Trinity:love, sex & vanity

LOVE

प्रेम प्रेम म्हणाजे काय असतं?

तुला माहीतीये?

माहीत असलं तरी काय?

तु नेहमीप्रमाणे उभी राहशील,

आपल्या काजळभरल्या डोळ्यांसकट.

परमेश्वराकडे दोन्ही हात करुन,

डोळे गच्च बंद करशील.

मला गच्च मिठीत घेशील.

सेन्योरा,

प्रेमातलं रॅशनल-प्रॅक्टीकल

मला काही कळत नाही.

कळपांची चरित्रं लिहिण्याचा

मला सोस नाही.

तेव्हा बिवेअर,

माझ्या त्वचेत प्रिझर्व केलेली

सगळी जुनी गंधिल वस्ती

तुझ्या मिठीत झोपेल.

तेव्हा आत्ताच भोगुन घे

हे दगडी मौन

मी पुन्हा कधीतरी

तुझ्यापासुन दुर

एकांतात तुझ्यावर प्रेम करेन.

-------------------------------------------------------------------------------------------------------------

SEX

मी प्रेम शोधत नाहीये खरं.

मी काहीच शोधत नाहीये.

काहीच नसणं हेच आहे ना अ‍ॅब्सोल्युट?

जाणिवेच्या भिंती

कोसळुन पड्ल्या, तरी

पुन्हा उभ्या रहातायत!

एकदा प्राण घेतला तरी

तो कावळा कसा

तिथेच बेसावध फिरतोय?

बाप मेल्यावर केस भादरुन,

विदुषक पुन्हा पुन्हा का हसतोय?

जिथे माझे ठसे आहेत

ते प्रदेश माझे नाहीत

पुन्हा मागे फिरुन पाहिलं,

त्या वस्त्या,ती बेटं

हेही आता उरले नाहीत.

आता पुन्हा जांघेतुन देह

आरपार नेण्याचा

पर्याय असेल मला?

पहाटे पहाटे

डॉन जुआनच्या पेंटींगमागे

मी लपवलाय आरसा

--------------------------------------------------------------------------------------------------------------

VANITY

माझ्या गंधाच्या थारोळ्यात

पडलेलं तुझं शरीर,

स्वतःशीच घे गोंजारुन

आणि चर्चबेल ऎकत,

मी घेतो दगडी श्वास.

ते बघ,

वहात चाललेत

स्ट्रीट्लाईट्खालुन असंख्य

शिळॆ देह,

हाडामासांची ओझी वहात,

मॆंदुतल्या इल्युजन्सशी

मास्टरबेट करत

केऑसबरोबर जगणारे

समांतर हात

आणि

आपण दोघेही पसरलो आहोत,

तिथेही

स्ट्रीट्लाईट्खाली

कुणाच्या न कुणाच्या तरी

टाळक्यात दबा धरुन,

वसंताची वाट पहात.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

ह.ज.क. स्वाक्षरी छान आहे.
बाकी कविता काय आपल्याला कधीच कळत नाहीत. त्यामुळे पास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे हरवलेले जहाज पक्षी कविता फक्त आणि फक्त घासकडवी किनार्याला लावू शकतात Wink
हलकेच घ्या

कविता नेहमीप्रमाणेच बाऊंसर गेली
साँरी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.