तारेने जोडलेली गर्दी

मी मला जे वाटतं ते कधी करतच नाही
एक गर्दी माझ्याकडून आपली कामे करून घेत असते

एका तारेन जोडलेली ही गर्दी
माझ्यासोबत चालत राहते रात्रंदिवस

माझा रंग या गर्दीचाच रंग आहे
मी या गर्दीच्याच भाषेत बोलत असतो
ही गर्दी माझ्या घरात-
माझ्या रक्तवाहिन्यांमध्ये
येऊन शिरली आहे

ही गर्दी मला वाहावत नेत असते
उंची शहरांच्या वैभवशाली रस्त्यांमधून
बहुमजली दुकानांमधून

माझ्या सभोवती वस्तूंचे एक जाळे पसरून पडलेले आहे
या वस्तू माझ्या आहेत की नाहीत
हे मला माहीत नाही
किंवा हे की या वस्तू नक्की कशासाठी आहेत

ही गर्दीच ठरवत असते माझ्या वेळा
माझी जगण्याची पध्दत

माझे जीवन
या गर्दीसाठी एक मनोरंजन आहे
ही गर्दी बघत असते माझ्या प्रतिमा
ऐकत असते माझा आवाज
न्याहाळत असते
माझी प्रत्येक हालचाल

इथून तिथवर पसरलेली ही अफाट गर्दी
एका तारेने जोडलेली ही भयंकर वेगवान गर्दी;
ही गर्दी माझ्याकडून आपली कामे करून घेत असते
मी मला जे वाटतं ते कधी करतच नाही…..

अनंत ढवळे

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

कविता आवडली.
'मी एक मुंगी, तू एक मुंगी' च्या चालीवर म्हणायचे तर 'मी एक पेशी, तू एक पेशी' असेही जाणवते आहे.
एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिजमप्रमाणे ही गर्दी तिच्यातल्या एकेकट्या व्यक्तींना स्वतंत्रपणे वागू देत नाही.
आणि तसे कोणी वागण्याचा प्रयत्न केला तर गर्दीची इम्यून सिस्टिम कार्यरत होते.

असे असले तरी हेच इव्होल्युशन आहे.नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली.
पराधीनतेचे वर्णन तटस्थ, मार्मिक.
पहिल्या ओळीत छेडलेली निराशा, मधले सगळे रंग घेउन शेवटीच भेटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिली नी शेवटची ओळ वगळल्यास 'मी नाहीच' किंवा 'मी गर्दीमुळेच अस्तित्त्वात आहे' असे अंतर्बाह्य संख्याप्राधान्य जाणवत राहते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली.
"जेथे जातो तू माझा सांगाती.
चालविशी हाती धरुनिया"
या ओळींचा नवा अर्थ सांगणारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

छान! कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कविता आवडली. पहिली आणि शेवटची ओळ नसती तर उच्च झाली असती.
ती ओळ मला गैरलागू वाटली कारण मला जे वाटतं तेच मी एक्झॅक्टली करतो आणि ते म्हणजे तारेत गुंफलेल्या माळेतला मणी बनण्याची धडपड!
नुकतंच एक छान वाक्य ऐकलं: "In this culture of ours, social conformity masquerades as individual freedom."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ननिंशी सहमत. स्वतःचे स्वातंत्र्य टिकवूनही या गर्दीचा भाग होऊन रहाता येते.

कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वांचे आभार - गर्दीचा भाग होऊनदेखील स्वतंत्र अस्तित्व टिकवता येते - हा या कवितेमागचा विचार नाही हे पुन्हा एकदा सांगावेसे वाटते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0