३६

गुरुजी आणि गायन शिकणे या लेखावरून आठवलं. पाचवीत/सहावीत होतो. मराठी माध्यम अनुदान मिळणारी ( सरकारी ग्रान्ट) शाळा. गायन विषय शिकवायला मास्तर ठेवायला परवडत होतं. शाळेची फी पाच रु, जवळच्याच खासगी संगीत विद्यालयात गायन/वादन फी दहा रु आठवड्यास दोन तास. पाचवी ते सातवी गायन विषय होता, चित्रकलाही.
अमचे गायन शिक्षक जोशी म्हणून पार्ल्याहून येत असत. भारी कडक होते. प्रामाणिकपणे पूर्ण अर्धा तास शिकवत, टीपी नसायचा, अवांतर नसायचे. तसे ते शास्त्रीय संगीत शिकवत, सुगम संगीत, भावगीत इतर गाणी यास फाटा. जून महिन्यात पहिला तास येइल तेव्हा यावर्षी तुम्हाला सहा राग शिकायचे आहेत, पहिल्या सत्रात तीन, दुसऱ्यात तीन. एवढे सांगून पहिल्या रागाला सुरुवात. पुढच्या आठवड्यात शंभर पानी वही तयार ठेवा, त्या वहीत लिहून घ्यायचे आहे, वहीला दहा गुण, प्रश्नोत्तरांस चाळीस, गायनास पन्नास असे शंभर गुणांची परीक्षा मुख्य वार्षीक परीक्षे अगोदर घेतली जाईल. अशी
कोरडी माहिती देऊन पाचवीत गायनाची/ विषयाची ओळख झाली.
गुरुजींची ओळख बाकी होती पण त्यांना जोशी गुरुजी किंवा गायनाचे मास्तर फक्त इतर शिक्षकांशी बोलतानाच म्हणायचे, एरवी 'गायनमामा' हे वरच्या वर्गातल्या मुलांकडून कळलेले. उंचेपुरे ५'१०" असावेत. पांढरा हाफ शर्ट, काळी/तपकिरी प्यांट हा नेहमीचा वेष. कॅालरला आतून रुमाल लावणारे दोन शिक्षक होते, हे एक. थोडे सुदृढ. कपाळ वर गेलेले मोठे आणि थोडेसे केस उलटे फिरवलेले. एकदम टापटीप. अवांतर गप्पा इतर शिक्षकांशी मारताना दिसणार नाहीत. वर्गात आले की प्रथम खुर्चित स्धानापन्न. ती एक लकब म्हणजे खुर्ची थोडी टेबलापासून दूर फळ्याकडे ओढणार, मागच्या दोन पायांवर तिरकी करून मागे रेलणार. थोडी तपकिरची चिमुट नाकात. " वही फिरवा आणि नव्या रागाचे आरोह अवरोह,वर्ज्य,चीज,मात्रा,स्वर लिहून घ्या पटापट." तास संपतासंपता एकदा म्हणून दाखवणार. पुढच्या आठवड्यात तासाच्या वेळी शाळेचा शिपाई पेटी आणून ठेवायचा. वाजवून चीज म्हणून दाखवायचे. "घरी करा रे सवय."

पाचवी सहावीत शिंगे फुटलेली नसत, सर्व शिक्षक आदरणीय, वंदनीय. पण एक गोष्ट समजली आणि हसु येऊ लागले. मग रागवून " सायबांसमोर (मुख्याध्यापकांसमोर ) उभे करीन."
किंवा "घंटेखाली उभे करीन."
( मुख्य दारापाशी जी तासाची घंटा होती तिथे) अंगठे धरून उभे करीन." असा दम मिळे. कधी कुणाला शिक्षा केल्याचे आठवत नाही.
काही निगरगट्ट मुले मख्ख चेहरा ठेवून हळूच कुजबुजत "कोणती?" आणि शेजारच्या मुलांना हसू दाबणे कठीण होई. एक नवीन शोध लागला होता. गाण्याच्या तासानंतर येणाऱ्या बाइंनी काही नकाशा काढताना खाली खडू उमटेच ना. "अरे, इथे तेलासारखं गुळगुळीत कसं झालय? कोणी लावलय तेल?" काचेच्या फळ्यावर ते लगेच लक्षात येत नसे.
तो प्रताप गायनमामांच्या डोक्याचा होता!! मग पुढच्या गायनाच्या तासाला मुलं लक्ष ठेवून पुटपुटत "लागलं!"
डिसेंबरात वसई सहलीला आलेले बरोबर. सकाळी
अकलोली गरम पाण्याची कुंडे येथे. पाणी खूप कढत नाही पण गरम. गायनमामा उतरले कुंडात. थेट खाली तळाला बसले श्वास रोखून बराच वेळ. दोनचार वेळा झालं. मग ओंडक्यासारखेआडवे पाण्यावर तरंगत राहिले हालचाल न करता. ही एक नवीनच ओळख होती. स्वत:च अलिप्तपणे सहलीचा आनंद घेत होते. आदरबिदर बराच वाढला त्यांचेबद्दल.

वर्गात गाणं आवडणारी दोनचार मुलंमुली होती पण त्या वयात गाणं म्हणण्याऐवजी कोरडे स्वरज्ञान कोणास आवडत नसावे. आणि या गायनगंगेला काठावरच्या सुखदु:खाची जाणीव नसावी. नाही, थोडीफार होती बहुतेक. एकदा चीज म्हणून गाऊन घेत होते. अचानक संतापले.
"कोण गातोय बेसूर?"
"इकडे मुलींकडे नसणार. मुलांकडेच असेल."
एकेका बाकावरच्या दोघादोघांना म्हणायला लावले.
अमच्या बाकावरच्या मकरंद आणि मी गायले. हं. "तू गा.", आता , तू.
पुन्हा गा बघू."
मी सर्व अक्षरे बरोबर गायली.
" तूच बेसूर गातोस."
" सर्व म्हणतील तेव्हा तू गप्प राहिचंस."
" वही पूर्ण लिहायची, परीक्षेत तुला ३६ देईन."
-
इतक्या लहान वयात 'गाणं येणार नाही' प्रमाणपत्र मिळालेला मीच असेन.
३६.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

कुठलाही बाप्तिझम नसणे हे फार उत्तम असते. निर्मळ राहतो माणूस. तुमच्यासारखा .आणि संगीतासारखा विषय कोरडेपणाने शिकवला तर माणसं एकतर औरंगजेब होतात किंवा कोरडे तज्ज्ञ.वाचलात तुम्ही.
म्हणूनच या वयातही रॉक ऐकण्याचे धैर्य करू शकता. ( आवडलं नाही हेही शांतपणे सांगू शकता)
संगीत आधी आवडायला पाहिजे. मुक्तसुनीत यांच्यासारखं. मग कडक शिक्षक मिळाला तरी फरक पडत नाही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निर्मळ राहतो माणूस. तुमच्यासारखा

१६ आना सच्ची बात

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

" सर्व म्हणतील तेव्हा तू गप्प राहिचंस.

हाहाहा. कसली हसले.
.

मुलींकडे नसणार

हे आवडलं Smile
.
काठावर पास. ROFL फार विनोदी किस्सा आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

आमच्या शाळेतल्या गायनाच्या बाईंना गाता यायचं नाही. (आधी गायच्या, मग काही तब्बेतीची / इतर वैयक्तिक कारणे झाली व त्यांचे गाणे थांबले असे काहीसे उडत उडत ऐकले होते). त्या फक्त पेटी वाजवून गाणं शिकवायच्या आणि प्रत्येक वर्गातल्या एखाद्या चांगल्या आवाजाच्या मुलीकडून गाऊन घ्यायच्या. आमच्या वर्गात तर संगीता टंकसाळे होती. तीच, आताची संगीता नेरुरकर. हा लेख वाचताना आठवलं की त्या परीक्षा घेताना एका वेळी तीन ते पाच मुलींची एकदम घ्यायच्या. कानावर कमी अत्याचार व्हावेत यासाठीची ही त्यांची युक्ती असणार.
पण त्या चांगल्या चालीही बांधायच्या. पुणे आकाशवाणीच्या बालोद्यान कार्यक्रमासाठी आमच्या शाळेतल्या एका बाईंनी लिहिलेल्या कवितेला त्यांची चाल होती. अर्थात त्याला वाद्यमेळ संयोजनाची जोड आकाशवाणीतील संगीत विभागाची होती. संस्कृत नाटकांच्या स्पर्धेत आमच्या शाळेचा सहभाग असे त्यातील पदांनाही त्या चाली देत. त्यांनी गाण्याची आवड नक्कीच निर्माण केली. विविध भारतीवरील संगीत सरिता रोज ऐकून नोंदी ठेवायच्या हा स्थायी गृहपाठ असायचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमच्या वर्गात तर संगीता टंकसाळे होती.

अहिल्यादेवी काय हो?

मला अंधुकसे आठवते - दहावीत असेन मी बहुधा तेव्हा - एकदा पुण्यात डेएसोची जितकी म्हणून हायस्कुले असतील - बोले तो आमची टिळक रोडची न्यू इंग्लिश स्कूल, झालेच तर न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, आणि अहिल्यादेवी - यांचे समाईक स्नेहसंमेलन म्हणा, विविधगुणदर्शनात्मक कार्यक्रम म्हणा, किंवा तत्सम काहीतरी एका संध्याकाळी रमणबागेत घडले होते. (सहसा असे समाईक काही घडत नाही, परंतु माझ्या आठवणीप्रमाणे बहुधा ते न्यू इंग्लिश स्कूलचे शताब्दिवर्ष असल्याकारणाने विशेष कार्यक्रम असावा. चूभूद्याघ्या.) तर त्या समारंभात या संगीता टांकसाळणीने, तपशील नीटसे आठवत नाहीत, परंतु, गाणे म्हणा, कीर्तन म्हणा, काहीतरी म्हटले होते, असे आठवते.

आता नक्की आठवत नाही, जे काही म्हटले होते ते बहुधा चांगलेच - नव्हे, उत्तमच - म्हटले असावे, पण... झाले! रमणबागकरांच्या वतीने बोलण्याचा मला अधिकार नाही, परंतु गेला बाजार आमच्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडमधील तमाम पोरे (अर्थात मनातल्या मनात) तिच्यावर इन्स्टंट लट्टू व्हायला तेवढेच कारण पुरले. (ऑल बॉइज़ हायस्कूलमध्ये दुसरे काय होणार!) दुसऱ्या दिवशी शाळेत तिचीच चर्चा. शिक्षकशिक्षिकांनी समजावून पाहिले, की मुलांनो, ती तुमची भगिनी आहे म्हणून. पण व्यर्थ. काऽही उपयोग झाला नाही.

(भगिनी. भगिनी!!! माय लेफ्ट फूट. त्या काळातले ते शिक्षक नि शिक्षिका तरी कोठल्या मटीरियलचे बनत, कोण जाणे. निष्काम कर्मयोगी सगळे! क्लूलेस.)

तीच, आताची संगीता नेरुरकर.

नेरूरकर, हं? (बोले तो, लग्न झाले, अं, तिचे!)

हंऽऽऽऽऽऽ!

(प्रदीर्घ उसासा. सुस्कारा. इ.इ.)

कालाय तस्मै नमः!

असो चालायचेच.
----------

बायदवे, मी वर वर्णिलेली घटना ही सर्का १९८०-८१च्या सुमाराची असावी. म्हणजे, माझ्या कथेतील कु. संगीता टांकसाळेचे वय आजमितीस अदमासे ५०च्या आसपास असावे. (माझेच वय तूर्तास ५३ आहे, त्यावरून अंदाज बांधीत आहे.)

नाही म्हणजे, तुम्ही आणि मी एकाच संगीता टांकसाळेबद्दल बोलत आहोत ना? नाहीतर तुम्ही दुसऱ्याच कोठल्या तरी संगीता टांकसाळेबद्दल बोलत असायचा, नि मी भलत्याच कोठल्या तरी संगीता टांकसाळेचे पुराण लावत असायचा!

असो.

==========
तळटीप:

नॉट दॅट इट मॅटर्स. माझेही झालेच की. फार कशाला, त्या काळी न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडमध्ये शिकत असलेल्या बहुतकरून सर्वांचेच आतापावेतो झाले असावे, आय डेअरसे. परंतु तरीही. इट्स द प्रिन्सिपल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो ना, त्या काळी बऱ्याच शिक्षकांनी मुलांना घडवण्याचा वसा घेतलेला असे. मग शेवटी रिटायर होण्या अगोदर एखादा पुरस्कारही मिळायचा.
काही विद्यार्थ्रांनी घडवून घेतलं नाही याचा त्यांना अभिमान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय. अहिल्यादेवी आणि तीच संगीता.
न्यू इंग्लिश स्कूलची शताब्दी होती. तशी अहिल्यादेवीही न्यू इंग्लिश स्कूलचाच भाग. आम्ही नंतर वेगळ्या झालो ना. तेव्हा आमची शाळा चाळीसच वर्षाची होती.
आम्ही नववीत होतो. संगीताने शिक्षणाचे महत्त्व या विषयावर उत्तम कीर्तन केले होते. तारीख बहुधा ३ जानेवारी १९८०. १ जानेवारीला मुख्य कार्यक्रम तुमच्या टिळक रोड शाळेत होता. संगीता आहेच सुंदर. आणि ती सादरीकरणावरही मेहनत घेते.

भगिनी. भगिनी!!! माय लेफ्ट फूट. त्या काळातले ते शिक्षक नि शिक्षिका तरी कोठल्या मटीरियलचे बनत, कोण जाणे. निष्काम कर्मयोगी सगळे! क्लूलेस.
प्रदीर्घ उसासा. सुस्कारा. इ.इ. (ती उभी रेघ कशी काढतात ?)
LOL आणि LOL
आपण एकाच वयाचे त्रेपन्न पूर्ण चोपन्न चालू.
हा सगळा मजकूर खरं तर व्यनि योग्य आहे, असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशा रीतीने न बा यांना त्यांचा जुना क्रश सापडला आहे (आणि लोकांना न बा यांना पण क्रश असू शकतो ही वस्तुस्थिती सापडली आहे) असे मी या ठिकाणी जाहीर करू इच्छितो.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि लोकांना न बा यांना पण क्रश असू शकतो ही वस्तुस्थिती सापडली आहे

एकवचन काय म्हणून??? (वचने किं दरिद्रता?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा Smile
सिरीअल क्रश व्हिक्टिमहूड माहीत नाही काय?
नसणारच आताच मी तो शब्द कॉइन केलाय Wink प्रत्येक क्रश संपेपर्यंत 'यही अपनी मंझील' अशी खात्री असणे. ही खात्री क्रश ओसरताच दूर होणे Wink ......... परत ये रे माझ्या मागल्या हा तो 'सिरीअल क्रश व्हिक्टिमहूड' सिंड्रोम.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

(ती उभी रेघ कशी काढतात ?)

<blockquote>(ती उभी रेघ कशी काढतात ?)</blockquote>

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हे असं लिहा

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...प्रतिसादाचा जो भाग उभ्या रेषेखाली आणायचा, तो सिलेक्टून मग ती वर जी उलट्या दुहेरी अवतरणांची खूण असलेले बटण आहे, ते दाबायचे.

परिणाम एकच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तारीख बहुधा ३ जानेवारी १९८०.

नाही मग मीही नववीत होतो तेव्हा. दहावीत नव्हे.

असो चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निव्वळ तारीख दिली आहे त्या तारखेच्या जवळ जाणाऱ्या एका तारखेचं शीर्षक दिलेली, विंदा करंदीकरांची एक सुप्रसिद्ध विरूपिका आहे. ती आठवली. प्रतिसाद अवांतर आहे हे मीच आधी नमूद करतो Smile

२८ जानेवारी १९८०

आजचा दिवस मला साजरा करू दे.

आज आर्. के. लक्ष्मणने लिहिली
आधुनिक भारताची सर्वश्रेष्ठ विद्रोही कविता
अर्धी रेषांत, अर्धी शब्दांत :
"नगरपालिकेने स्वच्छतेपोटी
कचर्‍याचे ढीग इथून हालवले
तर आम्ही भुकेने मरू."

आजचा दिवस मला साजरा करू दे.

कचर्‍यातील अन्नांश उचलून
जिवंत राहण्याचा हा हक्क
आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का?
तसे नसल्यास,
सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल
आपले सरकार या लोकांवर
फिर्याद घालू शकेल की नाही?
-- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी

आजचा दिवस मला साजरा करू दे.

- विंदा करंदीकर

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मार्मिक दिली आहे.

(तुम्हाला नव्हे. विंदांना.)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तंबाकूवाल्या मलुष्ट्याचा काय रे तू? (माझेच वय तूर्तास ५६ आहे, म्हणून अरे-तुरे करत आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।

व्यक्तिचित्र मजेशीर आहे. गायन, चित्रकला, हस्तव्यवसाय, कार्यानुभव, समाजसेवा वगैरे गोष्टी शाळेत टाईमपास म्हणून घेतल्या जातात. बहुदा तसं होणं अपरिहार्य असावं. पर्यायाने, या कामाला खरंच एखादी त्यात रस असणारी व्यक्ती नोकरीला लावली तर त्या व्यक्तीची कुचंबणा होणार. गायनमास्तरांनी तसं होऊ दिलं नाही असं दिसतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मस्तं लिहिलय अचरटबाबा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आचरटबाबा,
मस्त.

इतक्या लहान वयात 'गाणं येणार नाही' प्रमाणपत्र मिळालेला मीच असेन.

Smile
इवान क्झ्लोवस्कींची कीर्ती कधीही न मिळू शकलेला देनिस आहे तुमच्या सोबतीला. संदर्भ: देनिसच्या गोष्टी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लई भारी !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।

छान लिहलंय!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0