कत्तें चढ गये - नज्म हुसैन सईद

कार्तिक महिना आलाय
असं म्हणतात की या मौसमात सारसी येतात

वारा न जाणवण्याइतपत संथपणे वाहातोय
हवेत थंडी दाटून राहिलीए

असं वाटतं हे प्राचीन शहर
एक प्रदीर्घ प्रवास करत-करत
नव्या जगाच्या वेशीवर येवून ठेपलंय

घरे तशीच आहेत
रस्तेही तेच आहेत
पण काहीतरी बद्लून गेल्यासारखं वाटतंय

लोकही तेच आहेत - त्यांच्या डोळ्यांमधलं दव
एव्हाना अभाव आणि निराशांना सरावून गेलंय

कार्तिक महिना आलाय
असं म्हणतात की या ऋतूत पानगळ सुरू होते

पावसाचे दोन थेंब खिडकीच्या तावदानांवर पडतात
एकमेकांकडे ओघळून एकत्र होतात
आणि पुन्हा विलग होऊन
खाली पडू लागतात
जश्या घरकामात गढून गेलेल्या बायका
अचानक भरून आल्यानं
हळुवार डोळे पुसतात
सरसावून पुन्हा कामाला लागतात

----
कवी - नज्म हुसैन सईद
अनुवाद - अनंत ढवळे
कवी अमरजीत चंदन यांनी या कवितेचा इंग्रजीत अनुवाद केला आहे. हा अनुवाद व अनुवादाचे इतर पाठ खालील संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.

http://www.mptmagazine.com/page/translate/?tid=524

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

देवनागरीत लिहिलेली परंतू मूळ नज्म कुठे मिळेल?
सारसी म्हणजे काय?

बाकी स्वतंत्र कविता म्हणून आवडली पण अनुवाद कसा आहे हे सांगणं कठीण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सारस म्हणजे क्रेन...मूळ कविता पंजाबीत आहे. वर दिलेल्या संकेतस्थळावर कवीच्या आवाजात ऐकता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविंबद्दल आपल्या शब्दांत दोन ओळींची माहीती मिळाली तर छान वाटेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अनुवादित कविता आवडली. पुढील भाग उल्लेखनीय वाटला:

पावसाचे दोन थेंब खिडकीच्या तावदानांवर पडतात
एकमेकांकडे ओघळून एकत्र होतात
आणि पुन्हा विलग होऊन
खाली पडू लागतात
जश्या घरकामात गढून गेलेल्या बायका
अचानक भरून आल्यानं
हळुवार डोळे पुसतात
सरसावून पुन्हा कामाला लागतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0