इंग्रजांचा आपल्या देशावरील प्रभाव

इंग्रजांचे राज्य हे जुलमी होते. इंग्रज येण्यापूर्वी आपल्या देशात सोन्याचा धूर येत होता.शिक्षण, अर्थव्यवस्था संशोधन, साहित्य, विज्ञान ह्यात पारंगत असलेल्या भारतीय समाजाला अनेक परकीय राज्यकर्ते लाभले नि हे वैभव नाश होत गेले. इंग्रजांनी भारताची अपरिमित लुट केली. इथली साधन संपत्ती आपल्या देशात नेली. आपल्या स्वातंत्र्या सैनिकांनी जीवाची पर्वा न करता देशावरची हि गुलामगिरी नष्ट व्हावी म्हणून लढे दिले नि देश स्वातंत्र्य झाला.

जेव्हा एखादा परकीय देश दुसऱ्या एखाद्या देशावर बलपूर्वक राज्य करतो त्या देशाला गुलाम बनवतो तेव्हा त्या विजेत्या देशाच्या संस्कृतीची छाप हि गुलाम देशावर पडते त्या विजेत्या देशाचे अनुकरण मोठ्या प्रमाणात गुलाम देशातील जनता करू लागते कालांतराने तीच त्यांची संस्कृती होते किंवा त्यांच्या जीवनशैलीचा मोठ्या प्रमाणावर भाग बनते. इंग्रजांचे राज्य जुलमी होते ह्यात शंकाच नाही परंतु त्यांच्या राजवटीत जे काही लाभ आपल्या देशाला झाले त्यांची संस्कुती आपण कशी आत्मसात केली त्याबाबत.

सर्वप्रथम १८१८ साली पेशवाई रसातळाला गेली नि इंग्रजांचा अंमल संपूर्ण भारतभर पसरला. इंग्रज येण्यापूर्वी आपला देश हा एकसंघ नव्हता अनेक राजे राजवाडे होते ते आपले राज्य हा स्वतंत्र देशच मानत असत. त्यांच्या आपापसात लढाया होत एकमेकांचा भूभाग बळकावणे, संपत्ती बळकावणे, लढाया करणे ह्याकडे त्यांचे जादा लक्ष असे. नंतर इंग्रजांनी ह्या साऱ्या राजांना पराभूत करून आपले मांडलिक केले. व संपूर्ण देशभर त्यांचे राज्य सुरु झाले. इंग्रजांच्या राज्याचा एक फायदा असा झाला कि त्यामुळे आपला देश एकसंघ बनला. ह्यापूर्वी राज्यातल्या जनतेची निष्ठा हि त्याच्या राजाच्या पायी वाहिलेली असे इंग्रजांनी एक छत्री अंमल सुरु केल्यामुळे राजाच्या ठायी असलेली निष्ठा आपसूक निघून ती देशभक्तीत परावर्तीत झाली. त्यामुळे देश एक व्हायला फार मदत झाली.

पेशव्यांच्या दारूण पराभव हा १८१८ साली झाला नि १८५३ साली भारतात पहिली ट्रेन धावली. इंग्रजांनी राज्यकारभार हातात घेताच अवघ्या ३५ वर्षात इतकी प्रगती झाली कि भारतात पहिली ट्रेन धावली. ट्रेन चे आगमन हि विकासाची नांदीच ठरली. . इंग्रजी राजवटीत शिक्षण समाजाच्या सर्व थरापर्यंत जावून पोहचले,सतीची अमानवी चाल, रोगांच्या साथींचे निर्मुलन हे करण्याबाबत त्यांनी पुढाकार घेतला घेतला.

आपले सर्वांचे आवडते पेय चहा हे सुद्धा भारतात इंग्रजांमुळेच आले.

इंग्रजी भाषा हि त्यांनी साऱ्या जगाला दिलेली मोठी देणगी ठरावी. आज आपल्या भारतातही बहुसंख्य जनता हि आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्यापेक्षा इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्यात धन्यता मानते. ह्यातूनच ह्या भाषेची महती ध्यानी येते.

तमाम भारतीयांचा आवडता खेळ क्रिकेट हा हि इंग्रजांचीच देन. हा खेळ तर आपल्या देशात इतका लोकप्रिय झालाय कि त्याला धर्मही म्हटले जाते. क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना जनता हि क्रिकेटचा देव म्हणूनही संबोधते इतकी ह्या खेळाची लोकप्रियता आहे. भारतीय पारंपारिक खेळ दम तोडत असताना क्रिकेटची लोकप्रियता हि आश्चर्यचकित करते.

भारतीय पुरुषांचा जो आवडता पेहराव आहे शर्ट, प्यांट,टाय, सूट, कोट, बेल्ट,बूट हि सारी इंग्रजांचीच देन आहे.

भारताला अनेक राज्यकर्ते लाभले ते राज्यकर्ते आपल्या संस्कृतीचा प्रभाव ह्या देशावर टाकून गेले. इंग्रज भारतातून जावून जावून आज जवळपास ६७ वर्षे झालीत पण त्यांनी उमटवलेला त्यांच्या संस्कृतीचा ठसा हा मात्र पुसट न होता
ठळकच होत आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

>>इंग्रज भारतातून जावून जावून आज जवळपास ६७ वर्षे झालीत पण त्यांनी उमटवलेला त्यांच्या संस्कृतीचा ठसा हा मात्र पुसट न होता

इंग्रज भारतातून गेल्यावरसुद्धा त्या संस्कृतीचा प्रभाव पुसट झाला नाही याचे कारण इंग्रज नसून सिमिलर संस्कृती असलेली अमेरिका जगावर राज्य गाजवते हे आहे. अमेरिकेऐवजी जगावर अरबांचे राज्य असते तर हा हा म्हणता आपल्यावरचा इंग्रजी संस्कृतीचा प्रभाव ओसरून गेला असता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

इंग्रजांचे राज्य हे जुलमी होते.

इंग्रजांची दोन राज्यं होती. पहिलं ईस्ट ईंडिया कंपनीचं १८५७ पर्यंत, आणि दुसरा क्राऊन रूल (१८५७-१९४७)- म्हणजे राणीचा/राजाचा अंमल.

कंपनी सरकार जास्त क्रूर आणि अमानुष होतं. क्राऊन रूल त्यामानाने बरा होता. मुख्य म्हणजे लोकशाही मार्गाने दाद मागायची सोय होती. गैरकृत्याचे पडसाद उमटत असत.

अवांतरः
जालियनवाला बाग प्रकरणावर तत्कालीन युद्धमंत्री विन्स्टन चर्चिल पेटला होता. त्याची टिप्पणी.

"The crowd was unarmed, except with bludgeons. It was not attacking anybody or anything… When fire had been opened upon it to disperse it, it tried to run away. Pinned up in a narrow place considerably smaller than Trafalgar Square, with hardly any exits, and packed together so that one bullet would drive through three or four bodies, the people ran madly this way and the other. When the fire was directed upon the centre, they ran to the sides. The fire was then directed to the sides. Many threw themselves down on the ground, the fire was then directed down on the ground. This was continued to 8 to 10 minutes, and it stopped only when the ammunition had reached the point of exhaustion.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सचीनजी,
तसे आपण काँग्रेसचे. पण इथे आपण कॉंग्रेसवाले, भाजपवाले, पुरोगामी आणि प्रतिगामी यांना सुखावणारी आणि दुखावणारी एकेक ओळ टाकून एक विचित्र कॉम्बो बनवला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

भारतीय पारंपारिक खेळ दम तोडत असताना >>

हे धेडगुजरी मराठी असलेले वाक्य तुमच्या डोक्यातल्या मराठीने केव्हाच राम म्हटला असण्याचे दर्शवते.
पण "राम म्हणत असताना" असे लिहीले तर आपण सिक्युलर.......अर्रर्र......सेक्युलर असल्याचे कसे दाखवणार. म्हणून मग तुमच्या मराठीनेच दम तोडला Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतीय पारंपरिक खेळांना हिरवा रंग कसा काय दिलात? नै म्हणजे बाकी २ ठिकाणी रंगसंगती 'अचूक' आहे म्हणून म्हटलं Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सेक्युलर म्हणजे हिरवे, असे सुचविल्याबद्दल ब्याटोबा, तुमचा निषेध.
इतर दोन ठिकाणी अचूक आहे म्हणजेच, सेक्युलर= 'हिरवे'.
हिरवे भगवे असे करून या देशाचे तुकडे करू इच्छिणार्‍यांच्या विकृत मनोवृत्तीचा प्रचण्ड राग येतो.
रंगांबद्दल मंदबुद्धीने लिहिलेले वाक्य आहे असे म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

अर्र, यू क्रॅक्ड द रॉङ्ग नट, आडकित्ताजी! सारक्याझम हो सारक्याझम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आसंय व्हय ते!
मंग स्वारी बर्का, स्वारी.
राँग नट बद्दलच बोलायचं तर, उजव्याबरोबर डावंही - आयमीन ओल्याबरोबर सुकंही जळतं कधीकधी Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हा हा हा Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुमच्या रागाला विचारतो कोण Biggrin

रंगांबद्दल मंदबुद्धीने लिहिलेले वाक्य आहे असे म्हणतो.
हे वैय्यक्तिक शेरेबाजी असलेले वाक्य प्रशासकांना चालते का? चालत असावे हे गृहित धरुन त्याला उत्तर देऊ इच्छीतो.
आडकित्त्या, तुझे हे वाक्य विकृत मनोवृत्तीचे लक्षण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इतिहास विसरला असावा !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतीय पारंपरिक खेळांना हिरवा रंग कसा काय दिलात?

हान तेजायला. बाजार उठवणारा प्रतिसाद. काय स्साला निरिक्षण आहे !!!

बॅटमन, तुमच्या फॅनक्लब मधे मला अंतर्भूत करा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आदाब!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मोहोरून जाऊन आदाब वाचताच, ही आठवली -->

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

इंग्रजांचेच काय घेऊन बसलात, भारतीय संस्कृतीवरील शक, हुणांपासून ते पोर्तुगिझ, फ्रेंच यांचाही ठसा अजूनही दिसून येतो.
इतकेच काय ब्रिटीश संस्कृतीवरही अनेक प्रकारे भारतीय वास्तव्याचा ठसा दिसून येतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इतकेच काय ब्रिटीश संस्कृतीवरही अनेक प्रकारे भारतीय वास्तव्याचा ठसा दिसून येतो

ब्रिटिशांचेच काय घेऊन बसलात, इथे अमेरिकेत न्यूजर्शीतल्या एडिसनात गुजरात्यांनी भरलेल्या अपार्टमेंटकाँप्लेक्समधे कोणी वाट चुकलेला पांढरा माणूस कोणा स्वजातीय मित्राचा पत्ता विचारत आला, तर त्यास म्हणे 'इथे कोणी फोरेनर राहात नाही' म्हणून वाटेस लावलेनीत, आहात कुठे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फोरेनर शब्दाचा संदर्भ वाचून हसू आवरेना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अगदी असेच म्हणतो. हहहहहपुवा ROFLROFLROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पेशव्यांच्या दारूण पराभव हा १८१८ साली झाला नि १८५३ साली भारतात पहिली ट्रेन धावली
भारतात रेल्वे येऊ नये म्हणून पेशवे लढत होते हा नवीन साक्षात्कार झाला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमुक माणसाच्या तोंडी लागणार नाही असे कुठेतरी म्हटले होते. पण इतका अन-ओरिजिनल, जाँडिस्ड व्ह्यूपाँईंटवाला कुणी भेटला, तर नाईलाजाने काहींदा करावे लागाते.

हे पहा:

या प्रतिसादाचे टायमिंग पहा. वरील कॉमेंटचे पहा. अन यांच्या बुद्धीची झेप पहा.
वरील चित्र क्लिकेबल आहे.
असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

केला प्रतिसाद कॉपी. आवडला म्हणून डकवला इथे. काय म्हण्णॉय? आणि असलं तरी त्याला कोण विचारतो?
आणि कॉपी तरी कशावरुन केला? टायमिंग दाखवलं म्हणजे काय होतं? कशावरून मीच त्या व्यक्तीला प्रतिसाद पाठवला नसेल आणि मग मी इथे टाकला नसेल? दया येते तुझी रे दया येते.

तुझी मनोवृत्ती सगळीकडे सगळ्यांना माहिताय. तेव्हा फाट्यावर मारण्यात येत आहे.

(प्रशासक, पर्स्नल कमेंटला केलेले प्रतिउत्तर आहे हे. स्वतःहून केलेली टिप्पणि नव्हे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंग्रज आले म्हणून आपल्याला हे चहाचे सुख मिळाले. नाहीतर बसला असता गाईम्हशींचे धारोष्ण दुध पित...आहात कुठे..
आणि हो..शक्य असल्यास गॉड सेव्ह द क्वीन हे पण म्हणा बघू Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत.

समजा इंग्रज आलेच नसते तर 'चायवाला' नामक आयडी तयार झालाच नसता, नै Wink दूधवाला अथवा तत्सम कैतरी झाला असता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरंच कि, मोदीचे 'चहामते' जर त्यांना पंतप्रधान होण्यासाठी सर्वाधिक मदत करणार असतील तर अगदी मोदींचे पंतप्रधान बनण्याचे श्रेय (जरतारी) देखिल इंग्रजांना जाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इंग्रजांचे राज्य हे जुलमी होते. इंग्रज येण्यापूर्वी आपल्या देशात सोन्याचा धूर येत होता.शिक्षण, अर्थव्यवस्था संशोधन, साहित्य, विज्ञान ह्यात पारंगत असलेल्या भारतीय समाजाला अनेक परकीय राज्यकर्ते लाभले नि हे वैभव नाश होत गेले. इंग्रजांनी भारताची अपरिमित लुट केली. इथली साधन संपत्ती आपल्या देशात नेली.

अधोरेखित वाक्य पूर्ण खरे नाही. अर्धसत्य म्हणा हवंतर. कॉस्ट बेनेफिट अ‍ॅनॅलिसिस केल्यावर इंग्रजांना तोटाच झाला असे जेकब वायनर किंवा डियडर मॅक्लुस्की यांनी दाखवून दिलेले आहे. तो अ‍ॅक्च्युअल पेपर मी गेली अनेक वर्षे शोधतोय. या मुद्द्याचा जिक्र प्रथम फ्रिडमन सायबांनी एका व्हिडिओत केलेला होता. हा व्हिडिओ . फ्रिडमन सायबांचे वाक्य नेमके असे आहे - Colonialism has cost the mother country more to govern the colonies than the benefits they extracted from those colonies. याच्या जोडीला नील फर्ग्युसन यांनी ही ते स्वतः इतिहासात डॉक्टरेट करत असताना (ब्रिटन मधे) त्यांनी ही दुसर्‍या एका अर्थशास्त्र्याचा पेपर क्वोट करून असाच मुद्दा मांडला होता. नील फर्ग्युसन हे जन्माने ब्रिटिश आहेत पण आता अमेरिकन झालेत. तो ही पेपर शोधतोय मी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्थशास्त्र्यांचे क्लेम्स रोचक आहेत.

पण मग इंग्रजांनी भारताची लूट केली इ. दादाभाई नौरोजी, विलियम डिग्बी, इ. नी लिहिलेय ते याला कौंटर जात नै का?

शिवाय, इ.स. १७०० पासून इ.स. १९०० पर्यंत इंग्लंड व अन्य युरोपियन देशांची अर्थव्यवस्था वाढली तिच्यात कलोनिअलिझमचा काही हात नसणे तितकेसे पटत नाही. असो, हे तुम्ही म्हणताहात ते पेपर पहायला आवडतील. मिळाले तर कृपया अस्मादिकांसही धाडणेचे करावे ही इणंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नील फर्ग्युसन ह्यांचा पेपर ह्यांचा हाच पेपर तुम्हाला अपेक्षित आहे काय?

दादाभाई नौरोजींपासून सर्व भारतीय विचारवंत असे मानत आले आहेत की ब्रिटिश सत्तेने भारताचे शोषण केले आणि भारताच्या गरिबीचे ते एक प्रमुख कारण आहे.

ह्या विचारामध्ये आणि फर्ग्युसन ह्यांच्या प्रतिपादनामध्ये अंतर का आहे हे सुगम भाषेत समजावून सांगितल्यास वाचायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंग्रजांनी भारताची अपरिमित लुट केली. इथली साधन संपत्ती आपल्या देशात नेली.

अधोरेखित वाक्य पूर्ण खरे नाही. अर्धसत्य म्हणा हवंतर. कॉस्ट बेनेफिट अ‍ॅनॅलिसिस केल्यावर इंग्रजांना तोटाच झाला असे जेकब वायनर किंवा डियडर मॅक्लुस्की यांनी दाखवून दिलेले आहे.

समजा इंग्रजांना अंततः तोटा झाला असे वादाकरता खरे मानले तरीही इंग्रजांनी भारताची अपरिमित लुट केली का नाही याच्याशी त्याचा काय संबंध? म्हणजे, अपरिमित लुट केल्यानंतरही त्यांना संपूर्ण हिशेब केल्यावर तोटा झाला असूही शकेल. हे म्हणजे एखाद्या वाईट राजासारखं असेल, म्हणजे प्रजेला लूटलंच शिवाय कारभार भोंगळ. नुकसान होईल नाहीतर काय होईल? -नि'ळी बाजू

ही फक्त शक्यता. बाकी पेपर/चर्चा वाचण्याकरता उत्सुक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कष्ट वाचवल्याबद्दल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समजा इंग्रजांना अंततः तोटा झाला असे वादाकरता खरे मानले तरीही इंग्रजांनी भारताची अपरिमित लुट केली का नाही याच्याशी त्याचा काय संबंध? म्हणजे, अपरिमित लुट केल्यानंतरही त्यांना संपूर्ण हिशेब केल्यावर तोटा झाला असूही शकेल. हे म्हणजे एखाद्या वाईट राजासारखं असेल, म्हणजे प्रजेला लूटलंच शिवाय कारभार भोंगळ. नुकसान होईल नाहीतर काय होईल?

तुमचं म्हणणं लक्षात येतंय माझ्या.

म्हणूनच मी अर्धसत्य हा शब्द वापरलाय.

१) मुद्दा असा असावा की - Assuming that the operations of the british Govt were not भोंगळ, the colonial enterprise still did not provide them a positive NPV. कारण फ्रिडमन नी मदर कंट्री असा शब्दप्रयोग केलाय.

२) तसेच भारतातून ब्रिटन कडे एक्सपोर्ट झालेल्या साधनसंपत्तीची व्हॅल्यू व ब्रिटन ने भारतास एक्स्पोर्ट केलेल्या साधनसंपत्तीची व्हॅल्यु यांचा लेखाजोखा मांडला तर भारतास ट्रेड डेफिसिट झालेला असला तरीही "ट्रेड डेफिसिट हा लूट असून समस्याजनक आहे" हा लोकांचा भ्रम असल्याने ....

आणि म्हणूनच तो पेपर शोधतोय मी. नेमके काय म्हणायचेय त्याबद्दल स्पेक्युलेशन करण्यापेक्षा ....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतातून ब्रिटन कडे एक्सपोर्ट झालेल्या साधनसंपत्तीची व्हॅल्यू व ब्रिटन ने भारतास एक्स्पोर्ट केलेल्या साधनसंपत्तीची व्हॅल्यु यांचा लेखाजोखा मांडला तर भारतास ट्रेड डेफिसिट झालेला असला तरीही

ब्रिटीशांनी भारताचा कच्चा माल नेऊन पक्का माल परत इथे विकला म्हणण्याचा नैतिक अधिकार सद्य भारतीयांस नसावा. म्हणजे trade deficit, import GDP ratio, composition of imports पाहून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Colonialism has cost the mother country more to govern the colonies than the benefits they extracted from those colonies.

व्यत्यास खरा मानणारा अर्थशास्त्री नाही असं अर्थशास्त्रात विधान नसावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.