स्त्री लैगिंकतेचा 'ब्र'

वेगवेगळ्या मराठी संस्थाळावर अनेकवेळा स्त्रीच्या लैगिकतेविषयी चर्चा झालीय. यात अनेक पुरुष सदस्यांची मते पाहण्यात आली. बरेचदा ती मत अचाट, अतर्क्य वाटली. "स्त्रीला कामभावना नसतात. ती थंड असते. ती पुरुषाच्या भावनांचा विचार करत नाही परिणामी त्याच्याशी समरसून रत होत नाही." इत्यादी अनेक तारे तोडलेले वाचले आहेत.
फार कमी वेळा स्त्री सदस्या मते मांडतात. कारण संकोच, भीती, उगाच कशाला वाद घाला...पण सख्यंनो तुम्ही पण तुमची मते मांडा.
आज पुन्हा एकदा या विषयावर थेट चर्चा सुरु व्हावी असे वाटते आहे. कारण एकच पुरुषांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणे. तस होणं अवघडच आहे तरीपण.
झालं असं कि नुकताच माझ्या वाचनात कविता महाजन यांचा ब्लॉग आला. त्यापूर्वी मी त्यांची ठकी आणि ब्र हि पुस्तके वाचली होती. 'भिन्न' बद्दल ऐकून आहे, वाचायचे राहिले आहे. मला त्यांचा रोखठोकपणा फार आवडतो. अत्यंत मार्मिकपणे स्त्री लैगिंकतेवर त्या लिहितात. माझ्या त्या आवडत्या लेखिका आहेत. ऐसी अक्षरेच्या विशेषांकात सुद्धा त्यांची अत्यंत सुंदर मुलाखत आहे.
या चर्चेसाठी मला काही त्यांच्या कथेतील उतारे समर्पक वाटले, ते देत आहे.
'ब्र'मध्ये एक प्रसंग आहे.... एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीकडे नवऱ्याची तक्रार करताना 'आपण नाही म्हटलं तर ऐकून घ्यावं लागतं, पण आपली इच्छा असताना त्याचं उठलं नाही तर आपण काही बोलायची चोरी असते... आता तुला सांगतेय तर तुझ्या चेहऱ्यावर कसे भाव आलेत बघ.' असं काहीतरी मैत्रिणीला सांगते.
त्यांच्या ब्लॉगवर एक 'डिमांड' नावाची लघु कथा/किस्सा आहे. उपहासात्मक शैलीत त्यांनी सत्य मांडलं आहे ..... मैनावतीने जाहिराती चाळून बऱ्या वाटलेल्या कॉलबॉय केंद्राचा फोननंबर फिरवला. एका घोगरट आवाजाच्या प्रौढ बाप्याने फोन घेतला.
मैनावतीने एका रात्रीसाठी एक बाप्या हवाय अशी डिमांड सांगितली आणि दर व दर कसे लावले जातात त्याची पद्धत असे दोन्ही विचारले.
घोगरट म्हणाले,”घरी नेणार तर दर वेगळे, हॉटेलमध्ये नेणार तर वेगळे, नुसते कॅबमधून भटकणार तर वेगळे. पुन्हा तुम्हाला कसा पुरुष हवा आहे आणि किती तासांसाठी आणि काही विशेष अपेक्षा आहेत का, यावर बाकी दरनिश्चिती होईल. तर तुमची गरज आणि अपेक्षा काय आहे ते सांगा.”
मैनावती म्हणाली,”तशी काही फार खास अपेक्षा नाहीये. चाळीशीच्या आसपासच्या वयाचा, थोडं टक्कल पडलेला, पोट सुटून अंग जरा विसविशीत झालेला, काहीसा गबाळा, फोर प्ले या शब्दातला फ देखील माहीत नसलेला, फार काही नीट करणं जमत नसल्याने कसंबसं काम उरकून तिसऱ्या मिनिटाला घोरायला लागणारा पुरुष पाहिजे आहे.”
घोगरट आश्चर्यचकित होऊन म्हणाले,”कमाल आहे. आमच्याकडे अशी डिमांड पहिल्यांदाच कुणी बाई… सॉरी तरुणी करतेय. सहसा सगळ्यांना तरुण, देखणे, दणकट, तज्ञ पुरुष हवे असतात. मी तुमच्या डिमांडनुसार व्यवस्था करतो. पण कुतूहल म्हणून विचारतोय, गैरसमज करून घेऊ नका… पण इतके पैसे मोजून तुम्हाला ‘असा’ पुरुष का हवा आहे? म्हणजे त्यामागे काही विशेष कारण आहे का?”
मैनावती म्हणाली,”गैरसमज कसला डोंबल्याचा? आणि कारण अगदी साधं आहे. गेले दोन महिने ऑफिसच्या कामानिमित्त सतत प्रवासात आहे. फार कंटाळा आलाय.”
“अहो, पण मग कुणीतरी इंटरेस्टिंग, तरणातगडा, मनोरंजक पाठवू का?”
“एरवी तसाच मागवला असता हो… पण आज किनई मला नुसता कंटाळा नाही आलेला… मला आज फार ‘होमसिक’ वाटतंय!”

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

कालचाच प्रतिसाद परत एकदा थोडक्यात. पुरुषांची विशेष चूक म्हणता येत नाही, स्त्रियांचे अवयव, स्पेशली erogenous zones इतके आत असतात की स्त्रीलाच आपल्याला काय आवडतं ते फंक्शनिंग नीट कळणं वेळखाऊ, किचकट, पेशन्स चं काम असतं. तिथे आणखी कोणी काय दवे लावणार कप्पाळ!!!
______
एकत्र कुटुंबपद्धत बर्‍यापैकी मूड्-किलर असते. आवाज करु नका, बोलू नका, गुपचूप काय ते. तेव्हा तो मुद्दा काल लिहीलेला.
__
अजुन काही सुचलं तर नंतर लिहीते.
___
हां माझी मैत्रिण आहे लेस्ली. लग्न झालेली आहे पण ती टॉइज वापरत असे. तेव्हा बायका (निदान अमेरीकन) देखील मजा करतात. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

सध्या घाईत फक्त एक दुवा : मालकीण

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

का? पण का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही! Tongue

(आत्ता खरंच घाईत आहे; सवडीनं सविस्तर.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुळात 'स्त्री लैंगिकता' आणि 'पुरुष लैंगिकता' या दोन वेगळ्या बाबी नाहित. लैंगिकता हा कप्पेकरण न करता येणारा वर्णपट आहे. त्यामुळे फक्त स्त्री लैंगिकता वगैरे कुणी बोलु लागलं की माझा पास!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुळात 'स्त्री लैंगिकता' आणि 'पुरुष लैंगिकता' या दोन वेगळ्या बाबी नाहित. लैंगिकता हा कप्पेकरण न करता येणारा वर्णपट आहे. त्यामुळे फक्त स्त्री लैंगिकता वगैरे कुणी बोलु लागलं की माझा पास!

ऑ ?

स्त्री कडे शिश्न नसते. पुरुषाकडे असते. ते दोघेही हस्तमैथून करू शकतात व अनेक करत असतीलही. हस्तमैथुन हे लैंगिकतेमधे येते. पण स्त्री हस्तमैथून करते तेव्हा वीर्य बाहेर येत नाही. पुरुष हस्तमैथून करतो तेव्हा बहुतांश वेळी वीर्य बाहेर येते. तेव्हा 'स्त्री लैंगिकता' आणि 'पुरुष लैंगिकता' या दोन वेगळ्या बाबी आहेत.

--

हिंट देतो. अर्थशास्त्र वाचा. म्हंजे मग -- वेगळं म्हंजे काय व कसं ओळखायचं त्याची तोंडओळख होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एखाद्या व्यक्तीला असलेले अवयव केवळ त्याच्या लैंगिकतेला प्रकट करणारी साधने आहेत. 'लैंगिकता' वायली नी हे अवयव किंवा स्राव वायले!
लैंगिकता ही मेंदूत असते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लैंगिकता ही मेंदूत असते हे विधान काही प्रमाणावर (से ५०%) बरोबर आहे. पण तशा तर अनेक गोष्टी मेंदूत असतात.

पण मेंदूत सुद्धा प्रत्येक व्यक्ती समलैंगिक संबंध, व भिन्नलैंगिक संबंध, व बायसेक्श्युअल संबंध यात फरक करते ना ??? की त्या तिनही बाबी एकमेकांस सब्स्टिट्युट म्हणून वापरते ???

एक पुरुष त्याच्या मेंदूत स्त्री शी समागम कल्पना करू शकतो. दुसरा एक पुरुष त्याच्या मेंदूत तिसर्‍या पुरुषाशी समागमाची कल्पना मेंदूतल्या मेंदूत करू शकतो. व चौथा पुरुष त्याच्या मेंदूत एकाच वेळी एक स्त्री व एक पुरुष या दोघांशीही समागमसंकल्पना करू शकतो.

मग हे तिन भिन्न नाहीत (म्हंजे कप्पेकरण करता न येण्याजोगे आहेत) असं कसं म्हणता येईल ??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहसा कोणत्याही एका कप्प्यात टाकणं हे वर्णनापुरतं केलं जातं हे खरं पण ती केवळ भाषिक सोय झाली.
शिवाय लैंगिकता म्हणजे फक्त संभोग नसतो.

असो. आज इतके पुरे.. बाकीचे चावून चोथा झाले आते. तेच ते लिहायचा कंटाळा येतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लैंगिकता ही मेंदूत असते हे विधान काही प्रमाणावर (से ५०%) बरोबर आहे. पण तशा तर अनेक गोष्टी मेंदूत असतात.

संगीत ऐकतेवेळी, चित्र पहातेवेळी, आवडता पदार्थ खातेवेळी पॅसिव्ह अनुभूती घेतली जाते. वी आर सिम्प्ली रिसेप्टिव्ह. पण रतीक्रीडेमध्ये किंवा हस्तमैथुनामध्येही कल्पनेतून अ‍ॅक्टिव्ह अनुभूती घेता येते. रतीक्रीडा स्वतःपुरती एनहॅन्स करता येते, इन्टेन्सीफाय करता येते (व्हेरीएबल). तेव्हा प्रत्येक गोष्ट मेंदूत होते हे जरी खरे असले तरी. लैंगिकता विशेष करुन मेंदूत होते असे म्हणता येइल.
बसमधील नको असणारे लैंगिक स्पर्श हे किळसवाणे वाटतात. तोच अगदी तस्साच स्पर्श प्रियकराकडून अतोनात आनंददायक वाटू शकतो. म्हणजे मेंदूविरहीत शरीराचा वाटा त्या सुखात नगण्य असतो, मेंदूचा/मनाचा वाटा तीव्र असतो, मोठ्या प्रमाणात असतो. रसगुल्ल्याचे गुलाबजामचे तसे नाही. सदासर्वदा तो गोडच (कॉन्स्टन्ट) लागतो. हां काही दु:खद प्रसंगी तोंडाची चव वगैरे जात असेल ते वेगळं.
.
तेव्हा लैंगिकता ही शरीरातील अन्य भागात विशेष नांदत नसून ९९% ती मेंदूतच नांदते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

लैंगिकता ही मेंदूत असते

मेंदूत नि प्रत्यक्षात बद्दल माझी आणि बॅटमनची कालच चर्चा झाली.
===================
ऋषिदा, मला आपल्या भावनांचा आदर आहेच. परंतु आपल्या भावनांचे नक्की आकलन करून घेण्याच्या (विशुद्ध) हेतूने मी खालील विधानाची चिकित्सा करू इच्छितो.
"ती जमिनीवरची रॉकेट्स, लाँच पॅड्स, खाणी, इंधने, कारखाने, काँपूटर प्रोग्राम वायले आणि भारताची अण्वस्रसज्जता वायली. अण्वस्रसज्जता ही मेंदूत असते." असं काहीसं तुम्ही लिहिलं आहे. यात काही तरी अब्द अब्द आहे खरं पण ते नक्की काय आहे हे प्रकटनसम्राट घासकडवीच व्यवस्थित लिहू शकतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ऋ ला कीतीही प्रयत्न केले तरी स्त्रीच्या मेंदुत काय चालते हे त्याच्या पुरुष जन्मात तरी शक्य नाही.

तरी पण तो इतकी ठाम विधाने कुठल्या बेसिस वर करतो ते कळत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>ऋ ला कीतीही प्रयत्न केले तरी स्त्रीच्या मेंदुत काय चालते हे त्याच्या पुरुष जन्मात तरी शक्य नाही.
बोले तो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"समजणे" हे एक क्रियापद घालायचं विसरल्या अनुताई.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>>स्त्रीच्या मेंदुत काय चालते हे त्याच्या पुरुष जन्मात तरी शक्य नाही. काय भारी स्टेटमेंट आहे . दुसऱ्या कुठल्याही पुरुष किंवा स्त्री ला तिसऱ्या कुठल्याही पुरुष किंवा स्त्री च्या मेंदूतील कळते असे म्हणायचे आहे काय ?
ठाम विधाने करणे ? माझ्या तरी वाचण्यात ऋ फारसा कधी जेण्डर बायस्ड ठाम किंवा अठाम विधाने करताना दिसला नाही .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुळात 'स्त्री लैंगिकता' आणि 'पुरुष लैंगिकता' या दोन वेगळ्या बाबी नाहित

बापट अण्णा - वरील ऋ चे विधान "ठाम" म्हणता येणार नाही का? ऋ ला "स्त्री लैंगिकता" कळुच कशी शकते आणि जर कळु शकत नसेल तर वेगळ्या बाबी आहेत की नाही हे कसे सांगणार?

दुसऱ्या कुठल्याही पुरुष किंवा स्त्री ला तिसऱ्या कुठल्याही पुरुष किंवा स्त्री च्या मेंदूतील कळते असे म्हणायचे आहे काय ?

मला म्हणायचे होते की पुरुष ऋ ला "स्त्री लैंगिकता" कशी असावी हे कसे कळु शकेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्त्रीच्या मेंदुत काय चालते ते कळणे कुठल्याच पुरुषाला जन्मात तरी शक्य नाही. >> अनुतै, तुमचे विधान हे असे ठाम पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऋषिदा, मला आपल्या भावनांचा आदर आहेच. परंतु आपल्या भावनांचे नक्की आकलन करून घेण्याच्या (विशुद्ध) हेतूने मी खालील विधानाची चिकित्सा करू इच्छितो.

माझं म्हणणं इतकंच आहे.

१.
दोन व्यक्तींचं लिंग (पक्षी: जेंडर) सारखेच असले शिवाय भाषिक सोयीसाठी जे लैंगिकतेचे कप्पे केले जातात तेही सारखेच असले (म्हणजे दोघेही सम/भिन्नलिंगी म्हणवले जात असले) तरी त्यांच्या लैंगिकतेचा फ्लेवर एकमेकांसारखाच असण्याची शक्यता फार कमी! त्याएकाच कप्प्यांतील एका व्यक्तीला जोडीदाराबरोबर ज्या प्रकाराने संभोग करून आनंद मिळेल 'एज्झॅक्टली' तशाच प्रकाराने संभोग करून (किंबहुना संभोग हा प्लेसहोल्डर झाला कोणतीही रतिक्रिडा) आनंद तित्काच मिळेलच असे नाही.
२. लैंगिकतेचे ठोकळेकरण केल्याने त्या ठोकळ्यातील मुख्य घटकांहून वेगळी लैंगिकता असणार्‍यांना उगाचच आपणात दोष आहे (व इतरांनाही त्यांच्यात दोष आहे) असे वाटू लागते.

त्यामुळे असे कप्पेकरण करणे मी माझ्यापुरते थांबवले आहे.

याहून अधिक स्पष्ट हवे असेल तर भेटल्यावर बोलु Smile

====

इस्रायल/इराण यांच्यासारख्या राष्ट्रांकडे जमिनीवरची रॉकेट्स, लाँच पॅड्स, खाणी, इंधने, कारखाने, काँपूटर प्रोग्राम हेच काय अगदी अणुभट्ट्या आणि युरेनियमही आहे पण ती अण्वस्त्रसज्ज नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इव्होल्यूशनरी सायकॉलॉजीनुसार:

स्त्रियांची लैंगिकता पुरुषांच्या लैंगिकतेपेक्षा खूप वेगळी (पण अर्थात तितकीच महत्त्वाची) असते. बऱ्याच कारणांनी पुरुषांच्या लैंगिकतेपेक्षा ती ज्यास्त व्यामिश्र असते. याची कारणे उत्क्रांती आणि संस्कृती यांच्या परिप्रेक्ष्यातून पहायला हवीत.

सुमारे ६० लाख वर्षांपूर्वी ‘होमो’ जीनस् चा पूर्वज आणि ‘पॅन’ जीनस् चा पूर्वज वेगळे झाले. ‘होमो’ जीनस् ची उरलेली एकच स्पीशी आपण आहोत आणि ‘पॅन’ जीनस् च्या उर्वरित स्पीशीज दोन - चिंपांझी अणि बोनोबो. आजची स्त्री (आणि पुरुषही) समजून घ्यायला किमान या तीन स्पीशीजची साधारण उत्क्रांती आणि त्यांच्या लैंगिकतेची विशेष उत्क्रांती समजून घ्यावी लागेल. सामाजिक (यात कौटुंबिक आणि व्यापकपणे राजकीयही अंतर्भूत) दृष्ट्या चिंपांझीजपेक्षा बोनोबो आपल्याला ज्यास्त जवळचे, त्यामुळे यापुढील मजकुरात या आपल्या चुलत-चुलत स्पीशीजचा उल्लेख सोयीसाठी फक्त ‘बोनोबो असा करूयात. बोनोबो मादी (तिला ‘बोनोबी’ म्हणूया!) आणि स्त्री यांच्यातील ढोबळ तुलना पुढीलप्रमाणे:

बोनोबी आणि तिचा भवताल स्त्री आणि तिचा भवताल

जीवशास्त्रीय रजोनिवृत्ती (menopause) येत नाही रजोनिवृत्ती येते (नातवंडांच्या संगोपनास पूरक?)
अंडमोचन (ovulation) काळ उघडपणे सर्वांस कळतो अंडमोचन (ovulation) काळ इतरांस गुप्त राहतो

लैंगिक सर्वसंभोगी (polyamorous) साधारणत: भिन्नलिंगी एकसंभोगी (monogamous)
sex & reproduction partially separated sex & reproduction partially separated

सामाजिक मादीप्रधान टोळ्या पुरुषप्रधान समाज

राजकीय egalitarian elitist
substitutes sex for aggression power and sex hopelessly mixed up

कौटुंबिक संभोग सर्वांशी, घरोबा एका नराशी साधारणत: संभोग आणि घरोबा एकाच नराशी

(वरील बाबींशी निगडित बोनोबो नर (बोनोबा?) अणि पुरुष यांची तुलनाही करायला हवी, पण ती पुन्हा कधीतरी करूया)

जीवशास्त्रीयदृष्टया आधुनिक मनुष्यप्राणी किमान दीडेक लाख वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आहे. यासुमारासची मानवजातीची लैंगिकता बोनोबोंपेक्षा फार वेगळी नसावी आणि या काळात स्त्री आणि पुरुष यांची कार्ये वेगळी, पण स्थान आणि सत्तेत वाटा साधारणपणे समान असावे असा माझा कयास आहे. सत्तरेक हजार वर्षांपूर्वी मानवजातीची मानसिक क्रांती झाली (भाषा आणि त्यानुषंगिक सामाजिक बदल). त्याच्या जोरावर मानवजातीने इतर प्राण्यांची (त्यांत Neanderthals सारखे मानवसदृष प्राणीही) ‘वाट’ लावली. पण मानवजातीची ‘वहिवाट’ साधारणत: hunter-gatherer चीच राहिली. आपले शरीर आणि मेंदू यानंतर उत्क्रांत झालेले नाहीत. Pleistocene चा शेवट आणि कृषीक्रांती दहा-बारा हजार वर्षांपूर्वी झाली आणि त्यानंतर पुढचे सामाजिक बदल प्रचंड गतीने झाले. वस्त्या, खेडी आणि पुढे नगरे यांच्यात माणसे स्थिरावत गेली. खाजगी मालमत्ता, तिचे अंगभूत विषम वाटप व्हावे आणि टिकावे, ती आपल्याच वारसांना (विशेषत: मुलग्यांना) मिळावी, त्यामुळे अपत्ये खात्रीने आपलीच आहेत हे पुरुषांना कळावे या सर्व बाबींमुळे स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य पुरुषांनी (आणि विशेषत: समर्थ पुरुषांनी) हिरावून घेतले. या सर्वांस पूरक अशी धर्मसत्ता आणि राजसत्ता अस्तित्वात आल्या आणि त्यांनी एकत्र येऊन स्त्रिया आणि गरीब यांचे दमन केले, ते थेट आजपर्यंत. गेल्या शंभरेक वर्षात काही ठिकाणी यात सकारात्मक बदल झाले, पण स्त्रीपुरुषांमधील राजकीय संबंध खूपसे तसेच राहिलेत. आजच्या स्त्रियांची लैंगिकता आणि तद्भव प्रश्न या पार्श्वभूमीवर समजून घ्यायला हवेत. तिची अंगभूत लैंगिकता, तिचे दमन झालेले स्वरूप आणि त्यावरचे व्यक्तिसापेक्ष आणि स्थलकालसापेक्ष थर यांचा फार जटिल गुंता झाला आहे असे मला वाटते. यातून योग्य आणि न्याय्य मार्ग काय काढता येतील याची काही प्रारूपे उपलब्ध आहेत आणि त्यांतील स्त्रीवादी प्रारूपे सर्वात महत्त्वाची आहेत. पण त्यांची अंमलबजावणी तर सोडाच, नुसती दखलसुद्धा पुरेश्या प्रमाणात आणि पर्याप्त गतीने घेतली जात नाहीये. पण त्याची सुरुवात आपल्यापासूनच करायला हवी, नव्हे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वरील तुलना एका तक्त्यामधे (table) मांडली होती, पण upload करताना तो format गेला. पुन्हा एक प्रयत्न करतो!

ही कहाणी खूप घिसी पिटी आहे. असेना का, पण अगदी कैच्या कै आहे. एक वेगळा धागा काढायचा का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तक्ता समजून घ्यावा ही विनंती!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टेबलाचा HTML कोड लिहावा लागेल.

सोपा कोड -

[table]
[tr][td]पहिली ओळ, पहिला स्तंभ [/td] [td]पहिली ओळ, दुसरा स्तंभ [/td][/tr]
[tr][td]दुसरी ओळ, पहिला स्तंभ [/td] [td]दुसरी ओळ, दुसरा स्तंभ [/td][/tr]
[/table]

यात चौकोनी कंसांऐवजी त्रिकोणी कंस वापरा. तक्त्याच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद येईस्तोवर तो प्रतिसादही संपादित करता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बोनोबी आणि तिचा भवताल स्त्री आणि तिचा भवताल
जीवशास्त्रीय रजोनिवृत्ती (menopause) येत नाही रजोनिवृत्ती येते (नातवंडांच्या संगोपनास पूरक?)
अंडमोचन (ovulation) काळ उघडपणे सर्वांस कळतो  अंडमोचन (ovulation) काळ इतरांस गुप्त राहतो
लैंगिक सर्वसंभोगी (polyamorous) साधारणत: भिन्नलिंगी एकसंभोगी (monogamous)
sex & reproduction partially separated sex & reproduction partially separated
सामाजिक मादीप्रधान टोळ्या पुरुषप्रधान समाज
राजकीय egalitarian elitist
substitutes sex for aggression power and sex hopelessly mixed up
कौटुंबिक संभोग सर्वांशी, घरोबा एका नराशी साधारणत: संभोग आणि घरोबा एकाच नराशी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>फार कमी वेळा स्त्री सदस्या मते मांडतात. कारण संकोच, भीती, उगाच कशाला वाद घाला...पण सख्यंनो तुम्ही पण तुमची मते मांडा.
आज पुन्हा एकदा या विषयावर थेट चर्चा सुरु व्हावी असे वाटते आहे. कारण एकच पुरुषांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणे. तस होणं अवघडच आहे तरीपण.>>

दोन स्त्रिया भांडताना पाहिल्यास { आणि ऐकल्यास} पुरुषांचा गैरसमज दूर व्हायला वेळ लागत नाही.
बाकीची चर्चा सख्या करतीलच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोन स्त्रिया भांडताना पाहिल्यास { आणि ऐकल्यास} पुरुषांचा गैरसमज दूर व्हायला वेळ लागत नाही.

लोल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सगळेजण लैगिकता कैंगिकता म्हणत टँन्जेन्शिअल जातायत Wink .... जस्ट किडींग!!! पण मी वाचलेलं एक थेट सांगते - पुरुषांचे ऑर्गॅझम आणि स्त्रियांचे ऑर्गॅझम यात म्हणे फरक असतो. पुरुषांचे प्रोलॉन्गड व कमी इन्टेन्स असते तर स्त्रियांचे स्पर्ट्स मध्ये आणि अतिशय इन्टेन्सिटीचे येते. आता हे कंपेर कसं करणार तर त्या रिसर्चवजा लेखात लिहीलं होतं की पहील्यांदा पुरुष असलेल्या व नंतर स्त्री झालेल्या लोकांनी हे सांगीतले म्हणे.
_____
वरती फक्त मजा केलेली आहे. लैंगिकता नावाच्या हत्तीला मध्ये फॅन्टसी, भावना, विकार सर्वच अवयवांची समावेशकता आहे याशी मी सहमत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

पण हे सॅपल वापरणं चूक असेल कि हो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

शक्य आहे.
____
बाय द वे अजो मी तुमची बोळवण करण्याकरता ते २ शब्दांचे उत्तर दिलेले नसून. मलाही डाऊट आहे की हा सॅपलसेट चूकीचा आहे. कारण लैंगिक अवयवांचे नंबर ऑफ मज्जातंतू तसेच अ‍ॅक्च्युअल मजातंतू सेमच रहाणार. मग पुरुषांना स्त्रीत बदलून रिसर्चवाइज काय मोठा तीर मारलाय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

आमिर म्हणतो; यशाला स्त्री -पुरुष असा चेहरा नसतो!

ह्या बातमीचा ह्या धाग्याच्या मूळ विषयाशी काहीही संबंध नाही. पण तरीही मी ही बातमी इथे डकवत आहे.

"यशाला स्त्री -पुरुष असा चेहरा नसतो" हे विधान "दहशतवादाला धर्म नसतो" सारखं आहे.
"स्त्रीलैंगिकता व पुरुष लैंगिकता ही फक्त भाषिक सोय असलेली वर्गवारी आहे" -- हे सुद्धा विधान असेच गुडीगुडी विधान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0