पुतळेच पुतळे

विडंबनात्मक
मूळ कवी बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)

पुतळेच पुतळे खूप गडे,
इकडे तिकडे चोहिकडे || धृ.||

इकडून तिकडून मोद(ई) फिरे,
सेल्फीसंगे मोद(ई) फिरे,
गावोगावी फिरले, देशोदेशी फिरले,
जगांत उरले मोद(ई) विहरले चोहिकडे || १ ||

भक्तगण हुकलेले हे,
विरोधक ही हसते आहे
खुलले फुर्रोगामी त्वेषाने,
आकांताने गाते गाणे,
समर्थक रंगले, फेसबुकवर दंगले,
विडंबन स्फुरले इकडे, तिकडे, चोहिकडे || २ ||

विरोधक विचित्र कसे,
नाक मुरडत हे पाहतसे कुणास बघते ?
मोद(ई)ला; मोद(ई) पुरुन उरले का त्याला ?
लोकांमधे ते, सदैव फिरतसे,
उधळली आश्वासने इकडे, तिकडे, चोहिकडे || ३ ||

वाहति सोशल मेडिया दृतगती,
भिडती गुलाम अन् अंधभक्त जिथे-तिथे
मनोमनी विरोधक रे, कोणाला टोकतात बरे ?
कमल फुलले, विचारवंत भैसटले,
भक्तगण फैलले इकडे, तिकडे, चोहिकडे || ४ ||

स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात
त्यांना मोद(ई) कसे झुरवतात,
डावलुनि जनप्रश्न ते जातात अस्मितेला,
मत्सर घेऊनी गेले विरोधकांचे
होणार पुतळेच इकडे, तिकडे, चोहिकडे || ५ ||

©भूषण वर्धेकर, दौंड
४ नोव्हेंबर २०१८

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

विडंबनाची सुरुवात पुतळेच पतळे आहे आणि पुढे ते मोद(ई)नी व्यापलेला अवकाश अशी त्याची गत होते. वृत्तलेखनही अनेक ठिकाणी हुकलेलं आहे. या सर्वांचा विचार करता पुढील सुधारित आवृत्ती कशी वाटते -
पुतळेच पुतळे खूप गडे,
इकडे तिकडे चोहिकडे || धृ.||

इकडून तिकडून मोद(ई) फिरे,
सेल्फीसंगे मोद(ई) फिरे,
स्वदेश फिरले,
देशाटन केले,
जगांत भरले
मोद(ई) विहरले चोहिकडे || १ || [बदल नाही]

भक्तगण झुकलेले हे,
अ-भक्तही खिळले आहे
सुटती विरोधक त्वेषाने,
आकांते गाती गाणे,
समर्थक् रंगले,
फेस्बुकी दंगले,
पाहिजेत पुतळे
इकडे, तिकडे, चोहिकडे || २ ||

विरोधक विचित्र कसे, हत्यार परजुनी पाहतसे
कुणास बघती ? मोद(ई)ला; मोद(ई) बधले का त्यांला ?
लोकांमधिं ते, सदैव फिरती, वचने देती
जनांचे “पुतळे” चोहिकडे || ३ ||

सोशल मिडिया वायुगती, मिथ्ये-तथ्ये पसरवती
भाविक अन् सोशिक रे, कोणाला गातात बरे ?
कमल विकसले,
भ्रमर गुंगले,
डोलत वदले
पुतळे राहो चोहिकडे || ४ || [मूळ कमल.. भ्रमर.. डोलत.. नव्या परिप्रेक्ष्यात कळते]

जनप्रश्नांच्या सत्यात, किती पामरे रडतात
मोद(ई) त्यांना कसे वळे1, “त्यांस्तव ही सारे पुतळे”
मूल्य अस्मिता
सदैव वदता
करणे आता
पुतळे, पुतळे चोहिकडे || ५ ||

1. वळवणे या अर्थाने. येथे क्रियापदाचे रूप सुसंगत नाही याची जाणीव आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लिहिताना एवढा सखोल विचार नव्हता केला. एकूणच फेसबुकवर बऱ्यापैकी पुतळ्यांबद्दल टिंगलटवाळी, समर्थनार्थ आलेलं वाचून लहानपणीची कविता आठवली जिचे विडंबन येथे करता येईल. म्हणून एकटाकीपणे लिहून मोकळा झालो. असो. मौज म्हणून लिहिले होते.
मात्र यापुढे असं विडंबनात्मक वगैरे लिहिताना वृत्त, लय वगैरेंचा विचार करेन.
आणि पुन्हा एकदा धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा

तुमचेच शब्द फिरवून काही करू पाहिले. विडंबनात रूपबंध मूळ कवितेचा वापरला तरी विडंबन काव्य ही स्वतंत्र कविता म्हणून वाचता यावी लागते. त्या दृष्टीने अजून पुष्कळ वाव आहे सुधारणेला, पण ते तुमचं अपत्य आहे, त्याला आकार तुम्हीच द्या.
जाताजाता, हेमंत गोविंद जोगळेकर यांच्या आत्मगौरवी लेख केविलवाणाच वाटतो, पण त्यांचा सदर विडंबन काव्यसंग्रह खरंच चांगला होता. त्यांनी अंतर्नादमध्ये इतरांच्या कवितांचा आस्वाद घेणारे एक सदर कोणतेही बोजड सैद्धांतिक शब्द न वापरता चालवले होते त्याचीही आठवण आली. (आमचं आडनाव एक असलं तरी नातं किंवा संपर्क नाही)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मौज म्हणून लिहितोय मी. पण यापुढे हे बारकावे विशेष करुन लिहिण्यात आणीन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा