सुन री पवन

http://www.youtube.com/watch?v=FSbTl3kEyMI

'सुन री पवन' या अनुराग चित्रपटातल्या अप्रतिम गाण्याचं हे रसग्रहण नव्हे, त्यातल्या व्हिडिओची ही रनिंग कॉमेंटरी. गाण्याची टिंगल करण्याचा हेतू नाही. केवळ मौजमजा.

गाण्याची सुरवात होते तेंव्हा, प्रथम एक पामेरियन कुत्रे बीचवर धावताना दिसते. एक गुब्बु मुलगा बीचवर बॉल खेळताना दिसतो न दिसतो तोच, मौशुमी वाळूचे घर बांधताना दिसते. निळ्या साडीत गाताना ती आपले सुळे चमकवत असते. पाठीमागे आणखी बर्‍याच निळ्या साडीतल्या मुली दिसतात, फक्त त्यांच्या धुवट साड्या असतात आणि चेहेरे हे, 'आपण यांना का पाहिलत' या कार्यक्रमासारखे असतात. त्या सगळ्या अंध असाव्यात अशी शंका येते. तेवढ्यात मौशुमी केसांना वाळूचे हात लावत उभी रहाते आणि दुसर्‍याच क्षणी ते प्रचंड काटेरी फिरणारे व्हील दिसते. अशा तर्‍हेने या सगळ्या मुली का आंधळ्या झाल्या, त्याचे कारण दिग्दर्शकाने खुबीने दाखवले आहे. पुन्हा आपण एक समुद्राचा लाँग शॉट बघतो, यावेळेस त्या मुलाबरोबर पुन्हा एकदा पामेरियनचे दर्शन होते. मौशुमी नव्यानेच अंध झालेली असावी कारण ती सारखी, वाटेत येणार्‍या प्रत्येक वस्तुला धडकत चालत असते. मात्र त्या टोकीदार चाकाच्या अगदी जवळून जाऊन सुद्धा तिचे डोळे फुटत नाहीत त्यामुळे आपला जीव भांड्यात पडतो. मौशुमीचा 'आय विल लिव्ह नो स्टोन अन्टर्नड' स्टाईलने पैदल प्रवास चालूच असतो. तेवढ्यात पहिले कडवे संपते आणि मधल्या म्युझिक पीसेसच्या वेळात डायरेक्टर परत त्या मुलाला दाखवतो. श्रीमंत घरातला तो मुलगा बॉलला कीक मारतो आणि बॉल मौशुमीच्या बांधलेल्या घराजवळ येतो. पाठोपाठ मुलगाही घरंगळत येतो आणि पर्वा नसल्यासारखा, एका घरावर पाय देऊन, बॉलला कीक मारताना दुसरे घरही उडवतो.(त्याची शिक्षा त्याला पुढे, सिनेमात मिळणार असते)

आता मौशुमी झोपाळ्यावर पोचलेली असते आणि तिथे बसून ती तिचं दुसरं कडवं सुरु करते. तिची केअरटेकर(ही मात्र सुंदर असते) तिला धरुन पुन्हा परतीचा गायडेड प्रवास सुरु करते. पण मौशुमीची इतरांना धडका देण्याची हौस फिटलेली नसते. परतीच्या प्रवासातही परत ती त्याच अंध मुलीला धडक देते.(अरेरे, त्याठिकाणी आपण हवे होतो, असा विचार प्रत्येक पुरुष प्रेक्षकाच्या मनांत आल्यावाचून राहिला नसेल) दुसरं कडवं संपायच्या बेताला मौशुमी परत ओरिजिनल जागी येते. तिला त्या केअरटेकरला ते घर दाखवायचं असतं. पण चाचपडल्यावर ते उध्वस्त झाले आहे हे तिला समजते. एवढे सगळे बघितल्यावरही त्या मठ्ठ मुलाच्या डोक्यांत प्रकाश न पडल्यामुळे तो, 'तुम्हे दिखता नही?" असा मूर्ख प्रश्न विचारतो. बहुतेक, प्रत्येक प्रेक्षकाला ती आंधळी आहे हे कळावे, म्हणून हा डायलॉग घातला असावा.

गाणे ऐकताना मौशुमी अकेली, अलबेली असून तिला कोणीतरी साथी हवा आहे हे कळते. 'पूरवैया पवन' ला उद्देशून जरी ती हे म्हणत असली तरी तिच्या भावना उचंबळून आलेल्या असतात हे सूज्ञ प्रेक्षकाला सहज कळते.( इतके अप्रतिम, सुंदर बर्मनी गाणे म्हटल्यावर तिला पुन्हा एकदा याच बीचवर येऊन 'वो क्या है' हे एलपी स्टाईल भिकार गाणेही म्हणावे लागते हे तिचे दुर्दैव!)

मौशुमीसाठी लताबाईंनी मात्र, खास ठेवणीतला आवाज लावला आहे.

field_vote: 
3.25
Your rating: None Average: 3.3 (4 votes)

प्रतिक्रिया

हा हा हा! हे गाणं आता खास लक्षात रहाणार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Biggrin भारीय रनिँग कॉमेँट्री.
गाणं खरच ऐकायला छान आहे. आणि सुळे वाल्या मौसमीचे केस आवडले मस्त उडतायत वार्याने.
पल्लवी जोशीचा भाऊ आहे का तो लहान मुलगा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>पल्लवी जोशीचा भाऊ आहे का तो लहान मुलगा?

नाही. मास्टर सत्यजित - http://en.wikipedia.org/wiki/Satyajeet_Puri

सुरवातीला मौसमी आवडायची पण नंतर मुनमुन सेन दिसल्यावर, तिचे यादीतले मानांकन खाली गेले. Smile

प्रेक्षकांना कळावे म्हणून संवाद कसे डफ्फर लिहले जातात यावर हम साथ साथ है का हम आपके है कौन यातील काही संवाद घेउन भडकमकर मास्तरांनी सोदाहरण स्पष्ट केल्याचे आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओके सत्यजीत पुरी नाव का... धन्यवाद.
बर्याच चित्रपटात असायचा तो मुलगा.
मधे रेडीफवर एक सिरीज आलेली, बर्याच चित्रपटात दिसणारे पण त्यांची नावं सर्वसामान्यांना माहीत नसतात असे कलाकार. छान होती ती सिरीज. लिँक मिळाल्यास देइन इथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मौशुमीताई कोणे एके काळी बारीक होत्या तेव्हा आकर्षक होत्या खर्‍या!

गाण्याची टिंगल करण्याचा हेतू नाही.

अरेरे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

म्हणजे ऑडिओ गाण्याची टिंगल करायची नाही असे म्हणायचे होते, कारण लताबाईंनी ते फारच छान गायले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता मला हे गाणं 'सलमा आगा' स्टाईलमधे ऐकायला आवडेल.

हे गाणं बघण्याआधी फक्त ऐकलं असतं तर कदाचित +१ म्हटलंही असतं, पण आता शक्य नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कुणीतरी हेच गाणे किती सुंदर चित्रीत झालेय असेही लिहू शकेल.
मराठी आंतरजालावरील चित्रपट परिक्षणे वाचू नये अन आता गीतांचेही परिक्षण वाचू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

गेले दोन दिवस तेच गाणं गुणगुणतो आहे. डोक्यातून जात नाही. बायको कावली म्हणून प्रयत्नपूर्वक बंद केलं तरी अधूनमधून शिटीवर आपसूकच येतं. उगाच तुमचा लेख वाचला झालं! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक सुंदर गाण्यांचे पिक्चरायझेशन इतके भिक्कार असते, की मला सहसा गाण्यावरून पिक्चरचे नांवही आठवत नाही याचा भयंकर आनंद होतो. कधी चुकून टीव्हीवर गाणे 'पाहिले' गेले तर या लेखात लिहिलेय तसे होते खरे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

अगदी अगदी. असेच कुणी 'रोज रोज आँखों तले' या नितांतसुंदर गाण्याच्या भिक्कार पिक्चरायझेशनबद्दल लिहा बॉ.
कॉमेण्ट्री जहबहर्‍याहा आवडली हेवेसांनल. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

< निळ्या साडीत गाताना ती आपले सुळे चमकवत असते.> Biggrin
पण मौशुमीची इतरांना धडका देण्याची हौस फिटलेली नसते.
प्रत्येक प्रेक्षकाला ती आंधळी आहे हे कळावे, म्हणून हा डायलॉग घातला असावा. Biggrin
झकास आहे " गानावलोकन" !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बारिक मौशुमी ला बघून "सौंदर्य साबुन निरमा - सोनाली बेंद्रे" का आठवतेय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

जबरी आहे रनींग कामेंट्री !! Smile

ह्या चित्रपटातले 'नींद चुराये चैन चुराये' हे गाणे आपल्याला जाम आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0