राजकारण । पक्का बंदोबस्त

भारतामध्ये आमुची आधारभुत असलेली खरी समस्या सामाजिक, धार्मिक,व सांस्क्रुतीक आहे. या व्यतिरिक्त ज्या काही समस्या आहेत त्या मुख्य समस्येच्या शाखा आहेत. जसे की चमचा युग या आधारभूत समस्याची एक लहान शाखा आहे.
भारतातील जो धर्म आहे.तो धर्मशास्त्रावर आधारीत आहे.त्याची विचार व विशेषता एकदम वेगळी आहे.धार्मिक विचार केवळमात्र नियंत्रणच ठेवत नाही तर यामधुन जातिय संस्क्रुती निर्मान झालेली आहे.इतर देशामध्ये धर्म व्यक्तीचा व्यक्तीगत प्रश्न आहे पण भारतामध्ये असे नाही धर्म व संस्क्रुती या एकाच पैशाच्या दोन बाजु आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जातीच्या समस्येवर दोन मोठे प्रस्ताव ठेवले आहेत. भारतातील जाती , त्यांची निर्मिती व कार्य आणि जातीचा अंत.
प्राचीन काळी जातीची समस्या दिसत होती व जातीच्या प्रतिबंधनला कठोरपणे लागू केल्या जात होत्या ती जातीची समस्या देशामध्ये जशीच्या तशी आहे.उदा. १)नेहरूंच्या कार्यावर लक्ष दिले असता १९५७ च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ४७% ब्राह्मण निवडुन आणले त्या व्यतिरीक्त २२.५% एस.सी. / एस.टी. गुपचुप संसद मध्ये बसुन राहत होते. परंतू १९८० नंतर हे जातीचे समीकरण बदलत गेले. विशेष करून जेंव्हा अस्प्रुश्य जातीचे बाबू जगजीवनराम यांनी पंतप्रधान बनण्याची इच्छा व्यक्त केली तेंव्हा इंदिरा गांधींनी १९८० मध्ये बहुमत मिळवण्यासाठी १५% क्षत्रिय आणि ३६% ब्राह्मणांना निवडुन आणावे लागले. २) ब्राह्मण मुळचे आर्य अहेत पण भारत लोकशाहीप्रमाणे ज्याची संख्या जास्त त्यांची सत्ता हे समीकरण आहे. अल्पसंख्येमुळे सत्ता मिळणे कठीण म्हणुन मग "गर्व से कहो हम आर्य है " म्हणनारे "गर्व से कहो हम हिंदू है" म्हणू लागले. ३) शिवसेना या पक्षाच्या नावातून "शिव" हा शब्द जर काढला तर ठाकरे परीवाराला साधी सरपंच निवडणुक जिंकणे मुश्किल होऊन बसेल. त्यामुळे त्यांनी शिवरायांच्या नावाचा वापर करून शिवरायांचंच राजकारण केलं.बाळासाहेब ठाकरे हे पुर्वी मराठी झेंडा घेऊन राजकारणात उतरले होते पण महाराष्ट्राबाहेर काही डाळ शिजली नाही त्यामुळे लगेच मराठी झेंडा टाकून हिंदुत्वाची मशाल हाती घेतली. ४) आत्ताचं उदाहरण म्हणजे ब्राह्मण - मराठा वाद हे आहे. काही संघटना आहेत त्यांचं सतत काहीना काही चाललेलं असतं. मग ब्राह्मणांना शिव्या देणं त्यांचा अपमान करणं म्हणजे बाकिचे बहुजन आणि मुस्लिम पाठींबा देतील हा ही एक राजकारणातीलच भाग आहे. अशी काही ठळक उदाहरणे देता येतील.
आपलं राजकारण हे अत्यंत भावणीक आहे.मुसलमानांना सांगितलं जातं की तुम्हाला शिवसेनेचा, भाजपचा धोका आहे आम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला मुसलमानांचा धोका आहे.अर्धे इकडे घालायचे अर्धे तिकडे घालायचे म्हणजे कधी सरकार पंजाचं येणार कधी छक्क्याचं येणार पण आपला काय फ़ायदा ? याचा गांभिर्यानं समाजामध्ये विचार झाला पाहिजे.आपल्या देशामध्ये नेमकं होतं काय की चांगली माणसं राजकारणात येऊच नयेत याचा पक्का बंदोबस्त केलेला असतो.काय सांगितलं जातं की राजकारण वाईट आहे, पैसा वाल्याचं आहे, दादागिरी करणार्याचं आहे, वशिलावाल्याचं आहे, त्याला कोणीतरी
गॉडफादर पाहिजे, त्याच्या खानदानात राजकारण पाहिजे. तरच माणुस राजकारणी होऊ शकतो.शुद्ध अफ़वा, लोकशाहीमध्ये यातलं एकही चालत नसतं. तुम्ही आम्ही चांगली माणसं याकडे दुर्लक्ष करतो म्हणुन यांचं फ़ावतंय. उदाहरणच पहायचं झालं तर विदर्भात गेलात तर आमदार बच्चू कडू आणि पश्चिम महाराष्ट्रात गेलात तर खा. राजू शेट्टी, हे दोन राजकारणी पैसा नाही, गॉडफादर नाही फ़क्त कार्यकर्ते तरी पण हे चारीमुंड्या चीत करून कारखानदाराला हरवून विजयी होऊ शकतात. हे आपल्या समोरील उदाहरण आहे.
आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या आमदाराचं कसं काय ? काय खरं नाही, त्याचं कसं काय ? पडण्याची शक्यता आहे, याचं कसं काय ? येण्याची शक्यता आहे, हसन मुश्रीफ़चं कसं काय ? १००% निवडुन येणार.यी देशामध्ये मुस्लिम निवडुन येंणं किती अवघड आहे हे आपल्याला चांगलं माहीत आहे.कारण मुसलमानांचा काटा काढणं अत्यंत सोपं आहे ,तो मुसलमान आपला काय संबंध ? भले भले मतदान करत नाहीत.
निवडणुका आल्या की आपण काय करतो ? ह्यो माझा, या पक्षाचा,त्या पक्षाचा, या गटाचा, त्या गटाचा, ह्यो आहे इकडं तर तो तिकडं आणि त्यामुळं नालायक लोकं निवडुन येतात म्हणजे आपल्या पुढं दोन नालायक उभे असतात त्यापैकी एका नालायकाला निवडुन द्यायचं असतं हे देशाचं सर्वात मोठं दुखणं आहे. उमेदवार कुठुन लादला पाहिजे ? उमेदवार मतदार संघातून लादला पाहिजे इथे गॉडफादर वरुन उमेदवार लादतो म्हणुनच आपल्या देशाचा बोरा वाजतोय.
येथे एकच सांगु इच्छितो की कशाप्रकारे जातीचे समीकरण बदलल्यामुळे सत्तेवर नियंत्रण बनतं व बनुन राहू शकतं आणि हे सर्व थांबवायचं असेल तर राजकारणात चांगली माणसं गेली पाहिजेत. राजकारणात चांगली माणसं जाण्यासाठी प्रबोधन घडले पाहिजे. कारण जमाना बुलेट चा नाही जमाना ब्यालट (Ballot)चा आहे.राजा आता राणीच्या पोटी पैदा होत नाही तर मतदानाच्या पेटीतून पैदा होतो ही ताकद बाबासाहेबांनी तुम्हाला - आम्हाला दिली आहे तीचा वापर करा आणि जर विकासच घडवायचा असेल तर राजकारणात आणी प्रशासनात चांगली माणसं आली पाहिजेत. राजकारण लढवायला चांगली माणसं तयार करा आणि या प्रस्थापिताला मातीत गाडण्याची तयारी ठेवा.
हेच आणि फ़क्त हेच देशाला प्रगतीकडे नेवू शकते, देशाला महासत्ता बनवू शकते....

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

जय महाराष्ट्र!! लेख आवडला.

अवांतर - सोर्‍या नादुरुस्त झाला काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजकारणात चांगली माणसं गेली पाहिजेत. राजकारणात चांगली माणसं जाण्यासाठी प्रबोधन घडले पाहिजे. कारण जमाना बुलेट चा नाही जमाना ब्यालट (Ballot)चा आहे.राजा आता राणीच्या पोटी पैदा होत नाही तर मतदानाच्या पेटीतून पैदा होतो ही ताकद बाबासाहेबांनी तुम्हाला - आम्हाला दिली आहे तीचा वापर करा आणि जर विकासच घडवायचा असेल तर राजकारणात आणी प्रशासनात चांगली माणसं आली पाहिजेत.

कृपया चांगली माणसे कशी आणायची यावर प्रकाश पाडाल काय? वाईट माणसे का आणि कशी येतात हे सर्वश्रुत सामान्य ज्ञान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कृपया चांगली माणसे कशी आणायची यावर प्रकाश पाडाल काय?

सोप्पं आहे. सर्व उच्च आणि हुच्च जातीच्या लोकांना निवडणुकीला उभं रहायला आणि मतदान करायला बंदी करा. मग बघा, चांगल्या माणसांचे भरघोस पीक लोकसभेत, विधानसभेत, राज्यसभेत आणि विधानपरिषदेत येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0