रिदम

'गन्नम स्टायल' गाणं महिना-दीड महिन्यापूर्वी बघितलं तेव्हापासुन डोक्यात घुमतयं...
युट्यूबवर धुमाकूळ अाहे, १ बिलियनच्या वर हिट्स!!!
कॅची ट्युनवर डान्स करणारी कोरियन जनता अाणि तो 'गन्नम हिरो',
अापण लगेच ठेका धरायला लागतो, सॉलिड रिदम.
पण गाणं ऐकलं तर,
तो पठ्ठया काय म्हणतोय ते काही कळत नाही,
एकदम मजेशीर प्रकार...

यावरुन मग मला उगीचच काही गाणी अाठवली.

९२-९३ मधे दुरदर्शनचं डीडी झालं,
'भारत तेजीसे इक्किसवी सदीकी तरफ' वगैरेचा काळ, असो.
तर, डीडीवर इंग्लिश गाण्यांचा एक तासाचा प्रोग्रॅम सुरु झाला
तसंही अाता फार चांगलं अाहे असं नव्हे पण तेव्हा अामचं इंग्रजी म्हणजे अगदी 'नवनीत'चं
अाणि हो 'इंग्रजी' कारण इंग्लिशचा ताससुद्धा शाळेत 'इंग्रजी'चा होता
त्यामुळे गाण्याचे बोल कधीच कळायचे नाहीत
कॉलेजमधे ज्यांना कळायचे किंवा कळतातयंत असं जे दाखवायचे त्यांच्याकडे अगदी अादरानं बघितलं जायचं

त्यात कधीतरी एक गाणं होतं - 'दिदी' -
उडत्या चालीचं, ठेक्याचं अाणि फ्रेश डान्स स्टेप्स असलेलं
खलीद नावाचा अरेबिक का अल्जिरियन सिंगर 'दिदि, दिदी, दिदी वो, दिदी ... ' करत गायचा,
मला वाटतं ते तेवडंच अाम जनतेला कळत असावं पण सगळे गुणगुणायचे,
ते अपाचे इंडियनचं 'अॅरेंज मॅरेज' गाणं तसंच...

बाकी तेव्हा सगळी इंग्लिश गाणी 'गन्नम स्टायल'च होती म्हणा

नंतर ९८ चा फ्रांसचा फुटबॉल वर्ल्डकप.
(अामच्यासाठी फुटबॉलचा सॉकर झाला तो १०-१२ वर्षांनी अमेरिकेचं वारं लागल्यावर...)
तर झिदान, बेबिटो, रोनाल्डीनो वगैरे मंडळी फुटबॉल खेळणार,
त्यात अाला रिकी मार्टिन वर्ल्डकप सॉंग घेउन,
'गो गो गो अाले अाले अाले - ला कोपा दा ला विदा', असं काहीतरी,
वर्ल्डकपबरोबर गाण्यात जोश, दंगाच इतका होता की गाण्याचे बोल वगैरेचा कुणी फार विचार केला नाही,
ते 'कप अॉफ लाईफ' अाहे अाणि प्रत्येक वर्ल्डकपला एक गाणं असतं तसंच हे वगैरे फंडे नंतर,
तोपर्यंत सगळ्यांनी त्या रिदमवर ती स्पॅनिश बाराखडीच पाठ केली होती...

२००४-०५ च्या गणपतीत 'अा अांटे अमलापुरम्'नं असाच दंगा घातला होता,
हाय-पिच अावाज, दणादण म्युझिक अाणि जबरा रिदम,
मंडळांच्या स्टिरियोच्या भिंतींसाठी तो एक पर्फेक्ट दारुगोळा होता
अाणि मग येडताक गाण्यावर पब्लिकची अगदी देशी येडताक डान्सबाजी
सही मजा यायची.
नंतर कुठंतरी ऐकलं की ते कन्नड का तेलुगू 'अार्या' पिक्चरचं गाणं अाहे,
याच का मागच्या वर्षी हिंदीत पण ते गाणं अालं बहुतेक...

कोलावेरी डी म्हणजे पण एक कहर होता.
हॅंडी-कॅम स्टाइल 'मेकिंग ऑफ' टाइप शुटींग अाणि ते कोण ऐश्वर्या-धनुष वगैरे गॅंग,
त्यात रजनीकांतची मुलगी कंपोजर अाहे वगैरे हाइप,
साऊथवाल्यांसाठी पर्फेक्ट मसाला...
नंतर मग सगळेच अापले फेसबुक-युट्यूबवरुन 'कोलावेरी डी'-'कोलावेरी डी' करायला लागले.

अर्थात अशी खूप गाणी असतील म्हणा,
कदाचित अापलं 'ढगाला लागली कळ' बाहेरच्यांना तसंच वाटलं असेल!
काय म्हणता...

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

गॅग्नम स्टाइल, कोलावेरी डी...

कानावरून ही गाणी आणि त्यांचा ढमढमाट जातात आणि डोळ्यासमोर त्यांची कवायतहि दिसते. तरीपण मला ५०-६० मिनटं यमन आळवणारे भीमसेन, रशिद खान, गंगूबाई, अजोय चक्रबोर्ती हेच आवडतात. जितकं जास्त वेळ आ-ऊ तितकी अधिक मजा!

Strange! I would think...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरंय... अावड अापली अापली.
अाम जनतेला कदाचित तो ढमढमाट करायला अाणि कवायती करायला सोपी म्हणून अशी गाणी आवडंत असावीत...
अर्थात क्लासिकल आणि पॉप असं दोन्ही आवडणारा वर्ग मोठा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हवा हवा ए हवा खुशबू लुटा दे - हे गाणं ही धांगडधिंगा रिदम नसलं तरी रिदमीकच. जादू असते या अर्थहीन पण तालबद्ध (रिदमीक) गाण्यात. आदिमानव नक्की कोणती कला पहीली शिकला असेल? बहुतेक पावसाच्या तालावर (रिदम) नाचायला शिकला असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अाणि हे गाणं अाठवल्याबदल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'हवा हवा' हे गाणे ज्या मूळ पर्शियन गाण्यावरून घेतले ते 'कौरूश याग़मायी' या गायकाचे गाणे इथे पाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वल्डकप फुटबाँलच्या वेळी शकिराच THIS TIME FOR AFRICA हे गाण फेमस हो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

अमुक आणि रंग यांची यादी जबराट आहे. हीच गाणी माझीपण फेव्हरीट आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्त विषय.. बरीच गाणी डोळ्यासमोरून गेली, त्यातील बहुतेक वर प्रतिसादात आली आहेत.

बाकी ते 'माधुरी सिक्षित मिली रस्तेमे' याही गाण्याला अर्थ फारसा नाहीच , रिदम मात्र एकसुरी असला तरी मजेदार आहे. आम्हाला शाळेत ते भलंमोठ्ठं गाणं 'तोंडपाठ' असणं प्रतिष्ठेचं होतं असं आठवतं Wink
ब्रेथलेस बाबतही तेच, शब्दापेक्षा ब्रेथलेस रिदमलाच महत्त्व

मराठीत या पठडीतलं कोंबडी पळाली हे पटकन आठवलं

बाकी, ऐसीवरच्या पहिल्यावहिल्या लेखनाबद्दल अभिनंदन! Smile
आता नियमीत लिहित रहा! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!