराम, आपण बालमित्र मी जीवनात नेहमीच तुझ्या पुढे राहिलो. तुझ्याहून जास्त पैसा कमावला. पोराला शिक्षण दिले, पण आज मला कळते कि, मी तो इसापनितीतला ससा आहे नि तो तू कासव, शेवटी शर्यत जिंकणारा. आज आपल्या ह्या जीवनाच्या सांजवेळी नक्कीच तू माझ्यापेक्षा सुखी आहेस तुझ्यासारखेच यशस्वी जीवन साऱ्याना लाभो हीच प्रार्थना.”

सखारामबापू भारावल्यासारखे दिगूअण्णाकडे पाहतच राहिले..

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

स्वतःच्या जीवनाचे साफल्य पोरांकरवी मोजण्याचा प्रकार लैच केविलवाणा वाटतो. वय झालं की मेंटॅलिटी इतकी लूजरछाप होते माणसाची??

यावर बहुतेक "तितक्या वयाचा झालास की कळेल" असे नेहमीचे उत्तर देतील लोक. पण वय होऊनही तशी मेंटॅलिटी नसलेले लोक पाहिल्यामुळे असा प्रश्न पडतो खरा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सखाराम, आपण बालमित्र मी जीवनात नेहमीच तुझ्या पुढे राहिलो. तुझ्याहून जास्त पैसा कमावला. पोराला शिक्षण दिले, पण आज मला कळते कि, मी तो इसापनितीतला ससा आहे नि तो तू कासव, शेवटी शर्यत जिंकणारा. आज आपल्या ह्या जीवनाच्या सांजवेळी नक्कीच तू माझ्यापेक्षा सुखी आहेस तुझ्यासारखेच यशस्वी जीवन साऱ्याना लाभो हीच प्रार्थना

आणि 'सखारामबापूंबरोबर' असं काही व्हावं हे खटकणारच, नाहि का?

स्वतःच्या जीवनाचे साफल्य पोरांकरवी मोजण्याचा प्रकार लैच केविलवाणा वाटतो.

पण पोरगं असं निघाल्याबद्दल 'आत्मपरिक्षण' करण्यास हरकत नाही, सश्याला फॅमिलीसाठी वेळच मिळाला नसणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि 'सखारामबापूंबरोबर' असं काही व्हावं हे खटकणारच, नाहि का?

हाहा, अगदी अगदी!!! विशेषतः कोब्रांच्या बालेकिल्ल्यात राहून शर्थीने खिंड लढवणार्‍या देब्राबद्दल तरी जास्तच Wink

पण पोरगं असं निघाल्याबद्दल 'आत्मपरिक्षण' करण्यास हरकत नाही, सश्याला फॅमिलीसाठी वेळच मिळाला नसणार.

आत्मपरीक्षण वैग्रे ठीक आहे हो. पोराच्या अचीव्हमेंटबद्दल जणू त्या स्वतःच्याच आहेत अशा थाटात मिरवणारे पालक पाहिले की लूजरपणाचा वास येतो, बाकी काही नाही. आणि मजा म्हणजे असे लोकच अशा पद्धतीचे मूल्यमापन जास्त करतात. "कमावले असतील हो बक्कळ पैसे, पण पोरं कशी निघाली बघा. नैतर आमची पोरं कुठे आणि त्यांची कुठे" छाप डायलॉग ऐकले की ती जळजळ स्पष्टच दिसते-यद्यपि कणवेच्या अति-थिन आवरणाखाली दडलेली असली तरीही. जन्मभर स्वतःचा वकूब काही नव्हता तस्मात पोराच्या आधारे मिरवणारे हे लॅकीज.

पोरांच्या बुद्धिमत्तेचा अभिमान वाटणे वैग्रे ठीके ओ, पण हे असलं काही पाहिलं की त्यांना विचारावंसं वाटतं, ***नो, आयुष्यभर तुम्ही असे काय दिवे लावले म्हणून आत्ता इतकी टिवटिव करताहात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

संकष्टी न करणारी सून नालायक असते ? आणि घरगूती मुलगी म्ह्णजे आदर्श ?? ही विभागणी काही पटत नाही.

काटकसर करणारा बबन स्वत:ला यशस्वी समजतो हे सखाराम बापूंच्या संस्कारांचे यश आहे. जर त्यांनी सुरवाती पासून 'शेजारचा माधव बघ , अमिरेकेला गेलाय ' असे (किंवा दुसरे काहीही) तुणतुणे वाजवीले असते तर बबन साठी आई - बाबां बरोबर राहाणे आनंद दायक राहीले नसते. सखाराम बापू आणि त्यांच्या पत्नी च्या चांगुलपणा बद्द्ल लिहायचे राहुन गेले आहे.

कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात. आजकाल जेष्ठांबद्दल सहानुभुती दाखवणारे लेखन करण्याचे फॅड आले आहे. त्यांनी दुसरी बाजू पण मांडावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भावनिक. चुकून मुक्तपीठावर आलो काय?
.
.
भावनिक लेख वाचून मनात भावनांचे उमाळे दाटून आले. ते असे :-
थबथबून येता भावना
सायंकाळी दाटे प्रीत हृदया
अळणी अळणी पाणी
साठले डोळ्यात अशी ही प्रेमकरणी

मज आठवे नमप्रसवा
जाई जुईचा वारा
तो रम्य ढग किनारी वसता
प्रसन्न वाटे शरीरा

सांजसंध्या प्रकटती मनकुसुम वेडावती
ओघळून माझे अश्रू जीवन सार्थवती

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सोनिया पर्व..सांजवेळ ... लढत राहा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||