माझा "वाचक" मित्र आणि मी!

"निमिष, तू स्वत:ला काय मोठा तत्त्वज्ञानी समजतोस की काय?" माझ्या एका जुन्या परम मित्राने मला एकदा चिडून विचारले.

मी हसून म्हणालो, "का रे मित्रा? असे तुला वाटण्याचे कारण काय बरे?"

आम्ही पुण्यातल्या एका उपहारगृहात मस्त अमृततुल्य चहा घेत होतो. हा मित्र दहा वर्षानंतर प्रथमच मला प्रत्यक्ष भेटला होता.

मित्र चहाचा घुरका घेत म्हणाला, "कारण रोज मी पाहतो, सोशल मीडीयावर विशेष करून फेसबुक आणि व्हाटसएप वर किंवा इतर मराठी वेबसाइटवर तू सतत ज्ञान पाजळत असतोस.

आपण हे करायला हवे, आपण ते करायला हवे असे सांगत असतोस. मोठमोठे लेख लिहितोस. इतर मेसेज जास्त फॉरवर्ड न करता बहुतेक वेळा स्वत:च लिहीत असतोस. एव्हढा मोठा

तत्त्वज्ञानी झालास काय गेल्या दहा वर्षात? एवढं सगळं सुचतं तरी कसं तुला?"

मी स्मितहास्य करून म्हणालो, "हे बघ , मी लिहिताना असे थोडेच म्हणतो की मी तत्त्वज्ञानी आहे! "लेखक- निमिष सोनार - एक तत्त्वज्ञानी" असे मी थोडेच टाकतो लेखासमोर?"

"तसे टाकत नाही म्हणून काय झाले, पण लेखातून तर तू तत्त्वज्ञान शिकवत असतोस सर्वांना!"

"नाही! मुळीच नाही. लोकांना तत्त्वज्ञान शिकवण्या इतका मी कुणीच नाही मित्रा! मी जे लिहितो ते अनुभवातून आलेले असते, माझ्या किंवा दुसऱ्याच्या! तुला किंवा वाचणाऱ्या व्यक्तींना ते

तत्त्वज्ञान वाटतंय तर मग ते तत्त्वज्ञान असेलही!" मी डोळे मिचकावत म्हणालो.

"शब्द उलट सुलट करून मला गोंधळात टाकू नको!" थोडा शांत होत तो म्हणाला.

"शब्द हे शब्दच असतात. ते सुलटच असतात. घेणारा फक्त सुलट शब्दांचा उलट अर्थ घेऊ शकतो. बाकी काही नाही!" मी म्हणालो.

हे पटल्यासारखे वाटून तो पुढे म्हणाला, "पण मला एक सांग, की तू लिहितो ते सगळ्यांना सांगतोस पण स्वत: ते करतोस का? पाळतोस का? की फक्त लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि ..."

मी म्हणालो,"मित्रा, तूच वर म्हणाला त्यानुसार "आपण" हे करायला हवे, "आपण" ते करायला हवे असे मी लिहितो. लोकांनी असे करावे, तुम्ही असे करावे असे मी लिहीत नाही. आपण

म्हणजे त्यात मी सुद्धा आलोच की रे!"

"होय. तेही खरंच आहे. आणि तुझा मेसेज आला की तो मला वाचावासा वाटतोच! एक प्रखर आग असते बरेचदा तुझ्या लेखनात!"

"हे तर अधिक चांगले झाले. माझ्या लेखामुळे किंवा त्यातल्या प्रखरतेमुळे शंभर वाचकांपैकी एकाला जरी वैचारिक फायदा किंवा बदल झाला किंवा शंभरात एकाला जरी वाचून चीड आली

तरी माझ्या लेखनाचा उद्देश सफल होतो ना मित्रा! एका लेखकाला अजून काय पाहिजे? वाचकांच्या प्रतिक्रिया आणि त्यांच्यात थोडा का होईना वैचारिक बदल! एवढेच!"

मित्राला अजूनही काही शंका होत्याच...

तो म्हणाला," पण, एक सांग तू जे लिहितो, ते तुझ्याबाबत घडलं असलं पाहिजे, त्याशिवाय ते इतकं प्रखर तू कसं लिहू शकतोस?"

मी पुन्हा म्हणालो, "नाही. मुळीच नाही. असं जरुरी नाही की मी जे लिहितो ते सगळं माझ्या बाबतीत घडलेलं आहे. जर एखादा लेखक फक्त आपल्या बाबत घडलेलेच खूप ताकदीने लिहू

शकत असेल तर काय फायदा अशा लेखनाचा? मला संवेदनशीलतेमुळे एक अंत:स्फूर्ती, ऊर्मी आणि प्रेरणा मिळते तेव्हाच मी नीट लिहू शकतो."

"म्हणजे, मला समजले नाही?"

"हे बघ. मी थोडासा इतरांपेक्षा जास्त संवेदनशील आहे. एखादा टीपकागद असतो ना तसा! मला वाटते प्रत्येक लेखक हा संवेदनशील असतोच. लेखकच नाही तर चित्रकार, कवी आणि

कोणताही कलाकार, अभिनेता हे संवेदनशील असतात, किंबहुना ते असावेत. त्याशिवाय एखादा अभिनेता कुणा एका पात्राची भूमिका कशी वठवू शकेल बरे? त्या पात्राच्या सुख दु:खाशी

समरस झाल्याशिवाय! आणि समरस तेव्हाच होवू शकतो जेव्हा तो कलाकार संवेदनशील असतो. तसेच लेखकाचे सुद्धा असते. आणि मी सुद्धा आहे! आजूबाजूच्या वातावरणातील,

जगातील सूक्ष्म बदल माझे मन टिपते. अवतीभवती जे लोक असतात त्यांच्या मनात काय चालले असेल, ते सध्या कोणत्या परिस्थितीत आहेत मग ती चांगली असो अथवा वाईट हे मला

एखादे वेळेस त्यांनी न सांगताच काही वेळा कळते. काही वेळा ते सांगतात तेव्हा कळते. त्यांच्या सुख दु:खाला मी लेखनातून जगासमोर मांडतो. ते ही तेवढ्याच ताकदीचे लिखाण असते

जसे की ते माझ्यासोबतच घडले आहे!"

एक आवंढा गिळून तो म्हणाला "बापरे! एवढं सगळं असतं का आणि असावं लागतं का लेखकांमध्ये क.. क.. कमाल आहे तुझी बरं का निमिष!"

"माझी कमाल वगैरे काही नाही. संवेदनाशीलता आणि लेखनाची अंत:स्फूर्ती आणि प्रेरणा ही मला मिळालेली दैवी देणगी आहे. त्यात माझा काही रोल नाही. मी फक्त माध्यम आहे रे! दैवी

देणगीचा उपयोग केलाच पाहिजे!"

"वा! हे म्हणजे अगदी असं झालं की..."

"अरे जाऊदे! राहू दे! अजून एक गोष्ट आहे बरं का लेखनाच्या बाबतीत! कल्पनाशक्ती! जे कधीच आणि कुणाबाबतच घडले नाही तरी ते प्रत्यक्ष घडले असे लिहिता आले पाहिजे. म्हणजे

उदाहरणार्थ आपल्या काल्पनिक कादंबऱ्या! कदाचित तसे कधी घडणारच नाही. किंवा पुढेमागे घडेल सुद्धा! कुणी सांगावं?"

"हो! तुझी जलजीवा कादंबरी मी वाचली. खूप अद्भुत कल्पनाशक्ती वापरलीय त्यात तू! म्हणजे तुला असे म्हणायचे आहे की लेखकाकडे कल्पनाशक्ती सुद्धा आवश्यक असते

संवेदनशीलते सोबत?"

"हो. अर्थातच! " मी डोळे मिचकावत त्याला म्हणालो, "आता हेच बघ ना ! आपण कधी पुण्यात असे भेटलो नाही, चहा पिला नाही आणि आपल्यात असा काही संवाद सुद्धा झाला नाही,

तरीपण मी हा वरील संवाद लिहिलाच ना!"

"धन्य आहे बाबा तुझी!", असे म्हणायला ना तो मित्र तिथे होता ना मी!

कारण हा संवादच मुळात काल्पनिक आहे!!

"पण खरा असता तर तो नक्की असे म्हटला असता!!" डोळे मिचकावत मी माझ्या मनाशी म्हटले!!!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
2.166665
Your rating: None Average: 2.2 (6 votes)

प्रतिक्रिया

एक प्रखर आग असते बरेचदा तुझ्या लेखनात!"
का लेखकांमध्ये क.. क.. कमाल आहे तुझी बरं का निमिष!"
संवेदनाशीलता आणि लेखनाची अंत:स्फूर्ती आणि प्रेरणा ही मला मिळालेली दैवी देणगी आहे
तुझी जलजीवा कादंबरी मी वाचली. खूप अद्भुत कल्पनाशक्ती वापरलीय त्यात तू

जे ब्बात

सोनार काका, तुमच्या खालील गुणांपैकी फारच थोडे गुण ह्या संवादात आले आहेत. हे सर्व गुण कव्हर होतील असा एक संवाद लिहाना. कमीत कमी बोल्ड आणि अधोरेखीत गुणांबद्दल तर लिहाच लिहा.

----------------
स्वतःबद्दल काही
Artist
Connoisseur
Creative
Friendly
Imaginative
Leader
Life Long Learner
Literateur
Maverick
Motivator
Restless
Retaliative
Sensual
Stylish
Talkative
Tech-savvy
Versatile
Witty

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या सर्व गुणांची आद्याक्षरे गोळा केल्यास लेखकाचे नाव तयार होते का? नसल्यास फाऊल धरण्यात यावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

...की मी संवेदनशील नसावा कारण मी सेन्शुअल आहे म्हणून?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-वाचनस्तु
https://vachanastu.blogspot.in/
माझी वलय ही कादंबरी जरूर वाचा:
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/valay_nimish_sonar.pdf

सोनार साहेब, तुम्हाला दुसर्‍या कोणी सांगितले आहे का हो की तुम्ही "सेन्शुअल" आहात म्हणुन?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक तर तुम्ही माझ्या लेखाशी तुलना माझ्या व्यक्तिमत्व गुणधर्म यादी शी का करत आहात?
आणि तुम्ही सेन्शुअल चा नेमका काय अर्थ लावत आहात? अर्थ क्रमांक एक घ्या. दोन घेऊ नका!

Adjective: sensual
|sen-shoo-ul|

1. Marked by the appetites and passions of the body • music is the only sensual pleasure without vice • a sensual delight in eating

= animal, carnal, fleshly

≈ physical

2. Sexually exciting or gratifying • sensual excesses

= sultry

≈ hot

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-वाचनस्तु
https://vachanastu.blogspot.in/
माझी वलय ही कादंबरी जरूर वाचा:
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/valay_nimish_sonar.pdf

मला कुणी तसे म्हटले न म्हटले तरी त्याचा माझ्या वरील लेखाशी काय संबंध येतो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-वाचनस्तु
https://vachanastu.blogspot.in/
माझी वलय ही कादंबरी जरूर वाचा:
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/valay_nimish_sonar.pdf

तसा कशाशीच कशाचा संबंध नाहीये ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या मावेरिक प्रकारच्या विचारांमुळेच तर माझे लेख प्रवाहाविरुद्ध वाटतात आणि त्याला उत्तर म्हणूनच मी वरील लेख लिहिला आहे.!!

Adjective: maverick

|ma-vu-rik|

1. Independent in behavior or thought • maverick politicians
= irregular, unorthodox
≈ unconventional

Noun: maverick

|ma-vu-rik|

1. Someone who exhibits great independence in thought and action
= rebel

~ nonconformist, recusant

2. An unbranded range animal (especially a stray calf); belongs to the first person who puts a brand on it
~ calf

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-वाचनस्तु
https://vachanastu.blogspot.in/
माझी वलय ही कादंबरी जरूर वाचा:
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/valay_nimish_sonar.pdf

मस्त आहे.

विषय कसा सुचला? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला असे बरेच दिवसांपासून जाणवत होते की माझे सोशल मिडीया वरील अलीकडील काही लिखाण प्रवाहाविरुद्ध असल्याने बरेचजण त्याला नाक मुरडत होते पण मला तसे प्रत्यक्ष सांगायला धजावात नव्हते. पण मला ते संवेदनशीलतेमुळे जाणवले! आणि मी त्याना उत्तर देण्यासाठी हा संवाद-प्रपंच रचला.!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-वाचनस्तु
https://vachanastu.blogspot.in/
माझी वलय ही कादंबरी जरूर वाचा:
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/valay_nimish_sonar.pdf

प्रत्यक्ष सांगायला धजावात नव्हते

तुम्हाला कश्या शब्दात सांगितले की कळेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रवाहाविरुद्ध

उदाहरणार्थ? कोणत्या विषयावर?

मला वाटतं लोकं लेखाच्या 'टोन' ला रिस्पॉन्ड करतात, कंटेंट पेक्षा।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-वाचनस्तु
https://vachanastu.blogspot.in/
माझी वलय ही कादंबरी जरूर वाचा:
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/valay_nimish_sonar.pdf

कमाल आहे लेखनकौशल्याची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभारी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-वाचनस्तु
https://vachanastu.blogspot.in/
माझी वलय ही कादंबरी जरूर वाचा:
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/valay_nimish_sonar.pdf

'कोनाडयात दिवा ठेवणं आणि त्याच्यासमोर तोंड ओवाळणं' ही म्हण ऐकली आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इवलासा जीव आहे हो ह्या संस्थळाचा! करपून जाईल ह्या आगीने ते!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.