मिडल मॅन

आज यानी विकांत म्हणजे शनिवारी म्हणजेच फनिवारी मित्रांबरोबर बसलो नेहमी सारखं (गब्बरभौ ने येळेत बिर्यानीच आवतन नै दिल सार्वजनिक). ह्यावेळी मात्र क्वचितवालं हॉटेल होत. कधीकधी करतो (म्हणजे जास्तवेळेस कॅश देतो) तसं ह्यावेळीही कार्ड स्वॅप केलं. अन् हाय दैया, डेबिट मॅसेज आला, त्यातलं शेवटचं वाक्य "at xyz bar and restaurant" हे वाचून तोंड कुच्चळ करुन त्या मॅसेजकडं बघण्यापलिकडे पर्याय नव्हता. एकदमच मिडल मॅन नावाचा चित्रपट झरझर मनात येउन गेला.
चित्रपट तसा पॉर्न व्यावसायाशी संबंधित आहे आणि ज्याप्रकारे चित्रपटाची प्रस्तावना होते ते आपोआप पटायला लागतं (पटायला पेक्षा रीलेट व्हायला लागतं).
दोन गर्दुल्ल्या मित्रांभोवती कथानक फिरताना नायक मिडल मॅन ठरतो.
रोजरोज पॉर्न बघणारा अन् वाचणारा मित्र बोलताबोलता तो वाचतो त्या मासिकातले चित्रं सायटिवर टाकायचा विषय काढतो अन् एक्स नासा शास्त्रज्ञ असलेला दुसरा मित्र लागोलाग ते चित्र विकायचा कोड तयार करतो अन् बघता बघता चिक्कार पैसा मिळायला सुरु होतो.
मग आणखी नवीनतेसाठी ते रशियन माफियाच्या स्ट्रिपक्लब मध्ये जाउन टपकतात. इथून पुढं त्यांची परवड चालू होते.
माझ्या सुरुवातीला मेळ खाणारा प्रसंग म्हणजे हे मित्र जेंव्हा त्यांचे चित्रं विकण्याचे काम हे क्रेडिट कार्डावरुन असतं अन् क्रेडिट कार्डाच्या स्टेटमेंटात त्यांच्या पॉर्न सायटीच नाव पडलेलं असतं. ह्यामुळंही कमी ग्राहकी होउ शकते हे हेरुन नायक ते बदलून सोबर असं बीझ डोमेन घ्यायला लावतो जे की एकदम अचूक ठरतं.
पुढं काय होतं? स्वत:चीच एक एजन्सी स्वत:च्या विकत घेतलेल्या जागेत चालू करुन पुढं काय होतं? रशियन माफियाच काय?? नायकाच्या कुटुंबाच काय???
नायक मिडल मॅन वठवताना स्वत: वाहवत जाउन...वैगेरे वैगेरे चित्रपट पाहूनच समजून घेतलं तर बरं.

माझंही ह्या महिन्याचं स्टेटमेंट...असो, हम फिर भी नही सुधरेंगे...

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चांगला चित्रपट आहे. मी देखील मागच्याच आठवड्यात बघीतला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0