मिळून तिघीजणी

अनघाने कंटाळून स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात पाहिलं. "साडेअकरा! अजून निदान पंधरा मिनीटं तरी थांबायला लागेल." हे सगळं स्वतःशी पुटपुटण्याचीही सोय नव्हती. तिचा ऑफिसमेट लगेच गप्पा मारायला लागला असता. तिने सवयीनुसार चष्मा काढला. खिशातून ताजा, धुतलेला रूमाल काढला आणि काचा साफ केल्या. तिला कालचाच संवाद आठवला.

"हिला चष्मा पुसायचं फेटीश आहे. चष्मा खराब झाला म्हणून तोंडाने तक्रार केली तरी हिला मनातून आनंदच होत असतो. आता चष्मा पुसायची "अधिकृत" संधी मिळाली म्हणून."
"म्हणूनच बहुतेक ही स्प्रिंकलर्स सुरू असले तरी तिथूनच चालत येते."
"नाही हं. केवढं उकडतंय. चार थेंब अंगावर पडले की बरं वाटतं."
"हे सगळे दाखवायचे दात..."

हे सगळं आठवून अनघाला हसायला आलंच होतं, पण तिने रोखलं. गप्पाड्या ऑफिसमेटची तिला दहशतच होती. शर्वरी आणि चांद्रेयीच्या आठवणीने अनघाने पुन्हा घड्याळाकडे पाहिलं. अजून दहा मिनीटं थांबायला पाहिजे. तिला तीन आठवड्यापूर्वीच त्या दोघींनी दम दिला होता.

"अनघा, तू किती लवकर फोन करून कटकट सुरू करतेस. तोपर्यंत कँटीनमध्ये त्यांनी मांचुरियनला फोडणीसुद्धा घातली नसेल."
"गप गं, मांचुरियनला फोडणी नाही घालत."
"हं, आंतरजालसाम्राज्ञी अनघा मॅडम मला स्वयंपाकशास्त्र शिकवणार... साडेअकरापासून जेवायचं नाव काढू नकोस. मला साडेबाराच्या आत भूक लागत नाही."
"पण तेव्हा रस्त्यावर, हॉटेलात गर्दी होते. थोडं आधी गेलं तर आपलाच वेळ वाचेल ना."
"ते ठीक आहे. पण साडेअकरा काय? अकराला चहा पिऊन पुन्हा साडेअकराला जेवायचं काय?"
"चांद्रेयी, तू फार उशीरा उठतेस. थोडी लवकर उठ आणि लवकर ये ऑफिसात. लवकर भूक लागेल."
"तुम्ही दोघी किती भांडता गं. आपण पावणेबारा-बाराला निघत जाऊ या. गर्दीही कमी असेल आणि चांद्रेयीला भूकही लागेल." शर्वरीने काढलेला मध्यममार्ग दोघींना मान्य झाला.

आज तिसरा बुधवार होता. दर तीन आठवड्यांनी, बुधवारी ऑफिसच्या कँटीनमध्ये दुपारचा मेन्यू काहीतरी भयंकर असायचा. म्हणजे मेन्यू तसा ठीकच असायचा, चायनीज. पण अन्नाच्या नावाखाली जे काही बनायचं त्याचा वासही चांद्रेयीला सहन व्हायचा नाही. शर्वरीला चायनीज आवडायचं नाही. अनघाची काहीही खायची तयारी होती. पण या दोघी बाहेर जाणार असतील तर आपणही का जाऊ नये, म्हणून अनघासुद्धा त्यांच्याबरोबर जेवायला बाहेर जायची.

अनघा शेवटी कंटाळून उठली. छोटी खोली वगैरे सगळं आवरूनही सात मिनीटं उरली होती. ती सरळ इमारतीच्या मुख्य दरवाजाशी जाऊन बसली आणि फोनवर फेसबुक उघडलं. तिचे बहुतेकसे फेसबुक मित्र 'अच्छे दिनां'च्या नावाने शंख करत होते. आणखी कंटाळून तिने 'पेजेस फीड' उघडलं. न्यू यॉर्क टाईम्समध्ये गमतीशीर बातमी होती, एक दिवसापुरता स्तनांचा आकार वाढवून मिळतो. तो सुद्धा मीठाचं पाणी वापरून. तिने हावरटपणे आख्खा लेख वाचला. मग पुढचा. 'आपली जाडी कमी झालेली मेंदूला झेपायला निदान सहा महिने लागतात,' असं काहीतरी शीर्षक होतं. ते 'टेड टॉक' होतं... न ऐकताच स्क्रोल केलं. तेवढ्यात सिक्यूरीटीवाल्याने तिला हाक मारली. "मॅडम, तुमच्यासाठी फोन आहे." शर्वरीचा फोन होता, जेवणासाठीच शोधाशोध सुरू झाली होती. अनघाने स्वतःचा फोन खिशात टाकला.

"हिला जेवणाची वेळ झाली की दोन मिनीटंही कळ काढता येत नाही."
"नाही गं. आज मी सकाळी लवकरच आले. एक बग परवापासून त्रास देत होता. मला शांतपणे त्यावर काम करायचं होतं. माझा ऑफिसमेट आला की काही काम धड होत नाही. तो प्रॉब्लेम सोडवला. मग पुढचं सगळं प्रकरण मार्गी लावलं. मग नवीन काही सुरू करायचा कंटाळा आला. मला ब्रेक हवाच होता. मी कधीची वाट पाहते आहे तुमची दोघींची."
"कुठे जायचं? नेहेमीचं कृष्णा नको. आज तेवढी भूक नाहीये. कुठेही चालेल यापेक्षा बरं उत्तर द्या," शर्वरी गाडीची किल्ली काढत म्हणाली.
"फार गर्दी नसेल तिथे कुठेही चालेल."
"सिझलर्स खायचं? बऱ्याच दिवसात खाल्लं नाहीये. शेअर केलं की फार होणार नाही."
"कोबेला जाऊ या. तिथे पार्किंग मिळेल बहुतेक."

"सिझलर्स शेअर करू या, पण ड्रिंक्स नाही हां. ती आपापलीच बरी."
"हां तर, काय वाचलंस तेवढ्या वेळात?"
"काही खास सांगण्यासारखं नाही. तुम्हाला दोघींना तर त्या बातमीचा काही एक उपयोग नाही. ब्रेस्टसाईझ एक दिवसाकरता वाढवण्याबद्दल बातमी होती. समज मी तसलं सलाईन टोचून घेतलं, २४ तास मिरवलं आणि मग परत ... "सांगे वडलांची किर्ती"."
"तुला काहीतरी सांगण्यासारखं दिसलं फेसबुकवर. माझ्या भिंतीवर मोदी, धर्मविरोधात शंख वाचून मला कंटाळा आला. किती दिवस तेच-ते बोलायचं. पाच वर्ष हे असे 'अच्छे दिन' येणार काय? मोदी चालेल पण मोदींबद्दल बोलणारे आवरा."
"ती सगळी टीका अस्थानी आहे असं म्हणत्येस का?"
"तसं नाही. पण ही टीकासुद्धा नाही. नुसती रँट असते. कंटाळा येतो."
"ते खरं आहे, मलाही कंटाळा येतो."
"ऑर्डर ठरवू या आधी."

एक व्हेज आणि एक नॉनव्हेज यावर एकमत झालं. अनघा कँटीनमधलं काहीही घासफूस खायची तरी शाकाहारी. शर्वरीला नुकतीच नॉनव्हेजची चटक लागली होती. चांद्रेयी चुकून माणूस म्हणून जन्माला आलेली. ती खरंतर वाघ किंवा सिंहांच्या घरात जन्माला यायची. पण हे फक्त खाण्यापुरतंच.

"तर मी परवाच 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' संपवलं. भारी आहे पुस्तक ते."
"कॉम्रेड डांगेंची प्रस्तावना वाचलीस का? ती ऑनलाईन नाहीये."
"अनघा, तुझ्याकडचं पुस्तक दे ना तेवढ्यापुरतं."
"जरूर. ऐका ना, माझ्या डोक्यात एक विचार आला. त्यात जे म्हटलंय पहा की फार्फार पूर्वी मातृसत्ताक पद्धत होती. तेव्हा बायका एकत्र रहायच्या. सगळ्या फीड करणाऱ्या बायका सगळ्या तान्ह्या मुलांना पाजायच्या. तर समजा, समजाच, आपली तिघींची एकाच वेळी डिलीव्हरी झाली तर आपण एकमेकींच्या मुलांना पाजू का? तुम्हाला काय वाटतं?"
"हं ... विचार करण्यासारखं आहे. असा काही विचार केला नव्हता मी. बहुतेक तुम्हां दोघींबरोबर मी घर शेअर करू शकेन. बेडरुमा स्वतंत्र. पण पोराबाळांचा विचार झेपत नाही मला. कोण पोरांपाठी धावत बसणार?"
"चांद्रेयी, एवढे हील्स आणि स्कर्ट्स घालून उसेन बोल्टसुद्धा धावू शकणार नाही. कल्पना करून पहायला काय जातंय तुझं? तुला खरंच काही करायला सांगत नाहीये कोणी!"
"मी पण कधी असा विचार केलेला नाही. मातृत्त्वाचं महत्त्व वगैरे सगळं मला ओव्हररेटेड वाटतं. पण दुसऱ्यांच्या मुलाला पाजणं ... मानवतावाद वगैरे ठीक आहे. पण ज्या मुलाची आई चांगली टुणटुणीत जिवंत आहे, त्या मुलाला पाजायचं हे ऑड वाटतं."
"शर्वरी, पण मुलाची आई म्हणत्येस त्या आम्ही दोघी असलो तर?"
"हे बरोबर आहे... करेनही कदाचित. हां, पण ज्या घरात तीन तीन तान्ही पोरं आहेत तिथे रहायचं म्हणजे रॅगिंग होईल पार."

तेवढ्यात जेवण आलं. थोडा वेळ फक्त सिझलर्सचा चुरचुरण्याचा आवाज येत होता. आणि मग तो सुद्धा बंद झाला. हातातला काटा टू-ओ'क्लॉक दिशेला उडवत अनघा म्हणाली, "शर्वरी, तुझ्याकडे बघतायत बहुतेक ते. चांद्रेयी, तू शेजारच्या टेबलावरची मिरी आण इथे, दिसेल तुला."
"माझ्याकडेच बघतायत कशावरून?"
"तुझ्यासारखी सुंदर, नाजूक, कमनीय ललना किती खात्ये हे पाहून त्यांचे काटे मोडले असतील"
"इश्श!"
"आवरा हिला."
"काय गं टवळे, मी खाते तेव्हा "कमर आहे का कमरा" म्हणून चिडवतेस मला. शर्वरी खायला लागली की फिगरची स्तुती."
"हे इथे किती इन्सुलेशन आहे ते पहा आणि मग बोल." अनघाचं बोट चांद्रेयीच्या कमरेपर्यंत पोहोचायच्या आत चांद्रेयीला काहीही करता आलं नाही.
"तू विषय बदलू नकोस. ती पोरं शर्वरीकडेच बघत असणार."
"'हर हायनेस'च्या डोक्यात रेडार बसवलंय हं. अॅक्यूरसी किती तुमच्या रेडारची, मॅडम? कामात त्या रेडारचा काही उपयोग होतोय का ते शोध आधी!"
"कमॉन! मी आणि चांद्रेयीसुद्धा तुझ्यावर लैन मारतो. तर मग ते तर ..."
"पुरुष आहेत असंच ना? मग त्यांना कुठे चेहेऱ्याचं पडलं असतं. पुरुषांना एकच गोष्ट दिसते."
"आत्ता आपल्या तिघींमध्ये कोणाचा अट्रॅक्टीव्ह दिसायचा काळ आहे?"
"म्हणजे?"
"अगं, ओव्ह्यूलेशन होताना म्हणे बाई पुरुषांना अधिक आकर्षक दिसते. त्याचा विचार करत होते मी."
"त्याचा काय संबंध? महिन्यातल्या कोणत्याही दिवशी शर्वरी आपल्यापेक्षा सुंदरच दिसते."
"तो उजव्या बाजूचा पहा. तो चांद्रेयीचा भाऊ शोभेल ना!"
"का, तू त्याला हळू चालताना पाहिलास का?"
"'गजगामिनी' असं सुंदर स्त्रीचं वर्णन करतात. अनघा, किती छळतेस तू तिला! ए, केस बघ ना त्याचे, चांद्रेयीच्या स्प्रिंगांसारखे कुरळे आहेत."
"तो चांद्रेयीकडे बघत असेल तर त्याला भेंच्योत म्हणणार का?"
"काय म्हणणार?"
"भे न च्यो त."
"भेंच्योत म्हणजे?"
"ए बाई, हळू बोल. आजूबाजूचे पळून जातील आणि हॉटेलवाला आपल्याला त्यांचं बिल भरायला लावेल."
"भेंच्योत म्हणजे बहिणीबरोबर झोपणारा."
"झोपण्यात काय वेगळं आहे?"
"अगं झोपणं म्हणजे नुस्तं झोपणं नाही. सेक्स. तू काय काल साईनफेल्ड पाहिलंस का काय?"
"तो दुसरा क्यूट आहे ना?"
"'चो-च्वीट' वाटतोय. तुला आवडला तर घेऊन टाक. पण साहिरला याच्याकडे पाहून अजिबात इनसेक्यूअर वाटणार नाही."
"ही बया कुठच्या कुठे पोहोचली. अजून दोन तासांनी मलापण याचा चेहेरा आठवणार नाही."

खालेल्ली ताटं उचलायला वेटर आला तेव्हा तिघी जमिनीवर आल्या. शर्वरीने टेबलावरचा फोन उचलला. तो पाहिल्यावर तिची चुळबूळ सुरू झाली. "मुलींनो, वाजले बघा किती! कामंधामं नाहीत का हाफीसात? निघा आता इथून. हला."

----

"तिच्यामारी! बारा वाजले हा झोल निस्तरताना. माझेपण. चल यार कुठेतरी बाहेर जाऊ या गिळायला. मिडवीक पार्टी करू."
"चल, आज साली माझ्याही डोक्याची हजामत झाल्ये."

"आजचा दिवस भारी निघाला यार. आम्ही भारी बाजूला बसलो. तू पोरींना पाठ दाखव."
"मी पण त्याच बाजूला बसतो मग."
"तिघं एकाच बाजूला?"
"आयला पोरींना समजलं का काय?"
"समजलं तर समजू देत. त्या पण इथेच बघतायत. चालू दिसतात."
"च्यायला, पण तीन मुली आहेत. ती हिरव्या ड्रेसमधली शकुंतला असणार."
"शकुंतला? ब्लाऊज गायब?"
"तू 'हम आप के'मध्ये अडकलास काय रे? एक शकुंतला आणि तिच्या दोन सखी"
"नाही यार. मला ती कुरळे केसवाली जास्त हॉट वाटते. ती शकुंतला असणार."
"आणि ढापणी?"
"कोणीही शकुंतला असली तरी ती ढापणी नक्कीच सखी असणार."
"बिल कोण देते आणि रिक्षावाल्याशी कोण बोलते त्यावरून समजेल."
"कसं?"
"बिल देईल आणि रिक्षा बोलावेल ती जास्त चंट असणार. ती शकुंतला, बाकीच्या सख्या."

----

घड्याळात पाहून शर्वरीची चुळबूळ आणखी वाढली. ती उठून टेबलाशेजारी उभी राहिली.
"तुम्ही कोणीतरी पुढच्या वेळेस बिल द्या. पैशांची देवाणघेवाण टळेल." चांद्रेयी बिलावर सही करताना म्हणाली.
"'हर हायनेस' चांद्रेयी मॅडमनी यावेळेस किती टक्के टिप दिली, २५, ३०, ५०?"
"आता निघा गं बायांनो इथून." हातातली किल्ली नाचवत शर्वरी करवादली.
"पुन्हा काय तो मगाचचा शब्द सांग... काय... भन ..."
"इथे मोठ्याने शिवी देऊ काय? गाडीत बसल्यावर सांगते."
"भेंच्योत."

----

"भेंच्योत? ही ढापणी शिव्या देत्ये? मला वाटलं होतं पोरींना शिव्या माहितसुद्धा नसतात."
"अर्थ माहित नसेल."
"अरे पण बिल कुरळ्या केसांनी दिलं. कार्ड वापरून."
"हिरवा ड्रेसवाली गाडीची किल्ली नाचवत्ये."
"बायकांच्या मनात काय चालतं हे पुरुषांना कधीही समजणार नाही."

----

"अनघा..." दारातून चांद्रेयीची हाक आली, तशी लांब ढांगा टाकत अनघा घाईने निघाली. मगाशी त्या ज्यांच्यावर कॉमेंट्स करत होत्या त्या पोरांचे चेहेरे आता एवढे बघण्यासारखे का झाले हे अनघाला आजतागायत समजलेलं नाही.

field_vote: 
3.166665
Your rating: None Average: 3.2 (6 votes)

प्रतिक्रिया

खिक्क..

ब-याच जणांनी बराच आणि ब-याच वेळा विचार केलेला दिसतोय एकूण.. प्रतिसादात जाणवले होतेच पण असे काहीतरी आल्याशिवाय राहूच शकणार नाही हेही तीव्र जाणवत होते.. म्हणून वाट पाहातच होतो..

हास्यास्पद असलेल्या आणि सरळ उत्तर देण्याइतपतही योग्यतेच्या नसलेल्या चिक्कार मनोरंजक आदि टाईपच्या प्रश्नावर बरेच काही उगवून आले की..

छानच..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तेवढ्यात सिक्यूरीटीवाल्याने तिला हाक मारली. "मॅडम, तुमच्यासाठी फोन आहे." शर्वरीचा फोन होता, जेवणासाठीच शोधाशोध सुरू झाली होती. अनघाने स्वतःचा फोन खिशात टाकला.

म्हणजे मोबाईल असतानाही सिक्यूरीटीकडे फोन करण्यामागचे रुपक काय आहे?

भेंच्योत

मधे त च्या ऐवजी द हवा असे वाटले, अर्थात बोली भाषेत शब्द/अक्षरे बदलतात पण 'द'मुळे अर्थ बदलणार नाही ह्याची खात्री वाटते.

पाच वर्ष हे असे 'अच्छे दिन' येणार काय? मोदी चालेल पण मोदींबद्दल बोलणारे आवरा."

Reductio ad मोदी

आणि हो, ही कथा बेख्डेल टेस्ट मधे नापास होत आहे बरं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गवि, भावना समजून घेण्याबद्दल आभार.

बेख्डेल चाचणीबद्दल विकिपीडियावरून -
In a 1985 strip titled "The Rule",[8][9] an unnamed female character says that she only watches a movie if it satisfies the following requirements:[4]

 • It has to have at least two women in it,
 • who talk to each other,
 • about something besides a man.[9][10]


(दोन किंवा जास्त) तीन स्त्री पात्रं आहेत, तिघींनाही नावं आहेत, बहुतांश वेळेस त्याच एकमेकींशी बोलतात आणि त्या पुरुष सोडून इतर बऱ्याच गोष्टींबद्दल आपसांत बोलतात; उदा: एकमेकींच्या सवयी, आजूबाजूच्या जगात काय सुरू आहे, इतिहासाचं पुस्तक, त्यातले तपशील, त्यातून सुरू केलेला thought experiment, शिवीचा अर्थ इ.

म्हणजे मोबाईल असतानाही सिक्यूरीटीकडे फोन करण्यामागचे रुपक काय आहे?
Reductio ad मोदी

मोबाईल असताना ऑफिसातले फोन वापरण्यात चतुर व्यवहार आहे. ऑफिसात मुळातच असलेला इंटरकॉम वापरला म्हणून ऑफिसला पैसे पडत नाहीत - नैतिकता आड येत नाही आणि मोबाईलचं बिल कमी येतं.
आणि खरंतर, मोदींचा कंटाळा हेच रूपक आहे; कसलं ते सांगण्यात गंमत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला कळली नाही Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो, ग्रेसच्या कवितेसारखं वाटलं -आवडतंय, पण समजत काहीच नाही.
बहुतेक मला अभ्यास वाढवावा लागेल..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो, ग्रेसच्या कवितेसारखं वाटलं -आवडतंय, पण समजत काहीच नाही.

'लेखन आवडले', म्हणणार नाही. समजले तर नाहीच, पण ते सोडून द्या. (फाइट मारून समजावून घेण्याइतका रस नाही.)

मला ग्रेसचे लिखाणही समजत/आवडत नाही. (टू बी फेअर, त्या वाटेसही गेलेलो नाही म्हणा.) त्यामुळे तुलनेशी सहमत आणि असहमत दोन्ही (एकसमयावच्छेदेकरून) आहे.

असो. आमचा पास.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इ का हय?

प्वोरांचे आडाखे चुकले हे वगळता मला बी समजली नाही.

सिझलर्सच्या उल्लेखामुळे उडालेलं लक्ष हेही कारण असेल.

_____
ते चुकतातच. इतिहास गवाह हय.
सिझलर्स शेअर करतात? ह्याट....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हा प्रतिसाद पाहिला नव्हता का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

BiggrinBiggrin आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

LOL!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गमतीदार संवाद आणि प्रसंग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रासंगिक आवडले. क्या कूल है हम सिनेमाचे नाव आठवले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile मजेदार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नावाप्रमाणे विक्षिप्त लेखन. आजच्या आधुनिक कन्यांच वर्णन, दिल्लीच्या पंजाबी कुड्या असत्या तर आणखीन शिव्या सहज खपवित्या आल्या असत्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"विक्षिप्त" काय ते कळले नाही.

आणि मराठी मुलींना फार शिव्या माहित नसतात असा समज असेल तर तो चुकीचा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे. सविता, मेघना भुस्कुटे, विक्षिप्त अदिती अशा मुली/स्त्रियांना भरपूर शिव्या माहित असल्या, आणखी शिव्यांबद्दल माहिती करून घेण्याची इच्छा असली तरीही तोंडात मर्यादित शिव्या असतात. शिव्या खपवायच्या असं ठरवेन तेव्हा पंजाबी कुडीला गोष्टीमध्ये आणेन. मराठी बोलणारी हवी असेल तर एखादी ठाणे-बेलापूर रोड मूलनिवासीसुद्धा चालेल. तिचं नाव अदिती, मेघना, सविता असंही असू शकतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सहज गंमत म्हणून प्रतिसाद लिहिला होता. बाकी दिल्लीत मी जिथे राहतो उत्तम नगर भागात लहान लहान पोरीसुद्धा भांडताना भयंकर शिव्या देतात कि मला त्या ऐकून हसू येत. बाकी माझ स्वत:बाबतीत म्हणाल तर जुन्या दिल्लीत बालपणी ज्या वाड्यात भाड्यावर राहायचो. तिथला घरमालक 'साला' शब्द सद्धा कुणा भाडेकरूच्या मुलांच्या तोंडून निघाला तरी बदडून काढायचा. त्यामुळे तोंडात कधी शिव्या आल्याच नाही. आमच्या सौ. चे बालपण सिख बहुल वस्तीत,त्या मुले लग्नानंतर कधी रागाच्या भारत तिच्या तोंडून बदमाश, हरामखोर इत्यादी नाजुक शिव्या ऐकल्या तरी मला भयंकर हसू यायचं. सहजच आहे काही वर्षात तिच्या तोंडून ही असे शब्द गायब झाले. बाकी कथा मस्त वाटली होती. आज पुन्हा वाचली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0