नार्सिससचा स्वप्नदोष

काचेच्या भांड्यातल्या गोल्डफिशसारखा
विहरतो तो स्वच्छंद लिमिटेड अवकाशात
अन् तापलेल्या सूर्याच्या तोंडावर मिटून कवाडं
प्रतिबिंब पाहतो काचेत अ‍ॅनिमिक प्रकाशात

बांधलेल्या आखीव मॅग्नेटिक रस्त्यांवर
गुळगुळीत मॅगलेव्हने जाताना भर वेगात
ऑटोपायलटवर टाकलेल्या आयुष्याला
रस्ता सोडून जायचं येतच नाही मनात

क्षणात रंग बदलणार्‍या बत्तीस बिटी भिंती अन्
आकार बदलत्या नॅनो फर्निचरच्या गराड्यात
कंटाळाच भरून राहिलेला असतो मख्खपणे
त्याच्या वेल इंजिनिअर्ड पिळदार शरीरात

चौघांचं चौकोनी चतुरस्र कायदेशीर कुटुंब
पसरलेलं जगभर ताणून एकेका कोपर्‍यात
स्वतंत्र, स्वतःचा असतो तो संपूर्णपणे
यंत्रांच्या आधाराने या एकविसाव्या शतकात

दचकून उठतो तो रोज गुडघ्यातलं डोकं काढून
स्वप्नातल्या जंगलाच्या मादक वासाने
अन् डिझायनर लाईफच्या शुभ्र चादरीवरचे
निरर्थकतेचे डाग पाहात बसतो सुन्नपणाने

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

'भरल्या पोटी जर बघतो आम्ही चंद्र, आम्हालाही कुणाची याद आली असती'
ही रिकाम्या पोटीची कविता, तर वरची भरल्या पोटीच्या विफलतेची कविता. एकंदरीत वैफल्यच जर प्राक्तनात असेल तर पोट रिकामं असलं काय, भरलं असलं काय...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरंय. कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम!
पूर्वप्रकाशित आहे काय? वाचल्यासारखी वाटते आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद!
पूर्वप्रकाशित नाहीय, पण चार-पाच महिन्यांपूर्वी इथल्या कवीमंडळाच्या शंभराव्या बैठकीत वाचली होती. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्याला नर्सिससचा इन्वर्टेड कॉम्पेक्स म्हणता येईल काय ? पण नाही. हे तसं नसावं.कवितेतली, नर्सिससला न्याहाळणारी त्याची प्रतिमाच असावी.

कोणतं नातं मॅच्युअल असतं?समजा,असलं तरी नात्यातल्या प्रेम,तिरस्कार ह्या भावना एकतर्फ़ी असू शकतात.आपण 'ज्या कारणासाठी' एखाद्यावर प्रेम करू, तो 'त्याच कारणासाठी' आपला तिरस्कार करत असण्याची शक्यता जास्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण 'ज्या कारणासाठी' एखाद्यावर प्रेम करू, तो 'त्याच कारणासाठी' आपला तिरस्कार करत असण्याची शक्यता जास्त.

भन्नाट. सुरेख वाक्य!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे आले.
भरल्यापोटी निराशगाणे सुरु.
सुख टोचणं म्हणतात ते हेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

दचकून उठतो तो रोज गुडघ्यातलं डोकं काढून
स्वप्नातल्या जंगलाच्या मादक वासाने

If he hears a wild call how much ever feeble it may be then there is hope!!!
Great poem!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आँटोपायलटवर टाकलेल आयुष्य!:-)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Wish you were here...

अगदी!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नगरी निरंजन जी !
मला ही कविता अगोदर वाचल्याच नक्की आठवतय तेव्हा पण खुप आवडली होती.
हेमंत दिवटे च्या कवितांच्या जातकुळीतील सुंदर कविता खुप आवडली. आधुनिक आयुष्यातील निरर्थकतेची अतिशय अर्थपुर्ण अभिव्यक्ती वाटली.
"विहरतो तो स्वच्छंद लिमिटेड अवकाशात" ही ओळ तर निव्वळ अप्रतिम.
तुमच्या इतर कविता कुठे वाचायला मिळतील ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री.नगरी निरंजन यांचे ऐसीअक्षरेवरील लेखन इथे वाचता येईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद ऋषिकेश.
कुमारकौस्तुभ, मी काही सिरियस कवी वगैरे नाही. मिसळपाव आणि ऐसीअक्षरे या दोन सायटींवर(च) अधूनमधून वाटेल ते आणि वाट्टेल ते टाकत असतो.
हे लिहिलेलं आवडलं हे वाचून आनंद वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण आवडेल असं लिहीत नसून त्रास होइल असं लिहीत असता हे नमूद करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars