ओढ दर्शनाची

तुझ्या दर्शनाची मनास लागली रे ओढ
मन होते कासावीस लागुनिया वेड

काम करता लक्ष नाही कामामधे चूक
नाही जाणीव पोटाला मरते तहानभूक

घर नाही दार नाही विसरतो संसार
जीवनात सार सारे वाटू लागते असार

नामस्मरण राहे मुखी हात टाळामधे गुंग
डोळ्यापुढे चरण तुझे मनी दर्शनाचा चंग

करी जिवाचे सार्थक अर्पिले जीवन माझे
एकदाच डोळे भरून पाहू दे रे रूप तुझे

नाही मोठा मी रे संत ना कुणी महंत
इवलासा जीव माझा होई तू कृपावंत . . .

.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ईश्वरमिलनाची उच्चतम इच्छा प्रकट करूनही न भेटणारा देव कधी कधी क्रूर वाटतो. तो कधीच भेटत नसला तरी तशी कामना करणारे लोक अनरिजनेबल वाटतात. कधी कधी मूर्ख वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

परखड प्रतिसादासाठी आभार, अरुणराव .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0