..थांबले ट्राफीक आता...

थांबले ट्राफीक आता.
माग लवकर भीक आता.

शांततेचा पॅक्ट झाला
वाढले सैनीक आता

जा पुरा व्यवहार झाला
तुझि नको जवळीक आता!

लग्न झाले..ते हि झाले
चांगले सोशीक आता..

दु:ख झाले भोगुनीया
हासणे ऐच्छिक आता.!

(प्रश्न झाले मांडुनिया
उत्तरे ऐच्छिक आता!)

लागु केली कर्जमाफी
काढ लवकर पीक आता!

उंच त्याचा भाव नेला
वाढले भावीक आता...!

विसर सारे शीकलेले
एवढे तू शीक आता

चेहरा सभ्य दिसावा
शिकुन घे ही ट्रीक आता.

हा लढा अंतिम आहे
फक्त थोडे टीक आता

- कानडाऊ योगेशु

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

वा! सगळ्याच दुओळी (? काय म्हणतात त्यांना?) अर्थपूर्ण, मार्मिक वाटल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शुचिताई,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

द्विओळी नाही द्विपदी म्हणतात. (गझलेत जसा शेर असतो तशी गझलसदृश कवितेत द्विपदी.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरेच्च्या हां बरोबरे. थँक्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

योगेशु - ही चांगली आहे बघा तुमची कविता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधीच्या कवितांवरुन मला वाटलं,
"थांबले ट्राफिक आता
पल्लू सखे तुझा ढळता", अशी काही तरी ओळ असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला ही असेच काहीतरी वाटले होते, म्हणुनच सुखद धक्का बसला की कवि दुसरा काहीतरी विचार ही करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान आहे कविता!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

धन्यवाद मित्रमैत्रिणींन्नो.

...कवि दुसरा काहीतरी विचार ही करतो

कुन्गफु पांडा मधला शिफु म्हणतो तसे देअर आर नो अ‍ॅक्सिडेंट्स.! Smile
जर आधीची कविता लिहिली नसती तर ही सुचली असती का नाही ह्याबद्दल शंकाच आहे.!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शीफू नाही, ते पहिल्या एपिसोडात कन्फ्यूशसवासी ऊग्वे म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शिफुचा गुरु उग्वे तसा म्हणतो.

बॅटमॅन हमेसा बराबर बोलता हय.!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लग्न झाले..ते हि झाले
चांगले सोशीक आता..

हे ते म्हणजे काय नक्की ?
एक अमोल पालेकरांनी तेंडुलकरांवर कार्यक्रम केला होता त्याच शिर्षक होत तें
ते आठवल
तुमच ते म्हणजे नक्की काय
आणि ते झाल्यावर सोशीक झाला म्हणजे नेमक काय झाला
सो शीक आता म्हणजे सोना सीख अभी अस हिन्दी मराठी मिक्स आहे का
आणि हो मी ते समजण्या इतका भोळा नक्कीच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

मारवा,
बर्याच गझलांच्या (भटसाहेबांच्याही) ते,त्यांनी त्यांचा असा उल्लेख येतो. बहुतेक वेळा त्याचा अर्थ म्हणजे प्रस्थापित/आरोप करणारे/निंदा करणारे इ.
उदा. भटसाहेबांचाच एक शेर पाहा.

स्वागतासाठीच माझ्या भुंकले ते आदराने
थुंकले तोंडावरी तो केवढा सत्कार होता!

व सोशीक हा शब्द सोसणारे/सहन करणारे ह्या अर्थाने वापरला आहे.
एकुण शेराचा एक अर्थ असा होतो कि लग्नापूर्वी जे म्हणत कि आम्ही काही सहन करणार नाही..स्वच्छंदी राहु वगैरे ते ही ल्ग्नानंतर निमूटपणे जगु लागले.
दुसरा अर्थ घेतला तर ते म्हणजे ते दोघे ती व तो.. लग्नापूर्वी बात बात पे झगडे करणारे आता एकमेकांना सहन करु लागले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता आवडली हे आवर्जुन सांगतो.
तुमच्या कविता वेगळ्या आहेत मजा येते वाचायला.
धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

विडंबन हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. तरीही का. यों. ची क्षमा मागून.......

थांबला ट्रॅफिक आता.
टाक न्यूट्रल गिअर आता.

शांततेचा अ‍ॅक्ट झाला
वाढवू ते गनिम आता

जा पुरा व्यवहार झाला
पाठवी पुढच्यास आता!

लग्न झाले..ते हि झाले
वाढवू तो वंश आता

दु:ख झाले भोगुनीया
अश्रु ते ऐच्छिक आता.!

प्रश्न झाले मांडुनिया
उत्तरे छापील आता!

लागु केली कर्जमाफी
बुडवी लवकर बँक आता!

उंच त्याचा झोका गेला
काप त्या दोरीस आता...!

विसर सारे पढवलेले
क्रांतीचा एल्गार आता

चेहरा हा झाकून घ्यावा
शिकुन घे हा धर्म आता.

हा लढा अंतिम आहे
फक्त हो ठिणगीच आता

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

उंच त्याचा झोका गेला
काप त्या दोरीस आता...!

ROFLROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0